
कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ६.
जे लोक घरदारे आणि शेतीवाडी करुन स्थायीक झाले आहेत त्यांना स्थान त्याग करणे अशक्य आहे,पण आपण गवळी असल्यामुळे एखादे योग्य स्थान बघुन गौळीपाडा तीथे वसवावी लागेल. सर्वानुमते कृष्णाने शोधलेल्या यमुनातीरी रम्य व विपुल दाट कुरणांनी भरलेल्या वृंदावनमधे नंदाचा गोकुळपाडा तीथे वस्तीला आला. वृंदावनमधे सगळी कडे कदंबाचीच झाडे,शिवाय गोवर्धन पर्वत,उंच उंच शिखरे,मधुर फळांचे वृक्ष, यमुना नदी जवळच असल्यामुळे पाण्या ची समृध्दी जणुं दुसरे नंदनवनच! नंदन वनातुन जशी नलिनी नदी गेली तशीच वृंदावनातुन अगदी मधोमध कालींदी नदी चा प्रवाह गेलेला,गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी ‘मंजिर ‘ नावाचा प्रचंड वटवृक्ष
हे स्थान निश्चित झाल्यावर सर्वांनी आपापले सामान आवरुन वृंदावनाला जाण्याची तयारी करुं लागले,नवीन जागी वृंदावनाला जातांना ऐकीकडे आनंद होत होता,तर दुसरीकडे ज्याठीकाणी आयुष्या चे दिवस घालवले ते जुनं स्थान सोडुन मनाला खिन्नपणा येऊन वियोगाचे दुःख पण होत होते.मात्र कृष्ण!संकर्षण,त्यांचे गोपसख्यांना नदीत डुंबायला,वाळुत,कदं बाच्या वनात खेळायला मिळेल म्हणुन आनंदात होते,
जाण्याचा दिवस उजाडला.तयारी निशी गाड्यांमधे अवजड सामान भरुन सर्वजण मार्गस्थ झालेत.मागे वळून पाहि ल्यावर व्रजगोकुळ उजाड,उध्वस्त अरण्यासारखे दिसुं लागले.श्रीकृष्ण आपली बासरी वाजवित सर्वांच्यामधुन चालत होता.पाहतां पाहतां सर्वजण वृंदा वनात पोहोचले.मोठी विस्तिर्ण जागा पाहुन तात्पुरता आडोसा तयार करुन, स्वयंपाकघर,पुढे बैठकीचे दालन,दारापुढे मोठे अंगण करण्यात आले.चुली पेटल्या. स्वयंपाक सुरु झाला.अंगणांत खाटा पडल्यात.गोपांचा प्रमुख वृध्द नंद एका खाटेवर बसला.त्याच्याभोवती अनुभवी गोप बसले होते.
खरच हे वृंदावन म्हणजे दुसरे नंदनवनच!श्रीकृष्ण तल्लीनतेने बासरी वाजवत होता.बासरीचे सूर आस मंतात भरुन गेलेत.आणि सर्व विश्व जागीच स्तब्ध झाले.गोपी पेटलेल्या चुली व हातातील कामे तशीच टाकुन बासरीचे सूर ऐकण्यासाठी नंदाच्या घराकडे धावल्या.यशोदा व रोहिणीही बाहेर आल्यात.पश्चिम क्षितिज लालसर झाले. सूर्याचा लाल गोल तिथेच थबकला.त्या लालसर अद्भुत,अद्वितीय अलौकीक प्रकाशात श्रीकृष्णाची मूर्ती वेगळीच दिसु लागली शंख,चक्र,गदाधारी जणुं विष्णुच सर्व गोपगोपी नतमस्तक झाले.नंदयशोदे च्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले. तेवढ्यात बासरी वादन बंद करुन नऊ वर्षाचा कृष्ण धावत नंदाजवळ येऊन म्हणाला,बाबा! उद्यापासुन दादा आम्हाला यमुनातीरी मल्लविद्या शिकवणार आहे.
वृंदावनात राहायला आल्यावर, वसुदेवाचे दोन्हीही पुत्र बलराम आणि कृष्ण वनांत गाई वासरांचे कळप चाराय ला नेऊ लागले.तिथे गोपसवंगड्यांसह यमुना नदीत भरपुर पोहणे,वृक्षांच्या सावलीत मनसोक्त खेळणे,न्याहारी करणे सूर्य कलेपर्यंत वृक्षाखाली पहुडणे व घरी जाण्याच्या वेळेस कृष्णाने बासरीचे सूर काढले की,गाई वासरे जिथे असेल तिथुन उड्या मारीत त्याच्या दिशेने येत असत. संध्याकाळी घरी पोहोचले की,बलराम कृष्णावरुन यशोदा रोहिणी मिठ मिरच्या ओवाळुन दृष्ट काढीत असे.
पाहतां पाहतां ग्रीष्म संपुन पर्जन्य सुरु झाला.जिकडे तिकडे सृष्टी हिरवीगार दिसुं लागली.यमुना दुथडी वाहुं लागली. बाहेर पर्जन्यधारा कोसळत होत्या. काळ्या मेघांनी भरलेले आकाश पाहुन बलराम म्हणाला,मेघांनी बघ,तुझाच वर्ण चोरुन घेतलाय! कृष्णा हा काळ तुझा निद्रा घेण्याचा,अरे शयनी एकादशीपासुन कार्तिकी एकादशीपर्यंत तु झोप घेतोस ना देवा विष्णू? कृष्णाने हलकेच त्याला सावध करत म्हटले,बलभद्रा!आपण पृथ्वीवर कोणत्या कार्यासाठी आलोत हे विसरुं नकोस.तेवढ्यात यशोदा बाहेर येऊन दोघांनाही नास्त्यासाठी आंत घेऊन गेली.
याप्रमाणे दिवस आनंदात जात होते राम कृष्ण पौंगडावस्थेत आले.एक दिवस श्रीकृष्ण एकटाच गायी चारत यमुनेच्या काठाकाठाने जात होता.यमुना दुथडी वाहत होती.ऋषीमुनी स्नान करुन घाटा वर ध्यानधारणेंत मग्न होते.आश्रमाबाहेर होमहवन सुरु होते.कृष्ण तसाच किनार्या किनार्याने जात असतां एक खुप मोठा डोह त्याच्या दृष्टीस पडला.त्या प्रचंड डोहाच्या तीरावर सर्पांची मोठमोठी बिळं दिसत होती.सर्पांचे त्या डोहाभोवती वेष्टण पडले होते.त्यांच्या फुत्कारांनी डोहाचे पाणी दुषित झाले होते.काठावर ची झाडेही जळुन गेली होती.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ७.
कृष्णाला आठवले,एक दिवस नंदांनी सांगीतले होते की,या व्रजाच्या उत्तरेस योजन दूर एक विषारी डोह असुन तिथे कालिया नांवाचा मोठा नागराज कुटुंबासहित राहत असल्याने डोहाचे पाणी विषारी झालेले आहे, त्या मुळे त्याबाजुस जाऊं नका. संथपणे गाई कुरणांत चरत होत्या. बरोबरचे गोप बरेच मागे राहिले होते. कृष्णाने गंभीरपणे मना शी कांही ठरविले.कालियाच्या फुत्काराने जळुन वठलेल्या कदंबवृक्षावर चढुन डोहावर लोंबकळणार्या शेंड्यावरील आडव्या फांदीला धरुन प्रचंड आरोळी ठोकत डोहात उडी घेतली.त्याच्या उडीने
तो प्रचंड डोह खळबळुन गेला.जणुं प्रलयच! आधीच्या कृष्णआरोळीने व आतां उडीने उसळलेल्या पाण्याने आंत असलेला, भयंकर रागाने,अति प्रशस्त पांच फण्याचा कालिया नाग क्रोधाने फुस्कारत खळबळुन वर आला.त्याची बायका मुलेही विषारी फुत्कार काढत पाण्यावर आले.सर्व पाणी विषमय झाले. त्या खवळलेल्या सर्वानी कृष्णाला आपल्या वेटोळ्यांनी जखडुन टाकल्याने त्याला बिलकुल हलता येत नव्हते.
तेवढ्यात कृष्णाला शोधत गोप आले मात्र, समोरचे भयानक दृष्य पाहुन ते सारे गर्भगळीत होऊन, ओरडत,वेगाने पळतच वज्राकडे गेले.हा हां म्हणता कालिया व सर्व सापांने कृष्णाला वेढल्या ची बातमी ऐकुन वज्रामधे हाःहाकार माजला.नंद-यशोदेला सांभाळत सर्व गोप धावत सुटले.श्रीकृष्णाला कांही होणार नाही,विष्णुचे स्मरण करा,असं बलराम सर्वांना समजावत होता.तिथे पोहोचल्या वर समोरचे विदारक दृष्य पाहुन शोकमग्न यशोदा तर प्राण त्यागण्यासाठी डोहाकडेच धाव घेतली,इतरांचीही वेगळी अवस्था नव्हती. सर्वांची शोकमग्न स्थिती पाहुन बलराम कृष्णाला म्हणाला….
हे महाबाहो श्रीकृष्णा! अरे हे, मानव बुध्दी गोपबांधव तुला त्यांच्यासारखाच साधारण मानव समजत असल्यामुळे अत्यंत शोकाकुल झालेत,त्यांचा जास्त अंत न पाहतां या विषमय सर्पाचे दमन कर!बलरामाचे खुणेचे शब्द कानी पडतांच,कृष्णाने शरीराभोवतालचे वेष्टण लिलया तोडुन मुक्त झाला व नागाच्या मधल्या मस्तकावर आरोहण करुन नाचु लागल्याने,मर्दनाने त्या भुजंगाला अतिशय वेदना होऊन तोंडातुन रक्त पडु लागले.भयभित नागराज कालिया श्रीकृष्णाला शरण जाऊन म्हणाला,देवा! मी तुझे सत्यरुप ओळखले नसल्यामुळे माझेकडुन आगळीक झाली.मला जीव दान दिल्यास,तुझ्या आज्ञेप्रमाणे वागेन. तर मग,तू परिवारासह तात्काळ हा डोह सोडुन सागरात रहायला जा.लगेच त्याने मान्य केले.त्याला आशिर्वाद देत कृष्ण म्हणाला,हे सर्पराजा तुझ्या मस्तकावर माझी पाऊलं उमटल्यामुळे पन्नगांचा शत्रु गरुड तुझ्यावर कधीच प्रहार करणार नाही.कृतकृत्य झालेला कालिया नाग कृष्णचरणांवर नतमस्तक होऊन,परिवारा सह निघुन गेला.
आणि श्रीकृष्ण डोहातुन तिरावर येऊन उभा राहिला.त्याच्या अद्भुत अलौकिक कृत्यांनी स्तंभीत झालेले गोप गोपींनी त्याला प्रदक्षिणा घालुन त्यांनी मनोभावे नमस्कार केला.विनयाने कृष्ण म्हणाला,तुम्हा सर्वांच्या निष्काम प्रेमाच्या बळावरच मी हे अद्भुत कृत्य करुं शकलो आतां या यमुनेचे पाणी पुर्णपणे स्वच्छ, निर्दोष,निर्मळ व तृष्टीपुर्ण आहे असे म्हणुन तो नंदाजवळ गेल्यावर,नंदाने त्याला दृढालिंगन देऊन छातीशी धरले,
नेत्रातुन आनंदाश्रु वाहुं लागले….
वृंदावन वज्रात समवयस्क गोपां बरोबर बलराम-कृष्णांचे दिवस मोठ्या आनंदात जात होते.गाई चारण्यासाठी वनांत जाऊन यमुना किनारी दूरवर जात. विकटप्रसंगी एकमेकांना इशारा देण्या साठी गोप सवंगडी शिंग वाजवित तर, कृष्ण वेणुचे सूर आसमांत घुमत.त्यांचा आवडता खेळ कुस्त्या… विविध आखा ड्यात मल्ल कुस्तींची स्पर्धा लावीत.ही स्पर्धा मोठ्या अटीतटीची व प्रसंगी प्राणां तिक सुध्दा होई.बलरामला तर या मल्ल विद्येची जात्याच आवड होती.पण कृष्ण ही या कलेत निपुण होता.कालिया सर्पा चा विलक्षण प्रसंगा घडल्यापासुन सगळे गोपसखे कृष्णाशी मोठ्या प्रेमाने पण भितियुक्त आदराने वागत.
एक दिवस कृष्णाचे सोबती येऊन सांगु लागले इथुन उत्तलेस तालबन नावा चे सुंदर अरण्य भरगच्च ताडवृक्षांनी बहरले आहे पण कृष्णा तिथे माणसांना प्रवेश वर्ज्य आहे.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ८.
त्या अरण्यात धेनुक नांवाचा अति बलाढ्य राक्षस गर्दभाचे रुप धारण करुन आपल्या इतर गर्दभ अनुयानांसह फिरत असतो.चुकुन एखादा माणुस गेलाच तर त्याचे नंतर नांवनिशानही कोणाला दिसत नाही.इतकेच काय त्याच्या भितीने पशु पक्षीही राहत नाही.इतके सुंदर अरण्य भयान भकास झाले.बलराम-कृष्णा त्या राक्षस गर्दभास तिथुन हुसकावुन लावले तर ते सुंदर अरण्य आपल्याला खेळाय ला,फिरायला व गाई चारायला मोकळे होईल.यमुनेकाठी असलेल्या तालवनाती ल त्या राक्षस गर्दभाचा समाचार घेण्यास बलराम-कृष्ण निघाले.हे तालवन खरोखरच सुंदर होते,पण निर्मणुष्य व शून्य! कृष्ण म्हणाला!
हे वन आपल्याला क्रीडा खेळण्यास उत्तम आहे असे म्हणुन एक ताडवृक्ष जोराजोरांत हलवायला सुरु वात केल्याबरोबर असंख्य फळे खाली पडल्याने व गोपांच्या बोलण्याच्या आवा जाने त्या भयान निर्जन शांत वनातुन एक माजलेला प्रचंड गर्दभ मोठा आवाज करीत क्रोधाने डोळे विस्फारीत त्याने बलरामाला दंश केला.मागच्या दुगाण्या शस्ररहित बलरामाच्या छातीवर झाडल्या बरोबर बलरामाने त्याच्या तंगड्या धरुन गरगर फिरवत समोरच्या ताडवृक्षावर फेकल्याबरोबर त्या प्रचंड राक्षसाची पाठ कंबर,मान मोडुन धाडदिशी जमीनीवर मरुन पडला.
सगळे गोपसखे बलरामाचा अलौकीक पराक्रम पाहुन मनात समजले की, हे दोघेही बंधु नक्कीच परमात्म्याचे अवतार आहे हे निश्चित!आतां ताडवन कायमचे सुरक्षित झाल्याने गाई निर्वेध चरुं लागल्या. कांही ऋषींनीही आश्रम स्थापन केले.एके दिवशी बलराम कृष्ण यमुनातटीच्या भव्य जुन्या मंडीर वृक्षा खाली खेळत होते. तेवढ्यात प्रलंब नावा चा राक्षस मायावी रुप घेऊन त्यांच्यात मिसळला.
कृष्ण व गोपांचा हरिणक्रीडन नावाचा खेळ सुरु होता. खेळ सुरु असतांना तो मायावी प्रलंब राक्षस बलरामाला पाठीवर घेऊन अरण्यात पळु लागला.बलरामाला धोक्याची जाणीव झाल्याबरोबर रामाने त्याच्या डोक्यावर इतकी जोराने बुक्की मारली की, तो तात्काळ गतप्राण झाला.त्याचा पराक्रम पाहुन त्याला “बलदेव प्रलंबहन” म्हणु लागले.कृष्ण आणि बलरामाच्या एकेक अद्भुत लिला आणि अतुल पराक्रम पाहुन वज्रातील सगळ्यांची खात्री झाली की, हे दोघे मानवरुप घेतलेले देवलोकीचे देवच!
बलराम-कृष्णांनी आपल्या अतुल पराक्रमी सारा वज्रप्रांत,वने,अरण्ये निर्भय केली होती.राम-कृष्ण आपल्या गोपसख्यांसोबत यमुनेच्या किनार्याने सभोवतालची शोभा पाहत फिरत होते, गाई चरत होत्या.सर्वजण दमल्याने एका झाडाखाली बसले असतां त्यांना भूकेची तिव्रतेने जाणीव झाली.न्याहारी आधीच खाऊन झाली होती.फळांनी एवढी तिव्र भूक भागणार नव्हती म्हणुन ते कृष्णाला म्हणाले, कृष्णा आता जर अन्न मिळाले तर? कृष्ण हसुन दीर्घ श्वास घेत म्हणाला, दादा! दूर कुठुनतरी षड्रस अन्नाचा सुगंध येत आहे.जवळच आश्रम असुन शरद ऋतुच्या प्रारंभीचे यज्ञ सुरु असावेत.
दोन तीन गोपांना आश्रमाचा शोध घेण्यास पाठवल्यावर खरंच कांही अंतरावर ब्रम्ह वेत्ते यज्ञ करीत असलेले दिसले.गोप त्यांना म्हणाले आम्ही बलराम-कृष्णाच्या आज्ञेने अन्न घेण्यास आलो आहोत.त्यांनी दुर्लक्ष केल्याने गोप ब्राम्हणांच्या स्रीयां कडे जाऊन बलराम कृष्णासह आम्ही भूकेने व्याकुळ झालोत,इथुन वृंदावनही लांब आहे.वृंदावनातील नंदाचा मुलगा श्रीकृष्णाने तुम्हाला पाठविले?हर्षित होऊन त्या स्रीयांनी विविध सुग्रास अन्न पदार्थ भांड्यात भरुन, त्यांच्या पतींनी मनाई केल्यावरही कृष्णदर्शनार्थ,उत्सुक तेने व लगबगीने गोपांसह निघाल्यात.
अनुपम सौंदर्य,पिवळा पितांबर, कमरेला शेला,काळ्याभोर कुरळे केसांची झुलपे,कानात कुंडले,मस्तकी मोरपिसां चा मुकुट,गळ्यात कमळफुलांची लांब लचक माळा,हातात बासरी व त्याच्या भोवती अस्पष्ट प्रकाशवलय अशा रुपात कृष्णाला पाहुन त्या स्रीयांच्या मनांत भक्तीची लाट उसळली.श्रीकृष्णा! तुझ्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालोत.आतां आम्ही आश्रमात न जाता तुझे नित्य दर्शन घडावे म्हणुन तुझ्यासवे वृंदावनी येतो.सतींनो! या जन्मीचे कर्तव्यकर्म तुम्हाला केलेच पाहिजे.स्वकर्माची फळे भोगलीच पाहिजे.निरंतर माझ्याठीकाणी चित्त ठेवा.या जन्मानंतर तुम्ही माझ्या रुपात मिळुन जाल.बलराम-कृष्णाला वाकुन नमस्कार करुन जड अंतःकरणाने त्या आश्रमाकडे निघाल्या.ऋषिभार्या गेल्यावर सर्वजण भक्तीभावाने अन्नावर तुटुन पडले.
क्रमशः
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ९.
वृंदावनात आल्यापासुन बलराम कृष्णांचे एक एक विस्मयकारक पराक्रम पाहुन सगळ्या गोपगोपींच्या ह्रदयात भक्तीभाव निर्माण झाला.श्रीकृष्णाला तर विष्णुचाच अवतार समजुन त्याला अनन्य भावे भजु लागले.विशेषतः गोपस्रीयांचे त्याच्यावर अतोनात प्रेम होते.माता,पुत्र, बंधु,भगिनी असे वेगवेगळे प्रेम त्यांना कृष्णाठायी वाटत होते.मनी ध्यानी कृष्णा बद्दलचे अवर्णनीय प्रेम त्यांच्या मनी दाटुन येई.ज्यावेळी श्रीकृष्ण बासरीचे सूर
काढत गाई चारायला घेऊन जात, तेव्हा त्याचे दर्शन घेण्यासाठी सर्व गोपगोपी लगबगीने आपापल्या दारात येऊन ऊत्सुकतेने वाट पाहत उभे राहत.त्याचे दर्शन झाले की, देहभान विसरुन,बासरी चे सूर विरेस्तोवर तो दिसेनासा झाला की, निराश मनाने,गुण आठवत,मग नित्य उद्योगाला लागत.संध्याकाळीही असेच घडे. मनुष्य तर मनुष्य जनावरे सुध्दा त्याचेवर प्रेम करीत असत.
शरदऋतु संपल्यावर सर्व गवळी शक्रोत्सव करण्याच्या तयारीस लागले.गिरियज्ञाची तयारी सुरु झाली. गोपींनी विविध पक्वान्ने बनविली.सर्व साहित्याने भरलेले गाडे गोवर्धन पर्वता च्या दिशेने निघाले.ब्रम्हवृदांनी यथाविधि, यथाशास्र यज्ञ केला.यज्ञकुंड धगधगले. गोवर्धनगिरिपुजेच्या आहुत्या पडल्या. मंत्रोच्चाराने सारा परिसर दुमदुमुन गेला, पवित्र झाला.यज्ञपुजा आटोपल्यावर सर्वां ची जेवणे झाली.गिरियज्ञाचा उत्सव पार पडल्यावर सर्वजण वज्रात परतले.
गोपांनी नेहमीच्या रुढीनुसार आपली पुजा न करतां गिरियज्ञ केल्या मुळे क्रोधीत होऊन इंद्राने पर्जन्यास्र वज्रा वर सोडले.काळ्याभिन्न मेघ आकाशात दाटल्यामुळे सगळीकडे अंधार झाला. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे कित्येकां च्या घरावरील छपरे उडुन गेली.गोठ्याती ल गुरेढोरे केविलवाणे हंबरु लागली. मुसळधार पाऊस सुरु झाला.सगळे वज्र जलमय झाल्याने वस्तु, गुरे वाहुन जाऊ लागली.पाण्याच्या प्रचंड लाटा वाढु लागल्या.मोठमोठे वृक्ष उन्मळुन तरंगु लागले.प्रलयच जणुं!श्रीकृष्ण वज्राची होत असलेली दुर्दशा पाहत होता,एवढ्या जलमय प्रवाहातुन कसेबसे कांही गोप त्याचेकडे येऊन करुणा भाकु लागले. श्रीकृष्णा तूच आमचा तारणहार इश्वर आहेस.गिरियज्ञ केल्यामुळे इंद्राच्या कोपा चे निवारण तुझ्याशिवाय कोण करु शकेल?तूच आमचा रक्षणकर्ता आहेस,हे करुणानिधि! आमचे रक्षण कर!
श्रीकृष्णाने सर्वांना आश्वास्त करीत म्हणाला,ज्या गोवर्धन पर्वताची पुजा करुन गिरियज्ञ केला तोच आपले रक्षण करील.तुम्ही सर्वजण आपापली गुरेढोरे घेऊन गोवर्धन पर्वताकडे चला.शेजारी उभ्या असलेल्या बलरामाला हळुच म्हणाला बलभद्रा! इंद्राला त्याच्या शक्ती चा फार गर्व झालाय!ठीक आहे! चल या व्रजांचं व पृथ्वीचं रक्षण केलच पाहिजे, असे म्हणुन सर्व व्रजवासी जनावरांसह कृष्ण बलरामाच्या मागोमाग पुरातुन चालु लागले.सर्व गोवर्धन पर्वताजवळ पोहोचले.श्रीकृष्ण त्या प्रचंड पर्वताजवळ ऊभा राहिला,शेजारी बलराम! आकाशा कडे पाहत कृष्ण पुटपुटला,देवेंद्रा या पृथ्वीवर मी कां आलो हे माहित असुनही भलत्यावेळी तुला कोप येण्याचे काय कारण? ठीक! बघ आता माझा पराक्रम!
श्रीकृष्णाने त्या प्रचंड पर्वताकडे नजर टाकली व आपला उजवा हात ताठ धरुन मनोमन म्हणाला,गिरिराज! आज व्रज वासिंनी तुझे पुजन ,यज्ञ केला.तेव्हा धर्म आणि कर्तव्यास अनुसरुन त्यांचे रक्षण कर.कृतज्ञ हो,कृतघ्न नको होऊस.आणि हाताची करंगळी आकाशदिशेला उचलल्याबरोबर, काय आश्चर्य! तो प्रचंड पर्वत करांगळीवर सरकला.श्रीकृष्ण सर्वां ना म्हणाला,माझ्या अलौकिक शक्तीने या पर्वताखाली येवढी जागा निर्माण झाली की,
तुम्ही आरामशीर राहु शकाल व थंडी वार्याचा उपद्रव होणार नाही. आंत गुहे मधे नवीन व्रजांची वसाहत झाली.सतत सात दिवस इंद्राच्या क्रोधाचे,तुफानी पावसाचे थैमान सुरु होते.शेवटी थकुन निरुपायाने इंद्राने माघार घेतली.दाही दिश्या मोकळ्या,निरभ्र झाल्यात.सूर्य प्रखर तेजाने तळपु लागला.तेव्हा कृष्णाने सामानासह सर्वांना बाहेर येण्यास सांगीत ले.गिरिगुहा मोकळी झाली.आणि हलकेच कृष्णाने आपला हात खाली घेत ल्याबरोबर गोवर्धन पर्वत पुर्ववत स्थितीत आला.श्रीकृष्णाच्या या दिव्य,अचाट पराक्रमाने श्रीकृष्ण हा विष्णु अवतार असल्याची पुन्हा एकदा त्यांची खात्री पटली.ब्रजवासी आनंदाने विभोर झालेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – १०.
करुं नका.योग्य वेळ आली की,माझे खरे स्वरुप तुमच्या दृष्टीस पडेल.धीर धरा.
यावर्षी चांगला पाऊस व निसर्गाने साथ दिल्याने आबादी आबाद झाले. इंद्राच्या कोपातुन सुटका झालेले गोप गोपी आनंदात होते.त्यांच्या मनोरंजना साठी बलराम-कृष्ण बैलांच्या अटीतटी च्या झुंजी लावत.एखादा मस्तवाल बैल अनावर झालाच तर श्रीकृष्ण आपल्या अवाढव्य शक्तीने जागीच दाबुन धरी. बलराम-कृष्ण पौगंडावस्था संपुन तारुण्यात १९ व्या वर्षात पदार्पन केले. श्रीकृष्णाचे रुप तर वर्णनातीत होते.सर्व आबालवृध्द गोपगोपी त्याच्या दर्शनार्थ वेडे झाले होते.त्यांना एकच भिती वाटाय ची की, हा आपल्यापासुन दुरावरणार तर नाही ना? हा कायम गुराखी कायम राहणार नाही हे स्पष्ट दिसत होते.आणि मग त्यांचे मन विषण्ण होई.
दर पोर्णिमेला बलराम-कृष्णा बरोबर सर्व गोपगोपी रासक्रीडा खेळयचे ठरविले.सर्व साजश्रृंगार,नटुन थटुन यमुनाकाठी कदंब वनांत आपपाल्या टिपर्या घेऊन दोघांची आतुरतेने वाट बघत,श्रीकृष्ण दर्शनार्थ अधीर झाले होते.एवढ्यात बासरीचे सूर काढत,पित रेशमी वस्र परिधान,कमरेला शेला, मस्तकी मयुरपिसांचा मुकुट,बाहुभुषणे घातलेला कृष्ण ऐटीत पावले टाकीत बलरामाबरोबर येत असलेला पाहुन सर्वां च्या नजरा त्याच्यावर खिळल्यात.गोप गोपींचे ह्रदय आनंदाने उचंबळुन आले. त्यांनी केलेल्या गोलाकाराच्या मध्यभागी श्रीकृष्ण उभा राहिला.मुरलीच्या तालावर टिपर्या पडुं लागल्या.रासनृत्य सुरु झाले. आणि रासक्रीडा खेळणे हा दिनक्रमच बनुन गेला.
एके दिवशी संध्याकाळी गोपगोपी रासक्रीडेसाठी श्रीकृष्णाची वाट पाहत असतांना एक भयंकार मस्तवाल बैल व्रजात शिरुन भयंकर उत्पात माजवल्या ने सगळीकडे हाःहाकार माजला.लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळुं लागले व श्रीकृष्णाचा धावा करुं लागले.तेवढ्यात कृष्णाने येऊन सर्वांना धीर दिला व टाळी वाजवुन बैलाचे लक्ष आपल्याकडे वेधले. कृष्णाला निश्चल उभे पाहुन,शिंगाने भोसकण्याच्या हेतुने,शिंगे रोखुन कृष्णा वर झेप घेतली,पण त्यापुर्वीच कृष्णाने त्याची शिंगे गच्च पकडुन जागीच उभे करत मागे रेटत नेले व शिंगाला व मानेला पीळ दिल्याने बैल धाडकण खाली पडला श्रीकृष्णाने त्याच्या एका शिंगावर पाय देऊन दुसरे शिंग जोराने उपटुन त्या शिंगा ने त्याच्या तोंडावर असा कांही फटका मारला की, बैलाने तात्काळ रक्त ओकले व पाय घासत प्राण सोडला. बैलाच्या रुपात तो वृषभासुर राक्षस होता.कृष्णाचे अचाट सामर्थ्य पाहुन व्रजवाशी हर्षित झाले. सर्व निर्भय झाल्याने गोपगोपींसह रासक्रीडा खेळुन सार्या व्रजवासियांना परम आनंद देऊ लागला.
श्रीकृष्णाच्या या लोकविलक्षण अद्भुत पराक्रमाची चर्चा,किर्ती चहुकडे पसरली.हळुहळु लोकांत, नारदाने भाकीत कथन केल्यानुसार कृष्ण हा नंद पुत्र नसुन वसुदेव देवकीचा पुत्र,कंसाचा काळ असल्याची चर्चा होऊ लागली. तेवढ्यासाठी तर कंसाने वसुदेव देवकीला मथुरेत कैदेत ठेवुन त्यांना झालेले पुत्र जन्मतःच कंसाने मारले,आठवी मुलगी ही शिळेवर आपटुन मारली.
वासुदेवाचा आठवा पुत्र कंसाचा काळ होईल ही झाले ली भविष्यवाणी असत्य कशी बर होईल ही चर्चा कंसाच्याही कानावर गेली.तो अस्वस्थ होऊन त्याचा संताप अनावर झाला.मी एवढा चौकस सावध असुन, माझा शत्रु,माझा काळ,राजधानीपासुन अवघ्या तीन कोसांवर सुखाने नांदत, वाढत आहे व मला कळु नये?गेली १६-१७ वर्षे वसुदेव गरीब निरुपद्रवी, इश्वरभक्तीत लीन असलेल्याने त्यांचेकडे दुर्लक्ष केले व स्वभावानुसार जुलमी राज वटीचा ओघ स्वकर्तुत्वाने भरभराटीस आलेल्या यादव,भोज,वृष्णी,अंधक यांच्याकडे वळली.अनेक देश देशोधडीला लागलेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


