देवक

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

लग्न (विवाह) देवक मराठी

दे्वक

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) ची परंपरा कशासाठी ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) ईतर जातीत करतात का ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) ईतर धर्मात किंवा देशात करतात का ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) का कशी करावी ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) कशासाठी करावी ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) कधी करावी ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) कोणी करावी ?.

देवक ची स्थापना  (प्रतिष्ठा) कशी करावी ?.

देवक ची स्थापना (प्रतिष्ठा) करून फायदा काय ?.

: विवाह,उपनयन या सारखे मांगी सोहळे अविघ्न पार पडावेत म्हणून मंडपदेवता व विघ्नहर्ता श्रीगणेशा यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे.यालाच देवक ठेवणे म्हणतात.

एक कोऱ्या सुपात किंवा परडीत आब्यांच्या पानाच्या सहा गुंडाळ्या ठेवतात.सूत्रवेष्ठित नारळ ठेवतात.हा नारळ कुलदेवतेचे प्रतिक असतो.पांढऱ्या रंगाचे गाडगे घेतात त्यात अक्षता,हळकुंड,सुपाऱ्या ठेवतात.त्यावर मातीचे झाकण ठेवतात.त्याभोवती सुत गुंडाळतात हे सूत्र वेष्ठित गाडगे म्हणजे अविघ्न कलश म्हणतात.त्यालाच अविघ्न गणपती म्हणतात.आंब्याच्या पानाच्या सहा गुंडाळ्या म्हणजे नंदिनी,नलिनी,मैत्रा,उमा,पशुवार्धिनी व शास्त्रगर्भा भगवती या देवता होत.या सर्वाना आवाहन करून पूजन करतात.देवक पूजन झाल्यानंतर घरातील देवाजवळ किंवा हॉलमध्ये वधू-वर आपापल्या जागेत ईशान्य कोपऱ्यात देवकांची स्थापना करतात.

देवक प्रतिष्ठा ज्यात केलेली असते ते सूप किंवा / परडी घेऊन यजमान याजमानिना वर/वधू व टोकांना असे सर्वजण त्यांना नेमून दिलेल्या जागेत जाण्यासाठी निघातात .त्यावेळेस या मंडळीच्या डोक्यावर सफेद छत्र धरले जाते योग्य जागी आल्यानंतर तेथे पाटावर देवक मांडून त्यांचे बाजूला समई प्रज्वलित करून ठेवतात.यानंतर घरचा आहेर होतो.नात्यातील संबंधित आपापल्या ऐपतीनुसार वधू-वर याजमानिना हळद, पिंजर, अक्षता ,लावून आहेर करतात.यजमान आहेर करणाऱ्यांना नारळाचा मान देतात.

गोत्र ही भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. “धर्मसिंधू” मध्ये गोत्राचे लक्षण पुढीलप्रमाणे दिले आहे.

‘तत्र गोत्रलक्षणम् ऐ विश्वामित्रो जमदग्निर्भद्वाजोsथ गौतम:|
अत्रिर्वसिष्ठ: कश्यप इत्येते सत्पऋषी:|

विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप हे सप्तर्षी होत. शास्त्रने गोत्रांची विभागणी पन्नास गणात केली आहे.

मराठा समाजात सगोत्री विवाह होत नाही. विवाहाची सोयरिक जमविताना देवक, नातेसंबंध हे ही पाहिले जाते.

देवक

प्रत्येक गोत्रास शास्त्रनुसार उंबर, कदंब, पळस, भारंगी इत्यादि वनस्पतींना देवक म्हणून अग्रमान दिला आहे. मौजिबंधन, विवाह यासारखे मंगल कार्य नीट पार पडावेत. कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंडप देवता विघ्नहर्ता गणेश यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे. यालाच देवक ठेवणे असे म्हणतात. मंगल कार्यात देवक ठेवल्यापासून तू उठेपर्यंत दरम्यान कोणाचेही अशौच नसते. देवक उठल्यावर लगेच अशौच सुरू होते. अशौच (सोहेरऐसुतक) येण्याचा संभव असेल तर लग्नापूर्वी दहा दिवस व मुंजीपूर्वी सहा दिवस देव – प्रतिष्ठा बसविता येत असे शास्त्र सांगते.

भारतीय, देवकाचा देव या अर्थी उपयोग करतात, व लग्न, मुंज वगैरे शुभप्रसंगीं याचें (देवदेवक) पूजन करितात. ब्राह्मणांत गणपति, सरस्वती, सप्तमातृका (या क्षुद्र देवता असतात) वगैरे असतात. ब्राह्मणांत जसा सगोत्रविवाह होत नाहीं तसा या खालच्या वर्गांत सदेवक (म्हणजे एकच देवक ज्यांचें आहे) विवाह होत नाहीं. त्यांच्या या देवकांत बहुधां वृक्ष-वेलीच असतात. उदा. आंबा, चिंच, जांभळी, अमरवेल, पिंपळ वगैरे. याशिवाय कुर्हाड, तीर, कट्यार, तरवार, पाणी वगैरेंहि देवकें वरच्या देवकांच्या जोडीस असतात. या देवकांची स्थापना (देवकप्रतिष्ठा) शुभप्रसंगाच्या अगदीं प्रारंभी करतात व प्रसंग संपल्यावर त्यांचें उत्थापन होतें. देवकांत फळांचाहि समावेश होतो. ज्ञानकोशांत निरनिराळ्या जातींची जी माहिती आलेली आहे तींत त्यांच्या देवकांचीहि माहिती आली आहे. (लांग-दि सीक्रेट ऑफ दि टोटेम; फ्रेझर-टोटेमिझम्; डाल्टन-डिस्क्रिप्टिव्ह एथ्नालॉजी ऑफ बँगाल.)

देवक

देवक ही एक देवकल्पना आहे. अनेक अनार्य जाती-जमाती आणि द्रविड वंशातील काही लोक यांच्यात पशुपक्षी, वृक्ष वनस्पती यांची नावे कुळाना देण्याची प्रथा आहे. ज्या प्राण्याचे किंवा वस्तूचे नाव कुळाला मिळाले असेल तो प्राणी किंवा वस्तू त्या कुलाचे देवक मानले जाते. देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा गूढ ऋणनुबंध असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते. ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हे तर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नाहीत. तसेच देवक मानलेल्या वृक्षाची पाने, फळे, फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत किंवा त्या वृक्षाच्या सावलीतही बसत नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की त्याचे सुतक पाळतात.[१]

अनुक्रमणिका

१प्राचीनत्व

२साहित्यातील महत्व

३ समजुती

प्राचीनत्व

देवकाची कल्पना सर्व जगात प्रचलित आहे, असे काही पंडित मानतात. केवळ आदिवासी लोकच नव्हेत ते सेमेटिक, आर्य, इजिप्शीयन हे लोकही देवक मानीत होते असे त्यांचे मत आहे. मोहेंजोदडो येथील प्राचीन अवशेषातही देवकपूजेची लक्षणे काही अभ्यासकांना आढळली आहेत.

साहित्यातील महत्व

रामायणात ज्या वानरांचे वर्णन केले आहे ते पशू नसून मानवच होते, वानर हे त्यांचे देवक होते असे म्हणतात. आजही भारतात हनुमान व जांबवान यांना आपले पूर्वज मानणारे लोक आहेत. महाभारतात तर अशी असंख्य नावे आढळतात. उदा. उलूक, नाग, सुपर्ण इ.

समजुती

खाद्य पदार्थाना देवक मानल्यावर ते पदार्थ खाता येत नाहीत. मग त्याचा पर्याय शोधून काढला जातो. भात हे ज्यांचे देवक असते ते लोक भाताची पेज काढल्यावर तिच्यावर येणारी साय खात नाहीत. मीठ ज्यांचे देवक असते ते लोक नुसते मीठ खात नाहीत, तर ते इतर पदार्थात मिसळून खातात. लोख्न्दाला(?) देवक मानणारे लोक त्याला जिभेने स्पर्श करीत नाहीत.

देवक बसविणे

लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे ‘देवक बसविणे’. वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते. ‘देवक’ म्हणजे संरक्षण. पुण्याहवाचनाचा विधी करताना वधूपिता, वधूमाता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात. हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो. यावेळी देश, काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधूपिता व वरपिता यांचे देवऋण फिटावे, धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो. देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात. कुलदेवतेचे स्मरण करून अविघ्न कलशाची स्थापना करतात. २७ सुपा-यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या ६ देवतांनी नन्दिनी आदि देवतांना आवाहन करण्यात येते. लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात. २७ देवतांची स्थापना तांदूळ, गहू पसरून केली जाते.हे सूप देवापुढे ठेवले जाते. सुपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते. मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घडयासारखे आहे याचे ते द्योतक आहे. ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उपभोगतो येतो. घडयाशी खेळले तर तो भंग पावेल. देवक स्थापनेपासून देवकोत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणा-यांना सोयर-सुतक इ. व्यावहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही. देवक बसते त्याच वेळी घरचे लोक व नातेवाईक, वधू-वर आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात. याला ‘घरचा आहेर’ म्हणतात.

घरातील शुभकार्य व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावे, म्हणून घरात कुलदैवत आणि विविध देवी देवतांची स्थापना करून पूजा केली जाते यांस ‘ देवक ‘ 
पूजणे अथवा ठेवणे म्हणतात. देवक फक्त ज्येष्ठांकडूनच पूजले जाते, अन्यथा घरातील कोणीही पुरूष व्यक्ति चालते.
देवका आधी सर्व धार्मिक विधी कराव्या लागतात, कारण प्रत्यक्ष देवच आपल्या घरी आल्याची भावना असते. म्हणून ब्राह्मणाकडून पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध,
मातृकापूजन केले जाते.
विवाहप्रसंगी वर आणि वधू, दोघांचेही घरी शुभ कार्य असल्याने देवक बसविले जाते.
देवक बसविल्यानंतर त्या घरातील कोणीही व्यक्ति कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावत नाही. एकदा देवक बसविल्यानंतर त्या घरात कांहीही अशुभ घटना
घडली तरी विवाह थांबत नाही अगदी घरात कोणी दगावले असतांना सुद्धां.

लग्न (विवाह) देवक हिंदी

(याने विवाह सम्पत्र कराते समय लगने वाला विशेष पदार्थ जिसमें देवत्व गुण समाहित माना जाता है ।)

भारतीय ज्योतिष में बारह राशियों में 27 नक्षत्रो को बांटा गया है.   इसमें प्रत्येक नक्षत्रका अपना एक विशिष्ट वृक्ष होता है जिसे आराध्य वृक्ष के नाम से पुकारा जाता है  । उसी प्रकार से मराठों की 96 कुलों में अपनी अपनी विशिष्ठ सामग्री है जिनका विवाह के समय होना आवश्यक माना जाता है.  

          मध्यप्रदेश के बडवानी खरगोन जिले के बारले आदिवासी लोग अपने इंदल पर्व पर (लड़का -लड़की का एक दूसरे को पसंद करने का पर्व वे कलम के झाड की छोटी डाल को जमीन में रोपते है तथा इसे वे इंद्र का प्रतीक मानते हैं तथा इस की पूजा के साथ इंदल पर्व को प्रारम्भ करते हैं । यह इंदल पर्व ऋग्वेदकालीन समन (एक दूसरे को पसंद करने का पर्व) का ही रुप है जो अबाधित रूप से चला आ रहा है.   विश्व भर में विशेष पत्तियों का विशेष महत्त्व अलग अलग समुदायों में मानने का प्रचलन है  । ये शुभ तथा कल्याणकारी चमत्कारी शक्तियों से सम्पत्र मानी जाती है  ।

लग्न (विवाह) देवक सामान्यतया इस प्रकार हैं

1 पंच पल्लव (यह अधिकांश कुलों में देवक रुप में प्रचलित हैं  ।)

2 कदम्ब

3 हल्दी

4 स्वर्ण

5 शंख

6 औदुम्बर (उंबर) 

7 केतकी

8 कमल (कमळ)

9 आंकड़ा रुई)

10 साळुंखी का पंख (पर) ( एक पक्षी)

11 जास्वंदी (जासवंदी) वेल

12 पिपल (पिंपळ)

12 आम (आंबा)

13 नागचंपा

14 सोनेकी रुद्राक्ष की माला

15 वेळू –वेत ( बांबू) 

16 गरुड पंख

17 शमी (आपटा)

18 मोरपंख

19 360 दीपक (दिवे)

20 सूर्यकांत मणी (माणिक नावाचे रत्न)

21 छत्र 

22 बड (वड)

• पंच महावृक्ष – या पंच पल्लव

आम.  बड.  पिपल.  औदुंबर .  वेळू  (शिसम) इन की पत्तियां सामान्यतया पंच पल्लव रूप में प्रयोग में लेते हैं  । शीशम आदि की जगह अन्य वृक्षों की लेकर पांच की संख्या पूरी कर ली जाती है  ।

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

6 Comments

  1. पाटील गोत्र आणि देवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *