भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग १०, (४६ ते ५०)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४६.

 शेवटच्या क्षणी दुर्योधनाने पांडवांचा नाश करण्याची प्रगट केलेली इच्छा पुर्ण करणे भाग आहे,पण कशी?उपाय कोणता?अगदी पतंगासारखी अग्नित उडी तर घेतली पण पुढे काय? अशा कशमशमधे असतांनाच एक भयंकर घुबड त्या विस्तिर्ण झाडावर निद्रिस्त शांत पणे झोपले असलेल्या कावळ्यांच्या माना कुरतडुन रक्तप्राशन करणार्‍या घुबडांची भयानक कृति पाहुन अश्वत्थामा च्या डोक्यात एकाएकी एक भयानक विचार त्याच्या मनी आला…यावेळी विजयाच्या धुंदीने पांडव,पांचाल गाढ झोपले असतील,अशावेळी त्या घुबडा प्रमाणे त्यांच्या शिबिरात घुसुन,पांडव,व पांचालाच्या माना मुरगाळयच्या.झाले.. ठरले… या विचाराने उत्तेजित होऊन, झोपलेल्या आपला मामा कृपाचार्य व कृतवर्माला उठवुन आपला बेत सांगीतला स्तब्ध झालेल्या कृपाचार्यांनी त्याला या बेतापासुन परावृत्त करण्याचा खुप प्रयत्न केला,पण! सूडाने पेटलेला अश्वत्थामा कांहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

 नुकताच अभिषेक झालेल्या सेना पतीची आज्ञा मानने भाग होते.निरुपाया ने निद्रिस्त पांडवांचा वध करण्यासाठी त्यांच्या शिबिराकडे निघाले.द्युष्टद्युम्न, बायका,नोकरांना ठार करुन दुसर्‍या छावनीतील पांडवांच्या पांच पुत्रांना ठार करुन, चुकुन कुणी वाचु नये म्हणुन कृपाने छावणीला आग लावुन तिघेही पहाटेच्या सुमारास निघुन गेले.दुर्योधनाने इच्छा शक्तीच्या बळावर प्राण धरुन,शेवटची घटका मोजत असलेल्या दुर्योधनाला छावणीत घुसुन द्यृष्टद्युम्न,पांचाल,द्रौपदी पुत्र कुणालाही शिल्लक ठेवले नाही ही वार्ता त्याला दिली.आतां फक्त पांडवांकडचे सात-पांच पांडव,कृष्ण, व सात्यकी व तुझ्या पक्षाचे आम्ही तिघेच उरलोत.ही वार्ता ऐकुन उत्तेजित झालेला दुर्योधन थोडा शुध्दीत येऊन क्षीण स्वरांत म्हणाला,जे काम भीष्म,कर्ण,तुझे पिता द्रोण करुं शकले नाही ते तूं करुन दाखविलेस,मी कृतकृत्य झालो,असे म्हणुन दुर्योधनाने अंतिम श्वास घेतला.

 या हत्याकांडातुन निसटलेल्या द्यृष्टद्युम्नाचा सारथ्याने पहाटे नदीकिनारी जाऊन पांडवांना ही वार्ता सांगीतल्यावर, धर्मराज मुर्च्छित पडला.थोड्यावेळाने सावध झालेल्या अत्यंत शोकमग्न,उद्गिग्न युधिष्ठीर म्हणाला, आपण विजय मिळवुनही आपला पराभवच झाला, आपण कसातरी शोक आवरु, पण साध्वी द्रौपदी हे दुःख कसे सहन करील? तिचे वृध्द पिता,भाऊ,लाडके पुत्र या सार्‍यांचा अमानुष रितीने झालेला वध ऐकुन,शोकाने तिची किती दारुण अवस्था होईल?

 तेवढ्यात हस्तिनापुरहुन श्रीकृष्ण येऊन पोहोचला.रात्रीचे हत्याकांड कळल्यावर म्हणाला,धर्मा! कालगती कुणीही अडवु शकत नाही.सगळे शिबिरा कडे गेले.सगळ्यांचे छिन्नभिन्न मृतदेह पाहुन पांडवांना दुःखावेग अनावर झाला.

रात्रीचा घोर संहार ऐकुन आधीच घायाळ असलेली द्रौपदी,प्रत्यक्ष आपल्या पुत्रांचा झालेले हत्याकांड पाहुन ती उन्मळुन पडली.अत्यंत शोकाकुल,विव्हल झाली. पण लगेच विलक्षण कठोर त्वेषयुक्त स्वरांत म्हणाली,ज्या अश्वत्थामाने झोपेत बेसा वध असलेल्यांचा वध केला,त्या दुष्ट अधम अश्वत्थामाचा व त्याच्या साथीदारांचा आजच्या आज प्राण घेतला नाही तर, मी अन्न पाणी त्यागुन आत्मदहन करेन. तिचा आवेश पाहुन धर्मराज मृदु समजावत म्हणाले,कल्याणी शोक आवर!त्याचे मवाळ धोरण पाहुन चवताळुन तिने भीमा ला ही कामगिरी सांगीतल्यावर,त्याचा वध करुन मस्तकावरचा मणी तुला आणुन देतो असे म्हणुन भीम लगेच धनुष्यबाण व आयुधे घेऊन निघाल्यावर श्रीकृष्णासह चारही बंधु रथारुढ होऊन भीमाच्या पाठोपाठ निघाले.अश्वत्थामा व्यासांच्या आश्रमात गेल्याचे कळल्यावर सारे तिथे पोहोचले.भीमाच्या दृष्टीस तो पडताच त्याच्या अंगावर धावुन गेल्या बरोबर भितीने घाबरुन अश्वत्थामाने ब्रम्ह शिरस अस्र,जे फक्त आणीबाणीच्यावेळी सोडायचे असते, ते अभिमंत्रित करुन सर्व पांडवांचा नाश व्होवो म्हणुन सोडल्या वर,कृष्णाने प्रतिकारात्मक ब्रम्हास्र सोडायला अर्जुनाला आज्ञा केली.दोन्ही अस्रे ऐकमेकांवर आपटुन अग्निज्वाला भयंकर आवाजात निघु लागल्याने समाधिस्त व्यास सजग होऊन, ते अस्र अश्वत्थामाला माघारी घ्यायला सागुन म्हणाले,नाहीतर बारा वर्षे दुष्काळ पडेल, पण अश्वत्थामाला माघारी घेणे माहित नसल्यामुळे त्याने ते अस्र अभिमन्यु पत्नी उत्तरेच्या गर्भावर सोडले.हे पाहुन खवळलेल्या अर्जुनाने त्याच्या मस्तकावरचा मणी काढुन घेतला.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४७.

अश्वत्थामा ब्राम्हण व गुरुबंधु असल्यामुळे त्याला जीवदान दिले,पण संतापलेल्या श्रीकृष्ण त्याला शाप देत म्हणाला,निद्रिस्त,निरपराध लोकांना,युध्द संपल्यावर तूं वध केलास,शिवाय उत्तरेच्या गर्भावर अस्र सोडले,ते तर माझ्या योगसामर्थ्याने मृतबाळ जिवंत करुन, पांडवांचा वंश निर्वंश होऊ देणार नाही, पण तुझ्या या दारुण पापाची शिक्षा म्हणुन तीन हजार वर्षे पृथ्वीवर वणवण भटकत,मस्तकातील जखमेत किडे पडुन दुर्गांधमुळे कोणीही तुझ्या वार्‍यालाही उभे राहणार नाही.श्रीकृष्णाचा भयानक शाप ऐकुन दुःखी,खिन्न मनाने जखमेच्या वेदनेने ओरडत तिथुन निघुन गेला.

अश्वत्थामाच्या डोक्यावरचा मणी घेऊन सर्वजण द्रौपदीकडे आले.गुरुपुत्र व गुरुबंधुचा वध न केल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.तो दिव्य मणी तिने युधिष्ठीराच्या मुकुटावर बांधला.नाईलाजा ने धर्माने गुरुचे उच्छीष्ट म्हणुन केवळ द्रौपदीच्या समाधानासाठी मणी धारण केला.अशा प्रकारे न भूतो न भविष्यती असा या भारतीय युध्दाचा शेवट झाला. पांडवांकडील सात अक्षौहिणीतुन सात व कौरवांकडील अकरा अक्षौहिणीतुन तीन लोक शिल्लक राहिले.पृथ्वीने केलेल्या प्रार्थनानेनुसार तिचा भार हलका करण्या चे मुख्य कार्य श्रीकृष्णाने करविले.

तेवढ्यात हस्तिनापुरहुन धृतराष्र्ट, संजय,विदुर,सर्व स्रियांसह गांधारी,कुंती तिथे येऊन पोहोचल्या.त्या सर्वांना दुःखी धर्मराज सामोरा गेला.संतप्त धृतराष्र्टाने मन आवरुन त्याला अलिंगन दिले.नंतर भीम नमस्कार करायला गेला असतां, आपल्या पुत्रांना ठार करणारा हाच..असे मनात येऊन त्याचा क्रोधाग्नि भडकला.ये भीमा ये,मला अलिंगन दे! असे म्हणत पुढे सरकला,पण त्याचा दुष्ट कावा श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यावर,भीमाला बाजुला सारुन लोखंडी पुतळा धृतराष्र्टा समोर केला.धृतराष्र्टाने त्यापुतळ्याला इतक्या जोराने आवळले की,त्या लोखंडी पुतळ्याचे चुर्ण चुर्ण झाले.श्रीकृष्णाच्या प्रसंगावधानाने भीमाचे प्राण वाचवले.

श्रीकृष्ण धृतराष्र्टाला समजावत म्हणाला,राजा! वेदशास्र,पुराणे तू जाणतोसच!अरे,तुझ्याच पुत्रमोहाने व अपराधाने एवढा सारा संहार घडला तरी, तूच पांडवावर कोप करतोस हे न्याय्य नव्हे.मी स्वतः,भीष्म,द्रोण,विदुर सर्वांनी नानाप्रकारे भावी अनर्थाची कल्पना दिली समजावले,पण त्यावेळी तूं कोणाचेच ऐकले नाहीस,निदान आतांतरी मनातला आक्रोश काढुन पांडवांनाच पुत्रांच्या ठायी समज.श्रीकृष्णाचे बोधांमृत ऐकुन धृतराष्र्ट म्हणाला,केशवा! तुझे म्हणने पटले. शांत झालोय! अगदी निशंक मना ने भेटव भीमाला.भीमाने पुढे होऊन अलिंगन दिल्यावर अर्जुन,नकुल,सहदेवां ना ही पोटाशी धरुन आशिर्वाद दिला.

नंतर युधिष्ठीर गांधारीला वंदन करण्यास गेला असतां,क्रोध अनावर होऊन ती शाप देणार,येवढ्यात व्यासांनी मनोवेगाने येऊन,तीचे मन परावर्तीत केल्यामुळे ती थोडी शांत झाली व युधिष्ठीर तीच्या शापापासुन वाचला.तो नमस्कारासाठी वाकला असतां,पट्टीतुन तिची दृष्टी त्याच्या पायाच्या नखांवर पडली असतां नखे काळेनिळे पडले.

त्यानंतर सर्व पांडव आई कुंतीला भेटल्यावर त्यांना पोटाशी धरुन खूप विलाप केला.दोन्ही सास्वांना नमस्कार करतांना द्रौपदीला शोक अनावर झाला, तेव्हा गांधारी म्हणाली, अग! माझेकडे बघुन तरी स्वतःचा शोक आवर!पण जेव्हा श्रीकृष्ण गांधारी सन्मुख गेला, तेव्हा मात्र,आपला संताप आवरणे तीला कठीण झाले,ती म्हणाली,योगेश्वरा!तूं सर्व सामर्थशाली असुन जर मनात आणले असते तर हा विनाश टाळु शकला असतास,आणि माझ्या शंभर पुत्रांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागले नसते.तरीसुध्दा तूं हे सर्व घडविले,जसा आमचा सर्वनाश केलास,तसेच आज पासुन ३६ वर्षांनी तुझे यादवकुळ आप सांत लढुन नष्ट होईल.वास्तविक गांधारी चा शाप तो परतवु शकला असतां,पण तो तिच्या तपोबलाचा अपमान झाला असतां,म्हणुन त्याने तथास्तू म्हणुन त्या शापाचा स्विकार केला.त्यानंतर सर्वजणं भागीरथीवर येऊन सर्व मृतवीरांना उदक दिले.अशाप्रकारे युध्दपर्व मागे पडले, गतकाळात जमा झाले.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्णा !!! भाग – ४८.

 यशास्वी,विजयी युधिष्ठीराने सर्व मृतांना तिलांजनी देऊन झाल्यावर कुंती म्हणाली,कर्ण तुमचा जेष्ठ भ्राता होता, त्याला पण तिलांजली दे!हे ऐकताच, आधीच शोकाकुल आणि उद्गिन्न असले ल्या धर्माला पराकाष्ठेचे दुःख होऊन, तो कुंतीला शाप देत म्हणाला,जगातील कोणत्याही स्रीच्या पोटात गुपीत राहणार नाही आणि त्याला भयंकर विरक्ती आली.सर्वांना मारुन राज्य ऊपभोगने त्याला पटत नव्हते.सर्वांनी परोपरीने समजावले पण व्यर्थ!श्रीकृष्ण व महर्षी व्यास बाजुला बसुन सर्व पाहत होते.धर्माची विरक्ती कमी होईना,तेव्हा व्यास म्हणाले,दंडधारणा हे सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे,तेव्हा भ्रात्यांसह धर्मार्थ कामाचा यथाशास्र प्रथम कर्तव्ये पार करुन मग जा अरण्यांत.तूं अश्वमेध केलास.तुझ्या कडुन झालेले हिंसाकृत सर्व पाप नाहीसे होतील.अखेर श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशाने राज्य स्विकारण्यास तयार झाला.

 सर्वांचे सजलेले रथ,शंख,मंगलवाद्याच्या गजरात व प्रजाजनांच्या जयजयकारात राजवाड्यात पोहोचल्यावर ,धौम्य मुनींनी उदडःमुख वेदीवर व्याघ्रचर्म घालुन वर सर्वतोभद्र ठेवलेल्या सिंहासना वर धर्मराज व द्रौपदीला बसवुन स्वतः श्रीकृष्णाने गंगोदोकाने त्याला पृथ्वीच्या सम्राटाचा अभिषेक केला.भीमास युवराज,सैन्यावर नकुल,परराज्य व दुष्टां ना शासन या कामावर अर्जुन,सहदेव समीपस्थ(खाजगी चिटणीस)अशा नेमणुका केल्यावर विदूर,संजय,कृपाचार्यना योग्य कामे वाटुन दिलीत

 याप्रमाणे सर्व व्यवस्था लावल्यावर जिथे भीष्म शरपंजरी पडले होते तिथे कृष्णासह धर्मराज गेले, भीष्माभोवती अनेक मुनी बसले होते.दूरवर रथ उभा करुन पायीच सर्वजण भीष्माकडे गेले. भीष्मांना श्रीकृष्ण म्हणाले,या विरक्ती आलेल्या युधिष्ठीराला चातुर्वर्ण्य व चतुर्था श्रम धर्माचा उपदेश करुन याचा शोक नाहीसा करा.कृष्णा मी असा शरपंजरी!ऐवढे बोलण्याने सुध्दा अतिशय कष्ट होत आहे रे! श्रीकृष्णाने भीष्मांना योगशक्ती देऊन म्हटले,तू उपदेश करेपर्यंत बुध्दी स्थीर राहुन वेदना जाणवणार नाही.पण कृष्णा,अरे! सर्व धर्माचा प्रवर्तक प्रत्यक्ष विष्णूरुप तू…. सत्य अद्वितीय,आदिम ध्यानरहित असा परब्रम्ह तू… आदीतीच्या पोटी द्वादशरुपाने अवतीर्ण सुवर्नकांती सूर्य तू…. देवांना आणि कृष्णपक्षात पितरांना तृप्त करणारा रजनीकांत तू… वेदरुपी परमेश्वर तू…सहस्र फणांनी शोभणार्‍या शेषाच्या पर्यंकावर निद्रा घेणारा निद्रास्वरुपी तू… धर्मस्वरुपी तू… सर्व सुष्ट पदार्थात आणि प्राणीमात्रांच्या शरीरात जीवरुपाने व्याप्त तू…जागृती,स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हीही अवस्थेत सारखाच राहणारा आत्मा,पंचमहाभूते व मनासह अकरा इंद्रिये व सतरावा ज्ञानी तो सांख्यरुपी तू…योगस्वरुपी तू…पुन र्जन्मापासीन मुक्त,मोक्षरुपी तू…अग्नी हे मुख,स्वर्ग हे मस्तक,आकाश ही नाभी, भूमी हे चरण,सूर्यचंद्र हे नेत्र आणि दिशा हे कान अश्या अवयवांनी युक्त असलेल्या विश्वरुपी परमात्मा तू… जय आणि दंड यांनी युक्त लंबोदर, कमंडलु धारण करणारा ब्रम्ह तू…शूलधारी,भस्मचर्चित, उर्ध्वलिंग,त्रिनेत्र देवाधियती रुद्र तू…विश्व कर्मन,विश्वात्मन्,विश्वसंभव पंचभूतातीत तू….. अशी वाक् रुपी यज्ञाने भीष्मांनी त्याची आराधना केल्यावर श्रीकृष्ण सद्गदीत होत म्हणाला,भीष्मा !मी तुझ्या वर संतुष्ट आहे.युधिष्ठीराला राजधर्म व मोक्षधर्माचा उपदेश तूंच कर!

 या राजाला उपदेश करण्याचा अधिकार माझा नाही तुझा आहे.तेव्हा निःशक मनाने,गुरुस्थानी असलेल्या त्या तुझ्या मुखातुन जे उपदेशामृत निघेल ते स्मृतिशास्रा प्रमाणे आदरणीय होईल.मग श्रीकृष्णाच्या अनेक प्रश्नानुरुप राजधर्माचे व मोक्ष धर्माचे रहस्य भीष्मांनी युधिष्ठीराला समजावुन दिले.भीष्मांचा उपदेश ऐकुन तिथे जमलेले समस्त ऋषीमुनी रोमांचित झालेत.शेवटी भीष्म म्हणाले,युधिष्ठीरा! हस्तिनापुलला जाऊन प्राप्त पृथ्वीचे राज्य चालव.यज्ञ करुन पितर व देवांचे ऋण फेड.प्रजेला आनंदीत ठेव.जा तू आतां.सूर्य उत्तरायणाकडे वळेल तेव्हा माझे उत्तरकार्य करण्यास परत ये.भीष्मांच्या आज्ञेने सर्व हस्तिनापुरला परतले. काही दिवस राहुन श्रीकृष्ण सुभद्रेला माहेरपणासाठी बरोबर घेऊन द्वारकेला रवाना झाला.जातेवेळी कृष्ण म्हणाला, अश्वमेध यज्ञाची तयारी झाली की, सर्व मंडळीसह परत येतो.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४९.

 थोड्याच दिवसांनी हस्तिनापुरहुन अश्वमेधयज्ञाची तयारी पुर्ण होऊन तिथी निश्चित झाल्याचे वृत्त घेऊन,सर्वांना आमंत्रित केल्याचा निरोप घेऊन दूत आला.श्रीकृष्ण सगळ्या यादव वीरांसह अगत्याने हस्तिनापुरला पोहोचल्यावर त्याचे यथोचित स्वागत केले.अश्वमेध यज्ञासाठी चार बंधु चारही दिशांना जाऊन अगनित द्रव्रे आणले.सर्व मंडळी आनंदात वार्तालाप करीत बसली असतां, तेवढ्यात लगबगीने एक दूत घाबर्‍या घाबर्‍या येऊन म्हणाला,उत्तरादेवीने मृत मुलाला जन्म दिला.नगरातील सर्व नामांकित राजवैद्यांचे सगळे उपाय हरले आहे.

 श्रीकृष्ण लगबगीने अंतःपुरात गेला तेव्हा तिथे दुःखी व शोकाकुल अवस्थेत कुंती,सुभद्रा,द्रौपदी बसलेल्या होत्या.तो आलेला पाहिल्याबरोबर,कुंती अतिशय दुःखाने म्हणाली,अरे माधवा!कुरु वंशाचा हा दीप,शेवटचा तंतु त्या अश्वत्थामाने खुडुन टाकला की रे…हे पुरुषोत्तमा!या महान संकटातुन तारण्या स तूच समर्थ आहेस.त्यावेळी तूं प्रतिज्ञा केली होतीस की,या मेलेल्या बालकास जिवंत करीन.तेवढ्यात सुभद्रा अश्रु ढाळीत म्हणाली,कृष्णा!आधीच सर्व कुरु कुलाचा उच्छेद झाला.पार्थाचा हा नातू जन्मला पण मेलेल्या अवस्थेत.कृष्णा! आमच्या कुलाच्या अभिरुध्दीसाठी तरी याला जिवंत कर!

 कुंती,सुभद्रेचा करुन विलाप ऐकुन दुःखी झालेल्या कृष्णाने त्यांना अशास्तव केले आणि तो प्रसुतिगृहात दाखल झाला तिथली विधिपुर्वक व्यवस्था पाहुन प्रसन्न झाला.श्रीकृष्ण आंत आलेला पाहतांच आतापर्यंत आवरुन धरलेला बांध फुटुन उत्तरा ओक्सीबोक्सी रडुं लागली,विलाप करुं लागली.म्हणाली,भगवान अभिमन्यु म्हणाले होते, तुझा हा पुत्र पराक्रमी होईल.मामाकडे अस्रशस्र,युध्दनीतीचे अध्ययन करुन नांव कमावेल!देवा,आतां त्यांचे शब्द खरे करणे तुमच्या हाती आहे. तिचा विलाप ऐकल्यावर,तिला धीर देत म्हणाला, उत्तरे! घाबरु नकोस. धीर धर.. तो आसन घालुन बसला.आचमन करुन त्या मृत बालकाला मांडीवर घेतले व मोठ्याने सर्व जगाला ऐकु जाईल एवढ्या आवाजांत म्हणाला….”मी आजपर्यत थट्टे तही असत्य भाषण कधी केले नाही. युध्दातुन कधी माघार घेतली नाही.मला धर्म विशेष म्हणजे ब्राम्हण प्रिय आहेत, त्या पुण्याईच्या बळावर…..सत्य आणि धर्म माझे ठीकाणी वास करतात,हे जर खरे असेल तर….हा पांडवांचा कुलांकुर अभिमन्युपुत्र जिवंत होवो. असे कृष्ण म्हणत आहे तोच त्या बालकाच्या मुखातु न टॅहाss टॅहाss चा मधुर स्वर ऐकुन सर्वीकडे आनंदी आनंद होऊन ह्रदयें हर्षा ने उचंबळुन आली.श्रीकृष्णाची स्तुतीगीते गाऊ लागली.उत्तराने कृष्णाला खाली वाकुन नमस्कार केला.श्रीकृष्णाचे नित्य सत्यवचन,धर्मप्रिती,ब्राम्हणांचा आदर आणि धर्मानेच दुष्टांचे निर्दालन हीच धर्म परायणता उपयोगात आणुन,धर्मपरायणतेत इश्वरीय सामर्थ्य आहे हे जगाला दुसरा कोणताही चमत्कार न करतां त्याने दाखवुन दिले,

 उत्तराने बालकाला श्रीकृष्णाच्या पायावर घातले असतां,कृष्ण म्हणाला, सगळ भरतकुल परिक्षीण झाले असतां हा अभिमन्युपुत्र जन्मला म्हणुन याचे नांव परिक्षित ठेवा.अर्जुन कृष्णाने एकमे कांना दृढ अलिंगन देत कृष्ण म्हणाला आपण दोघे नरनारायण आहोत.

 चैत्र पोर्णिमेचा उत्तम मुहुर्त पाहुन व्यास महर्षीनींनी युधिष्ठीर-द्रौपदीला यज्ञ दिक्षा देऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली यज्ञीत अश्व सोडला.अश्व निरनिराळ्या देशात फिरुन एक वर्षाने सर्व राजांना पराक्रमाने जिंकुन अर्जुन परत आल्याचे वृत्त कळताच श्रीकृष्णासह युधिष्ठीर सामोरे जाऊन समारंभपुर्वक अर्जुनाला यज्ञमंडपात आणले.यथाशास्र अश्वमेध यज्ञ झाल्यावर,सर्व राजांसह अवभृतस्नान झाले.

 दक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा युधिष्ठीर म्हणाला,अश्वमेधाची दक्षिणा पृथ्वी होय.अर्जुनाने जिंकलेली पृथ्वी सर्व ब्राम्हणांना दान देतो, ती त्यांनी आपसात विभागुन घ्यावी.आणि मी चारही बंधु व पत्नीसह वनात जातो.त्याचा हा निर्णय चार बंधु व द्रौपदीस आनंदाने मान्य झाला.पण व्यासमुनी धर्माला म्हणाले, आम्हाला तूं दिलेली पृथ्वी तुला परत करतो तिचा स्विकारुन आम्हाला त्याबदल्यात धन दे.युधिष्ठीराने कोटी कोटी दक्षणा देऊन सर्व ब्राम्हणांना तृप्त केले. व्यासांनी आपला भाग कुंतीला दिला. त्याचा पुढे दानधर्मातच विनियोग झाला. नंतर बलराम कृष्णालाही अपार धन द्रव्य दिले.श्रीकृष्ण मंडळीसह द्वारकेला निघाला तेव्हा परिक्षिताला त्याच्या ओटीत घालत सुभद्रा म्हणाली,याला अभिमन्युसारखा श्रेष्ठ धनुर्धर बनव…

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – ५०

 सुभद्रेची इच्छा जाणुन प्रसन्नपणे श्रीकृष्ण म्हणाला, सुभद्रे,भगिनी!अभिम न्युची इच्छा मी नक्की पुर्ण करीन,तसेच घडेल.उत्तरे! तुझा हा पुत्र पृथ्वीचे पालन करणारा,कुरुवंशाला लागलेला सगळा कलंक नष्ट करुन कुरुवंश ऊज्वल करेल. योग्यवेळी ही जबाबदारी मी घेईनच!

 गहिवरुन कुंती म्हणाली,कृष्णा तुझ्या आमच्या पहिल्या भेटीपासुन, आमचा त्राता,संरक्षक,हितकर्ता झालास. भावनाचे भरते येऊन कुंती स्तब्ध झाली. श्रीकृष्णाने तिला वंदन करुन म्हटले, आत्या! “जिकडे धर्म तिकडे कृष्ण ” हे त्रिवार सत्य आहे. आतां मला जाण्याची अनुमती द्यावी….

 श्रीकृष्ण,बलराम,यादवांसह प्रसन्न मनाने द्वारकेस परतले.हस्तिनापुरातील सर्व कार्य उरकले होते.पृथ्वीवर सगळी कडे धर्माचे राज्य सुरु होते.अश्वमेध यज्ञा नंतर युधिष्ठीराने ३६ वर्षे तर कांहीच्या मते २९ वर्षे राज्य केले.या कालावधीत श्रीकृष्णाने आपला वेळ योग-साधनेतच व्यतित केला.कोणी शत्रु उरला नव्हता. नित्याचा कारभार,नवीन पिढीकडे सुपुर्द करुन सांसरिक,राजकीय व इतर बाबींतुन तो निवृत्त झाला.

 ज्ञानार्थी,अथार्थी,ब्राम्हण याचक नेहमीच त्याच्याकडे येत असे.त्यांच्या पालन पोषणाचा भार मात्र त्याने स्वतः कडेच ठेवला होता,म्हणुनच त्याला ‘ब्रम्हण्यदेव’ व गोब्राम्हण्य हितकर्ता म्हणुन संबोधीत असत.श्रीकृष्णाचे नित्य दर्शन घडावे,त्याचे उपदेशामृत कानी पडावे म्हणुन कित्येक ऋषी द्वारकेतच आश्रम बांधुन राहत होते.ब्राम्हणांचा परा मर्श,गाईंचे संरक्षण,गोधन वृध्दींगत,ऋषी मुनींचा यथायोग्य परामर्श घेत,ज्ञान- परमार्थ वेदान्तावरील चर्चा अश्या कार्यात मग्न राहुन गृहस्थाश्रमातुन संपुर्ण लक्ष काढुन पुत्र-पौत्रांचा सोहळा पाहत सहजतेने तो आयुष्य जगत होता.

 ज्या कार्यासाठी त्याने (विष्णुने) भूलोकी अवतार घेतला होता ते कार्य त्याने भारतीय युध्द करवुन व पृथ्वीने विनंती केल्यानुसार,मानवदेही अवतार घेऊन पृथ्वीचा भार हलका केला. भारतीय युध्दात एकुन सहासष्ट कोटी, एक लक्ष,वीस हजार लोकं कामी आले होते.अधर्माचा नाश करुन परत धर्म स्थापन केला.त्याच बरोबर नरदेह धारण केलेल्या परमात्म्याने बालपणापासुन वृधत्व येईपर्यत मानवाने आदर्श जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण घालुन दिले होते.

 एक दिवस श्रीकृष्णाचा सखा,व चुलत भाऊ उध्वव,श्रीकृष्णास भेटावया स गेला असतां तिथे नेहमीप्रमाणे कांही ऋषीमुनी बसलेले होतेच.त्याला पाहुन प्रसन्न मुद्रेने त्याचे स्वागत केले.त्यांना सांगत असलेला वेदांतपर उपदेशअमृत एका बाजुने बसुन कानात साठवु लागला ऋषीमुनी निघुन गेल्यावर दोघे बराच वेळ बोलत बसले.बोलतां बोलतां श्रीकृष्ण म्हणाला,उध्दवा! आतां या भूलोकीवरचा माझा अवतार लवकरच संपणार आहे. ज्या कार्यासाठी मी मानवातार घेतला होता,ते कार्य,पृथ्वीवरचा भार भारतीय युध्द घडवुन हलका केला,पण दुसरा याद वांचा भार वाढला आहे.अरे! हे देवांश धारी यादश माझ्या प्रभावाने वैभवाच्या शिखरावर पोहोचले असुन त्यांचा नाश कोणत्याही शत्रुकडुन शक्य नाही.पण अमाप वैभवामुळे ते उन्मत्त झाले. ऋषी, ब्राम्हणांविषयी आदर उरलेला नाही. सध्या यादवात ब्राम्हद्वेष,मद्यप्रिती हे दोन दुर्गुन शिरल्यामुळे त्यांचा अंतकाळ आता जवळ आला आहे.

 म्हणजे आतां तूं स्वतःच भरभराटी स आणलेल्या कुळाचा नाश करुन निज धामी जाण्याची तयारी चालवली आहे तर,तेवढ्यात घाबरलेले सांब,,प्रद्युम्न इतर बंधुसह येऊन घडलेली घटना सांगु लागले. प्रद्युम्न म्हणाला,नारद,व दुर्वास ऋषी शिष्यासह आपल्या दर्शनार्थ येत असतां,सांबाच्या मित्रांनी त्याला स्रीवेश दिला.सांबाने दुर्वासऋषींना नमस्कार करुन विचारले मी गर्ववती असुन मला पुत्र होईल की कन्या?कोपिष्ट दुर्वासऋषी म्हणाले,भगवान श्रीकृष्णाच्या या अवलक्षणी पुत्र सांबाला उद्या मुसळ होऊन सर्व यादवांचा नाश करील.आणि.. रागाने तरातरा निघुन गेले.गंभीरपणे कृष्ण म्हणाला,आतां भोगा आपल्या कर्माची फळं!मी कांहीही करुं शकत नाही.ते सगळे निघुन गेले,पण जातां जातां प्रद्युम्न सांबाला म्हणाला दुर्वासांकडे जाऊन उःशापाची क्षमायाचना तरी करुन पाहु या.ते गेल्यावर कृष्ण म्हणाला हे क्रमप्राप्तच होते.

 क्रमशः
 संकलन – मिनाक्षी देशमुख.

                         

भगवान श्रीकृष्ण चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading