नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९२३
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥
निकटवासिया आळवितों धांवा । येथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥
उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥
तुका म्हणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥
अर्थ
मी लोकांचे कोणतेही गुणदोष माझ्या अंगाला लागू देत नाही जरी प्रसंगी मला ते लक्षात आले तरी मी वरच्यावर लगेच ते बाजूला टाकून देत असतो. देवा मला माहित आहे तू माझ्या निकटच वास करीत आहे त्यामुळे मी तुला आळवीतो आहे तुला मी हाक मारली की तू लगेच धावून ये आणि मला यातून सोडव. जे आमच्या अंत:करणात उमटते तेच आम्ही देवाजवळ प्रकट करतो आणि त्याचा बोभाटा झाला की ते देवाला कळते आणि तो आमच्याकडे धाव घालत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणताही प्रसंग असो आम्ही काळाच्या तडाख्यातून वाचतो कारण आम्ही समर्थाची लेकरे आहोत व त्याच्या बळानेच आम्ही नेहमी सुखी आहोत.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
