84 दृष्टांत दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा !

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

84 दृष्टांत दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा !

एक राजा आणि नगरशेठ यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नगरशेठ चंदनाचा व्यापार करीत होता. एक दिवस नगरशेठला माहित झाले कि, लाकडाची विक्री कमी झाली आहे. हे ऐकताच शेठच्या मनात विचार आला कि राजाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक चंदनाची लाकडे त्याच्याकडून खरेदी करतील. यातून त्याला नफा होईल. संध्याकाळी राजाकडे भेटायला नगरशेठ गेला. त्याला पाहून राजाच्या मना विचाआला कि, नगरशेठने माझ्याशी मैत्री करून अपार धन मिळविले आहे.

एखादा असा नियम बनविला पाहिजे कि ज्यामुळे याचे सारे धन राज्याच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे. एक दिवस नगरशेठला राहवले नाही, त्याने राजाला विचारले, “मागील काही दिवसांपासून आपल्या मैत्रीत अंतर पडले आहे असे का?” राजाने म्हंटले,”मलाही असेच वाटते! चला नगराच्या बाहेर एक साधू राहत आहे. त्यांना याचे कारण विचारू.” दोघे साधूकडे गेले, त्यांना आपली समस्या सांगितली आणि विचारले,” आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट विचार का येत आहेत? कृपया याचे कारण सांगावे” साधू म्हणाले,” राजा आणि नगरशेठ !! तुम्ही दोघे पाहिलं शुद्ध भावनेतून भेटत होता. पण आता तुमच्या मनात वाईट विचार आले असतील ” शेठ्ला साधू म्हणाले,” तूम्ही असा का विचार केला नाही कि, राजा चंदनाच्या लाकडाची माडी बांधेल.

तू राजाविषयी चुकीचा विचार केला. त्यामुळे राजाच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार आला. तुझ्या लाकडाची तेंव्हाही विक्री होणारच होती.” राजाला साधू म्हणाले,” नगरशेठच्या धनाची तू अशा धरलीस त्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले.” त्यानंतर त्यांनी दोघांना मनातील वाईट विचार काढून टाकण्यास सांगितले. चुकीच्या विचाराने मैत्रीत अंतर वाढविले गेले असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर राजा आणि नगरशेठ दोघे परत पाहिल्यासारखे वागू लागले.

तात्पर्य- विचाराच्या पावित्र्यातुनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 38
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *