अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग ५, (१७ ते २०)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!!  हनुमान  !!!

                   भाग – १७.

             हनुमानाचे शब्द ऐकून क्रोध अनावर झालेल्या जांबुमालीने बाणांचा वर्षाव सुरु केल्याबरोबर हनुमानाने उडी घेऊन एक मोठे झाड मुळासकट उपटून त्या राक्षस सैन्यावर फेकले व मोठाले दगड, झाडे फेकून मारुं लागले. जांबुमालीने धारदार शस्राच्या आधारे हल्ला मोडून काढला व हनुमानावर महास्र सोडले. ते अस्र हनुमानाने त्याच्याच सैन्यावर फेकले. आपल्या अस्राचा परिणाम होत नाहीसे बघून त्याने स्वतःचा मोठा आकार केला. हनुमानाने त्याच्याहीपेक्षा महाकाय आकार केलेला बघून जांबुमाली आवाक झाला.आपली शक्ती हनुमानसमोर कमी पडत असल्याचे बघून ऐंशी हजार सैनिकांना एकदम त्याच्यावर हल्ला करण्याची आज्ञा देण्यासाठी मागे वळला तर त्याला धक्काच बसला. कुठे गेले गेले सैनिक? जिथे सैनिक होते तिथे उंच पहाड उभा दिसला. त्या पहाडाखाली सैनिकांना स्वतःचे प्राण वाचवण्यास वेळही न मिळता त्यांना आपला जीव गमवावा लागला.

नंतर दोघेही आपल्या मुळ आकारात येऊन समोरासमोर उभे ठाकले. परिस्थितीने घेतलेले वेगळे वळण बघून जांबुवली अस्वस्थ झाला.ही  त्याच्या स्वाभीमानाला लागलेली चांगलीच ठेच होती. संतापाने हनुमानावर झेप घेतल्याबरोबर हनुमानाने त्याच्या नाभीत बोट खुपसून त्याला डोक्याच्या वर उचलून गरगर फिरवत खाली फेकले. त्याची सगळी आंतरेंद्रिय अवयव तोंडातून बाहेर आली.अतिशय वाईट मरण आले. राम राम राम मंत्रघोष करत हनुमान चालते झाले.

             सीतेचा शोध हनुमान घेऊन हनुमान परत आल्यावर सीतेच्या सुटकेसाठी एवढं मोठं सैन्य समुद्र कसा ओलांडेल? त्यांना वाटले, श्रीरामांना एवढ्या सैन्याची गरजच काय ते एकटे जाऊन सीतेला परत आणू शकत होता पण विचारण्याचे धैर्य नव्हते.रामाचे ध्येय त्यांना माहित होते. सर्वाना एकत्र घेऊनच काम साध्य करायचय! त्या प्रचंड महासागराकडे सारी वानरसेना हतबल होऊन बघत होती.सगळ्यानी सीताशोधासाठी अपार कष्ट घेतले होते. एका महिन्यात संपूर्ण पृथ्वी पालथी घातली होती. आणि आतां सीतेचा शोध लागला. पण तिच्या पर्यंत पोहचू शकत नव्हते. सर्वांच्या मनातील चलबिचल चालली होती, पण हनुमानही तेवढेच हतबल होते. अडचणीच्यावेळी रामनाम जप केला की, समस्या सुटत असे. रामनाम जप सुरु होता. वैतागून सहज चाळा म्हणून जवळचा एक दगड उचलून समुद्रात फेकला. आणि काय आश्चर्य, तो फेकलेला दगड पाण्या वर तरंगतांना दिसला. हनुमान आनंदाने वेडा होऊन नाचू लागले. सर्व वानरसेनालाही तो तरंगणारा दगड दिसला.मग त्यांनी आणखी एक दगड समुद्रात फेकला पण तो बुडला. मग दुसरा तिसरा असे अनेक दगडं फेकले पण सारे बुडाले.मग त्यांनी पहिला दगड कसा फेकला ते आठवले.आणि रामाचे नांव घेऊन फेकल्या बरोबर दगड तरंगु लागला. सगळे वानर आनंदाने नाचू लागले. नवीन शोध त्यांना लागला.तोडगा मिळाला. समुद्रपार करण्यास्तव  दगड गोळा करणे.

        झपाट्याने कामास सुरुवात झाली.विविध  आकाराचे दगड जमा होऊ लागले. त्यांची क्षमता बघून राम प्रसन्न झाले. त्यांनीही एक दगड पाण्यात फेकला.पण तो बुडला. दुसरा दगड स्वतःचे नाव घेऊन फेकला तोही बुडाला. राम गोंधळले. त्यांच्या मागे उभे असलेले हनुमान म्हणाले, प्रभू आपण टाकलेला दगड तरंगेल,असं वाटलच कस? ज्या गोष्टीचा त्याग करुन फेकाल तो बुडणारच ना? त्यागलेल्या गोष्टींंना कसली आलीय आशा? आम्ही तुमचं नाव घेऊन जेव्हा समुद्रात पाषाण फेकतो तेव्हा  तो तरंगतो कारण त्यांना तुमची सेवा करण्याची तुमच्या पदकमळ स्पर्शाची आस असते.त्यामुळे आम्हाला या दगडांना आपल्या पायाशी अर्पण करुं द्यात.सेवा करण्याची संधी मिळू द्या. हनुमानाच्या बोलण्यातील तारतम्य ओळखून कांही गोष्टी घडतात तशा घडू द्याव्यात. सेतू बांधकामाचे कामास झपाट्याने वेग आला.

१०० योजने लांब व दहा योजन रुंद सेतू बांधणे सोपं काम नव्हतं. हनुमान उत्तरेकडे जाऊन प्रचंड मोठे पाषाण मुबलक प्रमाणात आणत होते.उत्तर-दक्षिण अशा दिवसभरात कितीतरी फेर्‍या मारत होते.अशा असंख्य उडून उडून फेर्‍या मारुन ते थकून गेले. शिवाय फेरीला वेळही लागत असल्यामुळे, अख्खा डोंगरच उचलून आणायचे ठरवले. सेतू अंतिम टप्प्यात आला होता. डोंगर आणायला उत्तर टोकाला हिमालयात पोहचले. बराच वेळ टेहाळणी केल्यावर त्यांना तो डोंगर दिसला. हनुमानाचे सारं आयुष्य डोंगर पर्वत फिरण्यात गेलं पण इतका सुंदर देखणा अगदी वेगळा निसर्गसंपन्न डोंगर पाहण्यात आला नव्हता.हनुमानांनाही जाणवलं जणु त्या डोंगरही हनुमानासोबत येण्याची ओढ लागली होती.

                क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २४-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                     भाग – १८.

           हनुमानाने तो सुंदर डोंगर उचलून उड्डाण केले व दक्षिणेकडे जाऊ लागले. तो जवळ येत आहे तोच सेतू प्रकल्पाचा वास्तुरचनाकार नील चा निरोप  घेऊन एक वानर येऊन म्हणाला,सेतू चे काम पूर्ण झाल्यामुळे आणखी खडकाची आवश्यकता नाही.ऐकून जिथे होता तिथे पर्वत आणला होता तिथे नेऊन ठेवला तेव्हा पर्वत अश्रू ढाळतांना व खूप अस्वस्थ दिसला. त्या पर्वताला म्हणाले, तू एक विशेष असून तुला, भावना, ह्रदय दिसते, कोण आहेस? अश्रू कां ढाळतोस? मी गोवर्धन! पर्वतांचा राजा! मला प्रभू रामांची सेवा करायची होती. ती संधी आली होती तोच निरोप आला. प्रभूंना जर माझी गरजच नाही तर माझ्या जीण्याला काय अर्थ? गोवर्धन पर्वताची श्रध्दा बघून हनुमान भारावले. पर्वताचे सांत्वन करत म्हणाले मी प्रभू रामांना शब्द टाकेन. प्रभू आपल्या भक्तांचा शब्द सहसा टाळत नाही. आणि हनुमानाने सेतू प्रकल्पाकडे उड्डाण केले. सेतूचे काम पूर्ण झाले होते. वानरसेना लंकेकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत होते.एकीकडे उभे राहून आपली प्रिया जी लंकेत बंदी होती त्या दिशेने बघत असलेले राम हनुमानाला दिसले.आणि नम्रपणे रामाजवळ आले. आणि

        गोवर्धन पर्वताच्या असिम श्रध्दा व भक्ती चं कौतुक करुन त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. गोवर्धन पर्वताची सेवा करायची इच्छा ऐकून राम म्हणाले, पुढचा अवतार घेईल त्यावेळी त्यावेळी पर्वतावर वसलेल्या वृंदावनात त्याचं जवळ जवळ अकरा वर्षे वास्तव्य असेल, एवढच नव्हे तर,कृष्णाच्या रुपात ते त्या पर्वताला आपल्या बोटावर सात दिवस व सात रात्र धरुन उभे राहतील. हा निरोप हनुमानाने गोवर्धन पर्वताला सांगीतल्यावर त्याला अतिशय आनंद झाला.

             रावण आपला भाऊ कुंभकर्णाच्या मृत्युने अतिशय संतापला होता. त्या भरात तो आपल्याच माणसांना ठार करत होता. आणि एकदम भस्मलोचनची आठवण झाली. दुसर्‍या दिवशी लंकेच्या सैन्याचा प्रमुख सेनापती म्हणून भस्मलोचनची नियुक्ती केली. जेव्हा लंकेच्या छावणीतून अतिशय आत्मविश्वासाने डोळ्यावर पट्टी बांधलेला एक राक्षस येतांना दिसला तेव्हा वानरांना आश्चर्य वाटून हसू आले. पण जसा तो जवळ अला तसा त्या डोळ्यांवरच्या पट्टीखालून ज्वाळा चमकत होत्या. आपल्या नजरेने सगळे बेचिराख करणारा राक्षस भस्मलोचन असल्याचे ओळखले.

            सगळी वानरसेना घाबरुन सैरावैरा पळू लागली. त्याच्या नजरेसमोर येऊ नये म्हणून सर्व वानर एकमेकांना तुडवीत पळत होते. सेना प्रमुखही गोंधळले होते. काय करावे सुचत नव्हते. तेवढ्यात भस्मलोचनने डोळ्यावरील पट्टी काढली. दुपारच्या सूर्यासारखे त्याचे डोळे तळपत होते.तो जिकडे दृष्टी टाके तिकडे वीज चमकल्या सारखी होऊन क्षणार्धात सैन्याची राख होत होती. हे प्रचंड नुकसान होत असतांना पाहून हनुमान विचारमग्न झाले.सर्वांं च्या आशा त्यांचेवर एकवटल्या असतांना त्यांना पळतांना बघून वानरांमध्ये नैराश्य पसरले. रामांनी हनुमानाला कांहीतरी हळूच सांगीतले.  आणि हनुमान रावणाचा किल्ला चढतांना दिसल्यामुळे सर्व वानर सैन्याचा उरला सुरला धीरही सुटला. हनुमानाला पळूनच जायचे होते तर, ते लंकेत घुसलेच कशासाठी?

             अचानक हनुमान आपल्या पाठीवर भली मोठी लोखंडी फळी घेऊन येतांना दिसले. राम-लक्ष्मण एकमेकांकडे हसून बघितले. हनुमान उड्डाण घेऊन भस्मलोचनच्या मागे उतरले. एव्हाना सर्व वानर सैनिक खडकाआड, झाडामागे,पाण्यात जिथे जमेल तिथे त्या राक्षसाच्या नजरेपासून बचाव करत दूर जाऊन लपले होते. हनुमानाने ती फळी शेपटीच्या आधारे भस्मलोचनच्या समोर धरली आणि कडकड असा मोठा धमाका झाला.आणि भस्मलोचन स्वतःच्याच राखेचा ढीग झाला. सारी वानरसेना जल्लोष करत आपल्या त्रात्या कडे धावले.उत्सुकते ती फळी आहे काय हे बघितले तर मोठा आरसा होता. हनुमानाने त्याला आरशात पाहायला भाग पाडले,त्यामुळे स्वतःच राख झाला.

            मृत्युदेव म्हणजेच यमदेवांनी, रावण तळावर कट शिजत असल्याची माहिती देत म्हणाले, वेळीच योग्य उपाय योजना केली नाही तर संपूर्ण सेनेचा विध्वंश होईल.

         बिभीषणाबरोबर सखोल चर्चा करुन रामांनी हा जगावेगळा प्रकल्प वेगळ्या पध्दतीने हाताळण्याच्या सुचना हनुमानाला देऊन म्हणाले, काय वाटेल ते करावे लागले तरी करुन हा कट पूर्णत्वास जायला नको. प्रकल्पाचे नांव होते.. चंडिस्तोस्र!

                    क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                     दि. २५-७-२०२२.

!!! हनुमान  !!!

                   भाग – १९.

          रामांच्या आज्ञेनुसार हनुमान माशीचे रुप घेऊन, रावणच्या राजवाड्याच्या आतल्या भिंती  वर बसले.तेथून योग्यवेळी बाहेर पडण्याचा रस्ता शोधत होते.तेवढ्या कुणीतरी हलकेच दार

उघडतांना आणि ओढून घेत असल्याचे दिसले. हनुमानाला तात्काळ निर्णय घ्यायला हवा होता.

क्षणार्धात ज्या खोलीत चंडिकास्तोस्र म्हटल्या जाणार होते तिथे पोहचल्यावर त्यांना धक्काच बसला.देवांचे गुरु बृहस्पती तिथं बसून चंडिका स्तोस्राचे पठण करतांना दिसले. देवांचे गुरु रावणाच्या बाजूने? कां? आणि तेही इतक्या गुपचुप? हनुमानाने आजूबाजूला नजर फिरवल्यावर लक्षात आले की, बृहस्पती स्वतः च्या इच्छेने म्हणत नसून,त्यांच्याभोवती कडक पहारा होता.

             हनुमान माशीच्या रुपात पोथीच्या पानावर बसले.ते सुक्ष्म रुपात असल्यामुळे कोणी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता.पोथीतील दोन शब्द खोडले, पण उपयोग झाला नाही. कारण बृहस्पतींचे स्तोस्र मुखोद्गत असल्यामुळे पोथीत पाहून वाचतच नव्हते.स्तोस्र पठणात अडचण आणण्यासाठी हनुमान इकडे तिकडे बघू लागले. या कक्षाची रचना एखाद्या अवघड चक्रव्यूहासारखी होती.

         पहारेकर्‍यांचे लक्ष नाही असे पाहून हनुमानांनी  आपलं रुप एका मोठ्या राक्षसात बदललं.बृहस्पती घाबरुन ओरडले. हनुमान पुन्हा माशीच्या रुपात आले. घाबरुन बृहस्पती इकडे तिकडे पळू लागले. आणि त्यांच्या समोर भयान रुपात येऊन हनुमान त्यांना घाबरवत होते. काय झाले हेच पहारेकर्‍यांना कळेना. झपाटल्या सारखे जोरजोरात बृहस्पती ओरडत होते. पळता पळता चक्रव्युहात अडकल्यामुळे बाहेरचा रस्ता मिळेनासा झाला.या धांदलीचा फायदा घेऊन पोथीतील तीन श्लोक गायब केले रावणाने त्यांनी परत मंत्रपठण करायला सांगीतल्यावर वगळलेले शब्द घाबरले असल्यामुळे स्मरणशक्तीने दगा दिला आणि गायब श्र्लोक म्हणायचे सुटले.रावणाच्या लक्षात आल्यावर तो स्वतः पठणास बसला.पण परिणाम मिळत नाही हे पाहून चंडिकादेवीस प्रसन्न करण्यासाठी  यज्ञाचे आयोजन केल. थोड्याच वेळात विश्वासू बुध्दीमान ब्राम्हण जमा केले.

            जेव्हा यज्ञाची तयारी सुरु होती त्या वेळी एक उत्साही तरुण ब्राम्हणाने गयावया करत यज्ञात सामील करुन घेण्याची विनंती केली. त्याची मदत होईल हा विचार करुन त्याला अनुमती दिल्यावर सगळ्यांना धावून धावून सगळ्यांना मदत करत असल्यामुळे सर्व ब्राम्हण  खुश होऊन आशिर्वाद देत म्हणाले, तुला काय हव ते माग.तो म्हणाला आपल्या सारख्या थोरांची सेवा करायची संधी मिळाली हीच मोठी भेट आहे.हे ऐकून आणखीनच खुश होत कांही तरी माग म्हणून आग्रह धरल्यावर, संकोचून तो तरुण ब्राम्हण म्हणाला, तुमचा सर्वांचा आग्रह आहेच तर, माझी इच्छा आहे शेवटच्या यज्ञमंत्रात थोडा बदल करावा.हा बदल जरी छोटा असला तरी राजाला मोठा फायदा होईल. स्तोस्रामधे ‘ह’ अक्षराऐवजी ‘क’ अक्षर घालावे. त्याच्याबद्दल विश्वास बसल्यामुळे जास्त विचार न करतां त्याची विनंती मान्य केली.

           जय त्वम चामुण्डे भूतार्थकारिणी । इथे  ‘हरिणी, च्या जागी ‘कारिणी’ या छोट्या बदला मुळे संपूर्ण अर्थच बदलला. या बदलामुळे देवी च्या क्रोधामुळे संपूर्ण यज्ञ, अवती भवतीचं सगळं जळून खाक झाले. हलकसं हसू घेऊन तो तरुण ब्राम्हण आपल्या मूळ रुपात येऊन रावणाच्या महालातून उड्डान केले. नंतर

           त्याने कबुतराच्या रुपात रावणाच्या कक्षात प्रवेश केला.आणि तिथे जे अविश्वनीय  दिसले ते  पाहून, अजिबात वेळ न घालता ते कबुतर १०० योजने अंतर पार करुन, रामाच्या समोर आपल्या मुळ रुपात येऊन घाईने म्हणाला, प्रभू आपल्या जीवाला धोका आहे. मला जी शंका होती,रावण तेच करायला निघायलाय! शांतपणे राम म्हणाले, बिभीषण तुमच्यावर, जांबुवंताचा अनुभव आणि हनुमाना च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.आणि संपूर्ण वानरसेना कामाला लागली. योग्य नियोजन करुन एक रणनीती तयार केली.

           सर्व वानरसेना तटभिंतीसारखे उभे राहिले. मध्यभागी सुग्रीव आणि अंगद आणि मानवी तटबंद भिंतीच्या बाहेर हनुमान, बिभिषण उभे राहिले.हनुमानाने आपली शेपटी लांब करुन त्या तटबंदीला वेढा घालून सुरक्षित केले.एक प्रकारे दोन संरक्षक भिंत असलेला तट तयार झाला.आंत बाहेर जाण्यासाठी एक छोटीशी फट ठेवली तिथे स्वतः हनुमान उभे राहिले….

                    क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                        दि. २६-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                   भाग – २०.

             राम-लक्ष्मणांनी मानवीतट भिंतीची पाहणी केल्यावर वानरांच्या समर्पित वृत्तीवर त्यांना गहिवरुन आले. बिभीषणाने राम लक्ष्मणाला तटबंदीच्या आंत आणताच सर्व वानरसैनिकांनी वाकून नमस्कार केला.पण आकाशाच्या भाग असुरक्षित असलेला लक्षात आल्यावर श्रीरामांना वर सुरक्षाचक्र ठेवण्याची विनंती केली. वर कटाक्ष टाकल्यावर, श्रीविष्णूचे सुदर्शन चक्र संपूर्ण तटबंदीभोवती घिरट्या घालू लागले.आपत्कालीन स्थिती आली तर, त्याचा सामना करण्यासाठी तटबंदीच्या आंत दोन खंदेवीर सुग्रीव व अंगद होते.त्यांच्या मांडीवर डोके ठेवून रामलक्ष्मण झोपले होते.

              पहार्‍यावर असलेल्या हजारो डोळ्यां पासून लपून एक सावली तिथे वावरत होती. ती सावली रावणाच्या कटाचा सगळ्यात महत्वाचा भाग होता. पाताळलोकातील रावणाचा मित्र, राक्षसी जगात मोहजलाचा ताकद असणारा महिरावण आपलं मोहजल पसरवत होता.त्यांने साक्षात मायादेवीला तिच्या मोहजाळाच्या शक्ती सहित बंदिस्त केले होते. ज्यावेळी हनुमानाच्या शेपटीची तटबंदी व वर सुदर्शनचक्र फिरत असल्याचे पाहिले तेव्हाच बिभीषणाचा हात असल्याची त्याला खात्री पटली. एवढा बंदोबस्तातूनही रामलक्ष्मणाचे हरण करायचे ठरवून महिरावण तटबंदीच्या दिशेने निघाला.

         हनुमान व बिभीषण तटबंदी भोवती फेर्‍या  मारीत होते. बिभीषण एकटाच पुढे गेल्यावर महिरावणाने रामाचे पिता दशराथाच्या रुपात हनुमानाजवळ येऊन म्हणाले, खूप वर्षा पासून भेट नसल्यामुळे माझ्या मुलांना भेटायला आलोय., राम-लक्ष्मण या शेपटीच्या तटबंदीच्या आंत असलेले  मला माहित आहे. तर मुलांना भेटायची परवानगी देशील?

त्याच्या तोंडून दशरथ नांव ऐकल्याबरोबर बिभीषणाचे शब्द आठवले. महिरावण हा भ्रमाचं स्वामी आहे. हनुमानाला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. तसेच राजा दशरथां चा अवमानही होऊ द्यायचा नव्हता. म्हणून सुरक्षित पवित्रा घेत म्हणाले, इथले तटरक्षक बिभीषण आहेत. त्यांनी परवाणगी देताच मी आपल्याला आत घेऊन जातो. नंतर येतो असे म्हणून दशरथराजाने काढता पाय घेतला. बिभीषण आल्यावर राजा दशरथ येऊन गेल्याचे सांगीतल्यावर, त्याने सक्त ताकीद दिली, कितीही महत्वाची, प्रत्यक्ष तुझे पिता आले तरी  मी सांगीतल्याशिवाय आत पाठवायचे नाही. आणि परत फेरी मारायला निघून गेला.

            बिभिषण गेल्यावर भरत आला. पुन्ः तीच पुनरावृत्ती झाली. भरतही घाईने निघून गेला. नंतर कौशल्यामाता, सीतामाईचे वडिल जनकराजा, आले व आंत जाण्यासाठी वाद घालू लागले. तेवढ्यात बिभिषण येतांना बघून निघून गेले. बिभिषण जाऊन कांहीच वेळ जात नाही तोच तो परत परत आला. हनुमानाच्या चेहर्‍यावरील गोंधळ बघून बिभीषण म्हणाला, आजची रात्र बिकट आहे. राम-लक्ष्मणाला याही पेक्षा जास्त संरक्षणाची आवश्यकता आहे. मज जवळ एक मंतरलेला धागा आहे तो त्यांच्या दंडाला बांधला की, त्यांचे योग्यप्रकारे संरक्षण होईल. महिरावण प्रयत्नांची शिकस्त करीत आहे तूं सतर्क रहा.

        आणि हनुमानाच्या अनुमतीची वाट न बघता बहुरुपी बिभिषण आत शिरला तेव्हा त्याच्या ओठावर लबाड हास्य होत… तटाच्या मध्यभागी पोहचताच त्याने फुंकर मारली आणि कांही समजायच्या आंत सर्वजण बेशुध्द पडले. ते पडतांना शस्राच्या आवाज हनुमानाने ऐकला पण तो जागा सोडू शकत नव्हता. तेवढ्यात फेरी पूर्ण करुन बिभिषण आलेला बघून हनुमान संभ्रमीत झाला. बिभिषण तर आंत गेला मग हा कोण? हनुमानाने बिभिषणाला पकडून गदागदा हलवत विचारले, कोण आहेस तू? विभिषणाला तर रामलक्ष्मणाला दंडाला मंतरलेला दोरा बांधायला आंत कोण गेल?शेवटी तूही राक्षसच ना? रावणाला विजयी करण्यासाठीच हे कपट केलेस ना? रामाचा हित चिंतक म्हणून खोटा वागलास? ना?बिभिषणा ला राम लक्ष्मणांची चिंता वाटू लागली. पण हनुमानांनी त्याला एवढं घट्ट पकडले की,तो तसू भरही हलू शकत नव्हता. बिभिषणाने परोपरीने आपणच खरा बिभिषण असल्याचे व आंत माझे रुप घेऊन महिरावण गेल्याचे व प्रभूचा जीव धोक्यात आहे, पण हनुमानाचा विश्वास कांहीकेल्या बसत नव्हता. अरेऽ मी कपटी असतो तर, रावणाचे सेनाप्रमुखांना मारण्यात, त्याचे कटकारस्थान मोडून काढण्यास मदत केली असती, इतकेच नव्हे तर माझ्या स्वतःच्या मुलास ठार होऊ दिले असते का? प्रामाणिक पणाचा आणखी कोणता पुरावा हवा? ही वेळ शंका घेण्याची नाही तर रामांना मदत करण्याची आहे.

                   क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. २६-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading