भाग 3
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन रामायणातले संस्कृतीदर्शन हा विषय पाहु.
आपल्याकडे संस्कृती व परंपरा या सशास्त्र व साधार असल्याने आजहि अनेक ठिकाणी सुरु आहेत. कालमानानुसार थोडे बदल झालेत परंतु आशय व गाभा तोच आहे.
वाल्मिकी रामायणात अयोध्या कांडात पाचव्या सर्गात राज्यारोहणाचे वर्णन आलय त्यात एक महत्वाचा भाग आलाय
दशरथ राजाने कुलगुरु महर्षि वसिष्ठांना या विधिकरता आमंत्रण दिलय .
कुलगुरु या शब्दाचा अर्थ कुऴाचा गुरु किंवा मार्गदर्शक हा होतो. पुरोहित म्हणजे पुर: हित: जो यजमानांचे हित जाणतो त्यांना पुर:म्हणजे पुढे नेण्याकरता (उत्कर्षा करता) योग्य सल्ला देतो तो पुरोहित जाणावा.कृ.यजुर्वेदात “वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिता:”असे वचन आलय (आम्हि पुरोहित राष्ट्रात जागृत राहू) संदर्भ – तै.सं.1-7-10 अनेक कुलांचे विविध कुलगुरु होते त्यांना त्या यजमान कुऴाचा सर्व इतिहास, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची स्थिती, वागणुक व आचरण या सर्वांची माहिती असते त्यामुऴे ते योग्य निर्णय घेण्यास मदतकर्ते होतात.
फँमिली डॉक्टर यांना जशी अेखाद्या कुटुंबाची आरोग्य, अार्थिक, कौटुंबिक स्थिती, अनुवंशीक आजार यांची माहिती असते व त्या मुऴे ते त्या रुग्णास योग्य सल्ला व उपचार देण्यास सहाय्यक ठरतात तद्वत कुलगुरु हे धर्मचरणाकरता मार्गदर्शक ठरतात आजहि अनेक कुटुंबात हि परंपरागत “पुरोहित “परंपरा सुरु आहे.सुख दु:ख दोन्हि समयी पुरोहित व यजमान हे एकमेकांस मदतकरतात अशी अनेक उदा.पाहण्यात आहेत.
गच्छोपवासं काकुत्स्थं कारयाद्य तपोधन ।
श्रेयसे राज्यलाभाय वध्वा सह यतव्रत ।। (5.2 अयोध्याकांड)
वसिष्ठ म्हणताक नियमपूर्वक व्रताचरण करणारे तपोधन दशरथ महाराज आपण आता जावुन विघ्ननिवारणरुप कल्याण सिध्दि करता श्रीरामांकडुन सपत्निक उपवास व्रत आचरण करुन घ्या.
उपवासाची संस्कृती आजहि आपण आचरण करतोय कि.
उप म्हणजे जवऴ व वास म्हणजे वास्तव्य. देवाच्या भगवंताच्या जवऴ भक्तिच्या हेतुने वास्तव्य करणे हे म्हणजे उपवास .
आपल्याकडे अनेक व्रतवैकल्यात “उपवास ” करा असे शास्त्रवचन आढऴते .राज्याभिषेक हे देखील प्रजापालनाचे व्रतच आहे.
अमरकोशात व्रत व नियम हे समानार्थाने आलेत.वृ या धातुपासुन हा शब्द निर्माण झालाय वृ म्हणजे निवड करणे.
वर हा शब्द देखील यातुनच निर्माण झालाय.यज्ञात “वरण ” देणे म्हणजे योग्य पदाकरता (आचार्य, ब्रह्मा, उपद्रष्टा, होता उद्गाता, ऋत्विज) योग्य ब्राह्मणाची नियुक्ति करणे हे देखील या “वृ “धातुच्या अर्थानेच येते.
ऋग्वेद, यजु, अथर्ववेदात हा “व्रत “शब्द अनेकदा आलाय
महाभारतात ब्राह्मण व क्षत्रिय यांनी तीन दिवसांपेक्षा जास्त उपवास करु नये असे वचन आहे.
उपवास हा आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक आहे त्याचप्रमाणे तो कर्माच्या दृष्टिनेहि आवश्यकच आहे.
पाप व रोग हे संस्कृतमध्ये समानार्थी शब्द आहेत.
शरीरं सत्त्वसंज्ञंच व्याधीनामाश्रयो मत:।
तथा सुखानां योगस्तु सुखानां कारणं सम:।। (चरक सूत्र 1-27)
शरीर व मन हे दोन्हि व्याधींचे आश्रयस्थान मानले गेले आहे त्याचप्रमाणे सुखाचे म्हणजे निरोगी आरोग्याचे आश्रयदाते हेच आहेत.
उपवासामुऴे शरीर व मन या दोघांची शुध्दता आपसुकच होते.
व्यास महर्षि पांडवाना उपदेश करताना म्हणतात
शरीर नियमं प्राहुर्ब्राह्मणा मानुषं व्रतं ।
मनो विशुध्दां बुध्दिं च दैव माहुर्व्रतं द्विजा:।। (महाभारत 3.93-21)
शारीरिक नियम पाऴणे हे ज्ञानी लोक मानवी व्रत समजतात व मनावर जय मिऴवून बुध्दि शुध्द करणे हे दैवी व्रत मानतात.
उपवास हा यत्नपूर्वक च करावा लागतो त्यात शरीर व मन या दोघांचेहि शुध्दिकरण होते.
आपण ज्या श्लोकाचे निरुपण अभ्यासतोय त्यात वसिष्ठांनी देखील यत्नत:म्हणजे प्रयत्न पूर्वक असा शब्द योजलाय.
ओघात विषय आलाय म्हणुन सहज सांगतो
प्रशाम्यत्यौषधै:पूर्वो दैव युक्तिव्यपाश्रयै:।
मानसो ज्ञान विज्ञान धैर्य स्मृति समाधिभि: (चरक सूत्र 1.29)
शारीरीक रोग हे दैव व युक्तिने आश्रीत औषधांच्या सहाय्याने बरे होतात परंतु मानसीक रोग मात्र ज्ञान विज्ञान (हे षड् दर्शनशास्त्रातले जाणावे) धैर्य, स्मृतिग्रंथ व समाधि वगैरे उपायांनी शमन होतात.
उपवासात म्हणजे देवतेच्या सानिध्यात केलेल्या तपामुऴे, समाधिमुऴे मन:शांत होते.
उपवासाचा हेतु हाच आहे.
एखादे कार्य आपल्या हातुन घडायचे आहे त्या आनंदात जर आपण भरपेट तेलकट, तिखट चमचमीत पदार्थ खाल्ले तर दुसर्या दिवशी अपचन, पोटबिघडणे, शौचाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. शरीर बिघडले कि मन:स्वास्थ हि बिघडते
म्हणुन आपल्याकडे योग्य आहार विहार हि बंधने आहेत हि आपली संस्कृती आहे. उपवास करा हे घरच्यांनी किंवा पुरोहितांनी सांगीतले कि लगेच ते “वेडे “ठरवले जातात.
डायटिशीयन ने मात्र फी घेवुन हे सांगीतले कि आपणास त्याचे कौतुक असते.
उपवास म्हणजे भरपेट नवीन पदार्थ (साबुदाणावडे, फराऴी मिसऴ, उपवासाचा चिवडा, काजुगर लाडु वगैरे ) नसुन परमेश्वराच्या जवऴ नियमपूर्वक व प्रयत्नपूर्वक वास्तव्य करणे हेच आहे.
काहि ठिकाणी दुध किंवा फऴ सांगीतलय पण ते पोटभर नसुन केवऴ जठराग्निची आहुती देण्याप्रमाणे जाणावे.
वेदकाऴापासुन आजपर्यंत लक्षावधी वर्षे हि संस्कृती टिकलीय हेच आपल्या धर्माचे वैशिष्ट्य आहे.
जैन, बौध्द, मुस्लिम या अन्यधर्मियांनी देखील हि उपवास संस्कृती स्विकारली आहे कारण त्यांना देखील याचे फायदे समजले आहेत .
राजकीय नेते करतात ते उपवास हे अन्नत्याग या सदरात येतात उपवासात मोडत नाहित कारण ते समर्थकांच्या व मिडियाच्या संनिध असतात “भगवंताच्या जवऴ वास करत नाहित “.
काहि मंडऴी उपवासाचे चुकीचे अर्थ काढुन त्याचा वापर “धमकी “करता करतात तेहि संयुक्त नाहि.
पाकला 55 कोटि रुपये देण्याकरता केलेल्या उपासाचे “पुण्यफऴ “आपले सैनिक व नागरीक रोज भोगताहेत.तेव्हा हा अट्टहासी उपास आपणास नको तर भगवंताच्या जवऴ जावुन व मन व शरीर शुध्द व्हावे या करता प्रयत्न करुया.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले