भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग ७, (३१ ते ३५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३१.

 वास्तविक स्यमंतक मण्यावर सत्यभामेच्या मुलाचा,पर्यायाने त्याचा हक्क होता पण!घरातील दुही टाळण्या साठी रास्त हक्काचा त्याग करुन,तो मणी तुझ्याच जवळ ठेव व निश्चिंत मनाने घरी परत ये, असा निरोप अक्रुराला श्रीकृष्णानने पाठवला.अक्रुर काशीहुन आल्यावर सर्वां समक्ष त्यालाच तो मणी देऊन स्यमंक मण्याचा विषय इथेच संपवला.

 श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन आनंदात जाऊ लागले.आठ भार्यांमधे सर्वतोपरी उत्तम व आदर्श गृहस्थी कशी चालवावा याचे ऊदाहरण त्याच्या जीवनावरुन दिसुन येते,पण धर्मरक्षणार्थ मानवलोकी अवतीर्ण झालेल्या कृष्णाला कुठली उसंत?तो सत्यभामेशी तिच्या महालात निवांत बोलत बसले असतां,इंद्राचा दूत निरोप घेऊन आला, “प्रागज्योतिष” (आसाम) चा महादुष्ट,ऊन्मत राक्षस,राजा नरकासुराने वरुणाचे छत्र,इंद्रमाता अदितीची कुंडले व इंद्राचे मणीपर्वत हरण केले.त्याचे परिपात्य करावे.हे ऐकताच कृष्णाला हा आपलाच अपमान समजुन,संतापाने त्याचे पारिपात्य करण्याचा निर्धार केला व तसा दूताला निरोप दिला,प्रागज्योतिषाचा(आसामचा) राजा नरकासुर राक्षसाने पृथ्वीवरील गंधर्वाच्या,मनुष्याच्या व राक्षसांच्या सुंदर सुंदर मुलींचे अपहरण करुन त्यांना एका पर्वतावर कैद करुन ठेवले होते.त्या गरीब मुलींना सोडविण्याचा विचार सुरु असतांनाच इंद्राकडुन दूत आल्यामुळे तात्काळ हालचाल करणे आवश्यक होते.सत्यभामे ने सोबत येण्याचा हट्ट केल्यामुळे तिलाही बरोबर घेऊन, शंख,चक्र,गदा घेऊन युध्दाच्या तयारीने सरळ गरुड वाहनाने श्रीकृष्ण प्रागज्योतिष नगरीत येऊन पोहोचला .प्रत्यक्ष श्रीवत्सांकित भूषण व वन मालांनी युक्त असा श्रीविष्णुच गरुडारुढ होऊन येत असलेसे पाहुन,नरकासुराने मुरु नामक असुरश्रेष्ठ आणि कल्पांत कतुल्य सेनापती हातात शक्ती घेऊन श्रीकृष्णाचा प्रतिकार करण्यास अंगावर धावुन आपल्या हातातील व्रज व कांचन अस्र फेकली.जळजळीत उल्केसारखी ती महाशक्ती आपल्याकडे येतसे पाहुन जनार्दनाने सुवर्णपंखा बाण सोडल्याबरोबर त्या महाशक्तीचे दोन तुकडे झाले.ते पाहुन संतापाने त्याने सुवर्ण गदा घेतल्याचे पाहुन वासुदेवाने अर्धचंद्र बाण सोडल्या वर गदेचे दोन तुकडे झाले व लगेच दुसर्‍या बाणाने त्याचे मस्तक उडविले. मरु व असंख्य दैत्यांचा समाचार घेतल्या वर श्रीकृष्णाने पर्वत ओलांडुन गेल्यावर तिथे निसुंद हा दुसरा सेनापती व हयग्रीवा सुल ससैन्य युध्दास सिध्द असल्याचे श्रीकृष्णाला दिसले.

 निसुंद, हयग्रीवासु व श्रीकृष्णामधे भिषण युध्द होऊन महाबलाढ्य दोघेही दैत्य ठार व दानव सैन्याची पूर्ण वाट लावुन,श्रीकृष्ण प्रागज्योतिष नगराच्या वेशीजवळ येऊन “पांचजन्य” शंख जोरात वाजवला.प्रचंड शंखध्वनी ऐकुन भयंकर क्रोधीष्ट नरकासुर, एक सहस्र अश्व जोडलेल्या,शत्रुला कर्दनकाळ वाट णार्‍या रथात आरुढ होऊन सोबत धुम्रवर्ण,धिप्पाड रकाक्ष व विक्रतमुखी, दैत्य,दानव व राक्षसांसह सज्ज होऊन नगराबाहेर,जिथे श्रीकृष्ण होता,त्याला गराडा घालुन भीषण युध्द सुरु झाले, शेवटी मधुसुदनाने आपल्या दैदिप्यमान चक्राच्या सहाय्याने नरकासुराच्या शरीरा चे दोन शकले भूमीवर पडले.पराभूत दानव सैन्य श्रीकृष्णाला शरण आले.

 श्रीकृष्णरुपी भगवान विष्णुंचे एक मोठेच काम आटोपले.श्रीकृष्णाने नरका सुराच्या प्रचंड वाड्यात प्रवेश करुन त्याच्या जामदार खान्यातील अपार धन, विपुल मोती,विविध रत्ने,प्रवाळ,वैडुर्य राशी,सुवर्ण,चंद्रकांत मणी,हिर्‍यांचा ढीग, महामुल्यवान शयने,सिंहासने, वरुणाचे हरण केलेले मौल्यवान छत्र, व इंद्रमातेची कुंडले,एवढे अफाट भांडार व वीस सहस्र हत्ती अठरा हजार अश्व,गायी कोशरक्षका ने श्रीकृष्णाला अर्पन केल्यावर,कृष्णाने ती सर्व संपत्ती द्वारकेस पोहोचविण्याची आज्ञा केली.नरकासुराने हरण करुन ठेवलेल्या कन्यांना मुक्त करण्यासाठी तो गरुडावरुन गिरिकंदात आला. त्या सर्व कन्यांची मुक्तता झाल्यावर त्या सर्वांनी भक्तीभावाने नमस्कार करुन सद्गदीत सयंत व आनंदी मुद्रेने म्हणाल्या,देवा! आमची मुक्तता करुन आमचा उध्दार केलास,तुझे चरण सोडुन आम्ही कुठेही जाणार नाही.त्यांच्या विनंतीनुसार सर्वांना अंगरक्षकांसोबत द्वारकेस पाठवुन दिले. तिथुन निघण्यापुर्वी नरकासुराची माता भूमी च्या विनंतीवरुन नरकासुर पुत्र भगदत्तला गादीवर बसविले.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !! भाग – ३२.

 सर्व व्यवस्था लावल्यावर सत्यभामेसह देवांचे वास्तव्य असलेल्या मेरु पर्वत ओलांडुन देवलोकी इंद्रभवनात प्रवेश केला.इंद्रपुत्र शतक्रतु अमरनाथने त्यांचे स्वागत केले.श्रीकृष्णाने आणलेली आदितीमातेची दिव्य कुंडले त्याच्या स्वाधीन केले.नंतर दोघेही इंद्राबरोबर देव माता अदितीच्या वैभवशाली दिव्यमंदिरा कडे गेले.अदितीपुत्र इंद्राने,कृष्णाने जिंकुन आणलेली कुंडले तिला अर्पन करुन,श्रीकृष्णाने मोठा परिक्रमाने नरका सुराचा वध करुन कुंडले कशी मिळविली याचे समग्र वर्णन तीला ऐकवले.श्रीकृष्ण सत्यभामेने पदवंदन केल्यावर,ती आशिर्वाद देत म्हणाली,जसा हा जगद्वंद्य इंद्र अजिंक्य आहे तसाच भूमात्रांना तु ही अवध्य आहेस,आणि ही तुझी सत्यभामा सदैव सौंदर्यवती राहुन,तू मनुष्यरुपात जो पर्यत पृथ्वीवर वास्तव्य करशील तोपर्यंत ‘जरा’ हिला स्पर्श करणार नाही.

 नंदनवनावरुन मार्गक्रमण करीत असतां,सत्यभामेला पारिजातकाचे झाड पाहिल्यावर हा वृक्ष आपल्या दारी असावा असे कृष्णाला म्हटल्यावर त्याने ते झाड उपटुन द्वारकेला सत्यभामेच्या मंदिराच्या अंगनात लावले.श्रीकृष्ण द्वार केस सुखरुप पसरल्याने सर्वांनाच आनंद झाला.श्रीकृष्णाने मातापित्यांचे पदवंदन केल्यावर बाजुलाच बसली असलेली कृश झालेली रुख्मिणी दिसल्यावर,त्याने सहेतुक मातेकडे पाहिल्यावर,माता म्हणाली,कृष्णा!तू गेल्या दिवसापासुन युध्दात विजयी होऊन सुखरुप परत यावास म्हणुन कडक उपास व व्रत वैकल्ये करीत होती.

 कृष्ण आल्याचे कळताच प्रमुख यादव सरदार भेटायला आले.तू द्वारके पासुन दूर गेल्याची संधी साधुन शिशुपाल द्वारकेवर चालुन आला,पण प्रद्युम्नने मोठ्या पराक्रमाने त्याला पराभूत केले. त्याने जातां जातां आग लावल्यामुळे द्वारकेचा बराचसा भाग जळून गेला.कांही हरकत नाही.येतांना प्रागज्योतिषपुराहुन अमाप संपत्ती आणली असल्याने विश्वकर्माच्या मदतीने द्वारकेला पृथ्वीवरील वैकुंठ बनवु!

 रैवत पर्वतावर रुख्मिणीच्या व्रताचे पारणे मोठ्या थाटात झाले.आणलेल्या विपुल संपत्तीपैकी मुक्तहस्तोदान करुन सर्वांना संतुष्ट केले.या अद्वितिय झालेल्या पारणा समारंभाने सारी द्वारका खुष व आनंदीत होऊन,रुख्मिणीची जिकडे तिकडे प्रशंसा होत असलेली पाहुन सत्यभामाच्या मनांत इर्षा निर्माण झाली.नेहमी प्रमाणे नारदमुनीची फेरी झाली असतां!पती कृष्ण फक्त माझेवरच वश राहतील असे व्रत सांगण्याची नारदा ला विनंती केल्यावर त्यांनी ‘पुष्पक’ व्रत करण्यास सांगीतले.या व्रताचा विधी स्वतः नारदाने केला.पुष्पक व्रताचे पारणे नारदमुनींच्या सागण्यानुसार केल्यावर स्वर्गाहुन आणलेल्या पारिजातकाच्या झाडाला श्रीकृष्ण बांधुन तो वृक्ष सत्यभामेने नारदांना दान केल्यावर नारद म्हणाले, सत्यभामे! मला दान केलेला हा वृक्ष व कृष्ण सोबत घेऊन जातोय.चल कृष्णा, कृष्णही निमुट ऊठला व नारदा बरोबर गंभीर मुद्रा करुन जाऊ लागला, तेव्हा घाबरलेल्या सत्यभामेला आपलं कांही तरी चुकल्याची जाणीव झाल्याने ती म्हणाली,मुनिवर्य! हे तुम्ही काय केलेत? पतीचे अढळ प्रेम प्राप्त होण्याचा हा प्रभावी विधी केलास ना? तिने खुप विनंती केल्यावर,सवत्स कपिला गाईचे उदक सत्यभामेकडुन करवुन श्रीकृष्णा ला तिच्या स्वाधीन केले.मग तिने विपुल दान देऊन सर्वांना संतुष्ट केले.पारिजात क फुलांचा सडा व सुगंध वर्षभर सर्वी कडे पसरत होता.

 सर्वी धार्मिक कृत्ये पार पडल्यावर श्रीकृष्णाने विश्वकर्माला पाचारण केले. त्याने द्वारकेचा कायापालट करुन स्वर्गा तील वैकुंठाप्रमाणेच द्वारकानगरी दुसरं वैकुंठच बनविले. द्वारकेभोवती कुबेराच्या चैत्ररथवन,इंद्राच्या नंदनवना प्रमाणे रमणीय बगीच्याचा वेढा दिल्यामुळे वेगळीच शोभा वाढली होती.विश्वकर्माने

श्रीकृष्ण,रुख्मिणी,सत्यभामा तसेच इतर राण्यांसाठी भव्यदिव्य व अनुपम सौंदर्य युक्त महल बांधले.नरकासुराकडुन सोडवु न आणलेल्या सार्‍या स्रीयांसाठी सर्व सोयींनी युक्त असा भव्य वाडा कृष्णाने आपल्या वाड्याशेजारीच बांधुन घेतला.

 त्या स्रीया श्रीकृष्ण आला की, त्याची मनोभावे भक्तीने पुजन करीत . गोकुळ वृंदावनांतील गोपींप्रमाणेच प्रीती चे भक्तीत परिवर्तन झाले.श्रीकृष्णाच्या अष्टभार्याही त्यांच्याशी स्नेहभावाने वागत प्रमुख गृहिणी रुख्मिणी त्या सगळ्यांची अगत्यपुर्ण काळजी घेई.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३३.

 श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन अगदी उत्तम तर्‍हेने चालले होते.आपल्या अष्ट भार्यांचे सर्व मनोरथ त्याने पुर्ण केले.तो सर्वांशी समभावनेने वागत होता.स्रीपुरुष उच्च नीच,भेदाभाव,श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना त्याच्या ठायी मुळीच नव्हती.जांबवतीला पुत्र होत नव्हता म्हणुन,स्वतः कृष्ण हिमालयावर जाऊन एक वर्ष घोर तपश्चर्या करुन महादेवाला प्रसन्न केले. महादेवाच्या वराने झालेल्या पुत्राचे नांव सांब ठेवले.

 बर्‍याच वर्षांनी समुद्र यात्रेच्या पर्वणी निमित्य सहकुटुंब महायात्रेला समुद्र किनारी जमलीत.तिथे विविध क्रीडा,गोकुल वृंदावनासारखा रासक्रीडा सारखाच छालिक्य गान क्रीडा,नाट्य प्रयोग,विविध पक्वानांचा आस्वाद घेत नव्या जुन्या आठवणी काढत मनमुराद आनंद सर्वांनी ऊपभोगला.सगळ्यांच्या आग्रहावरुन बर्‍याच वर्षाने श्रीकृष्णाने मुरली वाजविली.सर्व वातावरण स्तब्ध झालं.सारे त्या वेणू वादनाने मोहित झाले. देहभान हरपले. सारे कार्यक्रम आटोपेस्तोवर पहाट झाली.मोठ्या आनंदात सर्वजण द्वारकेस पोहोचले.

 श्रीकृष्णाच्या अष्टभार्यांना प्रत्येकी दहा पुत्रे व एक कन्या झाली.अपत्याबाब तीत ही त्याने समानता दाखवली होती. सर्व पुत्रे रुपवान व पराक्रमी होते.त्यांना सर्व प्रकारची विद्या व योग्य शिक्षण देण्यासाठी अनुभवी शिक्षण नेमाले.वेळ मिळेल तेव्हा तो स्वतःही मार्गदर्शन करीत असे.त्या पुत्रांच्या वेदाध्ययनासाठी द्वारकेतच वेगळा आश्रम बांधुन,सांदीपानी मुनींच्या देखरेखेखाली बलराम- श्रीकृष्ण व यादवांची मुले अध्ययन घेऊ लागली.श्रीकृष्णाचा संसार वाढत होता. पुढच्या पुढ्या निर्माण होत होत्या.प्रत्यक्ष श्रीकृष्णाचीही दिनचर्या अत्यंत आदर्श होती.रोज ब्रम्हमुहुर्तावर ऊठुन सर्व पुजा विधी आटोपुन ब्राम्हणांचे,मातापित्यांचे, धेनुचे दर्शन घेऊन बाहेर दर्शनार्थ जमले ल्या प्रजाजनांच्या इच्छा जाणुन तात्काळ पुर्ण केल्या जाई.नंतर अंतःपुरातील प्रत्येकीचा परामर्ष घेऊन,प्रत्येकीकडे क्रमाने जाऊन भोजन घेत,त्यांना आनंद प्रदान करीत असे.हे सर्व होत आहे तोच पाणीदार पांढर्‍या शुभ्र घोड्यांनी जोडलेला रथ समोर आला की, उध्दव,सात्यकी या दोन मंत्र्यांसह रथारुढ होत असे.वेळे च्या बाबतीत तो फार काटेकोर असे.वेळेत सभागृहात प्रवेश करी.सर्व कामाचा रितसर आढावा घेतल्यावर दोन प्रहरा नंतर घरी परत येई,भोजनोत्तर विश्रांती झाली की,उध्दव किंवा एखाद्या पत्नीबरो बर सोंगट्याचा डाव खेळे.संध्याकाळी शस्रविद्येचा सराव,व्यायाम.परत रात्रीच्या भोजनोत्तर कारभारी,बलरामाशी राजकारणी चर्चा होई.भार्यांशी चर्चा करुन मुल-मुलींच्या विवाह,मोजिबंधने, यज्ञे,व्रते या सर्वांची उत्कृष्ट व्यवस्था लावुन दिली जाई.द्वितिय प्रहरी झोपायला जाई.

 याप्रमाणे धर्मानुसार सध्दर्म काटेकोर पाळत श्रीकृष्णाचा काळ आनदात जात होता.अशातच पांचाल देशाचा राजा द्रुपद राजाकडुन द्रौपदी स्वयंवराचे निमंत्रण घेऊन दूत आला.४५ वर्षाचा श्रीकृष्ण आपल्या पुत्रांसहित स्वयंवराला गेला.जेष्ठ पुत्र २० वर्षाचा सुंदर,पराक्रमी प्रद्युमला जर द्रौपदी मिळाली तर पहावे.त्याच्या बरोबर स्वयंवर बघण्यास व पराक्रमाची परिक्षा देण्यास बरेच यादववीर व बलराम सुध्दा आपले दोन पुत्र व उल्युकसह निघाला.रोहिणीला बलराम नंतर आणखी पुत्र झाले तेही बरोबर होते.देवकीला कृष्णानंतर ‘गद’ नावाचा पुत्र झाला तोही बरोबर होता.या गदावरुन श्रीकृष्णास गदग्रज असेही म्हणत.

 द्रौपदीला बघण्याच्या उत्कंठेने व तीला मिळविण्याच्या दुर्दम महत्वाकांक्षेने भरत खंडातील मोठमोठे राजे पण आले होते.यज्ञवेदातुन जन्मलेल्या या याज्ञसेनीचे अनुपम सौंदर्य,प्रखर बुध्दीमत्ता,दाहक तेजस्वीपणा इत्यादी अलौकिक गुणांची ख्याती त्यांच्या कानी पोहचली होती. दुर्योधन बंधु,कर्ण, गांधार पुत्र शकुनी, सौबल,बृहदल, इत्यादी राजे हजर होते. पंचनद्यादेश,विराटदेश,मगधदेशांचेही राजे चढाओढीने आले होते.भरतखंडाती ल एकही मोठा राजा येण्याचा राहिला नव्हता.सर्वांची ससैन्य शिबिरे पडली होती.आतांपर्यत कोणत्याही राजकन्ये साठी एवढी राजामहारांची गर्दी झाली नव्हती.अग्निशिखा द्रौपदीला जिंकण्या ची दुर्दम्य आकांशा मनी बाळगुन हजर झाले होते.नव्हते फक्त पांडव.ते लक्षागृहात जळुन मेल्याचे वृत्त मागेच सगळीकडे पसरले होते.त्यामुळे कांहीना आनंदी झाले होते,कारण एकटा अर्जुनानेच हा ‘पण’ जिंकला असतां व आपल्याला संधी मिळाली नसती.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३४.

 द्रुपदाने श्रीकृष्णाची व्यवस्था उत्तम ठेवली होती.कृष्णाच्या मनांत आले,इथे अर्जुन हवा होता.द्रौपदीसाठी तोच योग्य होता,पण रानोमाळ भटकणार्‍या पांडवांना स्वयंवराचे वृत्त कळले असेल का?स्वयंवाराचा दिवस उडाडला.विस्तिर्ण सुशोभित स्वयंवर मंड पात निमंत्रित राजे आपापल्या स्थानी विराजमान झाले.समोर उंच मंचावर खास तयार करवुन घेतलेले वेगाने फिरत्या यंत्रात एक मत्स्य बसविलेले, खाली पात्रात ठेवलेल्या पाण्यात पाहुन त्या मत्स्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा ‘पण’ ठेवला होता.हा ‘पण’ कोणत्याच राजाला जिंकता आला नाही.श्रीकृष्ण, सात्यकी समर्थ असुनही उठले नाहीत. कर्ण उठला.तो लक्ष्य साधणारच होता, पण तो अधिरथी सूतपुत्र,क्षत्रिय नाही,मी सूतपुत्राला वरणार नाही असे भरसभेत त्या अग्निशिखा द्रौपदीने म्हणुन त्याचा अपमान केला.पुढे काय?

 तेवढ्यात एका बाजुला बसलेल्या ब्राम्हणांतुन एक वीर ऐटीत पावले टाकीत पुढे आला.श्रीकृष्णाने त्याला तात्काळ ओळखले.त्या ब्राम्हणवीर रुपातील अर्जुनाने सहज ‘पण’ जिंकला आणि द्रौपदीने त्याला वरमाला घातली.पण जिंकलेल्या द्रौपदीला घेऊन आपल्या बंधु सह जिथे उतरले होते तिथे आले,पाठोपाठ श्रीकृष्णही आला.आत्या कुंतीच्या पायावर मस्तक ठेवले.पांडवांनी भोगले ल्या वनवासी जीवनाची व्यथा ऐकल्यावर त्यांचे सांत्वन,समाधान केले.द्रौपदीला बहिण मानली.द्रौपदीच्या विवाह सोहळ्यात जातीने हजर राहुन,अहेर म्हणुन तिला अपार धन दिले.त्या दिवसां पासुनच पांडवांची श्रीकृष्णावर भक्ती कायम जडली.अर्जुनाकडे त्याचा विशेष कल,ओढा होता.पुढे हे दोघे नर-नारायण म्हणुन प्रसिध्द झाले.सर्व उरकवुन श्रीकृष्ण द्वारकेत परतला.

 वारणावतातील लाक्षागृहात कुंती व पांडव जळली नसुन सुरक्षित व जिवंत असुन, ‘पणात’ अर्जुनाने द्रौपदीला जिंकले ही वार्ता चहुकडे पसरली.तशीच हस्तिनापुरला लोभी अंध धृतराष्र्टालाही कळल्यावर त्याचे धाबे दणाणले.पांचाल राज्याच्या सहाय्याने आपला हक्क मागण्यासाठी चालुन येतील,शिवाय आपले लाक्षागृहाचे कपट कारस्थान उघड होऊन बदनामी होईल असे वाटल्या मुळे,अंध,दुष्ट,लोभी धृतराष्र्टाने मायेचा आव आणुन पांडव जिवंत असल्याबद्दल जाहीरपणे आनंद प्रदर्शित केला.विदुराला पाठवुन पांडव,कुंती,द्रौपदी यांना कृष्णा सह प्रेमाने हस्तिनापुरी पाचारण केले. दुर्योधन-पांडवात समझौता घडवुन खांडववनासारखं,जंगलांनी,श्वापदांनी भरलेला प्रदेश,पांडवांना दिला.शांतता प्रिय व स्वकर्तुत्वार पुढे येणार्‍या पांडवां नी तेही कबुल करुन थोड्याच दिवसांत श्रीकृष्णाच्या सल्ल्याने मुळच खांडवप्रस्थ गांवाशेजारी “इंद्रप्रस्थ” नावाचे शहर वसवुन,पांडव नीती व पराक्रमाने राज्य करुं लागले.

 श्रीकृष्ण द्वारकेला पोहोचल्यावर कांही दिवसांनी भीष्मक राजा व रुख्मीने त्याची मुलगी रुख्मावतीचे स्वयंवर मांडले.स्वयंवराला श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्न गेला होता.रुख्मिणीच्या हरणा पासुन रुख्मी वैर धरुनच होता,तरी पण स्वयंवरात रुख्मावतीने प्रद्युम्नच्याच गळ्यात वरमाला घातली व इतिहारासा ची पुनरावृत्ती झाली.पराक्रमाने प्रद्युम्नने सर्व राजांचा पराभव करुन वधुला घेऊन द्वारकेला परतला.

 वास्तविक रुख्मीच्या मनांतील वैर, क्रोधाग्नी शांत झाला नव्हता,पण कृष्णा ला आपण जिंकु शकत नाही याची पक्की खात्री पटल्यावर,वरवर कां होईना लाडक्या बहिणीला बरे वाटावे हा विचार करुन पुत्री रुख्मावतीच्या विवाहास संमती दिली.या विवाहसोहळ्यास कृष्ण बलराम,रुख्मिणी,सांब इत्यादी मंडळी प्रद्मुम्नसह भोजकट नगरीस गेले.तिथे वेगवेगळ्या देशांचे राजे आले होते.मोठ्या समारंभपुर्वक थाटामाटात विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला.खरंतर नवीनच विवाहसंबंध जोडुन आपले पुर्वकर्म विसरुन वैरभाव नाहीसा करायचे रुख्मीच्या मनांत होते,पण त्याच्या दुष्ट सल्लागार मित्रांनी त्याला बलरामबरोबर द्युत खेळण्याचा सल्ला दिला..त्याला फासा तील मर्म कांही कळत नाही.पण आग्रहा ने बोलावल्यावर क्षत्रिय युध्दास व द्युतास नकार देत नाही या नियमास अनुसरुन रुख्मिने बलरामास द्युत खेळण्याचे आव्हान दिले.बलरामाने प्रथम शंभर हजार सुवर्ण नाणी पणास लावली.ती रुख्मीने जिंकली.बलरामाला राग यावा या उद्देशाने कलिंगराजा कुत्सितपणे हसला. इर्षेने रुख्मीने एक लाखाचा पण लावला तो बलरामाने जिंकला पण रुख्मी कबुल होईना.कपट करने त्याचा स्थायी भाव होताच शिवाय कपटी स्नेह्यांचे सहाय्य मिळाल्याने तो अधिकच चेकाळला ते पाहुन खवळलेल्या बलरामाने दहा कोटी निष्कांची लावलेली जंगी पैज पण जिंकला.परत वाद उपस्थित झाला.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३५.

 बलरामने जिंकलेल्या पैजेवरुन परत वाद निर्माण झाल्यावर आकाश वाणी झाली की,बलरामानेच पैज जिंकली,रुख्मी नेहमीच कपट व खोटे बोलतो,तो विश्वासाहार्य नाही.येवढ्या वरुन रुख्मीने सावध व्हायला हवे होते, पण कपटी मित्रांच्या जोरावर शेफारुन तोल सुटुन भलतेसलते बोलत बलरामा कडे तुच्छतेने हसुन बघत म्हणाला, अरे बलरामा! तुम्ही गवळ्यांची पोरं, रानात गाई चारणेच तुमचे काम!द्युत खेळणे आम्हा राजांचा षौक…उत्तेजन देणारे त्याचे मित्र होतेच.यावेळी मात्र बलरामा ला संताप अनावर होऊन, लोखंडाच्या परिघाने रुख्मीच्या मस्तकाचे तुकडे केले. गोष्ट एवढ्या थराला जाईल असे न वाटल्याने कलिंगराजा तिथुन निघाला असतां बलरामाने त्याचेही दात पाडले. शत्रुपक्षाकडील विरांची एकट्या बलरामा ने कत्तल केली.रुख्मीचा वध झाल्यावर श्रीकृष्ण मात्र तटस्थ राहिला.कारण दुःख दाखवले तर दादाला राग येईल व आनंद मानला तर रुख्मिणीला वाईट वाटेल.नव वधुसह सर्व मंडळी द्वारकेला परतली.पुढे कांही दिवसांनी रुख्मावतीला अनिवृध्द नावाचा पुत्र झाला.योग्यवेळी बाणासुराची कन्या उषाशी त्याचा विवाह झाला.

 द्वारकेत श्रीकृष्णाचे व इंद्रप्रस्थात पांडवांचे जीवन सुरळीत सुरु होते,दोन्ही कडचे दूत चांगल्या वाईट वार्ता घेऊन ये जा करीत होते.द्रौपदी विवाहानंतर पांडव बंधुना नियम घालुन दिला होता की,जेव्हा द्रौपदी एका भ्रात्याबरोबर एकांतात असेल तर दुसर्‍याने त्या एकांताचा भंग करु नये.जर झालाच तर त्याने बारा वर्षे तिर्थाटन करावे.एका ब्राम्हणाच्या गाई कसाई लुटुन नेत असल्याची तक्रार आल्यामुळे शस्रासाठी नाईलाजाने युधिष्ठीर-द्रौपदी एकांतात असतांना नियमाचा भंग करावा लागल्याने त्याला बारा वर्षे तिर्थयात्रेला जावे लागले. १२ वर्षे संपल्या वर श्रीकृष्णाला भेटण्यास अर्जुन आला असतां त्याच्या सन्मानार्थ कृष्णाने रैवत पर्वतावर मोठा उत्साह केला,तिथे श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा त्याच्या दृष्टीस पडली.तिच्या रुपावर अर्जुन मुग्ध झाला. श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यावर,शिवाय अर्जुनावर विशेष मर्जी असल्यामुळे सुभद्राचा विवाह त्याच्याशीच व्हावा, पण बलरामची इच्छेनुसार तिला दुर्योधनाला द्यायची होती.त्यानुसार वाटाघाटी सुरु होत्या.त्यामुळे दादा सम्मत्ती देण्याची शक्यता नव्हतीच.शिवाय दुर्योधन राजा होता,तर अर्जुन राजाचा भाऊ! म्हणुन त्याने अर्जुनाला सुभद्रेचे हरण करण्याचा सल्ला दिला.त्यानुसार मृगयेला जाण्याचे निमित्य करुन रथ घेऊन निघाला व योग्य वेळ पाहुन सुभद्रेला रथात घालुन रथ इंद्र प्रस्थाकडे हाकलला.हे वृत्त कळतांच संतापुन बलरामाने यादव सेनेला पाठलागाचा हुकुम दिला,पण श्रीकृष्ण स्वस्थ असलेला पाहुन,बलरामाच्या लक्षात सारा प्रकार आल्याने,अर्जुनाला समोपचाराने परत बोलावुन द्वारकेत त्यांचा विवाह थाटात लावुन दिला.या विवाहाने अर्जुन श्रीकृष्णाचे संबंध अधिकच दृढ झाले. दोघांचे जीव व आत्मे जणुं एक झाले.

 या विवाहाने श्रीकृष्ण दुर्योधनाचा जुळुन येणारा संबंध जरी मोडला तरी पुढे जांबवती पुत्र सांबने दुर्योधन कन्या लक्ष्मणाचे अपहरण केल्याने जुळुन आला.पण खवळलेले कौरववीर कर्ण, शल्य,भूरी,यज्ञकेतू स्वतः दुर्योधन सैन्या सह सहा जणांनी त्याचा पाठलाग करुन एकट्या सांबावर बाणांचा वर्षाव केल्या वर सांबानेही त्यांचा प्रतिकार केला शेवटी बर्‍याच प्रयत्नाने कसेबसे सांबाला पकडण्यात यश मिळाले.सांबाला बांधुन लक्ष्मणासह विजयी हर्षाने परतले.हे वृत कळताच दोन्ही कुळात वैर उत्पन्न होऊ नये या हेतूने,व बलरामाचा ओढा शिष्य दुर्योधनाकडे असल्याने हे प्रकरण समोप चाराने मिटवण्याच्या उद्देशाने त्याने उध्दव कुलोपध्याय ब्राम्हणास सोबत घेऊन हस्तिनापुरला गेला.

 नगराबाहेरच्या ऊपवनात छावणी टाकल्यावर, स्वतः एकदम जाणे प्रशस्त न वाटल्याने प्रथम उध्दवला पाठविले. बलराम आल्याचे कळताच,प्रथम उध्दव चे यथोचित स्वागत करुन बलरामाला भेटण्यास भीष्म,द्रोण सर्व मंडळी गेली. वातावरण मित्रत्वाचे व खेळीमेळीचे झाल्यावर वाक्चतुर बलराम म्हणाला, तुम्ही अधर्माने एकट्या सांबाशी युध्द करुन बध्द केले म्हणुन जय मिळवला अशी समजुत केलेली बरोबर नाही.सांबा ला मुक्त करुन मित्रत्व कायम ठेवा.पण कौरवांना पटले नाही.यांच्यासारख्या हीन म्हणजे गवळी कुळात आमची कन्या कधीही देणार नाही.त्यांची दर्पोक्ती ऐकुन बलरामाला अतिशय राग आला.बघा मग आतां यादवांचा पराक्रम, असे म्हणुन बलराम बाहेर येऊन हस्तिनापुरच्या दक्षिणेस नांगर जमीनीत घुसवुन पुर्ण हस्तिनापुर शहरच वर उचलुन गंगेच्या पाण्यावर तरंगत ठेवले.सगळे नगरवासी भयभीत झालेत.शेवटी कौरव शरणआले

 क्रमशः  संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

भगवान श्रीकृष्ण चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading