
हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! पेशवाई !!!
भाग – ५१.
३ मार्च १७९३ला परशुरामभाऊ पटवर्धन बाजीराव आणि चिमणाजींना घेऊन पुण्यात दाखल झाले.आबाजी कृष्ण शालूकरांनी पेशवाईची वस्रे सातार्याहुन आणले.बाजीरावांचा नाना वर भरवसा नसल्यामुळे,दौलतराव शिंदे पुण्यात आल्यावरच त्यांनी पेशवाईची महावस्रे स्विकारली.पुण्यांत बाजीरावां च्या नांवे द्वाही फिरवल्या गेली.नाना फडणीसांना अटक करण्याची कुणकुण लागतांच,पुण्यातुन निसटुन सातारा गाठला आणि तिथुन महाडला आले. दौलतरावांना कबुल केलेली रक्कम न दिल्यामुळे बाजीरावांना कैद केले आणि चिमणाजीला २६ मे १७९३ रोजी पेशवाई च्या गादीवर बसवले.
तिकडे नाना फडणीसांनी महाडला कटकारस्थान करुन व दौलतराव शिंदेंना दोन कोट रुपये व सव्वीस लक्ष रुपयांची जहागिरी कबूल करुन परत ४ डिसेंबर बाजीरावांना पेशवे बनवले.त्यावेळी साठ तोफांची सलामी दिली आणि राज्यकारभार सुरु झाला.
नाना फडणीसांनीही कबूल केल्याप्रमाणे पैसे न दिल्यामुळे,दौलतराव शिंदेंनी त्यांचे मुख्य कारभारी नाना पागनीसांकरवी नाना फडणीसांना कैद केले.३१ डिसेंबर १७९७ ला एक ढाण्या वाघ जेरबंद झाला.नानांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले.पुढे १८ जुलै १७९८ ला दोन कोटीची भरपाई देऊन नानांना मुक्त करण्यांत आले.तोपर्यंत राज्याची वाताहत झाली होती.बाजीरावां कडुन पैसा मिळत नाही असे पाहून दौलतरावांनी पुण्यांतील लोकांचा अनन्वित अत्याचार केला.बाजीरावांनीही जुन्या सरदारांचा छळ मांडला.त्यामुळे कित्येक सरदार वैतागुन पेशवाई सोडून निघून गेले.नाना फडणीसांना ही अधोगती पाहून खुप वाईट वाटले.१३ मार्च १८०० मधे ज्वराने नाना फडणीसां चा मृत्यु झाला.नानांनी नऊ लग्ने केली होती,परंतु अपत्य झाले नाही.मरतेसमयी नऊ वर्षाची पत्नी मागे राहिली.संपले एक पर्व!
एके दिवशी बाजीरावांना मस्तानी चे भूत दिसल्याचा भास झाला.त्यांनी तात्काळ मस्तानी महाल पाडण्याचा आदेश दिला.कांही दिवसांतच बाजीराव- मस्तानीच्या प्रेमाचा तेजोमहाल उध्वस्त झाला.पायाचे दगड सुध्दा उखडून फेकले
नंतर बाजीरावांनी स्वतःसाठी विश्रामबागवाडा,शुक्रवारवाडा बांधला.
यशवंतराव होळकर हा तुकोजीचा दासीपुत्र!याला काशीराव,मल्हारराव आणि विसाजी असे तीन भाऊ होते. तुकोजी होळकरांच्या मृत्युनंतर या चौघा भावांमधे गादीसाठी भांडणे लागली. काशीराम पेशव्यांच्या व मल्हारराव सर्जेरावांच्या आश्रयाला गेले.पुढे दौलतराव शिंदेकडून भांबुर्ड्याला मल्हार मारल्या गेला.विसाजी व यशवंतराव नागपूरकडे पळाले.शिकार करतांना चुकुन गोळी लागुन यशवंतरावाचा उजवा डोळा जायबंदी झाला.पुढे मुलूख घेण्या वरुन दौलतराव व यशवंतरावांची लढाई झाली,त्यात यशवंतरावांचा पराभवझाला
पुढे अमृतराव पेशवे यशवंतरावां ना येऊन मिळाले.यशवंतरावांचा भाऊ विसाजी दक्षिणेत अमृतरावांच्या नांवे खंडणी वसूल करुं लागला म्हणून बाजीरावांनी,विसाजीला पकडून आणायचा आदेश बापू गोखलेंना दिला. पकडुन आणलेल्या विसाजीला १६ एप्रील १८०१ मधे हत्तीच्या पायी दिले.
यशवंतराव चिडून फौज घेऊन पुण्यावर चालून येत असल्याचे कळतांच बाजीराव सिंहगडवर पळून गेले.
इकडे यशवंतराव होळकरने भावाचा बदला घेण्यासाठी पुण्यांतील लोकांचा अतोनात छळ केला.प्रचंड जाळ पोळ केली.सार्या पुणे शहरांत आगीचे लोट दिसू लागले.शनिवारवाड्यातील चीजवस्तुंचीही लूटालूट केली.
पेशवे बाजीराव सिंहगडावरुन सुवर्णदुर्गला गेले,तिथून वसईला गेले. ८ डिसेंबर १८०२ मधे इंग्रज अधिकारी कर्नल क्लोज आणि बाजीरावांमधे वाटा घाटी होऊन वसईचा तह झाला.इथेच पेशवाईच्या पायात गुलामगिरीच्या बेड्या अडकल्या.वसईच्या तहाने पेशवाईला जबरदस्त तडाखा बसला.या तहांतर्गत…
१.पेशव्यांनी यापुढे फक्त इंग्रजांचे सैन्य पदरी बाळगावे.
२.या सैनिकांच्या खर्चासाठी इंग्रजांना कांही मुलूख तोडून द्यावा.
३.पेशव्यांनी युरोपियन लोक पदरी ठेवू नये.
४.मराठ्यांनी सुरतेवरील ताबा सोडावा.
या वसईच्या तहामुळे पेशव्यांच्या हातातील सर्व शस्रे गळून पडली.साधा पांच मैलाचा प्रदेशही पेशव्यांच्या मालकी चा राहिला नाही.पेशवा फक्त कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातला डाव ठरला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
अंतिम भाग -५२.
१३ मे १८०३ रोजी बाजीराव पेशवे पुण्यात आले तेव्हा त्यांचं नवीन नामकरण झाल, ” हिज हायनेस बाजीराव पंडित पंतप्रधान बहादूर!”
जनरल वेलस्कींनी ही नवीन पदवी बाजीरावांना देऊन गादीवर बसवले.पुढे बाजीराव स्थिरस्थावर झाल्यावर,त्यांनी सर्व सरदारांच्या नेमणूका व तैनाती जप्त करुन उत्पन्न वाढवायला सुरुवात केली.
अमृतराव पेशव्यांनी बाजीरावांचा नाद सोडून,आपल्या पथकासह इंग्रज अधिकारी वेलस्लीच्या स्वाधीन झाले. जनरल आर्थर वेलस्लींनी वाटाघाटी करुन अमृतरावांना सालाना आठ लक्ष रुपयांची नेमणूकी दिली.अमृतराव पेशवे वाराणशीत स्थाईक झाले.तिथे त्यांनी अमृतविनायक नांवाचे गणपती मंदिर बांधले.खुप दानधर्म केला. ६ सप्टेंभर १८२४ मधे वाराणशीतच अमृतरावांचे निधन झाले.
इकडे शनिवारवाड्यात १८०८ साली दुसरी आग जवाहिरखान्यास लागली.या आगीत मोठमोठे आरसे, तस्बिरी आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.
बाजीरावांनी इंग्रजांविरुध्द उठाव करण्याचा निर्णय घेतला.बाजीरावांनी त्यांचा अत्यंत विश्वासू गुप्तहेर त्रिम्बकराव डेंगळे वर,इंग्रजांचा हेर म्हणून काम करणार्या गंगाधर शास्रीचा काटा काढण्याची जबाबदारी सोपवली.१४ऑगस्ट १८१५ मधे गंगाधर शास्रीचा पंढरपूरमधे निर्घृण खून झाला.चिडलेल्या इंग्रजांनी त्रिंबक डेंगळेना स्वाधीन करण्याचा बाजीरावां कडे लकडा लावला.बाजीरावांवर नजर ठेवण्यासाठी एल्फीन्स्टची नेमणूक केली.
हळूहळू बाजीरावांच्या हातातले सरदार,सैनिक पसार झाले.इंग्रजांना शह देण्यासाठी १८९६ साली बाजीराव प्रत्येकाला मदत मागत पुरंदर,सासवड, फिरत चाकवणला आल्याचे कळतांच इंग्रज सतर्क झाले.इंग्रजांच्या पलटणीत अस्पृश्य जातींचा भरपूर समावेश होता. ती सर्व जमात बाजीरावांच्या अन्यायाला कंटाळलेली होती.शेवटी १ जानेवारी १८१७ मधे कोरेगावला इंग्रजांनी त्यांना गाठलेच.युध्दाला तोंड लागले.प्रचंड कापाकापी झाली.निर्णायक युध्द होण्या आधीच बाजीराव सातार्याकडे रवाना झाले.एल्फिन्स्टनने त्रिम्बकराव डेंगळेंना स्वाधीन करण्याचा आदेश दिला.
एल्फिन्स्टनने एकतर्फी करार करुन १३ जून १८१७ रोजी महाराष्र्टाबाहेरचा ३४ लाखांचा मुलूख इंग्रजांनी ताब्यात घेतला.
१८१७ रोजी खडकी येथे निकराची लढाई जुंपली.नंतर १६ नोव्हेंबरला पुण्याजवळील येरवाडा येथे बाजीरावांचा दणदणीत पराभव झाल्या वर बाजीराव पळून गेले.स्वराज्याचा श्वास कोंडल्या गेला.
घरभेदी बाळाजी नातूच्या मदतीने एल्फिन्स्टनने १७ नोव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडल्या गेला.गणेश महालातल्या पेशव्यांच्या राज गादीला अखेरचा मुजरा करुन शनिवारवाड्याचा भगवा झेंडा उतरवुन त्या जागी इंग्रजांचा युनियन जॅक झेंडा फडकू लागला.
इंग्रजांनी शनिवारवाडा ताब्यात घेऊन,तिथे मुख्य कचेरी स्थापन केली. शहराची कडेकोट नाकेबंदी झाली.बाजी राव सतत सात महिने इंग्रना हुलकावण्या देत शेवटी २० फेब्रुवारी १८१८ रोजी आष्टीला इंग्रज-मराठ्यांत झालेल्या निकराच्या लढाईत बाजीरावांची हार झाली.तरीही धीर न सोडतां नर्मदा ओलांडून शिंदेची मदत मागीतली.परंतु मदत न मिळाल्याने ३ जून १८१८ रोजी सकाळी दहा वाजतां बाजीराव असिगड ढोलकोट येथे जनरल माल्कनच्या स्वाधीन झाले.
१८२८ साली शनिवारवाडा पूर्ण पणे जळाला.बाजीरावांना सालाना आठ लक्ष रुपयांची तैनात देऊन बिठूरसारखा लहानसा मुलूख राज्यादाखल बाजीरावां ना देण्यात आला.हे राज्य सहा चौरस मैलाचे होते.बाजीरावांची मागची उपाधी जाऊन “महाराज बाजीराव” ही नवीन उपाधी बहाल करण्यांत आली.
११ डिसेंबर १८३९ ला बाजीरावांनी आपले मृत्युपत्र तयार केले.१८४१ साली त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.१८४४ साली माझी संपती व पेंशन माझा मुलगा नानासाहेबांस मिळण्याबाबत कळवले. १८४७ साली दृष्टी क्षीण झाली. कांहीच दिसेना.२८ जानेवारी १८५१ रोजी सकाळी ८-९ च्या दरम्यान त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
या दुसर्या बाजीरावांना पळपुट्या किंवा पेशवाई बुडवली असा ठपका ठेवल्या गेला.पण थोडा त्यांच्या दृष्टीकोणातुन विचार केला तर,ते जेव्हा गादीवर आलेत, स्वकीय,सैन्य,सरदार सोडून गेले.सारे स्वार्थाने बरबटलेले.अतिशय फितूरी वाढलेली,तरी त्यांनी इंग्रजांविरुध्द लढा देण्याचे प्रयत्न केला पण कोणीही साथ दिली नाही. जवळ पैसा,मनुष्यबळ,विश्वासू माणसं नाहीत.तरी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले.या प्रयत्नातूनच राणी लक्ष्मीबाई, तात्याटोपे सारखे लढाऊ शूर योध्दे निर्माण केले.पण शेवटी अपयश आले.
पुढे बाजीरावांचे दत्तकपुत्र नाना साहेबांची पेंशनची मागणी लार्ड डलहौसी ने साफ नाकारली.१८५७ च्या युध्दाची ठीणगी पडली.नानासाहेबांनी इंग्रजां विरुध्द जंगी लढा देऊन शेवटी नेपाळात पळ काढला.पुढे ते नेपाळातच वारले. आणि उरल्या सुरल्या पेशवाईचा कायमचा अस्त झाला.
१८५७ मधे तात्या टोपे,झांशीची राणी लक्ष्मीबाईंनी बहुमोल कार्य केले. पुढे कोट्यावधी शूर वीरांनी घुसमसणा र्या आगीत रक्ताचे अर्ध्य व आहुत्या देऊन अखेर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातत्र्य मिळाले,म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणून सन्मानाने जगत आहोत.
पेशवाईचा शेवट ज्ञानेश्वरीच्या अमृत ओळींनी करु या!
“ये मराठियेचिया नगरी।ब्रम्हविद्येचा सुकाळु करी। घेणे देणे सुखचिवरी। हो देई या जगा ।।
!! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

