१४९, अभंग :- कपट काही एक । नेणे भुलवायाचे लोक :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 149
कपट काही एक ।
नेणे भुलवायाचे लोक ॥१॥
तुमचे करितो कीर्त्तन ।
गातो उत्तम ते गुण ॥धृपद॥
दाऊ नेणे जडीबुटी ।
चमत्कार उठाउठी ॥२॥
नाही शिष्यशाखा ।
सांगो अयाचित लोका ॥३॥
नव्हे मठपति ।
नाही चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाही देवार्चन ।
असे मांडिले दुकान ॥५॥
नाही वेताळ प्रसन्न ।
काही सांगो खाण खुण ॥६॥
नव्हे पुराणिक ।
करणे सांगणे आणीक ॥७॥
नाही जाळीत भणदी ।
उदो म्हणोनि आनंदी ॥८॥
नेणे वाद घटा पटा ।
करिता पंडित करंटा ॥९॥
नाही हालवीत माळ ।
भोवते मेळवुनि गबाळ ॥१०॥
आगमीचे नेणे कुडे ।
स्तंभन मोहन उच्चाटणे ॥११॥
नव्हे यांच्या ऐसा ।
तुका निरयवासी पिसा ॥१२॥

अर्थ :- लोकांना भुलाविण्यासाठी मी कोणतेही कपटकृत्य करीत नाही. देवा मी फक्त तुमचे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो. लोकांना भूल पाडण्यासाठी मी जडीबूटीचा चमत्कार दाखवित नाही. माझी याचना न करणारी वृत्ती पसरवीणारी माझे कोणी शिष्यमंडळी नाहीत. मी मठपति नाही, मला जमिनींची देणगी मिळालेली नाही. दूकान मांडावे तसे देवाची पूजा अर्चा करण्याचे असे उघड प्रदर्शनहि मी मंडलेले नाही. भुत-वेताळाला वष करुण लोकांचे भविष्य जाणणारा मी नाही. लोकांना सांगणारा एक आणि करणारा, असा मी एक दांभिक आणि पुराणिकही नाही. मी अंबाबाईचा उदो म्हणून कोणत्याही माणसाच्या डोक्यावर खापर जाळत नाही. उदो, उदो म्हणत नाचणारा भावाविन कोरडया भक्तीचा वेदांत सांगणारा करंटा पंडितही नाही. हातातील जपमाळ हलवुन, भोवती पाखंडयांचा मेळा जमावणारा मी नाही. आपले महत्त्व वाढविण्यासाठी स्तंभन, मोहन, उच्चाटनासारखे खोटे उपचारही मी करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलभक्तिवाचून मी कोणतेही उपचार जानत नाही.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *