भाग 5 :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

आज युध्दाचा *१८ वा दिवस.* परंतु हाच१८वा दिवस अंतिम आणि निर्णायक असेल हे कुणालाही ठावूक नव्हते.
कर्णाने वृषालीचे दुःखी मनाने सांत्वन केले व स्वतःलाही सावरले. तीला कर्णाने सांगीतले की, उद्या निर्णायक युध्द होईल. *उद्या एक तर कर्ण तरी राहील किंवा अर्जुन*. उद्याचा सूर्यास्त कुणीतरी एकजणच पाहील. दुसरा साक्षात सुर्याच्या तेजात मिसळुन जाईल.








