संत सोपानदेव प्रस्तावना

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


नमस्कार!

अनुक्रमणिका


संत श्री सोपानदेव ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधु!ज्ञानेश्वर माऊली इतकेच प्रतिभाशाली,बुध्दीमान,मृदु स्वभावाचे.निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांसारखे गुरु आणि मोठे भाऊ अशा दोघांचे मार्ग दर्शन सार्थकी लावणारा एक अलौकीक संत,माऊली लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनांवर, कार्यावर लाख अक्षरं लिहिल्या गेली, आजही लिहिल्या जात आहेत,पण सोपानांवर अगदी स्फुट स्वरुपांत लिहिल्या गेले. “कैवल्य गीता” मधील भगवत गीता व “सोपानदेवी” वाचल्यावर सोपानदेवांच्या अलौकिक बुध्दीमत्ता, असामान्य प्रतिभेची आणि शब्दांवर असलेल्या अफाट प्रभुत्वाची साक्ष पटते. गीतेच्या ७०० श्लोकांच अगदी शब्दशः भाषांतर म्हणजे “सोपानदेवी” आहे. ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ,त्यांचे समकाली न असुनही सोपानदेवांची भाषा अत्यंत सोपी,सुलभ आणि त्याही काळात इतक्या सोप्या मराठीत भगवद् गीतेचे भाषांतर लिहुन सोपानदेवांनी किती मोठं कार्य केलय हे लक्षात येते.


ज्ञानेश्वरांपासुन सोपानदेवांना वेगळं काढल्या जाऊच शकत नाही.कारण ज्ञानदेव ज्ञानसूर्य होते तर,सोपानदेव त्यांची सावली.म्हणुनच सोपानांचं अस्तित्व त्या ज्ञानसूर्याच्या सावलीसारखं झालय!किंचित दुर्लक्षित गेलेले सोपानां बद्दल लिहितांना ते सर्वार्थाने सर्वांना समजावे या दृष्टीने केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
ज्ञानदेव हे सोपानदेवांचे मोठे भाऊ तर होतेच पण त्याच बरोबर आई,वडील, सखा,गुरु,परमेश्वर सर्व कांही होते.
आळंदीच्या कर्मठ मंडळींनी या भावंडांच्या आईवडीलांवर कसा जीव घेणा प्रसंग आणला आणि त्यांनी तो कसा निमुटपणे स्विकारला,त्यांच्या मनाची झालेली घालमेल,त्यांच्या आत्म समर्पनाच्या वावटळींनी चौघांही भावंडांची आयुष्ये कशी पाल्यापाचोळ्या सारखी भिरभिरली,हा नियतीचा आखलेला डाव त्यांनी कसा सहन केला, चौघांतली एकी,एकमेकांबद्दलचे अपार प्रेम आणि बुध्दीमत्तेचे तेजस्वी वलयाच्या सहाय्याने या चौघा भावंडांनी नियतीवर आणि आपल्या तेजस्वी ज्वाळांनी अंधकारावर कशी मात केली हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


मौजीबंधनाची आवश्यकता आहे किंवा नाही या बाबत चारही भावंंडात झालेले चर्चेत सोपानदेवांचे बुध्दीसामर्थ्य प्रभावीपणे स्पष्ट होते.सोपानदेव जेव्हा आत्मअध्ययनात रमले होते,त्यावेळी त्यांनी एकटाक हरिपाठ अभंग लिहून पुर्ण केले.सोपानदेवांनी लिहिलेली “सोपानदेवी” आणि ज्ञानदेवांनी लिहिले ली “ज्ञानेश्वरी” आपल्या दोन्हीही लहान भाऊ व शिष्य यांचा अलौकिक बुध्दीचा साक्षात्कार पाहुन निवृत्तीनाथांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले,
ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी नंतर सोपानदेव आणखीणच अबोल,शांत झाले.आता सूर्यच नव्हता तर सावली कुठे?आणि शेवटी ज्ञानसूर्याची सावली ज्ञानसूर्यात विलिन झाली.
जसे जगाच्या अंतापर्यंत ज्ञानदेव, ज्ञानसूर्य आपल्या तेजाने तळपणार, तद्वतच ज्ञानसूर्याची सावली असलेले सोपानदेव तळपत राहतील.
नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

  1. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

  2. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

  3. […] संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ […]

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading