दृष्टांत 41 सभ्य आचरणाची दैवी शक्ती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आदर

रात्री साडेअकरा वाजता एक वयस्क आई स्वयंपाकघरात भांडी घासत असते तिच्या घरात दोन सुना असतात ज्यांना भांडीच्या आवाजाने त्रास होत असतो आणि त्या आपल्या नवऱ्याला आईला जाऊन बोलायला सांगतात

सुना नवऱ्याला बोलतात तुझ्या आईला रात्री भांडे घासायला मना कर सकाळी पण ५ वाजता उठून पूजा करून आवाज करत असते त्याच्या मुळे आमची झोप मोडते आणि त्रास होतो आम्हाला तुम्ही जाऊन हे नको करू सांगा

मोठा मुलगा उठून किचनच्या दिशेने जातो. वाटेत हीच गोष्ट त्याच्या धाकट्या भावाच्या खोलीतून ऐकू येत होती. त्याने धाकट्या भावाची खोली ठोठावली. लहान भाऊ बाहेर आला.

दोन्ही भाऊ स्वयंपाकघरात जातात आणि आईला भांडी साफ करण्यास मदत करतात,आई नकार देते पण ते ऐकत नाही आणि भांडी साफ झाल्यानंतर दोन्ही भाऊ आईला मोठ्या प्रेमाने तिच्या खोलीत घेऊन जातात, मग आवाज ऐकून त्यांचे वडील पण जागे होतात

दोन्ही भाऊ आईच्या पलंगावर बसतात आणि म्हणतात, “आई सकाळी आम्हाला ही पूजा करायला उठव आणि आम्ही सकाळी वडिलां सोबत योगा पण करू.

आई म्हणाली ठीक आहे
दोन्ही मुले रोज सकाळी लवकर उठून पूजा करू लागले
आई सोबत त्यांनी रात्री ९.३० वाजता भांडी साफ करण्यास सुरवात केली, मग त्यांची पत्नी म्हणाली आई भांडे घासत आहे मग तुम्ही का मदत करत आहात तिला त्यावर ते म्हणाले आमचे लग्न करण्या मागे हे एक कारण पण होते आमच्या आईला मदत होईल पण काही हरकत नाही आम्ही आईला मदत करत आहोत

आमची आई आहे आम्ही मदत करतो यात काही चुकीचे नाही आहे

पुढील तीन दिवसांत घरात पूर्ण बदल झाला सुना लवकर भांडे घासून ठेवायला लागल्या कारण त्यांच्या पतीला भांडे घासावे लागत होते म्हणून सकाळी लवकर देव पूजेला देखील उठायला लागल्या

काही दिवसात संपूर्ण घराच्या वातावरणात पूर्ण बदल झाला.

सुनांनी सासू सासर्यांना पूर्ण आदर करण्यास सुरवात केली. कथा सार

जेव्हा सून त्यांचा आदर करत नाही तेव्हा आईचा आदर कमी होत नाही
जेव्हा मुलगा आपल्या आईचा आदर करीत नाही किंवा आईच्या कार्यात सहकार्य करत नाही तेव्हा आईचा आदर कमी होतो.

जन्माचा संबंध आहे.

आई वडील पहिले आहेत.
🙏💐सर्वांना नमस्कारजी 💐🙏

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 35

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *