अध्याय ५ अष्टावक्र गीता Ashtavakra Gita

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अष्टावक्र गीता – अध्याय ५

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.अध्याय ५अष्टावक्र म्हणालातुझा कोणाशींही संबंध नाहीं, त्यामुळें तूं शुद्ध आहेस. तूं कशाचा त्याग करुं इच्छितोस ? अशा रीतीनें देहाभिमान नाहींसा करुन तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥१॥

अशीच भावना कर कीं, माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे; जसा समुद्राच्या पाण्यांत बुडबुडा उत्पन्न होतो–आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून, तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥२॥

दृश्यमान जगत् प्रत्यक्ष दिसत असलें तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसें आभासरुप आहे. तुला शुद्धाला—-मलरहिताला तें नाहीं, असें जाणून तूं लयाला—-निर्वाणाला प्राप्त हो. ॥३॥दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यु जो समान मानतो असा पूर्ण होऊन तूं लयाला—-मोक्षाला प्राप्त हो.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *