२८९५, अभंग :- एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८९५
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटोंचि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥
कायावाचामन । स्वरूपेचि अनुसंधान । लक्ष भेदी बाण । ये पाडें लवलाहो ॥२॥
तुका म्हणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥

अर्थ

सर्वत्र एक नारायणच पाहावे जर विषमता पाहीली तर तेथे व्यर्थ क्षीणच उत्पन्न होतो. सर्वत्र नारायण आहेच याविषयी थोडा देखील बदल आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. या प्रपंचातील सर्व प्रकारचे गबाळ सर्व उपाधीचा कोल्हाळ चुकवून, एकांत स्थळामध्ये जाऊन जेथे आपल्याला आनंद वाटेल तेथे नारायणाचे चिंतन करत राहावे. कायावाचामनाने नारायणाच्या स्वरुपाच्या ठिकाणी अनुसंधान करावे. लक्षवेधी बाण ज्याप्रमाणे आपला लक्ष्य साध्य करतो त्याप्रमाणे त्वरेने आपण आपले नारायण हे लक्ष्य साध्य करुन घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “आळस आणि निद्रा यांच्यावर दगड टाकावा. आणि जागृतीमध्येच धैर्य धरुन नारायणाच्या स्वरुपाला मिठी मारावी व त्याला जाणून तुम्ही घ्यावे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *