भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग ४, (१६ ते २०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १६.

शस्ररक्षकाने सांगीतलेली धनुर्भंगा ची विलक्षण हकीकत ऐकुन कंस एकदम सुन्न झाला.एवढे सैन्य असतांना या बाल वीराने सर्वांसमक्ष एवढ्या अवजड धनुष्याचे तुकडे करुन निघुन गेला. ज्याच्या भयाने चुलत कां होईना,भगिनी च्या सात पुत्रांचा घात करुन निंद्य व भयंकर कृत्य केले,तोच अद्याप जीवंत आहे म्हणजे नारदाची भविष्यवाणी खरी ठरते की काय? थोडे मन स्वस्थ झाल्या वर मंचरचना पाहण्यासाठी प्रेक्षागाराकडे गेला.

दुसरा दिवस उजाडला.सकाळ पासुनच नटुन थटुन लोकांच्या झुंडी प्रेक्षा गाराकडे जाऊं लागल्या.थोड्याच वेळात विस्तिर्ण मंडप प्रेक्षकांनी भरुन गेला. मोठेछोटे सरदार आपपाल्या जागेवर बसले.भरजरी जाळीचे रत्नखचित पडदे सोडलेल्या दालनात अंतःपुरातील स्रीया बसल्या.पुर्वाभिमुख दरवाज्यावर निवडक सैन्य तैनात असुन कुवल्ल्यापीड हत्तीही झुलत होता.श्रृंगारलेले घोडे सारखे खिंकाळत होते.अश्याप्रकारे पुर्ण तयारी झाल्यावर बारा वाजतां कंसाची स्वारी पूर्व दरवाज्यातुन मंडपात शिरल्याबरोबर सर्व प्रेक्षक उठुन उभे राहिलेत.दारापासुन मंचकापर्यंत अंथरलेल्या उंची गालीच्या वरुन झपझप चालत कंस सिंहासनारुढ होताच भालदार,चोपदारांच्या ललकार्‍यां नी विस्तिर्ण प्रेक्षागार दणाणुन गेला.तेव ढ्यात सेवकांनी पायघड्या चटकण उचलल्या.सगळीकडे शांतता व उत्सुकता शिगोशिग पसरली.

कंसाच्या इशार्‍यासरशी त्याचे मल्ल,कंसाला मुजरा करुन,त्यांच्यासाठी मुद्दाम असलेल्या राखीव जागेत येऊन बसले.शेवटी बलराम-कृष्ण आपल्या गोप मल्लांसह प्रफुल्लीत मुद्रेने तुतार्‍या च्या आवाजात दरवाज्यात आल्याबरोबर पुर्व संकेतानुसार कुवल्ल्यापीडाच्या माहुताने त्यांच्यावर हत्ती घातल्याबरोबर सार्‍या लोकांत एकच हाःहाकार उडाला. तो मदस्राव हत्ती अंगाभर चालुन येत असलेल्या पाहुन कंसाचा कुटील डाव श्रीकृष्णाच्या लक्षात आल्याबरोबर संतापाने त्याने हत्तीच्या सोंडेचा आधार घेऊन त्याच्या पोटाखाली शिरुन आपल्या व्रजमुष्ठींनी असे कांही प्रहार केले की,

तो प्रचंड हत्ती

वेदनेने व संतापाने कृष्ण कोठे आहे हे पाहत गरगर फिरुं लागला.हत्ती ची मस्ती जिरवण्यासाठी कृष्ण हत्ती समोर दंड थोपटुन उभा राहिलेल्या दिसल्याबरोबर तो चवताळलेला हत्ती कृष्णावर चालुन जाऊन दाताने भोकसण्याच्या इराद्याने जोर करुन गुडघे टेकवल्या बरोबर कृष्णाने त्याचे दात पकडुन काडकण मोडल्याने हत्तीचे तोंड रक्त बंबाळ झाले.कृष्णाने त्याच्याच दाताने हत्तीच्या मस्तकावर असा कांही प्रहार केला की,एवढा प्रचंड हत्ती मस्तक फुटल्याने घेरी येऊन धाडकण खाली पडला व तो अनंतात विलिन झाला.

अर्ध्या घटकेतच श्रीकृष्णाने एवढा प्रचंड हत्ती ठार केल्याचे पाहताच सर्व प्रेक्षक आश्चर्याने आवाक होऊन तोंडात बोटे घातली.मग श्रीकृष्ण बलराम गर्जना करीत दर्शनी दरवाजातुन आंत शिरले. त्यावेळी सिंहासनाधीन असलेल्या कंसाने कृष्ण हत्तीची झुंज पाहुन तो अतिशय भयभीत झाला.एवढा मदोन्मतत हत्ती बिनाशस्राने केवळ आपल्या बाहुने मारला.त्यापुढे चाणूर व मुष्टीक मल्ल कसा काय टिकुं शकेल? हत्तीशी झालेली श्रीकृष्णाची अद्भुत झुंज पाहुन प्रेक्षक कमालीचे आश्चर्यचकित होऊन हा साधा मानव नसुन कुणी देवच अवतीर्ण झाला असे वाटुन

प्रचंड जयघोषाने प्रेक्षागार दणाणुन गेले.कंसाला शत्रु,मल्लांना अशनी,यादवांना विष्णु,सामान्यांना सम्राट,स्रीयांना कामदेव आणि देवकीला बाळ अशा वेगवेगळ्या रुपात कृष्ण भासला.श्रीकृष्ण आत प्रवेशताच क्रुध्द कंसाने चाणूरास त्याच्याशी कुस्ती करण्याची आज्ञा केली.कंसाची आज्ञा होताच त्याचे मल्ल गुरुंना वंदन करुन हौदात उतरले. कसलेल्या प्रौढ मल्ला बरोबर हे दोन बालमल्ल कुस्तीस उभे राहिलेले पाहुन हा उघड उघड अन्याय आहे,नियमानुसार कुस्ती व्हावी असेच सर्वांना वाटत होते.

श्रीकृष्ण आणि चाणूरची निकरा ची झुंज हौदात सुरु झाली.त्याचवेळी दुसरीकडे बलराम व मुष्टीकरची आकसा ने कुस्ती सुरु होऊन एकमेकांर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते.कंसाने वाद्ये आणि कुजबुज बंद करायला सांगुन, श्वास रोखुन कुस्ती पाहुं लागला.शेवटी चाणूरचा जोर कमी झाल्यावर श्रीकृष्णाने उभ्या उभ्या त्याला वाकवुन गुडघ्याचा रेटा देऊन इतक्या जोराने मुष्टीप्रहार केला की, तो लगेच गतप्राण होऊन धाडकण खाली पडला.श्रीकृष्णाचे अचाट कृत्य पाहुन प्रेक्षागार जयजयकाराने दुमदुमुन गेला.कंसाने तोशल नावाच्या मल्लाला इशारा केला.तोशर-कृष्णाची निकराची झुंज सुरु झाली.तिकडे बलरामने मुष्टीका ला व श्रीकृष्णाने तोशरला ठार मारले. तीनही बलाढ्य मल्ल ठार झाल्याचे पाहुन सभास्थान शून्यवत झाले.जनानी पडद्यातुन देवकीचे आनंदाश्रु वाहु लागले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १७.

सिंहासनाधीन कंस क्रोधाने पेटुन त्याच्या मनावरचा ताबा गेला,त्याने सेवकास आज्ञा करीत म्हणाला या रानवट गावंढळ गोपांना सभागृहातुन हाकलुन द्या व या दुटप्पी नंदाला लोखंडी खोड्यात साखळीने अडकवुन टाका. नेहमी माझा द्वेष करणार्‍या वासुदेवाला फटक्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करा

शिवाय कृष्णाच्या पक्षाचे जे आहेत त्यांचे गोधन व संपत्ती जप्त करुन नगराबाहेर हाकलुन द्या.याप्रमाणे कंस भराभर हुकुम सोडत असलेला व नंदाचा व वसुदेवाचा अपमान केलेला पाहुन कृष्णाच्या संतापाचा कडेलोट झाला.त्याने कंसाकडे एकदम इतक्या चपळतेने उडी मारली की तो तिथे कधी प्रगट झाला कुणाला कळलेच नाही.

मग क्षणही न दवडतां कृष्णाने आपला बाहु लांबवुन,कंसाचे केस पकडुन सिंहासनावरुन खेचत,फरफटत रंगभूमीवर आणत असतांनाच त्याचा प्राण गेला.त्या क्रुर व शूर पुरुषाला ‘वीरगती’ न मिळतां त्याची इतिश्री झाली.कंसाला मारुन प्रजेचा जुलुम नाहीसा केला.तेवढ्यात कंसाचा भाऊ सुनामा धावुन आला असतां बलरामने मधेच अडवुन त्याचा चेंदामेंदा केला.सारा आखाडा मल्लांच्या प्रेताने भरुन गेला.वसुदेव जिथे बसले होते तीथे बलराम श्रीकृष्णाने जाऊन त्यांच्या चरणा वर मस्तक ठेवले.नंतर तिथे बसलेल्या इतर श्रेष्ठ जेष्ठ यादवांना व क्षत्रियांना परिचय देऊन सगळ्यांनी नमस्कार केला व देवकीकडे गेलेत.तिने दोघांना कवटाळु न आनंदाश्रु व स्तनातुन दुध ठिपकु लागले.नंतर बलराम कृष्णाने आपल्या मातापित्यांना जन्मस्थानी वाड्यात घेऊन गेले.

आतांपर्यंत बलराम कृष्णाच्या भितीने दाबुन ठेवलेला शोक कंस अंतः पुराचा बांध फोडुन बाहेर पडला.कंसाच्या स्रीया त्याच्या प्रेताभोवती गोळा होऊन आर्त स्वरांत आकांत करुं लागल्या,नाथ आम्हाला अनाथ करुन एकटेच कसे चाललात?पती हेच आमचे परम दैवत!आतां आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहावे? नाथ! आपले अजेय चतुरंग सैनिकांनी इंद्रालाही जिंकले!मग आजच हे असे कसे घडले? नाथ! माझे पिता,जगाचा सर्वश्रेष्ठ अधिपती जरासंधाचे पाठबळ असतां ते असे हतवीर्य कसे झालेत? नाथ!

आपण सर्व राजांमधे पराक्रमी व बलिष्ठ असुन एका यत्किंचित गवळ्या च्या पोराने आपली अशी अवस्था केलीच कशी?आतां आम्ही कृष्णाच्या आधारावर जगायचे कां? अरे आमच्या सहगमनाची बिनाविलंब तयारी करा.त्यांचा शोक सुरु असतांनाच कंसाची आई व उग्रसेन पुत्र कंसाच्या वधाची वार्ता समजताच,पुत्र कसाही असला तरी,दोघेही लगबगीने तिथे आलेत.आपल्या पुत्राचे फरफटत आणलेले,धुळीत,दुर्दशावस्थेत पडलेले प्रेत पाहताच शोकाकुल माता प्रेतावर पडुन धायमोकलुन आक्रोश करुं लागली.

जरा वेळाने आपला शोक आवरुन, पती उग्रसेनला म्हणाली,महाराज! जीत आणि जेता हा क्रम अखंड चालणारच आहे.विजयी कृष्णाकडे जाऊन प्रेत संस्कार करण्यासाठी विनंती करुन तयारीला लागा.

१६-१७ वर्षापुर्वी ज्या वाड्यात जन्म झाल्याबरोबर ऐन मध्यरात्री तुफान पावसात,यमुनेच्या प्रचंड पुरातुन कंसा च्या भितीने वसुदेवाने कृष्णाला गोकुळा त नंदाघरी नेऊन,त्याची नुकतीच जन्मले ली कन्या घेऊन आले होते,आज त्याच वाड्यात कंसाचा वध करुन कृष्ण विजयी झाला.

आज तोच वाडा लतापताकांनी,दारा त सडा संमार्जन,रांगोळी घालुन, दारांना फुलांच्या माळांनी सजवला होता.बलराम कृष्ण दारात येताच त्यांचेवरुन लिंबलोन उतरवले.ज्या खोलीत कृष्णाचा जन्म झाला होता,ती खोली पाहुन देवकीला अनावर दुःखाचा उमाळा आला.

भावना वेग आवरेनासा झाला.अरे कान्हा! किती अभागी आम्ही? पुत्रसुखाला,बाललिलां ना,बोबडे बोल ऐकायला, बालमुख चुंबना ला पारखे झालो,पण आजचा तुम्हा दोघां चा अद्वितिय पराक्रम पाहुन तुम्ही परत मिळालात हे आमचे अहोभाग्य!नाही माते… अभागी तू नसुन आम्ही आहोत.समर्थ असुनही एवढे दिवस तुम्हाला दुःखात खितपत पडुन रहावे लागले.कंसापासुन तुमची मुक्तता लवकर करुं शकलो नाही हे आमचे दुर्देवच!यापुढे तुम्हा दोघांची अक्षय सेवा घडावी हा प्रयत्न करुं!तेवढ्यात वृध्द नंद,वसुदेव देवकीच्या भेटीस आल्यावर कृष्ण त्यांना कडकडुन मिठी मारत म्हणाला,बाबा! तिकडे यशोदामाता इथली हकिकत ऐक ण्यास वाटेकडे डोळे लावुन बसली असेल तरी विनाविलंब व्रजाकडे प्रस्थान करावे.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !! भाग – १८.

 श्रीकृष्णाच्या सुचनेनुसार वसुदेवाने नंद व इतर सर्व गोपांचा वस्रालंकार अर्पन व स्तुती व कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांची बोळवण केली.त्यानंतर यादववीर येऊन बलराम-कृष्णाचे दर्शन व वसुदेवां चे अभिनंदन केल्यावर कंसस्रीयांचा ह्रदय विदारक विलाप सांगीतल्यावर श्रीकृष्णा ला फार वाईट वाटले. आवेशात कंसाचा वध करुन त्याच्या स्रीयांना दुःखाच्या खाईत लोटल्याचे दुःख तर मलाही होत आहे,दुःखी स्रीयांचा आर्त स्वर ऐकुन कोणाचे ह्रदय कळवळणार नाही.?पण काय करणार? कंसाने पाप व जुलमी अत्याचाराचा कळस गाठला होता.आतां तुम्हीच त्या स्रीयांचे सांत्वन व मथुरेतील जनतेचे समाधान करा!

 तेवढ्यात आपल्या जुलमी पुत्राच्या अंत्यसंस्काराची अनुमती मागण्यासाठी शरमिंदा झालेले उग्रसेन आलेले पाहतांच चटकण उठुन वसुदेवाने त्यांचा हात धरुन मोठ्या आदराने मुख्य स्थानी आणुन बसविल्यावर,उग्रसेन कृष्णाला म्हणाले! कृष्णा! तु अलौकिक पराक्रम करुन माझ्या उन्मत्त पुत्रास शिक्षा दिल्याने शत्रु तुला घाबरु लागले. यादवांचा पाया मजबुत केलास. सामंत, राजे तुझे मांडलिक होतील,प्रजा तुझ्या आज्ञेत वागतील,कृष्णा राज्याची जी संपत्ती आहे ती सर्व तु घे,फक्त आम्हा दिनांना कंसाचे प्रेतसंस्कार करण्याची अनुमती दे… उत्तरक्रिया पार पडली की, पत्नी,सुनांना घेऊन अरण्यात जाऊन उर्वरीत आयुष्य तिथेच काढु…

 उग्रसेनचे असे अगतिक बोलणे ऐकुन कृष्णाला गहिवरुन आले,तो म्हणाला,तात! आपण आतां जे बोललात ते समयोचित,कुलाला व शीलाला साजेसे बोललात,पण तात! झाल्या गोष्टीला उपाय नाही.तात कंसाचे प्रेतसंस्कार राजाच्या इतमानेच करु या! तात! मी राज्याच्या लालसेने हे केलेले नाही.मला राज्याची किंचितही इच्छा नाही.तुम्हीच भद्रकुलाच्या अग्रणी आहांत.लगेचच श्रीकृष्णाने उग्रसेनचा अभिषेक करवुन स्वहस्ते राजमुकुट त्यांच्या मस्तकी ठेवला.नंतर स्वतः जातीनिशी हजर राहुन राजकीय इतमानाने कंसाची उत्तरक्रीया पार पाडली.

 आतां उग्रसेन राज्यकारभार पाहुं लागले.कंसाच्या जुलमाने देशोधडीला लागलेल्या सर्वांना परत बोलावुन घेतले. भोज,वृष्णी,अंधक, या सर्व कुलातील देशत्याग केलेल्यांना त्यांची संपत्ती, जहागिरी मानमरातब परत केला.सर्वजण आनंदाने व एकोप्याने नांदु लागले.आणि मथुरेची भरभराट होऊन चौफेर नावलौकिक वाढु लागला.वसुदेवाचा वाडाही गजबजुन गेला.देवकी रोहिणीसह त्यांच्या सर्व भार्या,अन्य पुत्र,

 व मुंजी कुलगुरु गर्ग मुनींकडुन यथाशास्र वसुदेवांनी करवुन घेतले.त्यांचे उपनयन विधि झाल्यावर उज्जयिनीला काशीकर सांदीपान या प्रसिध्द गुरुगृही जाऊन वेद विद्या व धनुर्विद्येचा अभ्यास केला.त्यांची प्रखर व विलक्षण बुध्दीमत्ता पाहुन आपली सर्व विद्या त्या दोघांना दिली. दोघांनीही मन लावुन केवळ ६४ दिवसांत सर्व वेद ग्रहण केले.धनुर्वेदाचे चारी खंड आणि अखिल शस्रांचा उपयोगाचे रहस्य शिकविले.चौसष्ट दिवसांत चौसष्ट कला (विद्या) त्यांनी ग्रहण केल्यात.

 राम-कृष्ण गुरुगृही असतांना इतर शिष्यांप्रमाणे हे दोघेही गुरुंची सेवा करीत गुरुसाठी रानातुन लाकडे,समिधा,कुश आणने,गाईंचे दुध काढणे, गाईंना रानांत चरावयाह नेणे अशी कामे ते मोठ्या आनंदाने करीत असे.त्या वैभवशाली राजपुत्रांची सेवा व निष्ठा पाहुन गुरु त्यांचे वर प्रसन्न झाले.बलराम श्रीकृष्णांची विद्या संपादन करुन झाल्यावर,श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, गुरुदेव!आपणाला मी कौणती गुरुदक्षिणा देऊ?शिष्योत्तमा! माझा एकुलता एक दत्त नामक पुत्र तिर्थ यात्रा करित असतां प्रभासतीर्थी एका प्रचंड मत्स्याने गिळुन टाकले.हे मधुसुदना! माझा तो पुत्र परत आणुन दे! श्रीकृष्णाने त्यांना आश्वास्त व गुरुवंदन करुन आज्ञा घेऊन निघुन गेले.राम-कृष्ण प्रभासक्षेत्री समुद्रकाठावर पोहोचल्यावर श्रीकृष्णाने समुद्रात प्रवेश केला.तेथे काठालगत असलेल्या प्रचंड खडकाखाल च्या डोहात पंचजन नांवाचा एक महादैत्य मत्स्यरुपाने राहत होता.त्यानेच गुरुपुत्रा ला गिळले होते.कृष्णाने त्याला डोहातुन शोधुना काढुन त्याचा वध केला व गुरु पुत्राला घेऊन दोघेही सांदीपनी आश्रमी आलेत.मुनी कृतज्ञतेने भारावुन गेले. आपण शिकविलेल्या विद्येचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांना वाटले.कृष्णाने समुद्रातुन आणलेली रत्ने गुरुंना अर्पन केले. त्यांचा आशिर्वाद घेऊन मथुरेत परत आले.

 क्रमशः

 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १९.

 वसुदेवाचे शूर पुत्र बलराम-कृष्ण अस्रविद्या,वेदविद्या संपादन करुन मथुरेत आले त्यावेळी संपुर्ण मथुरानगरी त्यांच्या स्वागतार्थ सजली होती.जसे इंद्रोत्सवा च्या वेळी लोक अत्यानदांत असत तसेच वातावरण ही दोघे गुरुगृहातुन सहा महिन्यानंतर परत आल्यामुळे होते.त्यांना मथुरेच्या सिमेवरुन आणायला सुशोभित शुभ्र अश्व जोडलेल्या रथात बसवुन वाड्यासमोर आल्यावर सुवासिनींनी त्यांचे औक्षण करुन स्वागत केले.

 राम-कृष्णाचे दिवस मथुरेत आनंदा त जात होते.श्रीकृष्ण धनुर्विद्यत व बलराम मल्लविद्येत सर्वांना शिकवुन तयार करीत होते.कृष्णाचा चुलत भाऊ अतिशय बुध्दीमान व बोलण्यात पटाईत असलेल्या उध्दवशी विशेष मैत्री झाली होती.श्रीकृष्णाचे गोकुळ,वृंदावनातील अद्भुत,अद्वितीय पराक्रमाच्या वार्ता ऐकुन कृष्णावर त्याची भक्ती जडली होती. कित्येकदा दोघेच यमुनातीरी फिरायला जात,आपापल्या मनीचे हितगुज सांगत. कृष्णाच्या सततच्या निकट सहवासाने हा परमात्मा,विष्णुचा अवतार आहे याची खात्री पटली.उध्दव कृष्णाचा अत्यंत विश्वासु मित्र व परमभक्त बनला.

 एक दिवस श्रीकृष्ण म्हणाला, उध्दवा!मी जरी इथे देहाने असलो तरी, माझे सारे चित्त वृंदावनी आहे.मित्रा! माझ्या वियोगाने गोपी अगदी होरपळुन गेल्या असतील.मित्रा!मी त्यांना स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे.मी लवकर परत येईन या आशातंतुवर कशाबशा टिकुन असतील.ज्यांनी माझ्यासाठी लोकधर्म सोडला,त्यांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे,तरी ऊध्दवा! इथली सर्व कामे टाकुन सत्वर वृंदावनी जाऊन माझ्यावती ने सर्वांचे समाधान कर!श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे दुसर्‍याच दिवशी रथ घेऊन रथ घेऊन वृंदावनी रवाना झाला. सायंकाळी तो नंदाची चौकशी करीत त्याच्या वाड्यासमोर पोहोचला.रथाचा आवाज ऐकुन नंद बाहेर आल्याबरोबर ऊध्दव उतरुन,मी कृष्णाचा परम मित्र व चुलत भाऊ उध्दव असा परिचय देत, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार तुम्हाला भेटायला आलो.असे म्हटल्याबरोबर,जणुं आपला पुत्र कृष्णच आहे असे वाटुन नंदाने त्याला कडकडुन अलिंगन दिले. त्याचे यथोचित स्वागत करुन मृदुशय्येवर बसवुन कुशलक्षेम विचारले.नंतर दोघांची जेवणे ऊरकल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले.ऊध्दवाने मथुरेची, त्यांच्या शिक्षणा ची सर्व माहिती कथन केली.आर्तपणे विकल स्वरांत नंदाने विचारले,ऊध्दवा! कृष्णाला यशोदेची,माझी,त्याच्या जिवलग गोपमित्रांची,गोपींची,राधेची, त्याच्यावाचुन कावर्‍या बावर्‍या झालेल्या गाईंची आठवण येते का रे? अरे! त्याला इथे सर्वांना भेटावेसे नाही वाटत का रे? अरे!तो इथे असतांना त्याची योग्यता कळली नव्हती.अरे!कृष्णाचै मोठाले परा क्रम,मधुर हास्य,मृदुभाषण,सर्वात म्हणजे भान हरपणारे त्याच्या बासरीच्या सूरांची सय आली की,आम्ही अस्वस्थ होतो,मने भरुन येतात.एकदा तरी त्याला इथे यायला सांग की रे!

 गर्गाचार्यांनी वर्तवलेले भविष्य अक्षरशः खरे ठरले.देवकार्य साधण्या साठी विष्णुचा अंश या मर्त्यलोकी अवतर ले.अरे ऊध्दवा!दहा हजार हत्तीचे बळ असलेला कंस,चाणूर,मुष्टीक केवढे असा मान्य मल्ल,इंद्राच्या ऐरावतालाही मागे सारेल असा कुवल्ल्यापीठ हत्ती या सर्वां चा त्याने एका क्षणांत वध केला.अरे एवढे अवजड धनुष्य ऊस मोडावा तसे सहज तुकडे केले.हाताच्या एका करंगळी वर गोवर्धन महापर्वत उचलुन धरला.अरे त्याच्या किती म्हणुन लिला सांगु?यशोदा सुध्दा तिथे येऊन बसलेली असल्यामुळे आपल्या मुलाचे चरित्र कौतुक ऐकुन दुःखवियोगाने हुंदके अनावर झाले,अश्रु थांबेनात.भगवान कृष्णावरचे त्यांचे अगाध प्रेम पाहुन ऊध्दवालाही गहिवर दाटुन आला.

 ऊध्दव त्यांचे सांत्वन करीत म्हणाला,अशा अनंतशक्ती,सर्वान्तर्यामी देवाचे मातापिता म्हणवुन घेण्याचा अधि कार तुम्हाला प्राप्त झाला,यापेक्षा अधिक काय साधायचेय?त्या सर्वेश्वर परमेश्वराल तुमची तळमळ कळत नसेल का?त्यामुळे च तर त्याच्यावतीने मला इथे पाठवले ना लवकरच तो तुमचे वियोग,दुःख दूर करेल जगातील प्रत्येक प्राण्यांचा तो आत्मा आहे.चिंता नका करु!बोलता बोलता पहाट झाली.गोपींना पाणी आणण्या साठी नंदाच्या घरावरुनच नदीवर जावे लागत असल्यामुळे त्यांना नंदाच्या वाड्या समोर रथ पाहिल्यावर त्या मनी चरकल्या हा मथुरेचा रथ पुन्हा इथे कशाला?अक्रुर आला तेव्हा त्याने श्रीकृष्णाला हिरावुन घेऊन गेला.आतां परत काय असेल?

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – २०.

 गोपी आपसांत चर्चा करीत असतांनाच स्नान संध्या आटपुन नदीवरुन येत असलेला ऊध्दव त्यांच्या दृष्टीस पडला.त्याच्या शांत,सौम्य,प्रगाढ ज्ञान,बुध्दीमत्तेच्या तेजाने कांतीमान चेहरा पाहुन हा अक्रुर नसुन,कृष्णानेच आपल्या जवळचा दूत कांही कुशल वार्ता घेऊन पाठविला असेल.त्याने बघ कृष्णा सारखाच वेश धारण केलेला असुन अजानबाहु,तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तो जवळ येतांच गोपींनी त्याला गराडाच घातला.गोपींनो!कृष्णाकडुन तुमच्या साठी निरोप घेऊन आलोय,हे ऐकताच त्यांच्या ह्रदयात आनंदी लहरी ऊमटल्या. त्यांनी त्याला एका झाडाखाली बसायला सांगुन,कृष्णाबद्दल कुशल सांगण्याची विनंती केली.आम्ही त्याच्या आठवणीने किती बेचैन झालोत,त्याच्या दर्शनासाठी किती उत्सुक आहोत याची त्याला कल्पना तरी आहे कां?कृष्णाला भेटण्या ची गोपींची उत्कंठा पाहुन ऊध्दव आश्चर्य चकित झाला.

 ऊध्दव म्हणाला,हे गोपींनो! भगवंता ची भक्ती साधण्यासाठी मोठमोठ्या योग्यांनाही अत्यंत कठीण साधना करुन परिश्रम,व्रत वैकल्ये,अनुष्ठाने,होमहवन, जपजाप्य,इंद्रीय दमन अश्या अनेक प्रका रांनी कृष्णभक्ती मोठ्या कष्टाने प्राप्त होते तुमचे भाग्य काय वर्णावे?यातील एकही उपाय न करतां,ऋषी मुनींनाही जे शक्य नाही,त्यांनाही हेवा वाटावा असे भगवान श्रीकृष्णाचे प्रेम तुम्ही संपादन केलेत.हे पुर्व पुण्याशिवाय शक्य नाही.आतां ऐका!मी कृष्णाचा विश्वासू दूत असल्यामुळे त्याने ही गुप्त कामगीरी माझ्यावर सोपवली आहे.भगवान कृष्ण म्हणतो, गोपींनो तुमचा व माझा वियोग होणे कधीही शक्य नाही,कारण मी सर्वात्मा आहे.मनोनिग्रहच सर्वांचे सार आहे.गोपीं नो नद्या जशा समुद्रास मिळतात तशाच तुम्ही माझ्यात एकरुप झालेल्या आहात. एक गोपी मधेच म्हणाली,हे दूता! कृष्णा ला म्हणावं,तुझं हे भारी भारी वेदान्त आमच्या समजण्यापलिकडे आहे,आम्ही तुझ्या सगुन रुपाला भुललेलो आहोत.तूं आम्हाला सोडुन गेलास…. हे ऐकुन ऊध्दव म्हणाला,तुम्ही असेच म्हणाल हे त्याला माहित होते!म्हणुन त्याने निरोप दिला की, मी तुमच्यापासुन दूर राहण्या चा हेतुच मुळी,तुम्ही सतत माझे चिंतन करुन,माझ्यावरची भक्ती दृढ व्हावी,तुम्ही माझ्याशी पुर्णपणे तादात्म्य पावावे,म्हणुन

माझेवर विश्वास ठेवा,जे मी करीत आहे ते योग्य करीत आहे अशी दृध भावना ठेवुन सारे विकल्प दूर करा.मी तुमच्या ह्रदयात सदैव आहे हा विश्वास ठेवा.अशा प्रकारे उध्दवाने गोपींची विविध प्रकारे समजुत घातली.

 नंद यशोदेच्या आग्रहास्तव उध्दव कांही दिवस राहुन,सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा,जणुं कृष्णच निघाला,या भावनेने त्या शोकाकुल झाल्यात,पण लगेच स्वतःला आवरुन,कृष्णाच्या आवडीच्या अनेक वस्तु त्याच्याजवळ देत म्हणाल्या,आमची एवढीच इच्छा आहे की,कृष्णचरणांपासुन आमचे मन क्षण भरही ढळुं नये,आमच्यामुखी सदैव त्याच्याच नामाचा जयघोस असावा आणि हा नश्वरदेह त्याच्याच सेवेत झिजुन जावा.जा ऊध्दवा जा…आमचे कुशल सांग त्याला.जड अंतःकरणाने सर्वांचा निरोप घेऊन ऊध्दव मथुरेकडे रवाना झाला.

 मथुरेला पोहोचल्यावर ऊध्दवाने वृंदावनवासीयांचे मनोगत व त्यांच्या निःस्सीम भक्तीबद्दल सद्गदित कंठाने श्रीकृष्णाला सांगीतले.मथुरेतील जनतेचे कृष्णावर अत्यंत प्रेम जडले.सर्वजन आनंदात होते.पण कंसाच्या दोन राण्या म्हणजे जरासंधाच्या दोन कन्या अस्ति आणि प्राप्ति ( सुकोनी व सुस्तानी) यांच्या ह्रदयात द्वेषाग्नी घुसमसत होता. श्रीकृष्णाने आपला पती कंसाला ठार मारुन आपल्याला दुःखसागरात लोटले हे त्या विसरुं शकत नव्हत्या.कश्या बश्या एक वर्ष मथुरेत राहुन,मगधदेशी आपला पिता जरासंधाकडे जाऊन आपल्या विलापांनी त्याचा आधीचा द्वेषाग्नी भडकवला.मथुरेत श्रीकृष्णाचे स्तोम माजले असुन,राजा उग्रसेन सुध्दा त्याच्या च कलाने वागतो हे ऐकुन जरासंधाचा क्रोधाग्नी भडकला.कंसवधाचा सूड घेण्यासाठी मथुरेवर स्वारी करण्याचा त्याने निश्चय केला.

 जरासंध सार्‍या हिंदुस्थानच्या सार्व भौम पदाला पोहोचलेला,सर्व राजांनी त्याचे मांडलिकत्व स्विकारले होते.इतरही हितैषी,राजे, नि चहाते सगळे आपापल्या अफाट सैन्यानिशी मथुरेकडे सरकु लागले.जरासंधाने मथुरेला वेढा घातला. मथुरेतील यादव,भोज,वृष्णी,अंधक इत्यादी क्षत्रिय बलराम-श्रीकृष्ण या दोन महापराक्रमी सेनापतीच्या अधिपत्या खाली मथुरेचे सावधपणे रक्षण करुं लागले.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

भगवान श्रीकृष्ण चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading