
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ६.
पुढील बेत आखण्यासाठी सर्वजण बैठकीत बसले.येत्या आठ दिवसांत सैन्याची जमवाजमव करुन मवाली गांवा पासुन दक्षिणेला दहा कोसावर सारंग सरोवराच्या काठी तळ देण्याचे निश्चित झाले.आशा देवपुरा आणि उदयसिंहांनी फौजेसह तिथे त्यांना मिळायचेय.येत्या सोमवारी चढाई करण्याचे निश्चित झाले.
पन्नादाईसह सरदार निरोप घेऊन निघून गेले.कुॅंवर उदयसिंहांनी मेवाडमधील राजपूत राजांना येऊन मिळण्याचे आव्हान केले.त्याप्रमाणे रावत साईदास, केलव्याचे जंग्गा,बागोरचे रावत, अखेराज सोनगारा कुंपा महाराज,रावत कौतुभराज यांनी आव्हान स्विकारुन आपापल्या सैन्यासह सारंग सरोवराच्या दिशेने कूच केले.त्या लष्करी तळाला विराटरुप प्राप्त झाले.
दुपारची वेळ… बनवीर आपल्या महाली मद्याचे चषक घशात रिते करीत होता.तेवढ्यात एक गुरुबक्ष नांवाचा विश्वासू गुप्तहेर आंत येऊन म्हणाला, महाराज!उदयसिंह जिवंत असून मावली गांवच्या परिसरांत सारंगसरोवराच्या काठी चित्तोडगडावर स्वारी करण्यासाठी मोठा लष्करी तळ उभारला आहे.बनवीर ची नशा खाडकन उतरली.विस्मयचकित होऊन, ओरडुन तात्काळ पन्नादाईला हजर करण्याची आज्ञा केली.तसेच गडा वरील सर्व सरदारांना सुध्दा बोलावणे पाठवले.भीत भीतच सरदार सामरा आणि भद्रनारायण येऊन मुजरा करुन उभे राहिले.बाकी सरदार कुठे आहेत? ते रात्रीच ससैन्य गड उतरले.आम्हाला वाटले आपणच त्यांना एखाद्या कामगिरि वर रवाना केले असावे.तुम्ही आपली फौज घेऊन मावाली गावाकडे कूच करा. आम्ही आणखी सैन्याची जुळवाजुळव करुन तुमच्या पाठोपाठ निघतो.
वास्तविक बनवीर मनातून चांगलाच भयभीत व घाबरला होता. उसणे अवसान आणून दोन दिवसांत कशी तरी मिळेल तेवढी फौज जमा करुन तो चित्तोडगड उतरला.कुॅंवरसी तंवर याला उदयसिंहाच्या बंदोबस्तास पुढे पाठवले.
कुंवरसी तंवर आणि उदयसिंहाच्या सैन्याची गाठ मावाली गावाजवळ पडली. दोन्ही सैन्यात घणघोर लढाई झाली. कुंवरसी तंवर व त्याचे बरेच सैन्य मारल्या गेले.कुॅंवर उदयसिंहांनी चित्तोडला वेढा घातलेला पाहून बनवीर एकदम धास्तावला.आपला अंतकाळ जवळ दिसू लागला.युध्द बरेच दिवस चालले.एके दिवशी संधी साधून मध्यरात्री चोरवाटेने बनवीर पळून गेला.राजाच नसल्यामुळे त्याच्या सैनिनी शस्रे खाली ठेवली.चितौड गड उदयसिंहाच्या ताब्यात आले. आपल्या प्राणप्रिय पिताजींची गादी मिळाल्याने ते आनंदविभोर झाले. सिसोदिया राजवंशाचा ध्वज पुन्हा सन्मानाने चित्तोडगडावर लहरु लागला.
१५४० ला कुॅंवर उदयसिंहांचा राज्या भिषेक होऊन ते महाराणा झाले.त्यांचा राज्याभिषेक सोहळा बघून पन्नादाईच्या नेत्रातून कृतकृत्य झाल्याचे आनंदाश्रू वाहत होते.मनात म्हणाली सत्याचा विजय निश्चित असतो.कुॅंवरला न्याय मिळवून देण्यासाठी पुत्र बळी द्यावा लागला.माझे डोळे निमाले.कर्तव्य पूर्ण झाले.आतां कशाचीच आस उरली नाही. राज्याभिषेक सोहळा आटपून महाराणा उदयसिंह दाईमांच्या पदस्पर्शासाठी आले व म्हणाले,दाईमां!आपल्या आशिर्वादाने व अलोट त्यागाने आम्ही या चित्तोडच्या राजगादीवर विराजमान होऊ शकलो.या तुमच्या पुत्राला भरभरुन आशिर्वाद द्या. तुमच्या त्यागाचे प्रतिक व उपकार हा महाराणा उदयसिंह कधीही विसरणार नाही.महाराणा!लेकरा!पुत्राने आईचे उपकार मानायचे असतात का?माझे स्वप्न पूर्ण झाले.तुम्ही प्रजेच्या सेवेने उजळून निघा.त्यांना न्याय द्या.स्रीयां वरील अत्याचार दूर करुन दुष्टांपासून त्यांचे संरक्षण करा.धर्म जागवा.कधीही स्वाभीमान सोडू नका
महाराणा उदयसिंहाचा कारभार सुरु झाला.पन्नादाईला राजमातेचा दर्जा दिला उदयसिंह कुंभळगडावर आशा देवपुरां च्या छत्रछायेखाली अतिशय लाडात वाढले होते.त्यांना कोणत्याही प्रकारे उणीव भासू दिली नाही.त्यामुळे ते विलासी बनले होते.वास्तविक यावेळी चित्तोड व संपूर्ण मेवाडला शूर,त्यागी व उत्तम शासक अशा महाराणाची आवश्यकता होती.परंतु मेवाडचे दुर्दैव! मेवाडला विलासी महाराणा प्राप्त झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ७.
महाराणा उदयसिंहाच्या हाती सर्वकश सत्ता आल्याने ते विलासी बनले
खुशमस्करे भोवती जमा झाले.त्यामुळे शूर सरदार दूर होऊ लागले.त्यांना २४ पुत्र व २० कन्या होत्या.थोरल्या महाराणी जयंतीबाई पासून प्रतापसिंह व शक्तीसिंह आणि धाकटी राणी धीरकंवर भटीयाणी पासून सर्व दुर्गुणसंपन्न पुत्र जगमल होता. ते धाकट्या राणीच्या पूर्ण आहारी गेले होते.ती कमालीची धूर्त!तिने बरोबर महाराणांंना आपल्या जाळ्यात ओढले होते.महाराणा पूर्ण मुठीत आलेले बघून तीने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली.थोरला पुत्र प्रतापसिंहा विरुध्द सतत कान फुंकण्यास सुरुवात केली. सतत प्रतापांविषयी खोटेनाटे सांगीतल्या मुळे व तिच्या मोहपाशात आकंठ बुडलेल्या उदयसिंहांनी जेष्ठ पुत्र प्रताप सिंहाचा अधिकार डावलून तिच्या गोड बोलण्याला भुलुन तिचा मुलगा जगमल ला त्यांच्यानंतर उत्तराधिकारी करण्याचे वचन दिले.
महाराणा उदयसिंहांनी आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणांसाठी उत्तम,प्रतिभावंत, विद्वान,अनुभवी राजगुरुंची व्यवस्था केली होती.ते राजगुरु म्हणजे प्रति द्रोणाचार्यच जणूं! प्रतापसिहांचे लाघवी बोलणे,सालस,कणखर बलिष्ठ शरीर बघून दोघां गुरुशिष्याचे अतुट नाते निर्माण झाले होते.प्रताप विविध शास्रात पारंगत तर होतेच,पण अनेक शस्रे चालवण्यात देखील अतिशय तरबेज होते.भालाफेकीत विषेश प्राविण्य प्राप्त होते.तलवारबाजीत त्यांच्या तोडीचा दुसरा वीर नव्हता.कुॅंवर प्रताप मुळातच आज्ञाधारक,गुणग्राहक,चिकित्सक, अभ्यासू,समंजस आणि मेवाडमधील राजकीय परिस्थीतीची जाणीव असल्या मुळे ते राजगुरुंचे अधिक लाडके होते. स्वतः प्रतापसिंह अतिशय निःस्वार्थी होते तेवढेच त्यांचे सर्व बंधू स्वार्थी,मतलबी होते.गुरुदेवांचे त्यांच्याशी असलेले सख्य बघून त्यांच्यावर जळत असे.राणी भटियाणीचा पुत्र जगमल हा प्रतापांचा अतिशय दुस्वास करीत असे.त्याच्यावर त्याच्या आईचे संस्कार तसेच होते.
प्रतापसिंह विद्यार्जन करीत असतांनाच आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे स्वप्न रंगवू लागले.पण राणी भाटियाणीमुळे पित्याच्या प्रेमाला पारखे झाले होते.ही गोष्ट गुरुदेवांच्या लक्षात आल्यावर प्रतापांना समजावत म्हणाले, तुम्हाला सध्या जी वागणूक मिळत आहे ती मेवाडच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.तुम्हा भावाभावातील दुफळीचा फायदा मोगल घेतल्याशिवाय राहणार नाही.म्हणून बाकीचा विचार बाजुस ठेवून मेवाडातील सर्व राजपूत राजांना एकत्रीत आणल्याशिवाय मोगलांवर शह बसणार नाही.मेवाड जनतेचे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे.जनता तुमच्या पाठी असल्यामुळे तुम्ही आपले ध्येय गाठू शकाल.मार्गात जरी तुमचेच लोक आले तरी त्यांना प्रेमाने जिंका.एक दिवस सत्य परिस्थितिची जाणीव नक्कीच होईल. पण तरीही कधीही गाफील राहु नका. कुणावर विश्वास न टाकतां सतत सावध राहा.पण गुरुदेव!विश्वास टाकल्याशिवाय ध्येय कसे गाठतां येईल?
कुॅंवर कांही गोष्टी स्पष्ट बोलतां येत नाही,बंधने येतात.मी जे सांगीतले त्याचा मतीतार्थ लक्षात घेऊन,आपला मेवाडचा बराचसा भाग मोगलांच्या ताब्यात आहे, तेथील आपल्या जाती बांधवावर,अन्याय अत्याचार होत आहे,स्रीयांची अब्रु लुटली जात आहे.नशीबाला दोष देत जीव मुठीत घेऊन टाहो फोडत जगत आहेत. त्यांना तुम्हाला मुक्ती द्यायची आहे.कुणा वरही विश्वास न टाकतां सदैव सावध रहा गुरुदेव!आपल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन दिलेल्या अमृतोपदेश अंतःकरणा च्या कुपीत सतत जतन करुन ठेवीन. मोगलांनी जिंकलेला मुलूख माझ्या शरीरांत अखेरचा थेंब असेस्तोवर मेवाड मुक्तीसाठी खर्च करेन.माझा श्वास म्हणजे माझा देश असेन.समाधानेने गुरुंनी तथास्तू म्हणत म्हणाले,नावांप्रमाणेच प्रतापी व्हाल.इतिहासात तुमचे नांव सुवर्णाक्षराने लिहिल्या जाईल.असे म्हणून ते निघून गेले.
महाराणा उदयसिंह आकंठ भोगविलासा त बुडलेले,आईच्या संस्कारामुळे प्रताप व शक्तीसिंह सोडले तर बाकीचे सारे राज पुत्रांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
आठवा भाग टाकणे शोधून
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ९.
अकबर हा फार दूरदर्शी सम्राट होता.संपूर्ण हिंदुस्थान त्याला आपल्या अधिपत्याखाली आणायचा होता,ते त्याचे स्वप्न होते.पण त्याचे आजोबा बाबर व पिताजी हुमायून यांच्या कारकीर्दीचा इतिहास त्याला ज्ञात होता. मेवाड राजपुतांनी कशी कडवी झुंज दिली,प्रसंगी केसरिया आणि जोहारचा कसा अवलंब केला,पण शरणागती पत्करली नव्हती.रक्त सांडले पण माघार घेतली नव्हती.राजपुतांचा पाडाव करणे हेच मुख्य उदिष्ट समोर ठेवून सारे सामर्थ्य पणाला लावायचा त्याने निर्धार केला.त्याची नजर अंजिक्य चितोडगडा वर होती.चितोडगड ताब्यात घेणे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचे होते.हा अकबरचा डाव प्रतापसिंहाच्या लक्षात आला.
त्याकाळी मेवाड अत्यंत संपन्न, मेवाडचा मुकुटमणी असलेलं राज्य असून चित्तोडगड राजधानी होती.आतां पर्यंत चित्तोडच्या गादीवर आलेल्या सिसोदिया वंशातील महाराणांचा पराक्रम व कर्तृत्व फार उज्वल होता.प्रत्येक महाराणा प्रजाहितदक्ष असून प्रजेच्या कल्याणार्थ खूप चांगल्या गोष्टी केल्या होत्या.पण उदयसिंहाच्या भोगविलास व अति मद्यसेवनाने चितोडगडाला अवकळा येऊन अवकळा निर्माण झाली.
ह्या अव्यवस्थेच्या बातम्या गुप्तहेरा मार्फत अकबराला कळत होत्या.त्या नुसार तो बेत आखत होता.याची चिंता भोगविलासलिप्त उदयसिंहाला नसली तरी प्रतापसिंहांना दिसत होत्या,पण त्यांना कोणतेच अधिकार नसल्यामुळे, विचार करण्याशिवाय हाती कांहीच नव्हते.अजुन विद्यार्जन संपले नव्हते तरी प्रतापांनी जनमत जागृत करुन त्यांच्या मनांत शत्रूविषयी घृणा निर्माण करीत होते.प्रतांपाबरोबर शिकत असलेला सरदार पुत्र मन्नासिंह त्यांचा जिवलग मित्र बनला होता.
एके दिवशी गुरुदेवांनी सर्व राज पुत्रांची पोहणे,भालाफेक,घोडदौडची परीक्षा घेतली.या सर्व शर्यतीत प्रताप अव्वल आल्यामुळे,राजपुत्रांच्या मनांत त्यांच्याविषयी आणखीनच द्वेषाग्नि भडकला.इतकेच काय पिता उदयसिंहांनी सुध्दा कौतुक केले नाही. याचे कुॅंवर प्रतापांना अतिशय दुःख झाले गुरुदेवांनाही वाईट वाटले.ते समजावत म्हणाले,तू एवढा हताश नको होऊस!नांवच तुझे प्रताप उच्चारताच शत्रूला धडकी भरेल.स्वतःत शक्ती पैदा कर! स्वामर्थ्यवान होऊन स्वहिंमतीवर उभे रहा.ते दोघेही अरवलीच्या पठारावर उभे होते.प्रतापसिंहाची नजर उंच टेकडीवर स्थित चितोडगडावर स्थिरावली.त्या गडा वर नऊ मजली विजयस्तंभ होता.माळवा आणि गुजराथच्या सुलतांनानी एकी करुन चितोडगडवर स्वारी केली होती, त्यावेळी गादीवर असलेल्या महाराणा कुंभांनी त्या सुल्तानाचा पराभव करुन मिळालेल्या विजयाप्रित्यर्थ हा विजय स्तंभ उभारला होता.हा विजयस्तंभ प्रत्येक राजपूतांच्या शौर्याला आव्हान देत म्हणतो,गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातत्र्याचे उपासक व्हा!पण केवढे दुर्दैव या विजयस्तंभाचे आव्हान राजपुतांना समजत नव्हते.
एकाएकी गुरुदेव म्हणाले,कुॅंवर! गुरुचे ऋण फेडायचे असते,गुरुदक्षिणा द्यायची असते.आज गुरुदक्षिणेच्या रुपात या पठारावर तुला दोन प्रतिज्ञा घ्यायच्या आहेत.पहिली…तू इतर भावांप्रमाणे विलासीन होणार नाहीस.आणि दुसरी.. आयुष्यात तू कधीच कुणाचे स्वामीत्व न स्विकारतां स्वातंत्र्याचा उपासक राहशील हीच माझी गुरुदक्षिणा! देशील?
दिलीsss !गुरुदेव, तुमच्या पवित्र चरणाची शपथ घेतो की,कोणत्याही सुख लोलुपतेच्या आहारी जाणार नाही.जोवर या भूमीतून मोगलांचे समुळ उच्चाटण होणार नाही,मातृभूमी स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत कोणतेही ऐश्वर्य भोगणार नाही.माझी गवताची गादी राहील,सोन्या चांदीच्या भांड्याऐवजी मातीच्या भांड्यातून अन्न सेवन करीन.माझा देश स्वतंत्र होईपर्यंत कितीही कष्ट पडले तरी शत्रूला उसंत घेऊ देणार नाही.असा आत्मयज्ञ पेटल्यावर माझ्या प्राणांची आहुती टाकायला मागेपुढे बघणार नाही.
शाब्बासss !धनंजयासारखा एकवचनी,एक बाणी शिष्य मिळाला हे माझे अहोभाग्यच!जशी अर्जुनामुळे द्रोणाचार्यांची किर्ति आर्यावर्तात पसरली होती,तद्वतच तुझ्यामुळे माझी किर्ती मेवाडप्रांती पसरेल.मला तुझा अभिमान आहे.दोघे गुरुशिष्य अश्वारुढ होऊन उदयपूरकडे परतले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – १०.
चितोडचे प्रजाजन जरी महाराणा उदयसांहावर नाराज असले तरी त्यांना ते आपला राजा मानत होते.समाधान एकच होते,बनवीरच्या दुष्ट,क्रूर,अत्याचार, अन्यायापासुन सुटका झाली होती. त्यांच्या विलासीपणामुळे राज्यात अराजकता माजली होती.मंत्रीगण, सरदार मनास येईल तसे वागत होते. त्याचवेळी उदयसिंहांचा द्वितिय पुत्र शक्तिसिंहाबरोबर त्यांचे कडाक्याचे भांडण झाल्यामुळे त्याने अकबरापुढे जाऊन शरणागती पत्करली.आपला सख्खा भाऊ अकबराला शरण गेल्याचे बघून प्रतापसिंहांना अतिशय दुःख झाले. सम्राट अकबरने चित्तौडवर स्वारी केल्याची तयारी बघून,शक्तीसिंहाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला.सारा मेवाड देशद्रोही म्हणून मला धिक्कारतील
अकबरची जय्यत तयारी बघून तो मेवाड नक्कीच जिंकेल याची खात्री पटल्याने, आपल्या पित्याला मेवाडवर येणार्या संकटाची सूचना देऊन सावध केले पाहिजे.भांडणे कोणत्या घरांत होत नाही.पिताजी मला नक्कीच क्षमा करतील,असा विचार करुन…
मध्यरात्री पहार्यावरील चौकीपहारे चुकवून शक्तीने मोगलतळावरुन गुपचूप पलायन करुन वायुवेगाने चित्तोडगड गाठले.पिताजींच्या रागवण्याकडे दुर्लक्ष करुन म्हणाला,पिताजी!क्षमा करा,पण ही वेळ फार आणीबाणीची आहे.अकबर जय्यत तयारीनीशी सेनासागर घेऊन गडावर चालुन येत आहे,आपल्याला सावध करण्यासाठी पहारे चुकवुन जीव धोक्यात घालून तुम्हाला सुचित करण्या स आलोय!त्याला आराम करण्यास पाठवून उदयसिंह विचारमग्न झाले. अकबर बादशहाच्या सेनेशी टक्कर देणे सोपे नव्हते.त्यांच्या विलासीवृत्तीमुळे राज्याकडे म्हणावे तसे लक्ष नव्हते. सरदार नाराज होते.जनता नाखुश होती.
आकाशच फाटले तर कुठे थिगळ लाववे
त्यांना एकदम आठवले,कुॅंवर प्रतापने मधल्या काळात पराक्रमाची झलक दाखवून बागडदेशावर विजय मिळवला होता.छप्पनच्या राठोडालाही पराजित केले होते,पण असूयेपोटी, जाणीवपूर्वक प्रतापच्या पराक्रमाची दखल नव्हती घेतली.पण आतां परिस्थिती वेगळी आहे.परकीय आक्रमण आणि चितोडगडाच्या अस्तित्वासाठी तसेच राजपुतांच्या अस्मितेसाठी कांही तरी पाऊल उचलणे भाग होते.राजपूता च्या इभ्रतीचा प्रश्न समोर होता.त्यांचा स्वदेशाभिमान जागृत झाला.त्यांनी ताबडतोब दरबार भरवला.दरबारात जयमल वीरदेव,रावत साईदास चुडावत, ईश्वरदास चौहान,राव बल्लु सोळंके, डेडिया सांडा,राव संग्रामसिंह,रावत साहित्य खान,रावत पत्ता,रावत नेतसी असे प्रमुख सरदार उपस्थित होते. महाराणा उदयसिंह प्रविष्ठ होताच,सर्वांनी उठून मानवंदना दिली.
महाराणा उदयसिंहांनी गंभीर आवाजांत शक्तिसिंहाने आणलेली बातमी सांगून म्हणाले,राजपूतांचा आत्मा असलेल्या चितोडगडावल आलेले अस्मानी संकट कसे दूर करायचे यासाठी आपापले विचार मांडावेत.प्रत्येकजण विचार मांडू लागले.एक सरदार म्हणाला, अकबराच्या अफाट सैन्य आणि त्याच्या आधुनिक शस्रे,तोफापुढे
आपल्याजवळ असलेल्या तुटपुंज्या सैन्यानिशी मुकाबला करुं शकणार नाही तेव्हा अकबराशी समापोचाराची बोलणी करावी असा विचार मांडला मात्र, महाराणा उदयसिंह संतापाने ओरडून म्हणाले,शरम नाही वाटत?अरे!शत्रूच्या तुलनेत जरी आपली फौज संख्येने कमी असली तरी आपला एक एक राजपूत वीर १०-१० शत्रूंना भारी आहे.आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी रक्त सांडल्याचा इतिहास विसरलांत?आपल्या मातृभूमी, देवधर्म,स्वातंत्र्याबद्दल कांहीच अभिमान नाही का?
महाराणा उदयसिंहचे आवेश,जोश पूर्ण बोलणे ऐकून सारा दरबार स्तंभित झाला.भोगविलासात गर्क,आपलाच राणा बोलतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.ते जरी विलासी,व्यसनी असले तरी त्यांचे आपल्या मातृभूमीवर उत्कट प्रेम असल्याचा साक्षात्कार झाला.सर्वां च्या भावना एकदम बदलून आदर वाढला.त्यांच्या ओजस्वी बोलण्याने सार्यांच्या अंतरी स्वातंत्र्यज्योत,देशप्रेम उफाळून आले.सर्वांनी एकदिलाने अकबर बादशहाशी मुकाबला करुन प्राणपणाने लढण्याचा निर्धार केला.सारे त्वेषाने आक्रमणाला तोंड देण्यास सज्ज झाले,आणि जयs मातृभूमीss,जय एकलिंगजीचा आवेशपूर्ण जयघोष उठला.सर्वजण युध्दाच्या तयारीला लागा असा आदेश देऊन दरबार संपला.
अकबर ५० हजार फौजेचा मोठा ताफा घेऊन चितोडवर स्वारी करण्यास स्वतः २३ आक्टोबर १५६७ ला येऊन चितोडगडाच्या पायथ्याशी चारही बाजूने छावण्या उभारल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


