दृष्टांत 40 नेहमी म्हणतो,”मीच का

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आजची गोष्ट
➖➖➖➖➖➖➖➖
🐂🐂एका गावात एक शेतकरी राहत होता. तो आपल्या शेतीत फार कष्ट करीतअसे. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते. शेती बरीच असल्यामुळे त्याच्याकडे शेतात कष्ट करण्यासाठी पाच-सहा बैल होते. त्यापैकी त्याला पांढऱ्या रंगाची बैलजोडी खूप आवडत होती. बैलजोडी दिसायला खूपच देखणी होती. शेतीतले कामेही खूप चांगल्या प्रकारे ही जोडी करत असे. तसा तो सर्वच बैलावर प्रेम करायचा. सर्वांची चांगल्या प्रकारे सोय करायचा.

पावसाळा सुरू झाला. पेरणीचे दिवस सुरू झाले. सगळीकडे कामाची लगबग सुरू झाली. त्या शेतकऱ्यांने ही पेरणीला सुरुवात केली.

एका दिवशी त्याने आपल्या आवडत्या बैलजोडीला पेरणीला जुपले दिवसभर तिफन चालली. चार वाजता शेतकऱ्यांच्या मुलाचा फोन आला की, “बाबा आज मी सहा वाजता रेल्वेने स्टेशनला आलो आहे मला घ्यायला या”. आता वेळ कमी होता. शेतकरी म्हणाला आपण आत्ताच तिफन सोडली. आणि आता मुलाचा फोन आला त्याला घ्यायला तर गेले पाहिजे. त्याने आपल्या गड्याला सांगितलं “अरे बाबा,आपली पांढरी बैलजोडी डमनीला जुप आणि आपल्याला स्टेशनला जायचे आहे.”लगेच गड्याने पांढरी बैलजोडी डमनीला जुंपली आणि ते मुलाला घेण्यासाठी स्टेशनला गेले. मुलाला घेऊन घरी येईपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.

घरी आल्यानंतर गड्याने बैलजोडी गोठ्यात बांधली त्यांना चारा टाकला आणि घरी निघून गेला. शेतकरी जेवण करून झोपी गेला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. सर्वजण झोपी गेले होते. शेतकऱ्याच्या मुलीच्या पोटात कळा यायला सुरूवात झाली. ती काही दिवसांपूर्वीच बाळंतपणासाठी माहेरी आली होती. आता तिला शेजारच्या शहरात दवाखान्यात घेऊन जावं लागणार. शेतकऱ्यांने आपल्या गडयाला आवाज दिला. त्याला सगळ सांगितला. गड्याने पांढरी बैलजोडी डमनीला जुंपली कारण ती जोराने पळत होते.

बैलांनी खूप मेहनत घेऊन जास्त वाटणारं अंतर कमी वेळात गाठून मुलीला दवाखान्यात पोहोचले. बैलगाडी दवाखान्याच्या बाहेर सोडली. त्या पांढऱ्या बैलजोडीतील एक बैल दुसर्‍या बैलाला म्हणतो “काय रे या शेतकऱ्याकडे सहा बैल आहेत ,आणि आपल्यालाच हा शेतकरी तिफनीला जुपतो, मुलाला आणायला आपल्यालाच सांगतोय,आणि आता शेवटी एवढ्या रात्री दवाखान्यातही आपल्यालाच घेऊन येतो बाकीच्या बैलांना तो काहीच काम सांगत नाही. ते मस्त मजा मारतात. इतक्यात शेतकरी दवाखान्यातून आनंदाने उड्या मारत, हसर्‍या चेहर्‍याने बैलाकडे आला. बैलाच्या पाठीवर हात फिरवतो, त्यांच्या पाया पडतो. आणि म्हणतो, “बाबांनो, तुम्ही माझ्यावर फार उपकार केले,तुम्ही जर आज नसते तर माझ्या मुलीचा जिवच काय पण तिच होणार बाळही वाचलं नसतं. आपल्याला नातू झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. त्याने बैलांना मनोमन धन्यवाद दिले.

आता मात्र त्या पांढऱ्या बैलजोडी तिल त्या एका बैलाला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.आणि त्या दोघांचाही दिवसभराचा शीण निघून गेला.

मित्रांनो, काम त्याच्याकडेच येतात जो प्रामाणिकपणे काम करतो. आपणही नेहमी म्हणतो,”मीच का ? याचे उत्तरही हेच आहे.

एखाद्या वास्तूचे किंवा समाजाचे राखण करायचे असेल तर काही लोकांना जागे राहावे लागते. तरच त्या समाजाचे रक्षण होते नाहीतर, तो समाज नष्ट होण्यास वेळ लागत नाही. म्हणून काही लोकांना जागावच लागते

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 36

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *