दृष्टांत 2 कुसंस्कार अर्थात वाकडा खिळा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते”
【मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय】

काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहि !ला, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते

” वाकड्याना सोडून सरळ जेअसतात त्यानाच ठोकले जाते*”
मग वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?

एक मजूर सहजतेने बोलला
“साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,
जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे


एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल”.
परंतू
तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता



त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )
बर
फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो
तर


चालती गाडी पंचर करणे
चालत्याच्या पायास रुतून जखम करणे
असे उपदव्याप करतो

त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले,
आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, तो सुरुवातीला नीट ठोकला गेला नसल्याने (त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने) तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात.

शेवटीं काय माणसांवर होणारे संस्कार सर्वात महत्वाचे असतात…

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 31

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *