हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677

हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासना पद्धती, मते, तत्त्वज्ञान आणि संप्रदायांचा समावेश आहे. हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील हिंदू धर्मियांची संख्या साधारण १ अब्ज १२ कोटी एवढी आहे. बहूसख्यांक हिंदू हे भारत, नेपाळ, माॕरिशस आणि इतर देशातही हिंदू राहतात. हिंदू धर्मात अनेक देवी-देवता आहेत. त्यापैकी मुख्य त्रिदेव ब्रम्हा, विष्णू आणि महेश आहेत जे सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण व संहार करतात.

हिंदूनी धर्मातील धार्मिक कृत्य बंद केले.

१) विवाहित, अविवाहित हिंदू स्त्री, युवतीने साडी अथवा नऊवारी पातळ नेसणे बंद केले आहे आणि वेगळाच पेहराव करणे चालू केले आहे. ज्या वस्त्राने अंगप्रदर्शन होते, ते वस्त्र परिधान करणे किती योग्य आहे. यामुळे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. संपूर्ण अंग झाकणारा पेहराव असावा. मुस्लिम स्त्री कधीच अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत नाही.

२)
हिंदू स्त्रियांची कपाळावरचे कुंकू ही एकेकाळी तुमची ओळख होती.
स्त्री ही त्याकाळी रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होत्या.
घरातून बाहेर पडण्या आधी पुरुष कपाळावर गंध लावत होते.
आता पुरुष भोंड्या कपाळाचे बाहेर पडतात.
आज स्त्रियांनी फॕशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध.
तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे.
अशा वागण्याला कुणाला जबाबदार ठरवायचे.

३)
आज बरेच हिंदूनी आपले पारंपारिक सण साजरे करणे बंद केले आणि
वाढदिवस साजरे करण्याच्या प्रथेला सुरूवात केली आहे.
वाढदिवस साजरा करताना केकसमोर मेणबत्ती लावण्यात येते.
त्या मेणबत्तीला फुंकर मारुन विझविण्यात येते.
ही पद्धती आपल्या हिंदू संस्कृतीला शोभा देणारी नाही.
दिवा विझणे एकेकाळी अशुभ मानले जात असे.

४) आज देशात वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे.
आपणांस जन्म देऊन ही दुनिया दाखविणाऱ्या आई-वडिलास वृद्धाश्रमात टाकणे किती योग्य आहे.
आपण आपल्या मुलांना हिंदूचे रामायण ग्रंथ, महाभारत ग्रंथ , भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता कधी वाचायला दिली आहे का?
तुम्ही हिंदू असून एकही ग्रंथ मुलांना वाचायला दिला नाही.

मुस्लिम समाजात कुराण ग्रंथ घरोघरी असतो आणि त्याचे वाचन ते नियमित करतात म्हणून त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात नाहीत.
हिंदूनी आपल्या मुलांना धर्म ग्रंथ वाचायला द्यावा तरच त्यांना आई-वडिलांचे महत्त्व कळेल.
मुलांवर चांगले संस्कार करणे हे देखील आई-वडिलांचे कर्तव्य आहे.

५) मुस्लिम समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते, तेव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरुन मस्जिद मध्ये इबादत / नमाजसाठी जाते आणि इबादत / नमाज हे आपले आयुष्यभराचे ते कर्तव्य मानतात.

हिंदू लोकांनी व त्यांच्या मुलांनी मंदिरात जाणे सोडून दिले आहे.
काही जण देवाकडून काही हवे असेल किंवा दुःखात असतील तेव्हाच देवळात जातात.
तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल,
मंदिरात गेल्यावर काय करावे हे माहित नसेल.
पूजा हे कर्तव्य आहे हे ही त्यांना माहिती नसेल तर ह्यात दोष कुणाला द्यायचा.
आई-वडिलांनी मुलांना योग्य संस्कार देणे गरजेचे आहे.

६) हिंदूची मुलं इंग्लिश शाळेत शिकून कविता करतात, गातात.
याचा तुम्हाला अभिमान वाटतो पण तुमच्या मुलांनी कधी गीतेचे श्लोक पठण केले आहे का?
तुमच्या मुलांनी गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दुःखही होत नाही.

मुस्लिम आपला लहान मूल बोलायला लागल्या बरोबर त्याला मोठ्यांना “सलाम” म्हणायला शिकवतात. पण हिंदूनी नमस्कार आणि प्रणाम करण्याची जागा हॕलो आणि हाय ने घेतली आहे. ह्यात दोषी कुणाला ठरवायचे.


मुस्लिम मुले इंग्लिश स्कूल मधून परतल्यावर उर्दू, अरबी सुद्धा शिकतात आणि कुराण सुद्धा वाचतात.

हिंदूची मुले रामायण, गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत भाषा येत नाही आणि बऱ्याचदा मातृभाषाही त्याला येत नाही. हा दोष कुणाचा आहे?

७) हिंदूकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व काही आहे पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला.

मुस्लिम आजही आपल्या परंपरेशी जुळलेले आहेत आणि हिंदूशी एकोप्याने, भाईचाराने राहतात. हिंदूना आपल्या श्रीमंतीचा, कार्याचा गर्व वाटतो व म्हणतात, आम्हीच श्रेष्ठ आहोत.

८) आज पुरुष स्वतः तिलक, भस्म, यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता.
तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते.
तुम्ही याला अनावश्यक समजता.
या पद्धतीची ओळख दाखवायला ही तुम्हाला लाज वाटते.

९) हिंदूनी आधुनिकतेच्या नावाखाली सकाळी ४ / ५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे.

कोंबडा सकाळीच उठून बाग देतो आणि तुम्ही सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपा काढता.

तुम्ही तुमचे संस्कार,चालिरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात,
याला दुसऱ्याला जबाबदार धरणार काय?

११) तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे शोधून काढा आणि याचा विचार करा.
यात कोण कारणीभूत आहे?

११) आज खरी अडचण ही आहे की, हिंदू समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे,

पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही.
इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत.
त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटूंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. गावात कीर्तन, भागवत, ग्रंथ वाचन ठेवा. तर कुणीही ऐकायला तयार नाहीत.

त्यामुळे तुमच्या समाजातील कोणीही कोणाचे ऐकत नाही. ह्यात दोष हिंदूचा आहे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुस्लिम समाज योगासना सोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतात.

१२) अनेक दशकांपासून तुमची हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे.
आजही तुम्ही तेच करत आहात पण मुस्लिमांनी त्यांची जाळीदार टोपी व पेहरावाची ओळख आजही कायम ठेवली आहे.
जर हिंदूनी त्यांच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजी पणाचा ठपका दुसऱ्यावर का ठेवता?

बोधः- हिंदूनी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.
आपणांस सभ्यतेचा अभिमान बागगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा. संस्कृती पार लयाला जात आहे, तिला जोपासायला पाहिजे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *