२९०५, अभंग :- विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२९०५
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥ध्रु.॥
होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळीच पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥

अर्थ

लोकहो तुम्ही भेदबुध्दीच्या वाटेने चालत जाऊन जाऊन खूप दूरवर अनेक योनीमध्ये पोहोचला आहात परंतू आता तरी या मनुष्य देहामध्ये पुन्हा देवाकडे माघारी फिरा. मग तुम्हाला मागे जे दु:ख झाले त्याचे भय पुढे उरणारच नाही. मुख्य म्हणजे भेदबुध्दीचा नाड येऊ नये जर असे झाले तर आपल्या हाती शेवट गोड येणार आहे. एकदा की इच्छा नाहीसा झाल्या मग कसले दु:ख राहाते ? पहिले तुम्हाला संसारामध्ये कंबर कसून जो अभ्यास होता फक्त आता वेळप्रसंग पाहून तसाच अभ्यास आपली कंबर कसून परमार्थामध्ये करावा. एकदा की तुला पश्चात्ताप झाला की त्या योगाने सर्व पूर्वीचे दोष खोटे होतील. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामध्ये आपली बुध्दी शुध्द करावी व देवाला अनुकूल करुन घ्यावे मग पाहा देव तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. देव तुमच्या नामस्मरणाचीच वाट पाहात आहे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading