अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग १, (१ ते ४)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!  प्रस्तावना  !!

                 नमस्कार!

        आतांपर्यत आपल्यासमोर ५० व्यक्तिरेखा सादर केल्यात. आणि आपल्या उत्स्फुर्त प्रोत्साहानाने मला लिहिण्याची स्फुर्ती मिळत गेल्यामुळे आज ५१ वे पुष्प अर्पण करतांना मला आनंद होत आहे.

        नेहमीप्रमाणे क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

     आपल्यासमोर सप्त चिरंजीवांपैकी एक हनुमान घेऊन येत आहे.

        श्रीहनुमान! श्रेष्ठ वानरदेव! रामायणातील

एक अतिशय अद्भूत व महत्वाचे व्यक्तिमत्व! तत्वज्ञानी महानायक, हनुमान हे प्रभू रामाचे एक विश्वासू अनुयायी,सच्चा भक्त, लंकानगरीला आपल्या शेपटीने ज्वालांमधे लपेटणारा निडर योध्दा, प्रभू रामाचा दूत बनून सीतामाईला रावणावर विजय मिळाल्याची वार्ता देणारा नम्र दूत, मरणासन्न असलेल्या लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली नेमकी कोणती वनस्पती हे न कळल्याने, मुळासकट द्रोणागिरी पर्वत उपटणारा सहयोध्दा हनुमान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुध्दी,शक्ती आणि नम्रतेचा अप्रतिम मिलाफ असलेल्या हनुमानाचे चरित्र आपणांपुढे पोहचवत आहे.

          काळाच्या ओघात आधुनिक वाचक कांहीसे दूर गेले आहेत. पुराण आणि लोककथां मधून हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या आणि वाल्मीकी ऋषींनी चित्तारलेल्या कथा एकत्र आणण्याचा अल्पसा प्रयत्न करीत हनुमानाच्या व्यक्तिमत्वाचं देवत्व जपत कधीही न ऐकलेल्या कथा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या कथांमधून वाचक आदर्शबोध नक्कीच घेतील आणि त्यांच्याही नकळत जीवनाचे मौल्यवान धडे मिळतील.

           साता समुद्रापलिकडे जाऊन, सीतेचा शोध घेऊन, भेटून रामांचा संदेश देणार्‍या हनुमानाकडून आपल्याला यशस्वी सुसंवादाची सुत्रे गवसतील. इच्छाशक्ती आणि एकाग्रता या बळावर समोर कितीही अडचणी असल्या तरी  त्यावर मात करत सहज मार्ग मिळू शकतो ही शिकवण हनुमानाकडून मिळते. परस्पर गुणांचं एकत्रीत रसायण हनुमान आपल्याला दाखवतो.

शक्तीसहित गोडवा, गांभीर्य, कुशाग्र बुध्दीमत्ते ला निरागसतेची जोड आणि तीव्र इच्छाशक्तीला विनयाची जोड असणार्‍या या हनुमानाचे चरित्र आपल्याला निश्चित आवडेल ही अपेक्षा!

          सीतेसमोर अतिशय सुक्ष्म रुपात प्रगट होणारा, लंका दहन करतांना प्रचंड महाकाय, विराट रुप धारण व असुरांचं दमन करुन रामाची मोहिम फत्ते करणारा, लक्ष्मणासाठी संंजीवनी आणल्याने त्याला जीवदान मिळाल्या मुळे, राम प्रसन्न होऊन, हनुमानाचे कौतुक व गौरव करुन म्हणाले, तू मला भरता इतकाच प्रिय आहेस. त्याला गौरवत सहस्रवदनी शेषनागही तुझा गौरव करेल असा वर दिला. राम-सुग्रीव भेट घडवून, वालीचा नाश व सुग्रीवा ला त्याच्या पत्नीसह राजपद मिळवून दिले. त्याच्या सल्ल्याने बिभीषण लंकेचा राजा झाला रामांनी ओळख म्हणून सीतेसाठी दिलेली अंगठी तोंडात धरुन समुद्र पार केला.सीतेने त्याला दिलेल्या वरांनुसार अष्टसिध्दी आणि नवविधी प्राप्त झाली.

         संजीवनी वनस्पती शोधत असतांना याकु पर्वतावर असलेल्या याकु नावाच्या साधुकडून

संजीवनी असलेल्या द्रोणागिरी पर्वताची माहिती मिळाली. परत येतांना भेटीचे वचन दिले होते, परंतु कालनेमी राक्षसाबरोबर युध्दात वेळ गेल्यामुळे साधूला दिललं वचन पाळता न आल्याने याकुऋषी दुःखी झाल्याचे कळल्यावर त्याचवेळी त्याच्यासमोर प्रकट होऊन दर्शनदिले

           युध्दकाळात शक्तीशालि महिरावणाने राम-लक्ष्मणाला बंदी केले तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी, महिरावणाच्या नियोजित पांच ठीकाणी असलेले दीप एकाच वेळी मालवून त्याचा वध केला व राम-लक्ष्मणाची सुटका केली. प्रभु रामांना रावणाविरुध्द युध्द जिंकण्यास मदत केली.तसेच त्यांना अयोध्ये पर्यंत पोहचवण्यात मदत केली.

           आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिकवण देणार्‍या, मार्गदर्शक ठरलेल्या हनुमंतास कोटी कोटी प्रणाम!

                      क्रमशः
           मिनाक्षी देशमुख.
        दि. २०-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

भाग – १.

           राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या हातावर देत असतांना एक प्रचंड गरुडाने झेप घेऊन तिच्या हातातील प्रसादाचा कांही भाग घेऊन उडून गेला.

          उपस्थित असलेल्यांना खुपच अचंबा वाटला.हा अपशकुन तर नसावा? अशी शंका उपस्थित केल्यावर, एका सुज्ञ ऋषीने सर्वांचे सांत्वन करत म्हणाले, एवढ्या कडेकोट बंदोबस्तात जो गरुड पायसचा घास हिसकावू शकतो तो विष्णूचांच गरुड असावा.ही लीला विष्णूंचीच आहे.

             तो गरुड पायसचा प्रसाद घेऊन किष्कींधा नगरीत पोहचला.तेथील घनदाट अरण्यात वनराज केसरीची राणी अंजना हात पसरुन भगवंताकडे सद्गुणी पुत्र प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करीत होती.तेवढ्यात गरुडा कडून तो प्रसाद तिच्या हातावर पडला.अंजनाने डोळे उघडून वर बघितले तर, गरुड तिच्याकडे पाहत असलेला दिसला. हा देवानेच पाठवलेला प्रसाद समजून श्रध्देने प्राशन केला. आणि तिला लवकरच प्रत्यंतर आले. दैवी शक्तीने तिला गर्भधारणा झाली.

          शांततेचं आणि सौख्याचं प्रतिक शिव शंकर ध्यानस्थ होते. ते जागृतावस्थेत येण्याची वाट पाहत त्यांची पत्नी सती समोर बसली होती  समाधी उतरल्यावर इतर विषयांवर बोलता बोलतां शंकरजी म्हणाले, लौकरच रावणाच्या राक्षसी साम्राज्य व अत्याचाराचे दमन करण्या साठी भगवान विष्णू मानवदेह धारण करुन पृथ्वीवर अवतार घेत आहेत.त्यांच्या या कार्यात मदत करण्यासाठी सर्व गंधर्वांना वानराच्या रुपात जन्म घ्यायचा आदेश दिला आहे.देवाच्या या अवतारी कार्यात भाग घेण्यासाठी मीही वानर रुपात अवतार घेणार आहे. हे ऐकून पतीसहवासाला पारखे व्हावे लागेल म्हणून दुःखी झाली.क्षणभर विचार करुन म्हणाली, आपल्या कर्तव्याच्या आड न येता, मलाही आपल्या शेपटात जागा द्याल?

           शिवशंकरांनी आनंदीत होऊन तिची मागणी मान्य केली. सतीच्या मनांत असलेली शंका तिने विचारलीच. एकीकडे रावणावर प्रसन्न होऊन त्याला अनेक ‘वर’ देता आणि दुसरीकडे त्याच्या पतनासाठी शिजत असलेल्या कटात सहभागी कसे होऊ शकतां? तिच्या निरागस व चौकस बुध्दीचं कौतुक वाटून म्हणाले, रावणाने दहा रुद्रावतारांना प्रसन्न करुन घेतले होते. पण अकराव्या वेळी त्याने असमाधानकारक व क्रोधयुक्त वर्तन केल्यामुळे रुद्राचा अकरावा अवतार, म्हणजेच मी पृथ्वीवर अंजनाच्या पोटी हनुमान म्हणून जन्म घेईल.

        विष्णूअवतारातील श्रीरामाची सेवा करण्याची आपल्या पतीची इच्छा पाहून सतीने त्यांना अलिंगन दिलं. दोघांच्या समागमातून निर्माण झालेलं शक्तीशाली बीज शंकरांनी वायु देवाकडे सोपवून योग्यवेळी ते बीज अंजनीकडे द्यायला सांगीतले. वायुदेव ही जबाबदारी जास्त वेळ पेलूं शकणार नाही असे वाटले.कारण ते बीज इतकं तप्त होतं की, त्यांनी जर आपल्या जवळ ठेवलं तर सतत उष्ण हवा वाहून पृथ्वीचा नाश होण्याची शक्यता वाटल्याने, वायुदेवाने  सप्तर्षी महर्षींना प्रार्थना करुन, योग्य वेळेपर्यत त्या बीजाचे रक्षण करण्यास सांगीतले.महर्षींनी मंदाकिनी नदीतून धातूचं पान आणून त्यात हे शक्तीबीज जपून ठेवले.त्यांनी वायुदेवाला बीजा च्या सुरक्षिततेची आणि योग्यवेळी सुपुर्द करण्याचे आश्वासन दिले.

         या दरम्यान स्वर्गीय ग्रहांमधील बृहस्पती च्या गुरुने पुंजिकास्थल नावांच्या सेविकेला तिच्या चुकीबद्दल शाप देऊन पृथ्वीवर वानरीच्या रुपात  जन्म देऊन पाठवले. हीच ती अंजली केसरीची पत्नी! विवाहाला अनेक वर्षे होऊनही संतती होत नसल्यामुळे ती अनेक प्रकारची व्रत वैकल्ये, तपस्या करीत असलेली वायुदेव बघत होते. तिच्यावर शंकराची कृपा दृष्टी होण्याची वेळ जवळ आली होती.

                  क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २१-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

भाग – २.

       आपली पत्नी पुत्रप्राप्तीसाठी एवढे खडतर व्रत करीत असलेले बघून, केसरीनेही शंकराचे व्रत करणे सुरु केले. विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत गोकर्णाला पोहोचला. तिथं त्याचा सामना भोळ्या भाबड्या साधूंना छळणार्‍या शांबसाधन नावाच्या राक्षसाशी झाला.त्या असुराशी युध्द करुन ठार केले.त्या राक्षसाच्या अत्याचारापासून सुटका केली म्हणून सर्व साधू मिळून, तुला अतिशय शक्तीशाली,गुणसंपन्न दुष्टांचा नाश करणारा पुत्र प्राप्त होईल असा वर व शिवमंत्र दिला. उत्सुकतेने केसरीने मंत्रोच्चार केल्याबरोबर त्याच्या समोर शंकर प्रकट झाल्या क्षणीच केसरीला आपण शक्तीशाली झाल्याचे जाणवले.केसरी ही वार्ता अंजनाला सांगण्या साठी अंजनाकडे निघाला.

          बर्‍याच कालानंतर दोघांची भेट झाल्या मुळे झालेल्या आनंदाने, प्रेमाने अलिंगन दिले. आणि केसरीला मिळालेली शक्ती अंजनीमधे शिरली.

          किष्किंधा नगरीत स्वतः नारदमुनी वाली कडे आले. म्हणजे ते कांही महत्वाचा संदेश सांगायला आले हे वालीराजाने ओळखले.नारद मुनींनी सांगीतलेला संदेश ऐकून वाली अंतर्बाह्य थरारला.कणखर, आत्मविश्वासी वाली अचानक स्वतःला असहाय्य समजू लागला. पण लगेच स्वतःला सावरले. केसरीची पत्नी अंजनाच्या पोटी साक्षात शिवशंकर वानराच्या रुपात घेणार आणि हे बालक पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ होईल व त्याच्यातील शक्ती वालीच्या कितीतरी पट अधिक असेल. हे सांगून नारद अदृष्य झाले

हे ऐकून क्षणभर तर वाली थोडा घाबरला, पण कोणत्याही गोष्टीवर मात करावी लागते हे उमगून त्याने एक बेत मनाशी ठरवला.

            दुसर्‍या दिवशी वालीने केसरीच्या राज वाड्यात प्रवेश करुन अंजनीच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यास ठेवलल्या दासीला फितवून गर्भपात होणारा पंचधातुचा काढा अंजनीला पाजण्यासाठी तिच्या हाती दिला. दासीने तो गरम करुन आरोग्यकाढा आहे असे म्हणून अंजनीला द्यायला जात असतांना, अपराधबोधा ने तिचे हात थरथरु लागले. दिवस भरत आलेल्या गर्भवतीला लोह,कथिल, जस्त,सोने. तांबे चा काढा देण्यासारखं महापाप नाही. त्या काढ्याने गर्भच नव्हे तर मातासुध्दा मृत्युमुखी पडु शकली असती. पण तिचा नाईलाज होता.

           वालीच्या दहशतीने तो काढा अंजनाला दिला.अंजनाने पेला रिकामा केला तरी अंजनाला कांही फरक पडला नसल्याने ती चिंतित झाली. दिवसभर काम करत असतांना तिचे लक्ष सतत अंजनीकडेच होते.

             दुसर्‍या दिवशी अंजनाला बाळंतकळा सुरु झाल्याने अंजनाला बाळंतकक्षात नेण्यात आले. गर्भपाताची बातमी मिळेल या आशेने दासी कक्षाबाहेरच रेंगाळत राहिली.पण कांहीच वेळात गर्भपाताऐवजी नवजात शिशूचे रडणे ऐकू आले आणि दासी गर्भगळीत झाली.पांच जहाल धातूंचा काढा घेऊनही बाळाला कसा जन्म देऊ शकते? स्वतःला सावरले. उत्सुकतेने मृत्युपाशातून वाचलेलं ते अद्भूत बाळ बघण्यास ती दासी बाळंत कक्षात गेली.तो बाळ तिच्या कडे पाहून हसत असलेला बघून तीला भोवळ आल्यासारखे झाले.त्याच्या कानात जन्मतःच पंचधातुचे कुंडले चमकत होते.त्यामुळे त्याच्या नाशाऐवजी सौंदर्यात भरच पडली होती.

असुरक्षिता आत्म्याचं सौंदर्य बाधीत करते तर निरागसता चरीत्र खुलविते.

         स्वर्गात इंद्राची महत्वाची वार्षिकसभा सुरु होती. सर्व प्रशासकीय प्रमुख आपापल्या विभागाची माहिती देत होते. आणि अचानक सर्वीकडे आंधार पसरला. न भूतो न भविष्यती अशी घटना स्वर्गातिहासात प्रथमच घडली. एकच हाहाकार माजला. सूर्य प्रकाशमान असल्यावर आंधार होऊच कसा शकतो? स्वर्गातल्या व्यवस्थेत कधीच चूक होऊ शकत नाही. अग्नीदेवतेचा अंधूक प्रकाश सभागृहात पडला होता. तेवढ्यात एक रक्षक अडखळत येऊन म्हणाला, एका वानराच्या पिलाने लाल फळ समजून सूर्य गिळला. तेवढच नव्हे तर ग्रहनकाळ असलेमुळे, सूर्याला गिळंकृत करायला राहू आला असतां त्यालाही गिळले. संपूर्ण अवकाशात गोंधळ उडाला. इंद्रदेव तात्काळ ऐरावतावर बसून घटनास्थळी निघाले. आणखी विलंब होऊ नये म्हणून इंद्राने आपले शब्दवेधी वज्रास्र भिरकावले,ते हनुमानाच्या हनवटीवर आदळले.हा वार कुणीच सहन करुं शकले नसता. त्या वानरबाळाचा फक्त जबडा दुखवला व बेशुध्द होत असतांनाच त्याच्या उघड्या पडलेल्या तोंडातून सूर्य व राहू बाहेर निसटले.

                  क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  २१-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

भाग – ३.

       सूर्यदेवाची सुटका झाल्यावर ते आपल्या नियोजित स्थळी परतल्याने सर्व  देवांनी सुटकेचा श्वास सोडला. पण त्यांना पुढील संकटाची चाहुल लागली. त्या वानरबाळावर हल्ला करण्यापपूर्वी बृहस्पती किंवा ब्रम्हदेवाचा सल्ल्ला घेतला नव्हता. वज्राघाताने ते बाळ जवळजवळ निर्जिवास्थेत पृथ्वीच्या एका गुहेत एकाकी पडले होते.

          अचानक स्वर्गावर आणखी एक संकट कोसळले. हवेची अभिसरण प्रणालीच बंद पडली होती. श्वास घेण्यास सर्वांना अडचण येऊ लागली. सर्वांनी सर्वोच्च सल्लागार असलेल्या ब्रम्हदेवांकडे धाव घेतली.ते म्हणाले, हे वानर बाळ वायुदेवाचा पुत्र आहे. अंजनेय म्हणजेच अंजनी पुत्र, श्रीशंकराचा अवतार आहे. रावण पतननामधे त्याची फार मोठी भूमका असणार आहे. आपल्या पुत्राची ही अवस्था बघून, वायु देवाने सर्वीकडची हवा बंद केली.वानरबाळाला शुध्दीवर आणण्यासाठी,व वायुदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व गंधर्वांना सोबत येण्यास ब्रम्हदेवानी सांगीतले.

               गुहेतील वातावरण खूप गंभीर होते. दुःखी बाप आपल्या निर्जिवत पडलेल्या मुला कडे पाणावल्या डोळ्याने बघत होता.ब्रम्हदेवांने आपल्या कमंडलू मधून पवित्र पाणी त्या बाळा च्या अंगावर शिंपडले व शरीरावर चोळले. कांही क्षणात ते बाळ उठून बसले आणि आपल्या सभोवताली जमलेल्या गर्दीकडे बघू लागला. त्याचा जखमी जबडा बघून ब्रम्हदेवांनी त्याचे ‘हनुमान’ म्हणून नामकरण केले. हनु म्हणजे जबडा! या बाळाने केलेला हा  अद्भूत प्रकार जगभर पसरुन कीर्तीमान होईल.म्हणून ‘हनुमान’! तसेच हा वायुपुत्र असल्यामुळे ‘मरुत सुत’ किंवा मारोती, आणि आतां त्याचं शरीर वज्रासारखं कठीण झाल्यामुळे ‘बजरंगबली’ म्हणून ओळखल्या जाईल. मी जोपर्यत आहे तो वर हा ही जगेल.कोणीही यास मारु किंवा पराजित करुं शकणार नाही.

             ब्रम्हदेवांच्या सोबत आलेल्या प्रत्येक गंधर्वाने त्याला आशिर्वाद दिला.याला अग्नि पासून कधीही भय राहणार नाही हा वर अग्नि देवानी दिला.इंद्राने त्याच्याइतकाच प्रसिध्द होईल, कोणतेही शस्रअस्र जखमी करु शकणार नाही, तर बृहस्पतींनी वर दिला याला आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान असेल.सर्व वेदांत शिकवण्याची जबाबदारी सूर्याने घेतली.धन्वतंरी देवाने रोगांचा उपचार करण्याचा, तर विश्वकर्मा  वास्तुविशारद यांनी अलौकिक बुध्दी, सर्जन शीलता व वैचारिक स्पष्टतेचा वर दिला. आणि त्याचे वडिल वायूदेवाने अतिवेगवान होण्याचा वर दिला.

             सर्व देवांचे वर देऊन झाल्यावर ब्रम्हदेवांनी त्याच्या गळ्यात हिर्‍याची माळ घातली व भगवंताचा आजीव सेवक राहशील असा सर्वोच वर देऊन म्हणाले, ज्याला याच्या गळ्यातील माळ दिसेल तोच याचा देव व धनी असेल. सर्वजण निघून गेल्यावर छोटासा हनुमान विचार करुं लागला, जर एवढ्या छोट्याशा खोडीने इतके लक्ष वेधून घेऊ शकतो तर आणखी खोड्या करायला काय हरकत ?

             त्या दिवशी आपला पुत्र धावत,उड्या मारत न येतांना बघून,कांही तरी घडणार अशी केसरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याचा पडलेला चेहरा बघून, गुडघ्यावर बसून त्याचा चेहरा कुरवाळीत केसरीने प्रेमाने विचारले, काय झाले बाळा? मला अभ्यास करायचाय हे वाक्य ऐकून केसरी आवाक् झाला केसरीला जाणीव झाली,नक्कीच यामागे मोठी शक्ती असावी. दररोज नदीकाठी जाऊन हनुमान लोकांच्या खोड्या काढतांना नवनवीन तर्‍हा शोधायचा.यज्ञयाग करणार्‍या ऋषींच्या अलौकिक शक्तीच्या भीतीने सामान्य माणूस त्यांच्यापासून दूर राहयचे आणि हनुमान मात्र त्या ऋषींच्या खोड्या काढून त्यांचा उद्विग्न चेहरा पाहून झाडामागे लपून पाहत आनंदी होत होता. एकदा ऋषींची सभा ज्या झाडाखाली बसून सुरु होती, त्या झाडाला रसरशीत पिकलेली फळे बघून, हनुमान त्या झाडावर झेपावला व ती फांदी तुटल्यामुळे दुसर्‍या फांदी वर झेपावला व तीही फांदी तुटली व दोन्ही फांद्या बसलेल्या ऋषींच्या मधे पडली. इजा कुणाला झाली नाही पण सर्वच ऋषी खूपच संतापले.पण त्याहीपेक्षा मोठी घटना घडली…

                   क्रमशः
 संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २१-७-२०२२.

भाग – ४.

एके दिवशी हनुमान जंगलात गेला असतां, तिथे त्याला जंगली हत्ती व वाघाची सुरु असलेली झुंज दिसली. तो सरळ जाऊन हत्तीची सोंड पकडून वाघाच्या तावडीतून सोडवले व दुसर्‍या हाताने वाघाची शेपटी पकडून दोन्ही प्राणी फरफटत आश्रमातील एका ऋषीच्या झोपडीच्या दाराच्या दोन्ही बाजू च्या खांबाला बांधले आणि लपून बसला. ती झोपडी तृणबिंदू नावाच्या ऋषीची होती. प्रातःर्विधी उरकण्यासाठी लोटा घेऊन दार बाहेर जाण्यासाठी दार उघडले तर समोर गुरगुरणारा वाघ पाहून त्यांचे धाबे दणाणले. किंचाळत परत झोपडीत शिरले.पण त्यांना जायची घाई झाल्यामुळे परत झोपडीच्या दुसर्‍या बाजूने बाहेर पडायला गेले तर जंगली हत्ती दिसला. परत ते झोपडीत गेले.

तृणबिंदूंची चांगलीच पंचायत झाली. पोट दुखु लागले आणि बाहेर मोठे संकट!तेवढ्यात हसण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीतून बाहेर बघतांच पोट धरुन हसणारा हनुमान त्यांना दिसला. तृणबिंदू ऋषींना अतिशय संताप आला व कमंडलू मधील पाणी हातात घेऊन त्याच्याकडे फेकत शाप दिला, हे उद्दाम माकडा, ज्या शक्ती आणि गतीच्या जोरावर सर्वांना त्रस्त करतोस, छळतोस, ती शक्ती जोवर कुणी तुला स्मरण करुन देणार नाही तोवर त्याचा विसर पडेल.ती शापवाणी ऐकून हनुमान शांत झाला.आपला वेळ अशा खोड्या करण्यात घालवण्यापेक्षा सत्कारणी लावण्याचा विचार करुं लागला. ज्ञान मिळवण्याचा विचार पक्का करुन राजवाड्यात पित्याकडे आला.

पित्याची अनुमती घेऊन, ज्ञानार्जन करण्यासाठी हनुमान सूर्याकडे निघाला. हनुमान आपल्याकडे येत असलेला बघून सूर्यदेवाला मागच्या प्रसंगाची आठवण झाली. त्यांना कांही वेळ हनुमानाच्या मुखात रहावे लागले होते.पण आतांचा हनुमान वेगळा होता. तो हात जोडून ऊभा असलेला बघून त्यांना आश्चर्य वाटले.

हनुमान अतिशय नम्रपणे म्हणाला, मी आपल्याकडे कितीही कष्ट पडले तरी ज्ञानार्जन करण्यासाठी आलोय.सूर्यदेवाला असा नम्र विद्यार्थी मिळतो म्हणून आनंद झाला.पण अडचण अशी की, सर्व वर्ग भरले होते.नुकतेच हजारो ऋषींना प्रवेश देऊन वर्ग सुरु झाले होते.

अजून सुरु न झालेला एकच वर्ग होता. जागा शिल्लक नसल्याचे सांगीतल्यावर हनुमान नुसताच हसला. कारण त्याच्यासाठी ही अडचण शुल्लक होती. तो वर्ग म्हणजे त्यांचा स्वतःचा स्वर्गीय रथ! त्यात मर्यादितच विद्यार्थी बसू शकत होते. दुसर्‍या दिवशी वर्ग सुरु झाल्या वर वर्गाबाहेर एक नवीन विद्यार्थी बघून वर्गातील विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. रथवर्ग जसा हलायचा तसा हनुमानही वर्गाबाहेर

हलायचा.ज्या वेगाने रथ धावायचा त्याच वेगाने हा पण धावायचा व तेवढ्याच तन्मयतेने सूर्य देवांचे व्याख्यान लक्ष जराही विचलित होऊ न देता तन्मयतेने ऐकायचा.

हे सर्व सुरु असतांना आपल्या गुरुचे मुख दिसत नाही म्हणून त्याच्याकडे चेहरा करुन उलट्या दिशेने उडायला सुरुवात केली. सूर्याच्या साठ कक्षेतून फिरत हनुमानाने सर्व वेद आत्मसात केले. आपल्या या नव्या शिष्यावर खुष होऊन आशिर्वाद दिला.शिक्षण पूर्ण झाल्यावर,

हनुमानाने गुरु सूर्यदेवाला गुरुदक्षिणा द्यायची इच्छा प्रकट केल्यावर ते म्हणाले, तुला गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर, माझा पुत्र सुग्रीव वालीच्या भयाने ऋषिमुख पर्वतावर लपून बसला आहे. वालीने त्याची पत्नी रुमाला ताब्यात घेऊन त्याला राज्यातून हाकलून दिले. जीथे सध्या सुग्रीव आहे ते पृथ्वीवरचं एकमेव असं ठीकाण आहे तिथे वाली जाऊं शकत नाही

गेल्यास ऋषीच्या शापामुळे त्याचेवर मृत्यु ओढवेल. तूं सुग्रीवाचा मंत्री होऊन त्याला राज्य व पत्नी मिळवण्यास मदत कर, हीच माझी गुरु दक्षिणा! आतां वाली व सुग्रीवच्या मधे भिंत नव्हे किल्ला बनून हनुमान उभा राहील.

ऋषिमुख पर्वतावर सुग्रीव तीन मित्रां बरोबर बसला होता. हनुमान त्याच्या समोर उभा राहिला तोच सुग्रीव भीतीने थरथर कापत व मित्र भयभीत होऊन खाली मान घालून बसलेले दिसले. इतके शक्तीशाली बलवान वानर हतबल कां? हा प्रश्न मनांत येताच कऽडकऽड असा मोठा आवाज झाला व सुग्रीव जमीनीवर गडबडा वेदनेने लोळत असलेला दिसला.सुग्रीवाचे मित्र त्याला उठवण्यास मदत करत होते.हा काय प्रकार आहे हनुमानाला कळेना. थोडा सावरल्यावर हनुमानाने स्वतःची ओळख दिली व काय घडले म्हणून विचारल्यावर, सुग्रीवाच्या वेदना कमी झाल्यावर, सावरलेला सुग्रीव सांगू लागला हनुमाना! दिवसातून रोज १२ वेळा ठराविक अंतराने या प्रकाराला मला सामोरे जावे लागते. सुग्रीव सांगू लागला….

क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading