67 दृष्टांत पिंडदानात अडू त्याला नाही सोन्याचे लाडू

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

67 दृष्टांत पिंडदानात अडू त्याला नाही सोन्याचे लाडू

प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले,”माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा स्वीकार करून घ्या.”

जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला.

त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला ,” भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.” त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले,”पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो.

मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.” पंडित म्हणाले ,” बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो.”

या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.

तात्पर्य- कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 16
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *