महाराणा प्रताप संपूर्ण भाग ४, (१६ ते २०)

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू  लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

महाराणा प्रताप

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – १६.

      अकबरला राजपुतांमधे दुफळी हवीच होती.त्याचे धोरणच फोडा आणि झोडाचे होते.तो कोणाही सरदार, सेनापतीला जास्त काळ एका ठीकाणी ठेवीत नसे.अब्दुल मजीद आसफखाॅं १५६८ पासुन चितोडगडावर होता.त्याला हलवून चितोडगडचा राज्यकारभार कुॅंवर सगरसिंहावर सोपवला.आणि अकबरची गुलामगिरी पत्करुन केवळ नामधारी राणा झाला.आपले सत्व गमावून,अकबर दरबारी मान झुकवुन त्याचे पाय चेपू लागला.वेळप्रसंगी आपल्याच बांधवांचे मुडदे पाडू लागला.

        उदयपूरचा महाराणा बनलेल्या जगमलला तर कांही धरबंधच राहिला नाही.तो आपल्या पिताजींच्या पावलावर पाऊल टाकुन मद्य,नाटकशाळा,नर्तकीत रात्रंदिवस गर्क होता.त्यामुळे राज्य कारभाराकडे लक्ष द्यायला त्याला वेळच नव्हता.मंत्रीगण,सरदार प्रजेवर वाटेल तशी मनमानी करीत असल्यामुळे सर्वत्र असंतोष खदखदू लागला याची साधी दखलही जगमलला नव्हती.

      महाराणा बनलेल्या प्रतापसिंहांची परिस्थिति अतिशय दयनीय होती.लोक इच्छेने ते महाराणा तर झाले पण त्यांच्या जवळ ना राजवैभव,ना संपत्ती,ना फौज फाटा!अकबरच्या ताब्यातील चित्तोडगड परत मिळवायचा होता.प्रतापसिंहाचा महाराणा म्हणून कुंभळगडावर अभिषेक झाल्याची वार्ता उदयपूरला कळल्यावर तेथील जनतेला अतिशय आनंद झाला पण त्यांना प्रत्यक्ष व्यक्त करतां येत नव्हता.राणी धीरकंवर भटियाणी तर अस्वस्थच झाली.आपला पुत्र जगमलचे वर्तन बघून ती अतिशय दुःखी होती.तीने तर पुत्रमोहाने प्रेरित होऊन करायचे तेवढे प्रयत्न केले होते पण जगमलनेच योग्य साथ न दिल्यामुळे दुःखी होऊन विचारात मग्न असतांना सगरसिंह येऊन म्हणाला, माताजी!जगमल विरुध्द कट केल्या जात आहे.तीने तात्काळ राजपुरोहित नारायण दासांना बोलावुन म्हणाली,कुॅंवर जगमल चा राज्याभिषेक तुम्ही केला ना?त्यांच्या विरुध्द रचल्या जात असलेल्या षडयंत्रा चि ताबडतोब बंदोबस्त व्हायला हवा. ठीक आहे राजमाता!सर्वांना भेटून व्यवस्थित करतो सारे,असे म्हणून निघून गेला.संध्याकाळी भरलेल्या राजदरबारात सारे मान्यवर उपस्थित होते.राणी भटियानीने बर्याच सरदारांना प्रलोभणे व आमिषे दाखवुन आपल्याकडे वळवले होते.दरबारात गोंधळ माजला होता.वादा ला नुसते उधान आले होते.चंदावत रावत  कृष्णसिंह उभे राहत म्हणाले,इथे दोन महाराणा उपस्थित आहे.खरा महाराणा कोण हे निश्चित करायचे आहे,तेव्हा मनां तील किंतू काढून,राजपूतांचा बाणेदार पणा,आदर्श जपून मोकळेपणे अन्याया ला न्याय देण्याच्या दृष्टीने आपले विचार स्पष्ट मांडावे.कोणीच न बोलल्याने,अक्षय राज उभे राहत म्हणाले,जगमल आणि प्रताप दोघेही सिसोदिया घराण्याचे राजपूत्र!प्रथेनुसार जेष्ठपुत्रच गादीचा वारस असतो,पण प्रथेला फाटा देऊन जगमलला गादीवर आरुढ केल्या गेले. सध्या अकबर या अचूक संधीच्या प्रतिक्षे त आहे.आपले कांही राजपूत स्वत्व, स्वाभिमान गहाण ठेवून अकबराचे मांडलीकत्व पतकरुन माना झुकवत आहेत.आपल्या घरंदाज स्रीया त्याच्या जनानखान्यात लोटल्या आहेत.ह्या सर्व परिस्थितीचा विचार करुन स्वतः जगमल ने ही चुक दुरुस्त करावी.मोगलांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्वानुमते उदयपूरचा महाराणा म्हणून प्रतापला मान्यता द्यावी.नंतर दरबारात बरीच उलट सुलट चर्चा होऊन सर्वांचाच कल व पाठींबा प्रतापांच्या बाजुने असल्यामुळे जयघोषात स्मित वदनाने सिंहासनाला पदस्पर्श न होऊ देता प्रतापसिंह राज सिंहासनारुढ झाले.

        राजपुरोहितांनी मंत्रांच्या जयघोषात प्रतापसिंहांच्या गळ्यात फुलमाळ घातली चंदावत रावत कृष्णसिंहांनी त्यांच्या कमरेला मेवाडच्या महाराणाची तलवार बांधली आणि तीन वेळा वाकून मेवाड च्या महाराणाला मुजरा केला.महाराणां वर सर्वांनी फुलांचा वर्षाव केला.दरबार जयघोषांनी दणाणून गेला.राज्यभिषेक सोहळा आटोपल्यावर,महारांनी दरबारा ला संबोधित केले,आपण सर्वांनी जो विश्वास टाकला त्याला कधीही मी तडा जाऊं देणार नाही.जोपर्यंत मेवाड स्वतंत्र एकसंघ होत नाही तोवर तुमचा हा महाराणा राजभोगाचा त्याग करुन प्रजे च्या सुख,शांती,स्वातंत्र्यासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा देत,त्यागमय,व्रतस्थ आयुष्य जगेल.पुर्वजांनी केलेल्या बलिदानाला कलंक लागू देणार नाही.

              क्रमशः

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – १७.

         जगमल एवढा उद्विग्न झाला होता की,तडक नाटकशाळेत  जाऊन मदहोश होईस्तोवर मद्याचे चषकामागुन चषक रिचवून आपले दुःख बुडवुं लागला.आणि कुॅंवर सगर?त्याला मोठा धक्का बसला. मेवाडमधे आपल्याला वाव नाही हे जाणून तो अकबराला जाऊन मिळाला.  राजपुतांत दुफळी माजवण्याचे काम अकबर व्यवस्थित करत हेतू साध्य करत होता.त्याने सगरसिंहला तडकाफडकी चितोडचा राणा म्हणून त्याला घोषित केले.अकबराचा मांडलिक राजा म्हणून चितोडचा राणा झाला.सत्व,स्वाभिमान  विकून का होईना गुलामगिरी पत्करुन तो महाराणा झाला.

       अकबरच्या मेहरबाणीने चितोडगड चा महाराणा झालेला सगर तो त्यांच्याच प्रमाणे वागुं लागला.आपल्याच जातभाई प्रजेवर अन्याय,अत्याचार करायला सुरुवात केली.राजसिंहासनावरुन पदच्युत केल्या गेलेल्या जगमलची स्थिती खूप बिकट झाली होती.तो भोगविलास, मद्याशिवाय जगूच शकत नव्हता.त्यामुळे विवेकशून्य होऊन घातक मार्ग अनुसरला स्वतःच्या बंधूंशी,मातृभूमीशी गद्दारी, देश द्रोह करायला अतिरेकी होऊन अकबरा ला शरण जायला निघाला.कुॅॅंवर सगरने जो आत्मघात केला होता,सूडाने अंध होऊन जगमल तोच आत्मघात करीत होता.प्रतापसिंहांची शक्ति नष्ट होण्या साठी एक एका राजपुत्राची शरणागती अकबराला हवीच होती.होईल तेवढी फितूरी पेरत होता.विरोधकांची भर अकबरकडे पडत होती.

        जगमल अकबरकडे गेल्यावर,गोड बोलून,भूलथापा देऊन,मोठमोठे आमिष दाखवुन आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे कबूल करवुन वचन घेतल्यावर सिरोही राज्याची जहागिरी देण्याचे कबूल केले. आणि आपण मेवाडवर लवकरच करत असलेल्या स्वारीत चांगला पराक्रम गाजवण्याची ताकीदही दिली.अकबराला संपूर्ण मेवाडप्रांत आपल्या अधिपत्या खाली आणायचा होता.एक धूर्त आणि दुसरा मूर्ख असे रसायण तिथे तयार झाले होते.अकबराच्या उपकाराखाली दबल्यामुळे,स्वतःचे सत्व हरवुन कळसुत्री बाहुलीप्रमाणे त्याला वागावे लागणार होते.जगमलला मिळालेल्या सिरोही जहागीरीवर खूष होऊन रवाना झाला.

      अकबर दरबारातील राजा मानसिंह मात्र अतिशय दुःखी झाले होते.त्यांनी मांडलिकत्व स्विकारल्यामुळे उघड बोलू शकत नव्हते.त्यांना आपल्या मातृभूमी विषयी तळमळ होती.प्रथम सगरसिंह व नंतर जगमल अकबराला मिळाल्यामुळे त्यांना अतिशय वाईट वाटले.अकबरचा धूर्त डाव त्यांना समजत होता पण…

      इकडे प्रतापसिंह महाराणा झाल्या मुळे मेवाडवासियांना अत्यंत आनंद झाला,तेथील राजांकडून हवी तशी साथ मिळत नव्हती.तरी देखील निराश न होता उत्स्फुर्तपणे गावोगावी फिरुन प्रजेत देशप्रेम जागृत करुं लागल्याने लोकांमधे चैतन्य निर्माण होऊन स्वदेश प्रेमाणे लोकं भारावून त्यांना येऊन मिळू लागले.रात्रंदिवस उपाशी तापाश त्यांची सतत घोड्यावर मांड असे.मोगलांचा उदयपूरवर वारंवार हल्ले होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतापसिंहांनी दुर्गम दर्याखोर्या,निबिड अरण्याने व्यापलेल्या दक्षिण मेवाडचा आश्रय घेतला.त्यांचे वास्तव्य ज्या भागात होते,तेथील आदिवासी भिल्ल जे अत्यंत स्वाभिमानी, कडवे,विश्वासू,वीरवृत्तीचे आणि त्या परिसराची खडान् खडा माहिती होती. त्यांचे मुख्य हत्यार भाला,धनुष्यबाण वापरण्यात तरबेज व अचूक नेमबाजीत प्रविण होते.

        भिल्लांचा राजा पुनर्वा पुंजाने प्रतापसांहांना भेटून अंतिम श्वासापर्यंत सहकार्य करण्याचे अभिवचन दिल्यामुळे प्रतापांची हिंमत खूप वाढली.त्यांच्या पाठी उभे असलेले लोकं ज्वलंत देशप्रेमा ने भारलेले होते.प्रतापसिंह बरेचदा वेशांतर करुन विस्कळीत झाल्याची पाहणी करीत असत.महाराणा सांगा चा आदर्श समोर ठेवून,मोडेल पण वाकणार नाही,मोगलांसमोर झुकणार नाही या ब्रिदाने अकबराशी संघर्ष व लढा देण्याचे ठरविले व त्यादिशेने प्रयत्न सुरु होते.

       प्रतापसिंहानी कांही आदर्श समोर ठेवले होते….जोपर्यत प्रजेची स्थिती सुधारत नाही तोवर राजवैभवचा उपभोग

घेणार नाही.स्वतःहुन कुणाशीही युध्द करणार नाही.सर्वांना संघटीत करुन मातृ भूमीच्या कल्यानार्थ वागायला लावीन. कधीच कुणाची गुलामगिरी स्विकारणार नाही.शत्रूचे आक्रमण झाल्यास सर्व राजपूतांनी एकत्र येऊन लढा देत हिंदु धर्माचे रक्षण करु.प्रतापसिंहांची ही आदर्श तत्वे म्हणजे स्वधर्माचे,स्वमातीचे कवच होते.बुंदी,मारवाड,डुंगरपूर,ईडर, बांसवाडा आणि सिरोही येथील राजे त्यांना येऊन मिळाल्याने त्यांच्या शक्तीत वाढ झाली.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – १८.

        महाराणा प्रतापांनी ही आदर्श तत्वे अंगिकारुन सतत चार वर्षे स्वातंत्र्य व प्रजेसाठी झटत होते.त्यांच्या या प्रयत्नाने प्रजेला सुखशांती लाभली,शेतीचे उत्पन्न वाढले,उद्योगधंद्यात भरभराट झाली.

        जगमलला सिरोहीची जहागिरी मिळाल्यावर अति मद्यसेवनाने त्याचे लवकरच निधन झाले.अकबराचे गुप्तहेर वेशांतर करुन मेवाडमधील प्रतापसिंहां ची वाढती लोकप्रियतेच्या बातम्या त्याला कळविल्या की,त्याचा नुसता जळफळाट होत असे.तो आपल्या महाली विचारात हरवून गेला.चितोडगडला वेढा दिल्यावर, त्याला कसा सामना द्यावा लागला त्याचे चित्र डोळ्यासमोर आले.जगमल,सगरला आपल्याकडे वळवून घेतले.प्रतापसिंहांना वळविण्यासाठी जंगजंग पछाडले,मोठ मोठी अमिषे दाखवली,पण ते खुपच खंबीर निघाले,ते वळले तर नाहीच उलट जनतेचे प्रेम संपादन करुन,शक्ती,फौज वाढवली.लेकीन हम महाबली सम्राट अकबर है,महाराणाको सीर नही उठाने दुॅंगा।तो खूप बेचैन झाला होता.

         प्रतापांनी खेडुताचे बेमालुम वेषांतर करुन उदयपूरपासून सोळा मैला वर असलेल्या एका गावात आले.धर्म शाळेजवळच्या मैदानात कांही लोक त्यांची प्रशंसा करीत होते,तिथे खेडूत वेशातील प्रतापसिंह पोहचले.जमावाती ल एकजण सांगत होता,चोंड्याला एका नवविवाहित सुनेला तिच्या सासुसासर्या समोरुन मोगल सैन्याने उचलून नेले कारण तिचा नवरा महाराणांच्या मुक्ती संघटनेत दाखल झाला.तेवढ्यात प्रतांपां वर लक्ष जाताच,हा शत्रूचा हेर तर नसेल ना अशी शंका आल्यावर महाराणांनी आपले बांधलेले मुख उघडे केल्याबरोबर त्यांची ओळख पटतांच उत्स्फुर्तपणे मेवाड सिंदूर महाराणा प्रताप की जय चा जयघोष केला.बातमी वार्यासारखी पसरली.त्यांच्यावर शंका घेतल्याबद्दल खंत व्यक्त केल्यावर महाराणा म्हणाले, तुमची चुक नाही,वेदनेच्या रुपाने बाहेर पडले.आम्हाला फक्त तुमची साथ हवीय! एक वृध्द म्हणाला,राणाजी,मेवाड हा आग्र्यासारखा मीना बाजार झाला आहे. नाहीss आमच्या हयातीत या मीनाबाजा राला मुठमाती देऊ.आणखी बरचस बोलुन त्यांना दिलासा दिला.त्यांच्या मना मधे देशप्रेम व मातृभूमीच्या स्वातंत्र्याची ज्योत पेटवून घोड्यावर स्वार होऊन निघून गेले.

         मीना बाजार म्हणजे अकबराच्या शहाजाद्यांच्या करमणुकीचे केंद्र!आग्र्यात मोकळ्या पटांगणांत विविध प्रकारची दुकाने भरल्या जायची,दुकाने फक्त देखावा असे,ती दुकाने चालवण्यासाठी खास शाही फर्मानानुसार राजपुतांनी आपल्या स्रीयांना घुंघट न घेता पाठवाय ची सक्ती केली जायची.विशेष म्हणजे त्या मीनाबाजारांत फक्त शहजाद्यांनाच प्रवेश असायचा.मग शहजादे निरिक्षण करीत मनांत भरलेल्या सुंदरीची निवड करुन त्याच्या वासनापूर्तीचा अड्डा असलेल्या शय्यागृहात रवानगी व्हायची. त्या राजपूत स्री ची इच्छा नसली तरी जबरदस्तीने बटीक म्हणून शहजाद्याच्या महाली पाठवल्या जायचे.कोणी विरोध केलाच तर गर्दन उडवल्या जायची.

      अकबराच्या दरबारी अनेक प्रतिभा वंत कवि,गायक,वादविवादपटू,विनोद वीर,संगीतकार होते.त्यापैकीच बिकानेर च्या राठोड राजाचा लहान भाऊ पृथ्वीराज कवि म्हणून अकबराच्या आश्रयाला होता.त्याची पत्नी ही शक्तिसिंहाची कन्या प्रतापसिंहाची पुतणी तिच्यावर मीनाबाजारात एक दुर्धर प्रसंग ओढवला.ती मीनाबाजारातील कांही वस्तु खरेदी करुन तिथे असलेल्या कारंज्याच्या कठड्यावर आजुबाजुचे सौंदर्य अवलोकन करीत बसली असता, एक बंद मेणा तिच्या पुढ्यात येऊन थांबला,तिला वाटले आपल्यासाठीच हा मेणा आहे असे वाटून ती मेण्यात बसली. मेणा वेगळ्याच वाटेने निघालेला बघून, तिने भोयांना विचारल्यावर,ते म्हणाले, आज्ञेनुसार मोठ्या शहजाद्यांच्या महाली नेत आहे.धोका लक्षात आल्यावर कमरेत लपवलेली कट्यार चाचपून बघीतली.ती राजपूत रमणी सिसोदिया राजवंशाची न डगमगता संकटा ला समोर जाण्यास सज्ज झाली.तीला रंगमहात  आणण्यात आले.शहजादा आंत आल्यावर बरोबर त्याची निर्भत्सना केली.त्याचेवर वार करणार हे बघून त्याने जीवदान मागीतले

             क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप !!!

भाग –  १९.

         शहजादा गयावया करीत म्हणाला, मातेss !आजपासून आम्ही मीनाबाजारा चे नांव सुध्दा काढणार नाही.दाराबाहेर पहार्यावर असलेल्या नोकरांना आतील येणार्या आवाजावरुन शहजाद्यास कांही तरी धोका असल्याचा संशय आल्याने ते दरवाजा उघडून आंत शिरले,आंतील दृष्य बघून त्यांची पाचावर धारण बसली. सशस्र असूनही चंपादेवीचा चंडिकेचा अवतार बघून शस्रांना हात घालण्याची हिंमत झाली नाही.संतप्त वाघीन हातात कट्यार घेऊन दालनातून बाहेर पडली व झपाझप पावले टाकीत दूर निघून गेली.

        त्यावेळच्या परिस्थितीनुसार मेवाड ला एका खंबीर नेतृत्व असलेल्या शासकाची गरज होती.महाराणा प्रताप त्यावेळी मेवाड राजसिंहासनावर आरुढ झाले ही मेवाडच्या दृष्टीने त्या कठीण काळात हिंदुस्थानच्या दृष्टीने फारच गौरवास्पद गोष्ट ठरली.नाही तर हिंदुस्थानचे चित्र बदलून हिंदु धर्मच जगा च्या पाठीवर शिल्लक राहिला नसता. उदयपूरवर सतत मोगलांचे हल्ले होत असत.अकबराचे सैन्य घरांघरात घुसुन लुटमार,घरांचा विध्वंश,मौल्यवान वस्तु ओरबडत.अमानुष अत्याचार करुन परिवारांतील पुरुषांना कापून काढत. स्रीयांवर बलात्कार करुन त्यांना ठार करत.जनावरे पळवून नेत,शेतातील उभी पिके कापत किंवा जाळून टाकत.आबाल वृध्द आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पळ काढत.गावांची नुसती राख झालेली असे.लोकं अगदी जीव मुठीत घेऊन जगत होती.कीडामुंगीसारखी माणसं मारली जात होती.

       मेवाडचा असा विध्वंश बघीतला की  महाराणा अतिशय दुःखी होत. आपल्या मुक्तीसंघटनेच्या सैन्यामार्फत प्रति हल्ले करीत.गनिमी काव्याचा अवलंब करुन अचानक हल्ला चढवून शत्रूला पळवून लावत.त्यांचे युध्द साहित्य,मौल्यवान वस्तु हस्तगत करत.याकामी आदिवासी भिल्ल निष्णात होते.त्यांच्या बाणाच्या टोकाला जहाल विष लावलेल्या बाणाने मोगल सैन्य तडफडून मरत.परंतु मोगल सैन्यांची संख्या जास्त असल्यामुळे परत हल्ले होत.उदयपूरवर सतत होणारे हल्ले पाहून महाराणांनी निर्णय घेतला..

     महामंत्र्यांना पूर्ण उदयपूर खाली करण्याचा दवंडी पिटवूनआदेश दिला,जो कोणी अवमान करेल त्याला मृत्युदंडाची जबर शिक्षा जाहीर केली.दवंडी पिटवून उदयपूर व आजुबाजुचा १०-१२ मैलांचा प्रदेश उजाड करुन टाकला.शेतातील उभी पिके जाळून टाकली.पाण्यांत विषारी द्रव्य टाकले.हेतू हा की,शत्रूला धान्य,पाणी मिळू नये.जनावरांना वैरण मिळू नये.सतत गजबजलेल्या उदयपूर शहराला स्मशानभूमीची अवकळा आली कोल्हे,कुत्रे,लांडग्यांचा स्वैर संचार सुरु झाला.

        उदयपूरमधे साठी ओलांडलेली गुणसुखदेवाई नांवाची राजपूत विधवा स्री अपल्या दोन मुलांसह परिटाचा व्यवसाय करुन जीवननिर्वाह करीत होती कांही दिवसांपूर्वी पाय घसरुन पडल्या मुळे पायाचे हाड मोडले.औषधोपचाराने ही हाड जुळले नाही.दवंडी ऐकून ती फार अस्वस्थ झाली.अधू पायाने कसे नगर सोडू?कांही विचार करुन पुत्र धरमचंदला म्हणाली,मला महाराणांना भेटायचेय. दुसर्या दिवशी धरमचंद व घेवरचद या तिच्या दोन पुत्रांनी घोड्यावर सामान लादून,आईला डोलीत बसवून कुंभळ गडाकडे निघाले. दोघेही बंधू निर्भय,शूर, धाडसी होते.बारा दिवसांनी आईच्या डोलीसह गडावर आले.

        महाराणांच्या कक्षात आलिशान सिंहासन होते,पण महाराणा त्यावर न बसतां,बाजुला गवताने बनवलेल्या साध्या सिंहासनावर विराजमान असलेले बघून तिघेही चक्रावले.त्यांचा प्रणाम स्विकारुन येण्याचे प्रयोजन विचारले. आम्ही उदयपूरहुन आलो असून आईला आपल्याला भेटायचेय!अरेरेss !पायाने अधू,वयही बरच दिसते,मातेss बोल माते!बेटा!खरं म्हणजे तुझी कान उघाडणी करायला खूप रागाने आले होते तो राक्षस अकबर,त्याने सारा मेवाड तप्त तव्यावर शेकतोय,रात्री बेरात्री कधीही त्याचे सैनिक हल्ला करतो,जेवणाच्या ताटावरुन उठून पळावे लागते.स्रीयांना घरात शिरुन सैतानालाही लाज वाटेल असे अत्याचार करतात,अशावेळी तुमची दवंडी ऐकल्यावर वाटले,स्वतः कुंभळगड च्या किल्ल्यात सुरक्षीत राहून जनतेला देशोधडी ला लावले,पण इथे आल्यावर वेगळेच चित्र पाहून,आपला राजा,अगदी सामान्य माणसासारखा कोणताही राजभोग न उपभोगता मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झटतो.फार मोठा त्याग आहे बेटा तुझा! माझे दोन्ही तरणेबांड शूर पुत्र तुझ्या सेवेत देत आहे.महाराणांनी दोघां बंधूना ठेवून घेतले व सुनांसहित तीची व्यवस्था भिल्लराजाच्या वस्तीत केली.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग  – २०.

        इकडे अकबरने सल्लामसलतीस्तव गुप्तभवमनात दरबार भरवला.तिथे अंबर मारवाड,बिकानेरचे मांडलिक राजेही होते.तेवढ्यात हेराने बातमी आणली, महाराणा प्रतापसिंहाने सारे उदयपूर उजाड केले.स्वतःच्या परिवारासाठी देखील अत्यंत कठोर नियम केले की कुटुंबातील कोणीही राजवैभवाचा भोग न घेता समान्य गरीब माणसासारखे साधे भोजन,जमीनीवर झोपावे.जोपर्यंत संपूर्ण मेवाडप्रांत गुलामगिरीतून मुक्त होत नाही. शिवाय शस्र निर्मिती भाल्यांना धार लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून,युध्दसादृष्य वातावरण तयार झाले शेती करण्याची परवाणगी कोणालाही नाही.त्याने तात्काळ राजा मानसिंहाला बोलावणे पाठवले.

         मानसिंहाचा कुर्निसात स्विकारुन अकबर म्हणाला,आमच्या पूर्वीच्या राज कर्त्यांनी ज्याचा विचारही केला नव्हता असे विशाल स्वप्न बाळगुन आपण सर्व जण वाटचाल करीत आहोत.हा हिंदुस्थान अंतर्गत यादवीने पोखरला आहे.हिंदुस्थानांत शांतता नांदावी,बाह्य शक्तिने वाईट नजरेने या देशाकडे पाहू नये यासाठी संपूर्ण हिंदुस्थान मोगल साम्राज्यात संघटीत व्हावे,पण आतां हे स्वप्न पूर्ण होईलसे वाटत नाही.मेवाडच्या महाराणाने आमच्या आकांक्षेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालवला आहे.

      त्यावर राजा भगवानदास म्हणाले, प्रतापसिहांना आधी प्रेमाने समजवावे, नाहीच समजले तर त्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही. मानसिंहजी, आपल्या बहिणीचा विवाह प्रतापसिंहाचा पुत्र अमरसिंहाशी जुळवण्याचा आम्ही कसून प्रयत्न करतो आहोत,हा विवाह संबध जुळला तर, प्रताप नांवाचे प्रकरण कायमचे मिटून जाईल.परंतु ,तुम्ही आमच्या बेगमचे बंधू! प्रतापसिंह हा विवाह संबंध करेल की नाही याबद्दल शंका वाटते.नंतर विषय बदलून अकबर म्हणाला,राजा मानसिंह आपल्याकडे अफाट सैन्य असून मेवाडच वसूल बंद होतो हा तर मोगल साम्राज्या चा उघड उघड अपमान आहे.राजे! मेवाडचा वसूल तात्काळ सुरु व्हावा. आम्ही दक्षिणेतील सुलतान व  नबाबा च्या विरोधी कारवायांचे परिपत्य करण्यास तिकडे जात आहोत.येतांना प्रत्यक्ष प्रतापसिंहाची भेट घेऊ,त्यांनी ऐकले तर ठीक!नाहीतर आमच्या तलवारीचे पाणी दाखवावे लागेल.त्यांच्या सारखा शूर,पराक्रमी,स्वाभिमानी महाराणा हट्टापायी मारल्या जावा असे वाटत नाही.नंतर शहाबाजला म्हणाला, तुम्ही एक सैनिक तुकडीसह त्वरीत चितोडकडे रवाना व्हा.भयभीत सगर सिंहासारखे भेकड माणसं केव्हा घात करेल याचा नेम नसतो.पण प्रतापसिंहा पासून सावध रहा.शक्य झाल्यास संधी साधून त्यांच्यावर हल्ला करुन जर्जर करा.मुजरे करुन सारे दरबाराबाहेर पडले

        सर्व निघून गेल्यावल अकबर स्वतः शीच म्हणाला,अखंड हिंदुस्थान अमंला खाली आणण्यासाठी साम्राज्याचा विस्तार केला.मेवाडचा बहुतांश मुलूख ताब्यात आणला,पण तेजाळणारा निखारा सतत असह्य चटके देत आहे. प्रताप!प्रताप!प्रताप!आम्हीही जलोद्दीन मोहमद अकबर आहोत.विजय मिळेस्तो वर चूप बसणार नाही.बायकापोरांना घेऊन उपाशीतापाशी रानावनात,डोंगर, कडेकपारीत लपत फिरतोय,पण किती दिवस?कधीतरी मोकळ्या मैदानात यावेच लागेल

      महाराणा प्रताप!मेवाडच्या मातृभूमी च्या संरक्षण व स्वातंत्र्यासाठी त्यागी व स्वातंत्र्यवीर लोकं कुंभळगडावर एकत्रीत करीत होते.शस्रनिर्मितीची प्रक्रिया जोरा त सुरु होती.मुक्तीसंघटनेच्या सैन्यांनी कुंभळगडचा परिसर व्यापला गेला. प्रत्येक व्यक्ती नवचैत्यन्याने भारावला होता.सैनिकांमधे ऊत्साह वाढण्याच्या दृष्टीने कुंभळगडजवळील निबिड अरण्या त अहेरिया शिकारीचा बेत केला.यानंतर त्यांनी कुंभळगड सोडण्याचे ठरवले होते. ज्यांना देशभक्तीची ओढ आहे,मातृभूमी वर प्रेम आहे त्यांनी कमळवीर व अरवली च्या डोंगर भागात वस्तीस यावे.शेती, व्यापारधंदा,इतर व्यवसाय बंद करावे.त्या मुळे शत्रूची शक्ती उपासमारीने क्षीण होईल.ही योजना जितकी उपयुक्त, तितकीच आत्मघाती पण आहे.आपल्या लोकांना सुध्दा अन्नधान्य मिळणार नव्हते त्यावर उपाय म्हणजे गुजराथ व सुरतशी मोगलांचा चाललेल्या व्यापारांना  लुटून त्यांची शस्रे,संपत्ती हस्तगत करुन आपल्या मूलभुत गरजा भागवल्या जाऊ शकणार होत्या.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                         

महाराणा प्रताप संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading