कुलदेवी देवता

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇

कुलदैवत व गोत्र शोधणे

१) प्रथम आपले भाऊबंद शोधावे , त्यांचे कुलदैवत असेल तेच तुमचे कुलदैवत असते . हजार पिढ्या बदलल्या तरी कुलदैवत बदलत नाही .
२) आपल्या मूळ गावात जावे , तेथे कुणीतरी आपल्या आडनावाचे , गोत्राचे असेलच , त्यांचे कुलदैवत असेल तेच तुमचे कुलदैवत असते .
३) जवळपास जे तीर्थक्षेत्र असेल तेथील उपाध्ये यांचेकडे पूर्वजांच्या नोंदी सापडतात . उदा पूर्वी प्रत्येक पिढीत एकतरी जण नारायण नागबली करत असत . त्यावेळी त्यांचे पूर्वजांचे नोंदी , गोत्र , कुलदैवत त्रंबकेश्वर येथे नोंद आहेत . इतर ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा नाशिक , त्रंबकेश्वर येथे जाऊन चौकशी करावी . पूर्वजांची सात आठ पिढ्यांची नावे सुद्धा त्यांच्या चोपडीत सापडतात .
४) मूळ गावातील उपाध्ये , गुरुजी यांना जाऊन विचारावे .
आजकाल सर्व तयार माहिती हवी असते , चौकशी कुणी करत नाही . भाऊबंद , नातेवाईक यांचेशी प्रेमाचे संबंध ठेवत नाहीत . जुन्या पिढीतील एखादी व्यक्ती सर्व माहिती देऊ शकते पण त्यांना कोणी विचारत नाही .

अशोककाका कुलकर्णी

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *