अभंग चिंतन :- हिरा ठेविता ऐरणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विजयजी पांढरे सर
9822992578
27-11-2021
vbpandhare@gmail.com

चिंतन

आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगावर चिंतन करणार आहोत .

अभंग आहे .

हिरा ठेविता ऐरणी
वाचे मारीता घणी ll १ ll

तोचि मोल पावे खरा
करणीचा होय चुरा ll २ ll

मोहरा तोचि अंगे
सुत न जळे ज्याचे संगे ll ३ ll

तुका म्हणे तोचि संत
सोसी जगाचे आघात ll ४ ll

– संत तुकाराम

संत कोणाला म्हणावे हा प्रश्न सर्वाना पडलेला असतो , अगदी स्थुल बुद्धीलाही पडलेला असतो व सुक्ष्म बुद्धीलाही पडलेला असतो .

बहुतेक लोक स्थुल बुद्धीचेच असतात म्हणुन स्थुल बुद्धीला संत शब्दाची व्याख्या कळावी म्हणुन या प्रश्नाची
उकल , स्थुल पद्धतीने या अभंगात संत तुकाराम महाराज करत आहेत.

जे खरे संत असतात ते कोणत्याच भयंकर वा अघटीत घटनेने डगमगत नसतात अशी खुण स्थुल बुद्धी साठी संत तुकाराम महाराज या अभंगात सांगत आहेत.
अशा दोन आख्यायिका आहेत की, ऐरणीवर हिरा ठेवुन त्यावर घणाचे कठोर घाव घातले तरी हिरा भंगत नसतो .

किंवा
खरी मोहर तीच असते जिच्या भोवती सुत गुंडाळले व ती सुत गुंडाळलेली मोहोर अग्नीज्वालेवर धरली तरी मोहरेवर गुंडाळलेले सुत अग्नीत जळत नसते .
संत कोणाला म्हणावे हे स्थुल बुद्धीला समजावताना , संतांची स्थितप्रज्ञता दृष्टांत रुपाने सांगण्यासाठी या दोन आख्यायिकांचा उपयोग संत तुकाराम महाराजानी केला आहे .

संत तुकाराम महाराज म्हणतात ,
संत असे घणाच्या आघातानेही न फुटणाऱ्या हिऱ्यासारखे
किंवा
अग्नी ज्वालेवर धरलेल्या मोहरे प्रमाणे असतात ज्या मोहरे भोवती गुंडाळलेल्या सुताला अग्नीज्वाला जाळु शकत नसते.

शेवटच्या कडव्यात तुकाराम महाराज म्हणतात असे सर्व जगाने अशी हेटाळणी केली किंवा अपमान केले किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तरी हे सर्व आघात संत शांतपणे सहन करत असतात व स्थुल बुद्धीसाठी संत ओळखण्याची हीच खुण आहे . स्थुल बुद्धीला वाटते की संताना ईतका त्रास होवुनही संत शांत व स्थितप्रज्ञच रहात असतात .
खरे म्हणजे ,
संताची आत्मस्थिती वेगळीच असते त्याना कोणत्याच घटनेचा आपल्याला वाटतो तसा त्रास होत नसतो वा कोणत्याच घटनेने संत बाह्यरंगातच काय पण अंतरगात देखील विचलीत वा सुखी – दुखी
होत नसतात हे तुकाराम महाराजाना सांगायचे आहे .

जे खरे संत असतात ते कोणी स्तुती केली म्हणुन खुश होत नसतात व कोणी अपमान केला म्हणुन दु:खी होत नसतात . आजु बाजुच्या जगात काहीही घटना घडो , कोणीही मरो संताना दु:ख होत नसते अथवा कोणीही जन्माला येवो त्या घटनेने संताना सुख वाटत नसते .

संत आत्मस्वरुपात स्थीर असतात ते शरीर व मनात किंवा पंचभौतिक जगात बद्ध नसतात , संतानी चार अवस्था निरास अंतरंगात अपरोक्ष अनुभवलेला असतो व शाश्वत अशा जन्म मरण रहीत ,चिरंतन कालातीत तत्वात संत प्रस्थापीत झालेले असतात , परमतत्वात प्रस्थापित झाल्याने , पंचभौतिक जगात घडणारी कोणतीही घटना त्याना विचलीत करत नसते, हे तुकाराम महाराजाना सांगायचे आहे .

स्थुल बुद्धी ला observer is observed समजत नसते ,
स्थुल बुद्धीला Real meditation समजत नसते ,
स्थुल बुद्धीने चार अवस्था निरास अपरोक्ष अनुभवलेला नसतो , शाश्वत चिरंतन असे जन्म मरण रहीत असे कालातीत तत्व स्थुल बुद्धीला माहीत नसते म्हणुन स्थुल बुद्धीला समजेल अशा
हिरा व मोहरा यांच्या
दृष्टांताचा उपयोग संत तुकाराम महाराजानी केला आहे .

पण आजुबाजुच्या अघटीत घटनानी विचलीत न होणे ही काही 100% संत असल्याची खुण असु शकत नाही , अनेक
बथ्थड दगड बुद्धीच्या लोकांवर देखील बाह्य जगतातील घटनांचा परीणाम होताना दिसत नाही म्हणुन काही ते संत होत नसतात .
अपरोक्ष आत्मज्ञानाशिवाय कोणीही संत होत नसतो .

बऱ्याच ठिकाणी अशा
ठार वेड्या व बथ्थड बुद्धीच्या लोकाना संत म्हणुन मिरवताना काही ठिकाणी आपण पहात असतो . ती व्यक्ती बेभान असते , त्या व्यक्तीला आत्मज्ञान झालेले नसते , ती व्यक्ती आत्मज्ञानाची गुरुकिल्ली समजावुन देवु शकत नसते , आजुबाजुची जाणीव देखील त्या ठार वेड्या व्यक्तीला नसते व त्या व्यक्तीची पुजा अर्चा काही लोक करत असतात व त्या वेडगळ व्यक्तीभोवती
आश्रम वा मंदीर व जत्रा भरवण्याचे उद्योग काही स्वार्थी लोक करत असतात व भोळी भाबडी जनता या कारस्थानाला बळी पडत असते .
खरे म्हणजे आपण स्वत: संत झाल्याशिवाय वा आपल्या स्वत:ला आत्मज्ञान झाल्याशिवाय किंवा आपण स्वत: चार अवस्था निरास अंतरंगात अपरोक्षपणे अनुभवल्याशिवाय आपण संताना ओळखुच शकत नसतो हे सर्वानी लक्षात ठेवणे गरजेचे आहे .

केवळ चार अवस्था निरासात
व्हावे आपल्याशीच परीचित ll

किंवा
आपणची व्हावे अंतरंगी संत ,
तेव्हाच संतत्व असे आकळत ll
हेच खरे .
Real meditation मधील
observer is observed
या समजेतुन प्रकटलेल्या
observation without observer मधे प्रकटणाऱ्या
complete dissolution
of consciousness
म्हणजे
अपरोक्ष चार अवस्था निरासातच संतत्व आकळते , हेच खरे , बाकी साऱ्या स्थुल बुद्धीच्या गप्पा . हेच संत तुकाराम महाराजानी अनेक अभंगात नमुद करुन ठेवलेले आहे
.

असो .
: सर्व लेख सूची पहा :-

विजयजी पांढरे सर
09822992578
27-11-2021
vbpandhare@gmail.com

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *