आपल्या मनातील प्रश्न व उत्तरे, वसंत निमसे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

प्रश्न १- देव कोठे राहातो ?


देव म्हणजे भगवंत त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीत सर्व भूतांच्या ह्रदयस्थानी राहतो. “सर्वस्यचाहम् ह्रदीसन्नीविष्टो.” परमेश्वर चराचर सृष्टीतील सजीवामध्ये राहातो तसा अणू रेणूत राहतो. यत्र तत्र सर्वत्र राहातो. तरीही श्रीमद्भगवद्गीतेत विभूती योगात सांगितले आहे त्याप्रमाणे तो काही ठिकाणी विशेष रुपाने वास करतो.
यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा l
तत्तदेवावगच्छत्त्वं यम तेजोशसंभवं ll


प्रश्न २. देव काय करतो ?
उत्तर देव अखिल सृष्टीचा रचनाकार (निर्माता) व चालकही तोच आहे. त्यामुळे या सृष्टीतील महाकाय तसेच सुक्ष्मातसुक्ष्म जीवांची सर्व जीवाच्या भरणपोषणाची जबाबदारी स्विकारुन या भूतमात्रांच्या भरणपोषण करण्यासाठी सुर्य, चंद्र, ग्रह, तारे, यांचे चक्र चालवतो. पाऊस, वारा, सागर, नद्या, डोंगर, वनौषधी यासर्व गोष्टी परमेश्वर देतो. चार दाणे पेरले तर त्याचे हजार दाणे करुन सर्व जीवाचे पोषण करतो. इतकेच नाही तर प्रत्येकाच्या ह्रदयात राहून आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून त्याची नोंद करतो.


प्रश ३ देव काय खातो ?
उत्तर – देव शुद्ध अंतःकरणाने आणि पवित्र भावाने दिलेले सर्वकाही खातो. पण त्याहीपेक्षा देवाला माणसाच्या ठायी असलेला अहंकार खायला आवडतो, अहंकार हे परमेईश्वराचे आवडते खाद्य आहे. पण माणूस तो अहंकारच देत नाही.

प्रश्न ४ देव केव्हा असतो ?

देव देव अनेकदा हसतो १) माणसाला पाच ज्ञानेंद्रिये, पा कर्मेंद्रिये अकरावे मन आणि बुद्धी देवून बुध्दी वापरण्याचे स्वातंत्र्य देवून ही माणूस सतत रडत कुढत व मागत असतो अशा उदासीन व भिकारी वृत्तीच्या माणसाकडे बघून त्याच्या वृत्तीवर देव कुत्सितपणे हसतो.


२) देव भक्ताला विचारतो का आलास ?

तेव्हा कोणतीही मागणी नसताना केवळ देवाची आठवण आली म्हणून भेटायला आलो आहे. अशा प्रिय भक्ताकडे बघून परमेश्वर आनंदी होवून हसतो.

३) खरेतर यासृष्टीवर परमेश्वराची सत्ता असताना माणूस स्वतःला बुध्दीमान व सत्तधीश समजून माझं माझं करीत सर्वठायी सत्ता गाजवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असतो अशा माणसाकडे बघून देव हसतो.


४) माणूस परमेश्वरानी दिलेल्या बुध्दीचा वापर करुन परमेश्वरावरच मात करण्याचा व देवाला सुध्दा फसवण्याचा प्रयास करतो. अशावेळी माणसांची लबाडी पाहून देव मिस्किलपणे हसतो.

याप्रमाणे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचून जरुर जरुर प्रतिक्रिया कळवावी ही विनंती 🙏
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
श्री वसंत जैतू निमसे.
रा. वेहळोली खुर्द.
ता. शहापूर जि. ठाणे
✏️✏️✏️✏️✏️

वसंत निमसे संकलन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *