२५१५, अभंग :- विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२५१५
विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥
तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धी दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥
उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तीरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥

अर्थ
या संसारांमधून तरून जाण्यासाठी कोणत्या उपायाने कोणता उपाय करावा लागेल याचा विचार आम्ही प्रथमच आमच्या मनात केला आहे. त्यावेळी आम्हाला आमच्या हृदही निवासी असलेला देव साह्य झाला आणि त्याने आम्हाला अविनाशी अशी आत्मबुध्दी दिली. आम्ही इतके दिवस संसार समुद्राच्या दुखात पडलो होतो हा संसार समुद्र कसा तरुन जावा या विषयी आम्ही विचार करीत होतो तुकाराम महाराज म्हणतात माझे आता पर्यंतचे आयुष्य संसार दुःखाने खूप दुःखी झाले होते त्यामुळे माझा जीव कासावीस झाला होता.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *