२८५८, अभंग :- आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेत नाहीं:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८५८
आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेत नाहीं ॥१॥
काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥
लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठा सांडी ॥२॥
तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥

अर्थ

लहान मुल आपला हट्ट गोड बोबड्या शब्दात आईजवळ बोलतो परंतू तो त्याचा हट्ट आईला इतका गोड वाटतो की त्यामुळे त्याची समजूत काढण्यासाठी ती तातडी करत नाही. लहान बाळ रडू लागले जास्त हट्ट करु लागले तर आईला त्याचे कौतुक वाटते गंमत वाटते व नंतर त्याची समजूत काढण्याचाही फार आनंद होतो त्याप्रमाणेच देवाने देखील माझे कौतुक करायचे ठरवले की काय हे मला कळत नाही. एखादे वेळी आई मुलाची गंमत करण्यासाठी लपून बसते थोडासा चुकारपणाही करते परंतू मुलाविषयी असलेल्या प्रेमाची निष्ठाला धक्का लागावा असा हेतू मात्र तिच्या मनात नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया वेळी आई आपल्या तान्ह्या बाळाला कठोर शब्दात बोलते देखील त्याला भीती देखील दाखवते परंतू पुन्हा त्याला जवळ घेऊन प्रेमाने आळवते.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *