61 दृष्टांत क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

61 दृष्टांत क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली.

परंतु शेतकरी म्हणाला,” तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील.” चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?.

चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, ” हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू.” हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, ” अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल !

तात्पर्य – जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] 61 क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा 62 भविष्याचे मनात चाळे, वर्तमानाचे केले काळे 63 बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे 64 झालेल्याचा नाही पुरावा, म्हणूनच सत्याचा झाला दुरावा.65 प्रतिभा, माणूस, वेळ तरच जमेल मेळ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *