रामायणातले संस्कृती दर्शन भाग ४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भाग 4


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन रामायणातले संस्कृतीदर्शन पाहुया
रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु होती
तत्र शृण्वन् सुखा वाच:सूतमागधवन्दिनाम् ।
पूर्वां संध्यामुपासीनो जजाप सुसमाहित:।। (अ.कां.6.6)
तुष्टाव प्रणतश्चैव शिरसा मधुसुदनम् ।
विमल क्षौम संवीतो वाचयामास स द्विजाम् ।। (अयोध्याकांड 6.7)
रामचंद्रानी उपवास व्रत केले हे आपण मागील भागात पाहिले. रात्री दर्भांच्या बैठकिवर रामचंद्र निद्राधीन झाले पहाटे उठल्यानंतर श्री रामचंद्रानी सूत मागध वगैरेंची श्रवणसुखद वाणी ऐकुन श्रीरामांनी प्रात:संध्या केली. भगवंताचे प्रात:स्मरण गोड मधुर वाणी ने करण्याची परंपरा वैदिक काऴापासुन आजपर्यंत सुरु आहे.रामायणकाऴी देखील हि संस्कृती होती.सूत मागध, भाट वगैरे मंडऴी या करता विशेष नियुक्त केली जात असे.पहाटेला भूप वगैरे रागांवर आधारीत भूपाऴी ची परंपरा महाराष्ट्रात सुरु आहे. उठी उठी गोपाऴा या सारख्या अनेक भूपाऴ्या आजहि अमर आहेत. वासुदेव, पिंगळी या सारख्या अनेक समाजांनी या काऴातहि हि परंपरा जपलीय या मंडऴीना जपणे हे पूर्वी राजाचे कर्तव्य होते आज समाजाने यांची योग्य दखल घेतली पाहिजे असे वाटते.यांच्याकडे भिक्षेकरी म्हणुन न पाहता एक कलाकार म्हणुन पाहिले पाहिजे व त्यांचा कलेचा आदर व सन्मान केला पाहिजे. ऋग्वेदात प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे 。असे प्रात:स्मरण सुक्त आलय.कराग्रे वसते लक्ष्मी。किंवा समुद्र वसने देवी 。या सारख्या श्लोकांनी आपण दिवसाची सुरुवात आजहि करतो.उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद हे सुबाल्लक्ष्मींनी गायलेले प्रात:स्तवन बरेच जणांच्या मोबाईलमधे ऐकायला मिऴते.अनेक मंदिरात पहाटे सनई चौघडा वाजवुन नौबत करतात काकडा आरती होते हि देखील भगवंताची स्तुतीच आहे हे प्रात:स्मरणच आहे.
भगवंताच्या स्तवनाने दिवसाची सुरुवात मंगल व्हावी हि आपली परंपरा आहे.


मनुस्मृतित देखील एक सुंदर वचन आलय
ब्राह्म मुहुर्त बुध्येत धर्मार्थौ चानुचिन्तयेत् ।
काय क्लेशांश्च तन्मूलान् वेदतत्वार्थमेवच ।। (4-92)
ब्राह्ममुहुर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी चार घटका उठुन धर्म व अर्थ या दोन गोष्टिंना साध्य करण्यास शरीरास किती कष्ट भोगावे लागतील याचा व वेदाचा ब्रह्म व कर्मरुप तत्वज्ञान जे दिलय ते त्याचा निश्चय करावा.
थोडक्यात दिवसभरात धर्म व अर्थाजन या दोघांची सांगड योग्य प्रकारे कशी घालता येईल याचा विचार करुन स्वार्थ व परमार्थ यांचा योग्य विचार प्रात:काली करुन मगच दिवसाची सुरुवात करावी.
रामायणात देखील रामचंद्र याच प्रकाराने वागत होते आता त्यांनाहि मनुवादी हे उपहासाने ठरवले जाईल.
वाधुल नावाच्या ऋषिंनी वाधुल स्मृति नावाचा ग्रंथ लिहिलाय
त्यात ते काय म्हणतात ते पाहा
ब्राह्मे मुहुर्ते प्राप्ते सम्प्राप्ते त्यक्तनिद्र:प्रसन्नधी:।
प्रक्षाल्य पादावाचम्य हरिसंकीर्तनं चरेत्।।
सूर्योदयापूर्वी ब्राह्ममुहुर्तावर निद्रा त्यागुन हातपाय धुवुन आचमन करुन पवित्र होवुन हरिसंकीर्तन करावे.भगवंताचे नामस्मरण करावे.
लवकर उठल्याने धर्म व अर्थ हे दोन्हि प्राप्त होतात अस जर सांगीतल तर लगेच पुरोगामी मंडऴी हा खुऴेपणा आहे हि मनुवादी वृत्ती आहे अस बोलतील
परंतु जर इंग्रजीत हेच म्हटल
Early TO BED.& Early to rise makes the person healthy wealthy & Wise
लवकर झोपणार्याला व लवकर उठेल त्यास आरोग्य, संपत्ती, सद् बुध्दि प्राप्त होते.
लवकर उठण्याचे हे फायदे इंग्रजीतुन सांगीतले तर मात्र आपण विचारवंत होतो.
पुढे सातव्या श्लोकात वाल्मिकी काय म्हणतात ते पाहा.


रेशमी वस्त्र धारण केलेल्या रामांनी मधुसूदन विष्णुची नतमस्तक होवुन प्रार्थना केली नंतर ब्राह्मणांनी स्वस्तिवाचन (पुण्याहवाचन) केले.
आजहि हिंदु धर्मात मंगल कार्यास आरंभ करताना (लग्न, मुंज, वास्तुशांत, साठीशांत वगैरे) पुण्याहवाचन करतात . पुण्याहवाचन याचा अर्थ पुण्य कारक अह म्हणजे दिवस वाचन म्हणजे वाचेने म्हटलले मंत्र.आजचा दिवस पुण्यकारक व्हावा या करता केला जाणारा विधि
आजहि आपण धर्मकृत्यास बसताना “सोवऴे “नेसतो. सोवऴे हे शक्यतो रेशमी वस्त्र (क्षौम वस्त्र) व धुत शुक्ल म्हणजे स्वच्छ धुतलेले हवे रेशीम वस्त्रात सुक्ष्म रोगजंतुंचा प्रादुर्भाव होत नाहि हे वैज्ञानीक सत्य आहे.जुन्या काऴात लोणची पापड, मोरावऴे, गावठि तूप वगैरे वर्षभर टिकणार्या गोष्टि या बरणीत बंद करुन रेशीम वस्त्राने (सोवऴ्याने वेष्टन) करुन देवखोलीत ठेवत असत.प्रिझर्वेटिव न वापरता या तंत्राने या गोष्टि टिकत होत्या व आजहि टिकतात कारण रेशीम वस्त्राचा महिमा.
सहज ओघात आल म्हणुन सांगतो “आर्य हे उत्तर ध्रुवावरुन आले युरोपातुन आले “हा मुर्ख शोध लावणार्या महाभागांना एक साधी गोष्ट कळत नाहि
युरोप हा थंड प्रदेश आहे तिथे कटिवस्त्र परीधान करणे (सोवऴे, धोतर वगैरे) हे शक्य नाहि त्यांना सुट बुट कोट असा बंदपोषाख लागतो. आर्य मात्र सकच्छ वस्त्र नेसत जे उष्ण कटिबंधास योग्य आहे व हे हवामान भारताचे आहे.
वेदात गाय, अश्व, गज यांचे वर्णन आहे.गोसूक्त देखील आहेत अनेक पुराणात स्मतिग्रंथात गो माहात्म्य दिलेय.या बर्फाऴ उत्तर ध्रुवावर रेनडियर हाच प्राणी पाळतात मग आर्य जर बाहेरुन आले असते तर रेनडियरची स्तुती पर काहि श्लोक त्यांनी रचले नसते का? पण तस आढऴत नाहि.


अाता हे वाचल्यावर काहि जण लगेच म्हणतील ते इकडे भारतात रुऴले व त्यांनी हि संस्कृती आपली केली त्यांना म्हणाव इंग्रज जवऴपास पावणेदोनशे वर्षे भारतात उष्णकटिबंधात राहिले मात्र त्यांनी सुटबुट परंपरा सोडली नाहि कि गो पूजन केल नाहि याचाच अर्थ युरोपातली मंडऴी हि इकडे जरी राहिली तरी त्यांनी आपले आचरण बदलले नाहि म्हणजे युरोपीय आपल्या परंपरा बदलत नव्हते हे कऴत तसच आर्यांनी देखील आपली संस्कृती आजहि टिकवली आहे याचे कारण ते याच भूमीतले आहेत.
आपण ज्या परंपरा जी संस्कृती आचरतो त्या मागे अनेक कारणे अाहेत त्यात भौतिक सुखे, परमार्थ, आर्थिक लाभ, आरोग्य या सर्वांचा विचार केला गेलाय.
पुढिल भागात स्नान, ध्वज व पताका या विषयी अधीक जाणुन घेवु व आपल्या संस्कृतीची पाऴेमुऴे किती घट्ट व खोलवर आहेत हे जाणुन घेवु सोबतच फाल्गुन मास आला कि काहि जण ध्वज पताका गुढ्या तोरणे यावर चिखलफेक करायला सुरुवात करतात व याचा चुकीचा अर्थ लावुन समाजाची दिशाभूलकरतात त्यांच्या आक्षेपांना योग्य व साधार उत्तरे देवु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *