दृष्टांत 39 अहंकाराचा वारा न लागो राजसा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

एकदाभाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात, रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव चालू होतो अन् सर्व जण दुसर्‍या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात.


मार्गाने जातांना गाढव विचार करते, आतापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे ? भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले. काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला, मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते. त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात.

तात्पर्य : जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा सदगुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी स्थिती गाढवापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला विसरू नये. अहंरहित रहावे. सर्व मानसन्मान देवाचरणी अर्पण करावेत.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 37

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *