२८७४, अभंग :- कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८७४
कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥१॥
शूर मिरवे रणांगणीं । मरणीच संतोषे ॥ध्रु.॥
पाहिजे तो कळवळा । मग बळा काय उणे ॥२॥
तुका म्हणे उदारपणें । काय उणें मनाचें ॥३॥

अर्थ

आपल्या कार्‍याकडे आपण जर एकदृष्टी लावली तर कोणत्याही प्रकारची शंका उत्पन्न होत नाही व आपले कार्य सफल होते. शूर योध्दा रणांगणावरच शोभून दिसतो आणि त्याला जरी मरण आले तरी त्याला संतोषच वाटतो. कोणतेही कार्य करताना त्या कार्‍याविषयी कळवळा पाहिजे तळमळ पाहिजे मग तेथे बळ आपोआप उत्पन्न होते मग तेथे बळाला कोणत्याही प्रकारची उणीव राहते काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्यामध्ये उदारपणा असेल तर तेथे मनाचा काय कमीपणा असणार आहे ?”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *