४ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -४.

सत्यवती आणि भीष्मांना विचित्रविर्याच्या लग्नाची चिंता लागली. पित्याच्या भोगेच्छासाठी सत्यवतीला आणले, त्याच मातेच्या आज्ञेने ब्रम्हचारी भीष्मांना प्रसंगी हरण करायला सांगीतले. मातृधर्म आणि भातृधर्म यांत ते अडकले हे त्यांच कर्तव्य असेल किंवा नसेलही. त्याचवेळी काशीनरेशाच्या तीन कन्यांचे स्वयंवर घोषित झाले. भीष्मांनी अलौकीक शस्र अस्र कौशल्य करुन सर्वांना हरवुन तीन्ही मुलींना पळवुन आणले.

त्यातील मोठी कन्या अंबाचे शाल्वावर प्रेम आहे हे जेव्हा भीष्मांना कळले तेव्हा त्यांनी सन्मानाने तीची पाठवणी केली. परंतु शाल्वाचा अहंकार दुखावल्याने अंबेला अव्हेरलं. त्यामुळे अंबा पुनः हस्तीनापुरला परतली. राज्यसभेत विचित्रविर्याना म्हणाली, “शाल्वाने अस्विकार केल्यामुळे आपणच माझा स्विकार करावा”

त्यावर ते म्हणाले, “तु ज्यावेळी शाल्वाकडे गेली तेव्हाच हा विषय संपली.”

त्यांची स्पष्टोक्ती ऐकुन ती म्हणाली, “स्वयंवरातुन भीष्मांनी हरण केल्यामुळे त्यांनी माझी जबाबदारी स्विकारावी.”

सभेमधे भीष्मांविषयी सर्वांना आदर होता. सभेतुन निषेधाचे सूर उमटु लागले. भीष्मांनी तीच्या इच्छेनुसार शाल्वाकडे ससन्मान पाठवणी केली. त्यामुळे अंबेनी इच्छेनुसार वाटेल तिथं जावं. भीष्म अविवाहित राहण्याच्या प्रतिज्ञेशी बांधील आहे. ती संतापाने बेभान होऊन कुरुराज्यसभेतुन बाहेर पडली.

इकडे वेदव्यासांसोबत त्यांच्या शिष्यांच्या चर्चेत उधाण आले. जैमिनी, पैल, सरसावत यांचे सोबत भीष्मांबद्दल सुरु होती. पराक्रम, धर्मनिष्ठा, ब्रम्हश्चर्य, त्याग आणि प्रचलीत ज्ञान, शिवाय पराक्रमी असल्यामुळे ते दुर्जेय योध्दा होऊ शकतात, परंतु समाजात स्थीत्यंतर नाही आणु शकत. ते प्रचलित धर्माचं शिस्तीत पालन करताहेत, पण धर्माच्या गर्भातही सृष्टीकर्त्याचा हेतु सांभाळायचा विचार त्यांचेजवळ नाही. संस्कृतीची मुल्य जपणे सुध्दा धर्मच आहे ना! चित्रगंदा सारख्याचे तारुण्य अपरिपक्व असतांना दोन अल्लड कन्या भोगक्रियेला देऊन कुरुवंशाचा घातच केला

भीष्माचं ब्रम्हश्चर्य दुसर्‍यांना संयमाची दिक्षा का देऊ शकत नाही? असल्या कृतीने सम्राट भरताची राज्यपरंपरा क्षीण होऊन संस्कृतीचा आधारच नष्ट होईल ! भीष्माची त्यागशीलता कोणतं सर्जन करेल ? इतिहासाचं सखौल ज्ञान, राज्यशासनाच्या सर्व पध्दती, नीती आणि न्यायाचे बारकावे, अर्थशास्रांचं असलेलं भीष्मांच ज्ञान कधीही गतिमान आणि उर्जस्वी होऊ शकत नाही.

त्यावर व्यास शांंतपणे म्हणाले, “पराक्रमाला समर्थन लागतं ! धर्माला तत्वज्ञानाचा आधार लागतो ! ब्रम्हश्चर्यव्रतामधे निरपेक्ष प्रेम असावं लागतं ! त्याग सृष्टीकर्त्याच्या ध्येयाशी मिळतं घेणारा व ज्ञानाला कृतज्ञेतेचं आवरण लागतं!”

अशाप्रकारे भीष्मांविषयी उलट सुलट चर्चा होऊन निराकरण केले.

इकडे अंबा तणतणतच म्हणाली, “तप करुन ज्या भीष्मानं सत्यानाश केला त्यांना आणि हस्तीनापुरला दुःखाच्या खाईत लोटणारं !”

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading