88 दृष्टांत ज्याची निर्भीड जनता, तोच राजा जाणता

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

88 दृष्टांत ज्याची निर्भीड जनता, तोच राजा जाणता
एकदा राजाला जनतेस मार्गदर्शन करण्‍यासाठी निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी राजांना प्रश्‍नही विचारले. त्‍यांची राजाने समाधानकारक उत्तरेही दिली. राजाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्‍स्‍युक्‍य असणा-या लोकांच्‍याही प्रश्‍नांची उत्‍तरे दिली.

याच क्रमाने राजाने लोकांना प्रश्‍न केले. तो म्‍हणाला,” जर मी तुम्‍हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय” मोठ्या संख्‍येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्‍हटले,” नाही, आम्‍ही तुमचा आदेश पाळणार नाही.” हे ऐकताच गर्दीतूनही राग व्‍यक्‍त झाला. राजाने सर्वांना शांत राहण्‍यास सुचविले. त्‍या महिलेला याचे कारण विचारले असताती म्‍हणाली,”तुम्‍ही तुमचे कपडे फार भरजरी आहेत.

माझ्या पतीचे कपडे गुडघ्‍यापर्यंतही येत नाही यावरून असे स्‍पष्‍ट होते की तुमच्‍या शाही भांडारामध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या हिश्‍श्‍यापेक्षा जास्‍त कपडा घेतला आहे.” महिलेला यातून असे सुचवायचे होते की राजाचे बोलण्‍याप्रमाणे वर्तन नाही. यावर राजा म्‍हणाला,”मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.” राजाचा मुलगा पुढे आला व त्‍याने सांगितले,”माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्‍श्‍याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्‍यात मी वाढ केली”

महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर राजा नाराज न होता त्‍या महिलेला धन्‍यवाद देऊ लागले कारण राज्याचा मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्‍याला किंवा धर्माला धोका नसतो.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 35
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *