
हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! पेशवाई !!!
भाग – ६.
शाहूमहाराजांनी १२ जानेवारी १७०८ मधे सातार्याला स्वतःला अभिषेक करुन घेतला.आसनस्थिरते मागे मोलाचा हात होता फक्त बाळाजी विश्वनाथ भटाचा!ताराबाईंनी कोकणातल्या वाडीकर सावंतांच्या मदतीने शाहूराजेंनी घेतलेले अनेक किल्ले परत जिंकून घेतले व कोल्हापूर ला आपले आसन स्थिर केले.
शाहूराजेंचे सातार्यास आसन स्थिर झाल्यावर बाळाजीवर वसूलीची जबाबदारी सोपवली.१७१० मधे रांगण्या च्या मोहिमेवर परतत असतांना वाराण तीरी वडगावला सेनापती जाधवांच्या पायाच्या जखमेमुळे अचानक दुर्दैवी अंत झाला.धनाजी जाधवांचा धाकटा मुलगा चंद्रसेनला शाहूराजेंनी सेनापतीपद बहाल केले.परंतु त्याचा ओढा ताराबाई च्या पक्षाकडे आहे हे लक्षात आल्यावर बाळाजींनी चंद्रसेनची कानउघाडणी केली,परंतु व्यर्थ!
शाहूराजेंनी २० ऑगस्ट १७११ मधे
“सेनाकर्ते” पदवी,सोबत २५ हजारांचा बाळाजींना सरंजाम दिला.पुढे मोगलाई तील चौथाई,सरदेशमुखी आणि घासदाण्याच्या वसूलीची जबाबदारी बाळाजी आणि चंद्रसेन जाधववर सोपवली,पण या मोहिमेत दोघांची चांगलीच जुंपली आणि चिडलेल्या चंद्रसेन जाधवने बाळाजीसह त्यांच्या पुत्रांना पांडवगड जवळ कैद केले.
पिलाजी जाधव स्वराज्याचे खरे पुजारी व बाळांजींचा सच्चा दोस्त!त्यांना कळल्याबरोबर यमाजी धुमाळच्या मदती ने बाळाजीची सुटका केली.बाळाजी सातार्यास जाऊन शाहूमहाराजांना सारी हकिकत कथन केल्यावर शाहूराजेंनी त्यांना अश्वास्त केले.तिसर्या दिवशीच चंद्रकांतने शाहूराजेंना निरोप पाठवला, बाळाजीस आमच्या स्वाधीन करा.पण बाळाजीसारखा हरहुन्नरी व्यवहारदक्ष, कर्तव्यदक्ष,कर्तबगार,एकनिष्ठ सेवकास ते थोडेच गमवणार होते?शेवटी चंद्रकांत ताराबाईच्या पक्षाला जाऊन मिळाला. ताराबाईच्या गटात दामाजी थोरात, रावजी थोरात,चंद्रकांत जाधव,आणि कान्होजी आंग्रे होते.
कान्होजी आंग्रेचे वडिल तुकोजी आंग्रे सुवर्णदुर्गात नाईक होते.तसं कान्होजी आंग्रेचं बालपण कष्टात गेले. जोशी ब्राम्हणाकडे कान्होजी गुरे वळवि ण्याचे काम करीत असत.कान्होजीची हरहुन्नरी,चपळता,हुशारी पाहुन त्यांना हत्याराचं शिक्षण दिलं.याच कलेच्या जोरावर सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहीतेकीडे नोकरी मिळाली. याच काळात कान्होजी छत्रपती राजाराम महाराजांच्या सानिध्यात आले तेव्हा त्यांनी पराक्रम करुन मोगलांना पळतां भुई थोडी केली होती.
कान्होजींचा पराक्रम पाहुन राजामांनानी त्यांना “सरखेल” आणि ध्वजवृंदाधिकारी या पदव्यांनी सन्मानित केले.त्यांनी जंजीरा किल्ला लढविला कोकणपट्टीतले अनेक किल्ले जिंकून जयगड व पूर्वगड हे किल्हेही बांधले.पुढे विजयदुर्गला त्यांनी आरामारचे मुख्य ठीकाण बनवले.
औरंगजेबच्या मृत्युनंतर ताराबाईचा पक्ष मजबूत करण्यासाठी कान्होजीने कोकणात नुसता धुमाकुळ घातल्याचे समजल्यावर,खिन्न शाहूराजेंनी कान्होजीं वर चालुन जाण्याचा आदेश बहिरोपंत पिंगळेंना दिला.पण या लढाईत पिंगळेंचा पराभव होऊन कैदी झाले.
स्वराज्याचा मुख्यमंत्री जेरबंद होणे म्हणजे अतिशय नामुष्कीची गोष्ट!कदाचित स्वआसनाला धोका होऊ शकेल.दुसरा पेशवा नेमण्याशिवाय पर्याय नव्हता.अंबाजी पुरंदरे सोबत मसलत करुन बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद देण्याचे ठरविले.पेशवे म्हणजे मुख्यमंत्री!बाळाजींच्या आधी सहा जणांनी पेशवाई उपभोगली होती,परंतु एकाही पेशव्याने नजरेत भरण्याजोगी कामगिरी बजावली नव्हती.
१७ नोव्हेंबर १७१३ ला मांजरी गांवी सनई चौघड्याच्या गजरांत खुद्द शाहूमहाराजांनी स्वहस्ते पेशवाईची वस्रे दिली.बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी शाहू महाराजांच्या चरणावर झेप घेतली.शाहू राजेंनी त्यांना उठवुन जीवाशिवाची भेट घेतली.बाळाजी!आजपासुन तुम्हाला स्वराज्याची शिलेदारीची जबाबदारी आणि पेशवाईची सूत्रे सुपुर्त करीत असुन रांजणगाव,कुर्डा वगैरे पांच महालांचे सरदेशमुखीचे वतन लिहुन दिले.महाराज हा बाळाजी पेशवा अंतिम श्वासापर्यंत स्वराज्याची निष्ठेने सेवा करील.आशिर्वाद असावा.श्रीवर्धन सोडल्यावर आपल्या आयुष्यात आजचा दिवस येईल याची बाळाजींनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ७.
त्यारात्री वाड्याच्या खोलीत गुप्त मसलत होऊन बहिरोपंत पिंगळेंना सोडवण्यासाठी सैन्याची तजवीज करुन कान्होजी आंग्रेवर चालुन जाण्याची आज्ञा शाहूराजेंनी दिली.राजेंचेच आश्वासन मिळाल्यावर बाळाजी,बाजुला उभा असलेल्या भानु कडे पाहत फडणीसीची वस्रे देण्याची शाहू महाराना विनंती केली. याच महादेव भानुनी २५ दिवस अंजन वेलीच्या किल्ल्यात असतांना बाळाजींचा अतोनात छळ होत असल्याचे कळताच, किल्लेदारास
लाच देऊन बाळाजींची सुटका केली होती.त्यांच्या विनंतीनुसार भानूंना फडणीशीची वस्रे प्रदान करण्यांत आली.
शाहूमहाराजांच्या आदेशानुसार विश्वनाथ पेशवे लोहगडकडे रवाना झाले.
भरपूर सैन्य,हत्ती,घोडे, घेऊन मजल दर मजल करीत मौजे ओलवण गांवी दाखल झाले.जवळच असलेल्या लोहगडला पाठविलेल्या हेरांनी तिथल्या स्थितीची माहिती दिली. मग बाळाजींना जुनी आठवण जागृत होऊन, बाळाजींना कान्होजींना आपल्या जुन्या स्नेहाचा हवाला देऊन लखोट्यात लिहिले,शाहू राजेंच्या आदेशानुसार लोहगड आमच्या हवाली करावा.लखोटा पाहून कान्होजीच्याही स्नेहस्मृती जाग्या झाल्या आणि तहाचे बोलणे करण्यास पाचारण केले.
२८ फेब्रुवारी १७१४ ला कान्होजी आंग्रे लोहगडवरुन ओलवण गांवी आले. दोघांच्या गळाभेटी झाल्या.दोघेही ब्रम्हेंद्र स्वामींचे शिष्य निघाले.आपल्या मिठास वाणीने ताराबाईचा पक्ष कसा चुकीचा आहे हे बाळाजींनी त्यांना पटवुन दिले. सोबतच सिद्दी,हबशे, व इतर विरोधकां विषयी समाधानकारक चर्चा होऊन मोठा सलोरण्याचा तह झाला.तहामधे शाहूराजें नी आंग्रेंना कोकणातील १६ सवघड आणि १० अवघड किल्ले,तसेच सरखेल किताब देऊन पूर्वीप्रमाणेच मराठ्यांच्या आरमारावर नेमावे.बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीसांची कैदेतुन मुक्तता करुन,शाहूराजेंचे घेतलेला मुलुख परत करावा व ताराबाईचा पक्ष सोडावा. कान्होजींनी या सर्व अटी मान्य करुन म्हणाले,बाळाजी! आपल्या स्नेहाची अपूर्व भेट म्हणुन लोहगड,धनगड आणि तुंगातिकोना किल्ल्याचा स्विकार करावा. कान्होजींच्या दिलदारपणाचा बाळाजींना मोठा अभिमान वाटला.पुन्हा गळाभेट घेऊन कान्होजी आंग्रे कुलाब्याकडे निघुन गेले.बाळाजी पेशवेंची मोहिम फत्ते झाली
बाळाजींनी लोहगड ताब्यात घेतला रामाजी महादेव भानूस सबनीशी देऊन किल्ल्यावर नेमले.नाणे मावळची मुजुम गिरी हरी महादेव भानूवर सोपवुन बाळाजी पेशवे सातार्यास आले.मोहिम फत्ते करुन आलेल्या बाळाजींचा शाहू महाराजांनी मोठा सत्कार केला.वाड्या वर आल्यावर पत्नी राधाबाईने औक्षण केले.
कांही दिवसांनी पुन्हा षडयंत्रांना उत आला.त्यातच ताराबाईकडे गेलेला चंद्रसेन जाधव(धनाजी जाधवचा मुलगा) मोगलांना जाऊन मिळाला.ताराबाईंना कोल्हापूरच्या गादीची चिंता निर्माण झाली.कान्होजी आंग्रेनी पक्ष सोडला, चंद्रसेन जाधव मोगलांना मिळाला.तारा बाईंनी दमाजी थोरात व रावजी थोरात यांना शाहूराजे व बाळाजीचा बिमोड करण्याचा आदेश दिला.दमाजी व रामजी थोरात आणि चंद्रसेन यांची गुप्त मसलत झाली.चंद्रसेन म्हणाला,चक्रव्युह रचून मी शाहूराजेंना जेरबंद करतो,तुम्ही दोघे बाळाजी विश्वनाथ पेशवेंना पकडा.
दमाजी थोरातांनी मिरजेकडे बंडाचे निशाण उभारलं.ते लोकांचा छळ करुन खंडणी वसूल करुं लागले.घोड्यां च्या टापाखाली माणसे चिरडू लागली. टाहो फुटु लागला. आकांत उसळला. शाहू राजेंनी पेशवे बाळाजींना मिरजे कडचे दमाजी थोराताचे बंड मोडण्याचा आदेश दिला. पेशव्यांची फौज बंडखोर दमाजीवर चालून गेली पण दमाजी हुलकावणी देत पुण्याकडे निसटून हिंगणे गांवी बस्तान मांडले.या भानगडीत मनुष्य हानी,संपतीची नासाडी टाळण्यासाठी सामंज्यस्याने वाटाघाटी करण्यासाठी पेशवे बाळाजींनी दमाजी थोरातास लखोटा पाठवला.दमाजीने वेगळाच हेतू मनात धरुन होकार कळविला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग -८.
मोठ्या खुशीत बाळाजी विश्वनाथ आपल्या दोन मुलांसह म्हणजे बाजीराव व चिमाजीअप्पांना घेऊन हिंगणेगांवी दाखल झाले.हे काय?सैन्याचा वेढा? क्षणांत डाव उलटला.दामाजी थोराताने फितूरी केली.बाळाजींना त्यांच्या दोन्ही मुलांसह कैद केले.बाळाजींच्या हाता पायात साखळदंड बांधुन अंधारकोठडीत डांबण्यात आले.भाकरी ऐवजी त्यांना राख चारण्यात आली.अमानुष छळ करण्यांत आला.
कांही दिवसांनी दमाजीने पेशव्यां च्या सुटकेसाठी खंडणीचा खलिता सातार्यास पाठवला.खंडणी न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.शाहू राजेंना काही सूचेना.गुप्त मसलत झाली. खंडणीपेक्षा बाळाजीची जान महत्वाची, खंडणी घेऊन स्वतः शाहूराजे उरुळीगांवी पोहोचले.दमाजीपंतास निरोप मिळतांच त्याची माणसं येऊन खंडणीची मोठी पेटारे घेऊन गेल्यावर,अंबाजीपंत, पिलाजी जाधव,बाजीराव,चिमाजीअप्पा आणि बाळाजी विश्वनाथची सुटका झाली.लागलीच पिलाजी जाधव मागे फिरुन दमाजी जाधवावर झडप घातली. दमाजी जेरबंद झाल्यावर त्याचा छळ करुन पुरंदर किल्ला मागुन घेतला. मधल्या काळात आंग्रेंच्या मदतीने हबशां चा पराभव करुन बाळाजींनी सर्व किल्ले ताब्यात घेतले होते.शिवाय सिद्दींनी ३० जानेवारी १७७५ ला पेशव्यांशी तह केला होता.स्वराज्याचा झेंडा मानाने फडकु लागला.शाहूमहाराजांच्या अनुमतीने सासवडला मोठा चौसोपी वाडा बाळाजीं नी बांधला.याच वाड्याच्या चौसोपातील झोपाळ्यावर बसून गतकाळातील घटना त्यांना आठवल्या होत्या.जवळच उभ्या असलेल्या राधाबाईकडे पाहत म्हणाले, राधा या पेशवाईचा प्रवासात तुमची मोलाची साथ लाभली.घर सावरले.चार बछड्यांना सांभाळले.
राधाबाई विनयाने म्हणाल्या,हे सर्व तुमच्या स्वकर्तृत्वाने झाले.दोन्ही मुलं देखील तुमच्याच वळणावर गेली. बाजीराव शंभूमहादेवाचा व चिमाजी भगवान विष्णुंचा अवतारच जणु!याच काळात चासकर घराण्यातील महादजी पंत जोशींची गुणी कन्या काशीबाईंशी १७११ साली बाजीरावांचा विवाह झाला.
दुपारची जेवणं आटोपल्यावर बाळाजी वामकुक्षी करीत होते तोच सातार्याहुन शाहूराजेंकडुन लखोटा घेऊन दूत आला. लखोट्यानुसार बाळाजी सातार्याला आले.मुजर्याचा स्विकार करुन राजे म्हणाले,बाळाजी,दिल्लीवर भगवा झेंडा फडकावण्याची नामी संधी चालून आली. हुसेन अली बंधूंनी बादशहा फर्रुखासियर विरुध्द आपली मदत मागीतली आहे. आम्ही तुमच्या भरोश्यावर होकार दिला. क्षणभर बाळाजी गंभीर झाले.दिल्लीला तडाखा देणं सोपी गोष्ट नव्हती.
मोगली सत्ता काबूत आणण्या साठी श्रीमंत पेशव्यांनी सैनिकांची जबरदस्त फळी उभारली.मसलती, नियोजन झाले.दाभाडे,सुर्यवंशी, सामवंशी,निंबाळकरांसारख्या मान्यवर सरदारांना गुजरात प्रांतात धुमाकुळ घालण्यास पाठवले.हरहर महादेवाच्या गर्जनेत खानदेश,गुजरात दणाणून गेला. मोगल सैन्यांची दाणादाण झाली.यवनी सत्ता हादरली.मराठ्यांची पलटण माळवा प्रांत ओलांडून बाळाजी बाजीराव व चिमाजीसह दिल्लीत दाखल झाले. बादशहा फर्रुखासियर घाबरुन मराठ्यां च्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात. सय्यदाने मराठ्यांशी करार करुन चौथाई सरदेशमुखी आणि वसूलीचे अधिकार मराठ्यांना सोपवले.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशाव्यतिरिक्त बराचसा मुलुख मराठ्यांना मिळाला.सय्यदने पेशव्यांच्या मदतीने फर्रुखासियरला गादी वरुन पायउतार करुन बादशहा म्हणून रफिउद् दरजतला गादीवर बसवले.
याचवेळी रात्रीच्या वेळी दिल्लीत असलेल्या मराठ्यांवर कांही यवन फौजेने अचानक हल्ला करुन भिषण संहार केला.यात महादेव चिटणीस आणि शंकरजी मारल्या गेले.
छत्रपती शाहूमहाराजांचा परिवार अजुनही मोगलांच्या ताब्यात होता.राणी येसूबाई,शाहूराजेंच्या बायकामुलांची सुटका केली.नंतर करारान्वये बादशहा फर्रुखासियर कडून ३ मार्च १७१९ ला शाहूराजेंच्या नांवे चौथाईची सनद व १५ मार्च १७१९ ला स्वराज्याच्या आणि सरदेशमुखीच्या सनदा लिहून घेतल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ९.
सय्यद बंधूंनी बाळाजींचा चांगला सन्मान केला.दिल्लीतील वास्तव्याचा, मोहिमेचा सर्व खर्च,वाटेतील खर्च आणि मौल्यवान पोषाख देऊन बाळाजींचा गौरव केला.सर्व खर्च वजा जाता ३ लाख रुपये राज्याच्या तिजोरीत आणण्यांत पेशव्यांना यश मिळाले.४ जुलै १७१९ रोजी सातार्यात दाखल झाले.
स्वराज्याची दौलत परत मिळाली. आईसाहेब येसूबाई व परिवार आल्याने शाहूमहाराजांच्या आनंदाला पारावार उरला नाही.घरोघरी आनंदोत्सव साजरा झाला.”न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवणार्या बाळाजी विश्वनाथां चा राजदरबारात शाही सत्कार करुन शाहूराजे म्हणाले,ह्या श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचे हे स्वराज्य सदैव ऋणी राहिल.
१७१९ चा पावसाळा संपताच संभाजी जो शाहूंना शह देऊ बघत होता, त्याच्यावर बाळाजी चालून गेले.बेळगांव, कुकुडी,माळवेद आणि डिग्रज भागात मोहिमा करत १७२० मार्चमधे इस्लामपूर जवळ निर्णायक युध्दात विजय मिळवून बाळाजी सासवडला परतले.या सर्व दगदगीचा परिणाम शरीरावर झालाच! त्यांच्या शरीरात कळा आणि ज्वाळांचा धुमाकूळ घातला.वैद्याच्या उपचाराचाही उपयोग होत नव्हता.त्यांना अंतिम क्षणाची चाहूल लागली.त्यांच्या जवळ असलेल्या बाजीराव व चिमाजींना क्षीण स्वरांत म्हणाले,आम्ही या मराठी मातीत श्रीमंत पेशवाईचा पाया रचला.त्यावर तुम्ही कळस चढवा,उतु मातु नका. पेशवाईची अशी कारकिर्द घडवा की, इतिहासांत तुमचे नांव विसरु शकणार नाही.शाहू महाराजांची मर्जी सांभाळा. २ एप्रील १७२०, हे राssम, हे रामss म्हणत बाळाजी विश्वनाथ कायमचे दूरच्या प्रवासाला निघून गेले.
पेशव्यांची रिक्त झालेली जागा जास्त दिवस रिकामी ठेवणे योग्य नसल्यामुळे एके दिवशी सासवडमधलं मोठं प्रस्थ, सासवडचे कुळकर्णी,देशपांडे सांभाळणारे,पेशव्याचे कारभारी अंबाजी पंत बाळाजी विश्वनाथच्या वाड्यात आले बाजीराव,चिमाजीआप्पांनी त्यांचे चरण स्पर्श केले.बाजीरावांनी अंबाजीपंताच्या हाताखाली राज्यकारभारचं शिक्षण घेतले होते.अंबाजीपंत म्हणाले,पेशवाईची गादी जास्त दिवस मोकळी ठेवून चालणार नाही.चला सातार्याला जायची तयारी करा.मोठ्या लवाजम्यासह चिमाजीअप्पा राऊ (बाजीराव) आणि अंबाजीपंतानी सातार्यात राजवाड्यात प्रवेश केला. तिघांनीही शाहूमहाराजांना मुजरे केल्या वर, अंबाजीपंत म्हणाले,महाराज!पेशवाईची गादी जास्त दिवस रिकामी राहल्यास गोंधळ निर्माण होईल.तरी पेशवाईची वस्रे बाजीरावांना देण्यात यावी.पंत तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री! आपल्या शब्दाचा मान ठेवूच,पण आधी हा विषय अष्टप्रधान मंडळासमोर ठेवणे जरुरीचं आहे.
राजदरबारांत श्रीपतराव प्रतिनिधीं नी बाजीरावांना पेशवाईची वस्रे देण्यास कां विरोध केला कुणालाच कारण कळले नाही.वास्तविक त्यांनी वेळोवेळी बाळाजींना मदत करुन आपलं श्रेष्ठत्व शाहूराजेंसमोर सिध्द केलं होतं आणि म्हणूनच महाराजांनी अष्टप्रधान मंडळात त्यांना मानाचं प्रतिनिधी पद बहाल केलं होतं.
दक्षिणेतील साडेसहा सुभ्यांचा कारभार सांभाळणारा निजाम मुन्मुलुरव ने गेल्या दहा वर्षापासुन दक्षिणेच्या मुलखाची रसद दिल्लीला पाठवली नसल्याने पातशहाने मुन्मुलरववर मोठी फौज पाठवल्याने घाबरुन त्याने मराठ्यां ची मदत मागीतली.शाहूराजे मागतील त्या रकमेच्या अटीवर २५,००० फौज पाठविण्यासाठी शाहूराजेंकडे वकीला मार्फत लखोटा पाठवला.मोगलाविरुध्द पाऊल उचलण्याची नामी संधी चालुन आली,पण २५,००० सैन्य आहे कुणाकडे
दुसर्या दिवशी राजेंनी दरबार भरवुन मोगलांकडुन आलेल्या पत्रातील मुद्दा सर्व उपस्थित अष्टप्रधानांसमोर ठेवला.परंतु कुणीच हिमंत न दाखवल्या मुळे,राजे म्हणाले,तुम्ही कोणी गेला नाही तर राज्याची आब जाईल.तेवढ्यात त्यांच्या समोर अंबाजीपंत पुरंदरेचा चेहरा समोर आला.चोपदाराकरवी त्यांना ताबडतोब दरबारात बोलावण्यांत आले. ते आल्यावर राजेंनी त्यांचेसमोर ही बाब ठेवल्यावर,पुरंदरे म्हणाले,महाराज!आम्ही आपले चाकर,आपला हुकुम पाळणे आमचे प्रथम कर्तव्य!तेवढी पेशवाईची वस्रे बाजीरावांना मिळाली की आम्हाला मोहिम राबवणे कठीण नाही. पंताचा डाव ऐकून शाहूराजेंनी आनंद झाला व बाजीरावांस दरबारात आणण्यास पंत निघून गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – १०.
आज सातारा नगरी फुलामाळांनी नटली होती.सनई चौघड्यांची मंगलधून वाजत होती.आज दरबारांत सर्वांनी हजेरी लावली होती.अंबाजीपंत, बाजीराव व चिमाजीअप्पांना घेऊन दरबारात आले.हिंदवी स्वराज्या पताका आसमंती फडकवणार्या महान योध्या कडे शाहूमहाराज कौतुकाने डोळे भरुन पाहत होते.बाजीरावांनी त्यांचे चरण दर्शन घेतले.वस्रालंकाराची ताटे आली. स्वतः महाराजांनी बाजीरावांना जरी पटका बांधुन त्यात कलगीतुरा खोवला. नंतर शिरपेच,कंठी चौकडा,ढाल,तलवार शिक्के कट्यार,चौघडा सनगे,जवाहीर, साहेब नौबत,हत्ती,घोडे अशा भेटी देऊन बाजीरावांचा यथोचित सन्मान केल्यावर बाहेर मंगल वाद्ये वाजुं लागली.
बाजीराव!आम्ही स्वराज्याची इभ्रत आपल्या हाती सोपवत आहे.उत्तम कामगिरी गाजवून मराठी दौलत भरभरटीस आणण्याची आमची अपेक्षा पूर्ण कराल ही खात्री आहे.महाराज! स्वराज्य निर्मिती,तीची भरभराट हेच आमचे ध्येय!आपल्या आशिर्वादाने मराठ्यांचा जरीपटका अटकेपार फडकवीन.त्यासाठी मुळावरच घाव घातला की,फांद्या आपोआपच गळून पडतील.बाजीरावांच्या आवेशपूर्ण बोलण्याने शाहूराजे भारावुन गेले.हा नयनरम्य सोहळा पाहुन सारा दरबार भारावुन गेला,परंतु प्रतिनिधींच्या काळजांत आगडोंब उसळला.
त्यारात्री गुप्त मसलतीसाठी बाजीराव,चिमाजीआप्पा आणि अंबाजी पुरंदरेंना शाहूराजेंनी बोलावुन घेतले. मोगलांकडून आलेल्या वकीलास काय जबाब द्यावा असे विचारले असतां बाजीराव म्हणाले,आमची २५,००० ची मराठी फौज रवाना होत असल्याचे कळवावे.शाहूराजे समाधान पाववले.
बाजीराव पेशव्यांनी सातार्यात दोन लाख कर्ज उभारुन खास फौज उभी केली.महाराजांचा निरोप घेण्यासाठी आलेले बाजीराव म्हणाले,महाराज!आम्ही स्वकर्तृत्वाची पहिली पायरी चढायला निघतो आहोत.आमची अमानत म्हणून चिमाजीआप्पास आपल्याजवळ ठेवतो.आशिर्वाद असावा
श्रीमंत बाजीराव पेशवे अंबाजी पंतासोबत फौजेनिशी सासवडला आल्या वर त्यांची पत्नी काशीबाईंनी औक्षण केले.आई राधाबाईंना लेकाचे अलौकिक रूप पाहुन डोळ्यात आसवं दाटुन आले.
आईचे चरणस्पर्श केल्यावर राधाबाई म्हणाल्या,राऊ! तुमच्या वडिलांसारखी कर्तृत्वाची पराकाष्ठा करा.आब राखुन हिंदवी स्वराज्याची पताका साता समुद्रा पार नेऊन फडकवा.
नव्या दमाचा नवा पेशवा श्रीमंत बाजीराव पहिल्या मोहिमेवर निघाला. सारं सासवड डोळे भरुन कौतुक पाहत होतं.राऊ सैन्यासह पुण्याला आले.तिथे आणखी सैन्य गोळा करुन औरंगाबादे च्या अलिकडे खराडी तुर्काबादला उतरले छावण्या,तंबू पडले.औरंगबादला असलेला नबाब मुन्मुलुरवला मराठे मदतीला आल्याचे कळतांच,अंबाजीपंता ना बोलावुन कांही अडचण आहे कां विचारल्यावर,पंत म्हणाले,नबाबजी! आमची मराठी फौज काळाच्याही दाढेत जाण्यास सदैव तयार असते.पण मुख्य अडचण पैशाची आहे.हे मराठेच आपल्याला वाचवणार याची खात्री नबाबला असल्यामुळे त्याने तात्काळ ५० लाख पंतांना दिले.
पैसे मिळाल्यामुळे बाजीरावांनी सैन्यभरतीचे आदेश दिले.बघतां बघतां चारच दिवसात जबरदस्त सैन्याची फळी उभी झाली.ही सर्व व्यवस्था झाल्यावर नबाब निजाम मुन्मुलरव दिल्लीच्या रोखाने निघाला.पाठोपाठ बाजीरावही निघाले.गुप्तहेर व्यवस्थित बातम्या पुरवीत होते.मोगल सैन्य नर्मदा उतरुन पुढे निघाले.कोट्याच्या मैदानात पातशहा च्या व निजामाच्या सैन्याची गाठ पडली. नबाब घाबरला.घोड्यांची पावलं थबकली.सैन्य शांत उभे राहिले.तेवढ्यात दिल्लीचा सरदार नबाबासमोर येऊन म्हणाला,नबाब! गेल्या दहा वर्षापासून पातशहास रसद पाठवत नाही याचा अर्थ काय?नबाब हात जोडत म्हणाला,सतत लढाई सुरु असल्याने शक्य झाले नाही,हे बोलणे सुरु असतांनाच श्रीमंत बाजीराव प्रचंड सेनेसह कोट्याच्या मैदानांत उतरली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


