दृष्टांत 114 चिलमीची आफत, दिन घागरीची करामत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

बोधकथा

एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता. चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला.
मातीने विचारले, “अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होतीस. मग का परत बदल केला ?”
कुंभार म्हणाला, “मी चिलीम बनवत असताना माझी मती बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !”


माती म्हणाली, “कुंभार दादा, तुमची मती बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !”

तात्पर्य :~

जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 22
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *