गोनाई (गोणाई) राजाई दोघी सासु सुना,संपूर्ण अभंग संत नामदेवाच्या परिवारातील चौदा लोकांचे नावे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत नामदेवाच्या घरचे चौदा लोकांचे नावे
संत नामदेवा १४ लोकांचा परिवार

NAMDEWA PUTRA ZALA VITHO BARASHASHI ALA

संत जनाबाई नामदेव रायाच्या भक्तीमय कुटूबाच
या अंभगात वर्णन करतात
गोनाई (गोणाई) राजाई दोघी सासु सुना ।
दामा नामा जाणा बापलेक।।
नारा गोन्दा विठा म्हादा हे चोघे पुत्र ।

जन्मले पवित्र त्याचे वंशी ।।
लाडाई गोडाई येसाई साखराई ।

चौघी सुना पाही नामयाच्या ।।
निंबाई ते लेकी आऊबाई बहीणी ।

वेडी पिसी जनी नामयाची ।।

संत जनाबाई इ.स. १३१० एकदा कार्तिकी एकादशीस जनीला तिचे आई-वडील पंढरपुरास
पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन आले.
पांडुरंगाचे रुप पाहताच जनी आपल्या आईवडिलांना म्हणाली,
“मी आता ईथेच राहणार ! घरी येणार नाही!” त्या वेळी तिच्या आईवडिलांनी तिची खुप
समजूत घातली; परंतु तिने त्यांचे सांगणे ऎकले नाहि. त्या वेळी तिचे वय अवघे
सात वर्षाचे होते. अखेर तिचे आईवडिल निराश झाले.
त्यांनी पांडुरंगाला सांगितले, “पांडुरंगा, आता जनीचा तूच पिता,
तूच पिता, तूच माता. तूच तिचा सांभाळ कर.” ते दु:खी अंत:करणाने जनीला तिथेच
पांडुरंगाच्या स्वाधीन करुन परत आपल्या गावी गेले.
जनी पांडुरंगाचे भजन करीत बसली.
नामदेवांनी तिला पाहिले. तिच्या आई-वडिलांविषयी विचारले.
तिने सांगितले की, “विठ्ठल-रखुमाई माझे आईवडील आहेत.
त्यांची मी कन्या आहे. पंढरपूर हे माझे माहेर आहे!” नामदेव
जनीला आपल्या घरी घेऊन गेले.

नामदेवांच्या घरातील सर्व काम ती करी. ती कामे
करताना तिच्या मुखात पांडुरंगाचे नाम असे.
नामदेवाचा परमार्थी ठेवा, नामदेवांचे ते धन जनाबाईला लाभले
होते.
नामदेवांच्या घरी देव सारी काम करतो, त्यांचे ऊणेदुणे सांभाळतो,
त्यांच्या आनंदात भाग घेतो.
अशी कितीतरी दुश्ये
जनाबाईनी पाहिली व ती तिने अभंगात आणली.

नामदेवा पुत्र झाला ।विठो बारशासी आला ।
आंगडे टॊपडे पेहरण । शेला मुंडास घेऊन ।
माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा ।
जनी म्हणे पांडुरंग । काय नावे ठेवू सांगा । । ।

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *