167, अभंग :- एक तटस्थ मानसी । एक सहज चि आळसी :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 167
एक तटस्थ मानसी ।
एक सहज चि आळसी ॥१॥
दोन्ही दिसती सारिखी ।
वर्म जाणे तो पारखी ॥धृपद॥
एक ध्यानी करिती जप ।
एक बैसुनि घेती झोप ॥२॥
एका सर्वस्वाचा त्याग ।
एका पोटासाठी जोग ॥३॥
एका भक्ति पोटासाठी ।
एका देवासवे गाठी ॥४॥
वर्म पोटी एका ।
फळे दोन सांगे तुका ॥५॥

अर्थ :-
एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करतांना तटस्त बसली आहे, तर दूसरी व्यक्ती आळसामुळे तटस्त बसली आहे. अश्या दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतिल फरक जाणकारालाच कळेल. एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटुन ध्यानस्थ बसतो आणि दूसरा बसून झोप घेतो. एक सर्वस्वाचा त्याग करुण साधू होतो, तर दूसरा पोट भरण्यासाठी साधू होतो. एकजण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो, तर दूसरा पोटासाठी भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

One comment

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading