संत सोपानदेव चरित्र २०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – २०.

अनुक्रमणिका


शंकरशास्रींना व सार्‍या धर्मसभेला बोपदेवांनी आज्ञा केली,दोन दिवसांत या मुलांना योग्य न्याय देण्यात यावा.झाल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये.असे सांगुन ते उभे राहिले.धर्मसभा संपल्याची ती खुण होती.विनायकबुवा चौघांना पुढे घालुन झपट्याने धर्मगाराच्या बाहेर पडले माघारी मात्र शास्री पंडीतात जोरदार चर्चा सुरु झाली.या सर्वांपासुन अनभिज्ञ चौघे मात्र त्याच निष्पाप,निरागस मनाने झोपडीकडे परतले.त्यांच्या मनांत खदखदणार्‍या प्रश्नांना वाचा तरी फुटली होती.उद्भवणार्‍या वादळाचा निचरा तरी झाला होता.निर्णय कांहीही लागो,निदान आपल्यावर होत असलेला अन्याय चार चौघांसमोर मांडला गेला.मनाचा होणारा कोंडमारा,घुसमट या सर्वापासुन मुक्तता मिळाली याचेच समाधान त्यांना वाटले.


रोजच्या दैनंदिन कामात दोन दिवस निघुन गेले.तिसर्‍या दिवशी चौघेही भावंडे धर्मसभेत गेल्यावर सोमणशास्री म्हणाले,तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला कोणत्याही धर्मग्रंथात न सांपडल्याने आणि ज्याला शास्राधार नाही असा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही तो अधिकार पैठणच्या धर्मपीठाला आहे.तिथल्या आचार्य बोपदेवांना तुमची सारी पार्श्वपिठीका विदित आहेच.तेच कांही तोडगा काढु शकतील,तेव्हा पैठणला जाणे उचित राहिल.निराश मनाने घरी परतले.


सोपान म्हणाले,असच कांही तरी घडणार याची अटकळ होतीच.अरे ज्ञानदादा!तुम्ही साक्षात ज्ञानसूर्य असल्या वर आळंदीच्या ब्रम्हवृंदाकडुन अनुमती मागणे म्हणजे साक्षात सूर्याने उगवण्या साठी चंद्राची अनुमती मागण्यासारख आहे.
दुसरे दिवशी सर्वांच्या आधी उठुन सोपान एकटेच निरव शांततेत अभ्यासा च्या नियोजित स्थानी नेहमीच्या दगडावर जाऊन बसले.आजपासुन त्यांची वेदांशी ओळख होणार होती.वेदांतील ओळींना, श्लोकांना “ऋचा” म्हणतात.ही ऋचा आज दादा शिकवणार,त्यापुर्वी उजळणी ला गायत्रीपठणाने सुरुवात केली.त्या उच्चारणातले स्वरांघात,आरोह,अवरोह, उदात्त,अनुदात्त,स्वरीत,स्वरसंकोच हे सारंं ते नेमकं आणि शुध्दतेने उच्चारत होते.नंतर त्यांनी गायत्रीपठणाला सुरुवात केली.


“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय।। दृष्टवा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
आचार्य मुपसंगम्य राजा वचनमव्रवीत्।।
गीतेच्या शुध्द स्वरांनी अवघं वातावरण गीतामय झालं.
सोपानाचं गीतेचं उच्चारण संपत आलं आणि निवृत्ती-ज्ञानदेव तिथं पोहचले.तोवर गीतेचा अठरावा अध्याय संपला होता.डोळे उघडले तेव्हा समोर निवृत्तीदादा व ज्ञानदादा दिसल्यावर त्यांच्या चरणावर मस्तक टेकवले.दादा मला सारं सारं लवकर शिकाययचय!निवृत्तीनाथ आसनस्थ झाले व अध्ययना ला सुरुवात झाली.वेद मुखोद्गत होणार अर्थ अन्वयांसह वेद म्हणजे ज्ञानाचं भांडार,आज त्याची कवाडं उघडली जाणार होती.


निवृत्तीचं ऋचा उच्चारण आणि सोपानांचं अनुकरण यांतुन ध्वनीसंमेलन घडत होतं.अवघं चराचर,गगनमंडळ रोमांचित होत होतं.
पैठणक्षेत्री जायची तयारी सुरु झाली.उद्या ब्रम्हमुहुर्तावर निघायचे ठरले. मुक्ताला आज सोपान अस्वस्थ,अशांत वाटत होतं.कांहीतरी विपरीत घडेल. संकट येईलसे वाटत होते आणि अचानक….वावटळीसारखा ज्ञानदादा तडक झोपडीत शिरुन झोपडीचं कवाड लावुन घेतलय.सोपान,मुक्ताला काय झाले समजेना.तेवढ्यात,अरे ज्ञानेशाsss ज्ञानेश्वरा ऐक असे ओरडतच निवृत्ती आले आणि बंद दारावर थापा मारुन ज्ञानदेवांना हाकारुं लागले.

सोपानही आर्ततेने हाका मारुं लागल्यावर ज्ञानेशांनं आतुनच उत्तर दिलं,मला आतां जगायचं नाहीय,जीविताचा शेवट करायचाय! सहनशक्तीचा अंत झालाय!आईबाबांनी प्रायश्चित घेतल्यावरही आपला छळ झाला,बहीष्कृत केलय,दगड मारले, तिरस्कार,अपमान,केला,माधुकरीत शेण गोळे वाढले,तरी सर्व विनातक्रार सहन केलं पण आज मात्र हद्द झाली.आज आपल्या आईच्या शीलावर,बाबांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले,हे मी सहन करुं शकत नाही.या जीवनाचा अंत करायचाय,बोलतां बोलतां ज्ञानेश्वरांना भरुन आलं.कोणाला कांहीच सुचेना.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading