२७६२, अभंग :- आम्ही पाहा कैसीं एकतत्त्वी झालों । राखणे लागलों वासनेसी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२७६२
आम्ही पाहा कैसीं एकतत्त्वी झालों । राखणे लागलों वासनेसी ॥१॥
तुम्हांविण कांहीं नावडावें या जीवा । केला तोचि देवा दृढ पण ॥ध्रु.॥
वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलेंचि वंदूं आवडीनें ॥२॥
तुका म्हणे कले नामाचें जीवन । वारताही भिन्न नेणों आतां ॥३॥

अर्थ

देवा आम्ही तुमची भक्ती करावी अशी आमची वासना आहे व त्या वासनेचे आम्ही रक्षण करत आहोत पाहा आम्ही कसे एकत्रित झालो आहोत. देवा तुमचेवाचून या जीवाला काहीही आवडू नये असाच आम्ही दृढपण केला आहे. देवा आम्हाला तुझे वर्म कळत नाही परंतू आमची तुझ्याविषयी एकनिष्ठ वृत्ती जी आहे ती आम्ही पांगू देणार नाही आणि जे वंदय आहेत त्यांना आम्ही आवडीने वंदन करु. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुझ्या नामालाच आम्ही आमचे जीवन केले आहे त्यावाचून इतर कोणतीही वार्ता आम्ही ऐकणार नाहीत.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading