नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९०४
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥
एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥
नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य झाली ॥२॥
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
अर्थ
संतांच्या समोर सर्पाला देखील मारु नये कारण सर्वत्र हरी व्यापक आहे अशी त्यांची भावना आहे व सर्पाला मारले तर ते कष्टी होतात दु:खी होतात. जसे एका माळेत अनेक मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे संतांच्या दृष्टीने जीव आणि शिव हे दोन्हीही एकरुप आहेत त्यामुळे ते सर्वत्र ब्रम्ह पाहत असतात आणि जर कोणाच्या अंगावरील एक केस जरी त्यांच्यासमोर(संतांच्या) उपटला तरी त्यांचे अंग कापते. संतांची जातच इतकी दयाळू आहे की त्यांना कुणाचेही दु:ख सहन होत नाही परपीडा झालेली तर त्यांना मुळीच सहन होत नाही कारण त्यांच्या दृष्टीने सर्व भूतमात्रांमध्ये साम्यताच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “वेदाने एक नीतीचा संकेत सांगितला आहे तो म्हणजे सर्व भूती एक ईश्वर आहे व कोणत्याही भूतमात्राचा मत्सर मनुष्याने करु नये याचेच नाव म्हणजे ईश्वराची पूजा आहे व असे केल्याने आपले चित्त सुखी होत असते.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
