दृष्टांत 58 अगा वडील जे जे करिती त्या नाम धर्मू ठेविती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दृष्टांत 58 अगा वडील जे जे करिती
गुरु गोविंदसिंह
शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह लहानपणापासूनच वैराग्‍याचा भाव बाळगून होते. सर्वसामान्‍य मुलासारखे ते कोणत्‍याही वस्‍तूची मागणी करत नसत. अध्‍ययन आणि ईश्‍वराच्‍या स्‍मरणात त्‍यांचा संपूर्ण दिवस जात होता. बालकांचा खोडकरपणाही त्‍यांच्‍या स्‍वभावात नव्‍हता. त्‍यांची आई त्‍यांचे

हे आचरण पाहून हैराण होत असे. परंतु त्‍यांच्‍यावर ती प्रेमही फार करत असे. एके दिवशी त्‍यांच्‍या आईच्‍या मनात त्‍यांना सोन्‍याचे कडे घालण्‍याचा विचार आला. त्‍यांनी एक सोन्‍याचे कडे बनविले आणि गोविंदसिंह यांना मोठ्या प्रेमाने घातले. मात्र काही वेळातच बालक गोविंदच्‍या हातातले कडे गायब झालेले आईला दिसले. आई त्रस्‍त झाली. बालक गोविंदला विचारले तर त्‍याने नदीकाठी नेले व कडे नदीत टाकून दिल्‍याचे सांगितले.

आईने असे करण्‍याचे कारण विचारले असता गुरु गोविंदसिंह म्‍हणाले,”मला गुरुनानकांनी चालविलेल्‍या मार्गाने चालावयाचे असताना तू मला संसाराच्‍या मोहमायेत अडकावू नये, या बेडीत जर मी बांधलो गेलो तर मला गुरुनानकांच्‍या मार्गावर चालता येणार नाही.” बालक गोविंदसिंह यांचे विचार विरक्त जीवनाचे संकेत देत होते.

तात्‍पर्य:-थोरांचे जीवन हे प्रेरणादायी असते. महान लोक हे मोह-मायेपासून दूर रहाण्‍याचा प्रयत्‍न करतात

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 23
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *