
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ४६.
शहबाजने केलेल्या नाकेबंदीमुळे महाराणा फारच अडचणीत सांपडले. नाकेबंदीमुळे गडावर येणारी रसद व शस्रास्रे,इतर सामानसामुग्री येणे बंद झाली.गडावरचे अन्न संपुष्टात आले,शस्रां चा तुटवडा पडू लागला.महाराणांसमोर बिकट प्रसंग निर्माण झाला.शहाबाजचे एकापाठोपाठ हल्ले आजुबाजुच्या टेकड्यांवरुन व खालुनही होऊ लागले. गडावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.महाराणांचा राजपरिवारही गडावर होता.
महाराणांनी तातडीने बैठक बोलावली.महामंत्र्यांनी सूचना केली की, राजपरिवाराची सुरक्षा अतिमहत्वाची असल्यामुळे सर्व परिवारासह वेषांतर करुन महाराणानी गड सोडावा.नाही.. हे शक्य नाही.तुम्हा सर्वांना संकटात टाकून आम्ही प्राण वाचवू? त्रिवार जमणार नाही. नाहीss नाहीss !
महाराणाजी!सद्य परिस्थितीचा विचार करावा.अन्नधान्य जवळ जवळ संपलेले,शस्रास्रे नाहीत,अशा परिस्थिती त गड वाचण्याची शक्यता नगण्य आहे. सर्वांनीच जर प्राण्यांच्या आहुत्या दिल्या तर मेवाडचा वाली कोण?मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणार कोण?बरं!प्राण देऊनही गड वाचणार नसेल तर व्यर्थ बलिदान का?महाराणा आपण मेवाडचे एक अद्वितिय मंत्र आहात!राखेतून स्वर्ग निर्माण करण्याची ताकद आपल्यात आहे.आपण वाचलात तर,लोहभिंती देखील हादरवू शकाल.दुसरा कोणताच मार्ग नाही.शत्रू गड केव्हाही काबिज करेल.
महाराणांनी खूप प्रतिकार केला पण,गडावरील सर्व लोकांच्या आग्रहापुढे त्यांचा नाईलाज झाला.शेवटी बेमालून वेषांतर करुन आपला परिवार,मंत्री, व कांही सैन्यासह रात्री गुप्तमार्गे सुरक्षित राणपूररला कांही दिवस मुक्काम करुन चुलिया गांवी मुक्काम केला.
महाराणा पाठोपाठ भामाशाह व भाऊ ताराचंद हेही गुप्त मार्गे गडावरील सारा खजिना घेऊन महाराणांसोबत न जातां रामपुर्याला रावदुर्गाकडे आश्रय घेतला.कुंभळगडावर मोगलांचे हल्ल्यावर हल्ले होत होते.किल्लेदार भाण सोणगरा खंबीरपणे तोंड देत होते.पुरेशे सैनिक नाही.अन्नधान्य नाही.उपाशीपोटी, अपुर्या शस्रानिशी राजपूत सैन्य पराक्रमाची शर्थ करीत होते.मोगल सैन्य वरती येत होते.त्यातच अकस्मात संकट उद्भवले.किल्ल्यावरील दारुने भरलेली तोफ अचानक फुटल्याने,होता नव्हता दारुगोळाही खलास झाला.अखेर भाण सनगरांनी सर्वांना एकत्रीत बोलावुन म्हणाले,आताच्या आणीबाणीच्या स्थितीत किल्ला लढवणे शक्य नाही. लढतां लढतां बलिदान देणे हा एकच मार्ग शिल्लक आहे.किल्ल्याचे दार उघडून शत्रूवर तुटुन पडू,आपले बलिदान व्यर्थ नाही जाणार!
दुसरा दिवस उजाडला तोच मुळी रक्ताचा सडा बघण्यासाठी!किल्ल्याचा दरवाजा उघडल्याबरोबर शत्रू सैनिक आंत घुसल्याबरोबर,राजपूत सैन्य जोशा ने तुटुन पडले.प्रेतांचा नुसता खच पडला.
राजपूतांचे किती जबरदस्त राष्र्टप्रेम,तिव्र निष्ठा त्यांचा पराक्रम पाहून सूर्यदेव देखील चकित झाला.बराचवेळ अटीतटी चे युध्द चालले.सर्व राजपूतवीर धारा तीर्थी पडले. माण सोनगरांनी अंगावर असंख्य जखमा घेऊन मृत्युला कवटाळ ले.त्यांचे बलिदान वाया गेले नाही.त्यांच्या बलिदानाचे चैतन्य हजारो तरुणांच्या अंगात शिरले.३ एप्रील १५७८ ला कुंभळ गड किल्ला शहाबाजखानच्या ताब्यात जाऊन किल्ल्यावर मोगलांचे निशान फडकले.
कुंभळगड ताब्यात आल्यावर किल्ल्यात कुणीच नाहीसे बघून खानला जबर धक्का बसला.किल्लेदार म्हणून गाझीखान बहकशीची नेमणूक करुन कांही सैन्य गडावर व कांही सोबत घेऊन महाराणांच्या शोधार्थ तातडीने गोगुंद्या कडे निघाला.तिथेही महाराणा न मिळाल्याने,संतप्त होऊन निष्पाप जनते वर लुटमार,अत्याचार,घरंदाज राजपूत स्रीयांच्या अब्रुला हात घातला तेव्हा कुठे त्याला थोडे शांत वाटले.गोगुंद्याला एक सरदार नेमून तो उदयपूरकडे निघाला. तिथेही महाराणांचा तपास न लागल्याने उदयपूर ताब्यात घेऊन नगराची भयंकर नासधूस,लुटमार केली.जनता त्याच्या अत्याचाराने बेजार,त्रस्त झाले.कुंभळगड,गोगुंडा,उदयपूर या ठीकाणी महाराणा न सांपडल्याने ससैन्य शोध घेत तीन महिने तो पहाडात भरकटत राहिला.एवढी नाकेबंदी केली, ठीकठीकाणी सैन्य,गुप्तहेर पेरले तरी महाराणा जिवंतच काय पण त्यांची सावलीही पकडू शकला नसल्यामुळे तो हतबल झाला.बादशहाला कसे तोंड दाखवावे या विचारांनी तो झोपेलाही पारखा झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ४७.
शहाबाखान क्षणाची उसंत महाराणांना लाभू देत नव्हता.सतत पाठलागावर असल्यामुळे व पहाडी मुलखात सैन्य पेरुन ठेवल्यामुळे त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले.सर्व सैनिक निघून गेलेले,दोन तीन सामंतासह रणकपूरच्या जंगलात लपून बसले.इडर ला जाण्याची संधी शोधत होते.शेवटी गुंगारा देऊन ईडरला सासर्याकडे गेलेत.
आपल्या एवढ्या बंदोबस्तातून महाराणा निसटल्याने शहाबाजखानला अतिव दुःख झाले.त्याने महाराणांचा बहुतेक मुलूख जिंकला होता.मेवाड मधील मोठमोठ्या नगरांची नासधूस होऊन प्रजा ठार झाली,कित्येक देशो धडीला लागले होते.मेवाड मुलूख उध्वस्त झाला होता.
विशेष म्हणजे महाराणांजवळ एकही सैनिक नव्हता.राजा असून सैन्य, धन,शस्रे नाहीत,किती दुर्दशा महाराणां ची?नियती किती कठोर घाव घालत होती,पण ते ताठ कण्याचे,थोडीही हिंमत न हरतां थिगळ लावण्याचा प्रयत्न चालू होता.
शहाबाजची स्थिती मात्र फारच अवघड झाली.महाराणांना अकबरसमोर उभे करणे शक्य नाही ही जाणीव झाल्या ने अखेर मेवाडचा बंदोबस्त करुन फत्तेपूरला निघून गेला.शहाबाजखान निघून जातांच महाराणनी पुन्हा सैन्याची जुळवाजुळव करुन,त्याने उभारलल्या चौकांवर हल्ले करायला सुरुवात केली.
पण सैन्यबळ कमी असल्यामुळे हल्ले यशस्वी होत नव्हते.नवीन सैन्य भरती साठी द्रव्याचा अभाव!त्यांची होत असलेली कुचंबणा बघून आपल्या कुवती नुसार प्रजाजन मदत करीत होते.पण जसे पेलाभर पाण्याने आग विझत नाही तसेच त्यांचे झाले.
भामाशाह व ताराचंद रामपुर्यास रावदुर्गकडे शहाबाजखान मेवाडमधून बाहेर पडेपर्यंत स्वस्थ राहिलेत.तो फत्तेपूरला निघून गेल्याबरोबर हे दोघे भाऊ सक्रीय होऊन मोगलांच्या ताब्यात असलेल्या माळव्यावर आक्टोबर १५७८ मधे स्वारी केली.तिथला राजा शरण आल्यावर त्याचेकडून २५ लाख रुपये व २० हजार अशफिर्या दंड वसूल करुन ती रक्कम व कुंभळगडावरील खजाना घेऊन चुलिया गांवी महाराणाकडे आला. त्यांना अतिशय आनंद झाला.प्रेमालिंगन देऊन गळाभेट घेतली.महाराणांना चिंतेत बघून भामाशाह म्हणाला,मी द्रव्याची व्यवस्था करुनच इकडे आलो आहे.त्याने टाळी वाजवताच ५-६ नोकरांनी द्रव्याची तबके महाराणांसमोर आणून ठेवले.भान हरपून महाराणा त्या द्रव्याकडे बघतच राहिले.
भामाशहाss ही संपती देऊन तुम्ही केवळ महाराणा प्रतापच नाहीतर संपूर्ण मेवाडवर तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही.महामंत्र्यांच्या ताब्यात ती अमाप संपती देऊन दोघाही भावांना जवळ बराच वेळ खलबत करत राहिले. महाराणांवरचे फार मोठे संकट टळले.
भामाशाह हा महाराणांसारखाच स्वच्छ चरीत्र्याचा,निर्मळ मनाचा निःस्वार्थी,निधड्या छातीचा आणि महाराणांवर अमाप विश्वास व निष्ठा असलेला राजपूत होता.एवढी संपत्ती प्राप्त होऊनही तो मोहवश न होता सारी संपत्ती महाराणा म्हणजेच मेवाडला निःस्पृहपणे देऊन टाकली.त्याचे दातृत्व बघून,महाराणा म्हणाले,आम्हाला राजा हरिश्चंद्रांची आठवण झाली.अशी त्यागी माणसे भूलोकी असतात म्हणूनच स्वर्ग निर्माण होतो.हळदीघाटाच्या युध्दातही त्याने अतुलनीय पराक्रम गाजवला होता. त्याच्या महादानाने व पराक्रमाने भारावून त्याची नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून केली.
भामाशहाने दिलेल्या द्रव्यामुळे महाराणांची विवंचना दूर झाली.जुन्या सैनिकांचे पगार सुरु केले.नवीन सैनिक भरतीस प्रारंभ केला.मेवाडमधे उत्सवाचे नवे वारे वाहू लागले.
शक्तिसिंहने दोन महिने मेवाडात जनसंपर्क साधून,त्याला लागलेला देश द्रोहाचा कलंक बर्याच प्रमाणात दूर करुन प्रतिमा उजळली होती.नंतर तो गोगुंद्याला आला.हा किल्ला नुकताच महाराणांनी मोगलांकडून जिंकला होता.नवीन सैन्य भरती केली.बरीच शस्रे विकत घेतली. सैन्य सामर्थ्य वाढल्यामुळे मोगलांनी बळकावलेले किल्ले ताब्यात घेण्याचा सपाटा लावला.गोगुंडा,उदयपूर,छप्पन, जावर,वाडाण या किल्ल्यासोबतच अति महत्वाचा अजिंक्य कुंभळगड सुध्दा हस्तगत केला.कुंभळगडावर मेवाडचा ध्वज दिमाखाने फडकू लागला.ह्या बातम्या ऐकून अकबरचा नुसता जळफळाट होऊं लागला.
शक्तिसिंह दोन महिन्याची भटकंती करुन गोगुंद्याला आपल्या पुज्य भाभीची, पुतण्या अमरसिंहची भेट घेऊन,प्रतापां शी गेल्या चार वर्षातील सुखदुःखाच्य्या गोष्टी केल्या.शक्तिसिंह अकबरला शरण गेल्यावर महाराणांची कशी दयणीय अवस्था झाली,कसे मुकाश्रू गाळीत होते हे ऐकून शक्तिसिंहाला अतिशय वाईट वाटले.त्याने यानंतर दादाला कधीही न सोडून जाण्याचे वचन दिले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ४८.
शक्तिसिंहने आपल्या भाभीच्या हातचा रात्रीचा खाना महाराणांच्या पक्तिस बसून घेतला.दुसर्या दिवशी शक्तिसिंहने दिवेरच्या शाही ठाण्यावर हल्ला करुन मोगलांना हुसकावुन लावून ताब्यात घेतला.मोगलांची ठाणी उध्वस्त करीत महाराणा चावंडला पोहोचले. चावंड हे दक्षिणेकडे असल्याने मावळा, गुजराथ,सिरोही,भागाला जवळ पडत होते.शिवाय तिथले राजे मेवाडचे मित्र होते.हा सर्व भाग “छप्पन की पहाडीयाॅं” नावाने प्रसिध्द होता.त्यावर छप्पन राठोडांचा अधिकार होता.चावंडचा राजा लुणा चावंडिया अत्यंत निर्दयी, अत्याचारी असून प्रजेवर अनन्वित छळ केल्यामुळे प्रजा त्याच्या जुलमाने अगदी त्रस्त झाली होती.त्यांच्याच विनंतीनुसार महाराणांनी चांवंडवर हमला करुन ताब्यात घेतला.महाराणांनी चांंवडचा कायाकल्प करुन तिथे राजधानी स्थापन केली.राजधानीस साजेसे मोठमोठे महाल बांधले.पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधल्या.चौपाल, गुप्त ठीकाणे,सैनिकांची निवासस्थाने, घोड्यांचे तबेले,पहाडाच्या पायथ्याशी चांमुडादेवीचे मंदिर,हे सर्व तातडीने करुन घेतले.पश्चिम-दक्षिणचा संपूर्ण मुलूख जिंकुन घेतला.नंतर महाराणांनी आपला मोर्चा डुंगापूर व बांसवाडाकडे वळवून जोधपूरच्या राव चंद्रसेन राठोडच्या मदती ने जोरदार हल्ला चढवून दोन्ही किल्ले ताब्यात घेतले.
अकबरला ह्या सर्व गोष्टी गुप्तहेरा करवी कळत होत्या.अकबरने मुलूख जिंकून पाठ फिरवली की,महाराणा परत हल्ला करुन ताब्यात घेत असे.महाराणां ना पकडण्याचे त्याचे सारे प्रयत्न निष्फळ होत होते.विचार करकरुन त्याच्या डोक्याचा नुसता भुग्गा झाला होता.ठरले
शहाबाजखानला पहाडी इलाक्याची सर्व माहिती झाल्यामुळे त्यालाच परत महाराणांना पकडण्यास पाठवावे.लगेच त्याला बोलावणे पाठवले.तो आल्यावर, अकबर म्हणाला,मागच्या वेळी तुम्ही नाकामायाब होऊन आलात,पण यावेळी फक्त कोशीस नाही..जिंदा या मृत महाराणा आम्हाला पाहिजेच.यशस्वी झाला नाही तर,बहुत बुरा हाल किया जायेंगा।
कुर्निसात करुन शहाबाजखान बाहेर पडला.तो खूप घाबरला होता. मेवाड मोहिमेसाठी त्याने भरपूर सैन्य व द्रव्य घेऊन १५ डिसेंबर १५७८ ला मेवाड च्या दुसर्या मोहिमेवर कांहीशा धास्ताव ल्या अवस्थेतच निघाला.
प्रचंड फौजेनिशी शहाबाजखान चालून येत असल्याची खबर गुप्तहेरांनी दिली.महाराणा त्वरेने पहाडी प्रदेशातील गोगुंद्याच्या पश्चिमेस वसलेल्या ‘ढोलन’ या अतिशय दुर्गम गावी आपल्या परिवार व विश्वासू लोकांसह आश्रय घेतला. या गावाचे वैशिष्ट म्हणजे उंबरांची खूप झाडं होती. संकट समयी उंबराचे फळ खाऊन वेळ निभावल्या जाऊं शकत होते.आपल्या परिवाराची होत असलेली ससेहोलपट पाहून महाराणांच्या काळजाला घरे पडत होती.पण नाईलाज होता.तिथे एक झोपडी उभारली.राजा आणि झोपडी?पण ही वस्तुस्थिती होती.यावेळी राणांनी उघड उघड युध्द टाळले होते.
त्यांनी गनिमी काव्याने सैन्याची विभागणी केली.छोट्या छोट्या तुकड्या सर्व पहाडी मुलखात पसरवल्या. शहाबाजखान अफाट फौजेसह पहाडी मुलखात शिरला,पण महाराणांच्या लपले ल्या सैन्यांनी गनिमी काव्याने मोगल सैन्यावर छापे मारुन त्यांच्याजवळच्या चीजवस्तू,शस्रे हडप करुन,त्यांचा सफाया करीत एकदम गायब होता.या छापामार युध्दाने मोगल सैन्य व स्वतः शहाबाजखान वैतागुन गेले होते.त्याने सर्व पहाडी इलाका पिंजून काढला,पण महाराणांचे नखही दिसले नाही.
महाराणांनी जो भाग जिंकला होता तो भाग त्याने परत मिळवून आपले सैन्य तैनात करुन पहार्याचा कडक बंदोबस्त केला.त्यावेळी मेवाडात मोगलांची जवळ जवळ ५० ठाणी होती.त्यांत मैदानी प्रदेशांतील दिवेर,उंटाळा,मोही,मदारिया, चितोडगड,मांडलगड,जहाजूपूर,मंदसौर, इत्यादी महत्वाची ठाणी होती.यावेळी तो मेवाडात सहा महिने राहिला.पण महाराणांचा त्याला थांगपत्ता लागला नाही.अखेर मेवाडची व्यवस्था लावून तो १५७९ ला फत्तेपूरला परतला.
शहाबाजखान परत गेल्याबरोबर आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ससैन्य पहाडी भागातून बाहेर येऊन त्याने जिंकलेले एक एक प्रदेश घेण्यास सुरुवात केली.मात्र मैदानी भागात कुणी ही शेती करुं नये हा कडक हुकुम जारी केला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ४९.
महाराणांचा आदेश तंतोतंत पाळून कुणीही शेती पिकवली नसल्यामुळे सर्व शेते ओसाड होऊन शेतांमधे गवत व काटेरी झाडे इतकी वाढली की,तिथे जंगली जनावरांनी वस्ती केली.मोगल सैन्यांना अन्नधान्य मिळेनासे झाले.त्यांची रसद येणार्या मार्गाची चारही बाजूने नाकेबंदी झाली.१५७९ मधे महाराणांनी पुन्हा दिवेर ताब्यात घेतला.या लढाईत कुॅवर अमरसिंह व भामाशहाने अद्भूत पराक्रम करुन मोगल ठाणेदार बहलोल खान ठार झाला.राजपूतांचा आवेश बघून दिवेरच्या आजुबाजुला असलेल्या आमेर,कोसीथळ,मदारिया इत्यादी ठाण्यातील मोगल सैनिक जीव वाचवून पळून गेले.जावरही ताब्यात घेतले.डुंगर पूर व बांसवाडाच्या नरेशांनी महाराणांचे वर्चस्व मान्य केले.
मेवाडचा दक्षिण पश्चिम भाग सुरक्षित झाल्यामुळे त्यांनी आपली राज धानी चावंडला केली.सत्ता वाढली तशी महत्वाकांक्षाही वाढली.सैन्यशक्तीही वाढली.महाराणांवर नितांत अमाप श्रध्दा निर्माण होऊन सर्व राजपूत संघटीत झाले.प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्यज्योत तेजाळली.महाराणांच्या व्रतस्थ जीवन प्रणालीमुळे लोकांच्या मनांत अतूट श्रध्दा निर्माण झाली.मातृभूमी स्वतंत्र व्हावी, प्रजेला सुख प्राप्त व्हावे म्हणून ते रात्रं दिवस झटताहेत पाहून मेवाड जनता त्यांना मनापासून साथ देत होते.
शहबाजखान दुसर्यावेळीही रिकाम्या हाताने परतल्याने अकबरला कांही नवल नाही वाटले.आतांपर्यत मेवाडवर तीन आक्रमणे केली पण महाराणा हाती लागले नाही.तेवढ्यात जोधपूरचा महाराणांचा समर्थक नरेश राव चंद्रसेनने मोगलांविरुध्द बंड पुकार ल्या मुळे नवीनच समस्या अकबरपुढे निर्माण झाली.राव चंद्रसेनने मोगलांचा एक एक प्रदेश जिंकत थेट अजमेरपर्यत येऊन ठेपला.त्याच्या बंदोबस्तासाठी अकबरने पयन्द मुहमदखानला ससैन्य रवाना केले.दोघांमधे घनघोर लढाई होऊन राव चंद्रसेनचा पराभव झाला. इकडे महाराणांनी मेवाडमधे बरीच सुधारणा केली.त्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले.
शहाबाजने केलेल्या दोन्ही वेळच्या मोहिमेत चांगला पराक्रम गाजवून मेवाड चा बराचसा भाग पादाक्रांत केला शिवाय विश्वासू सरदार म्हणून अकबरने तिसर्यां दा मेवाडच्या मोहिमेवर त्यालाच पाठवण्याचे ठरवले.
महाराणांना सतत धावपळ जरी करावी लागत असली तरी राज्यकारभारा वर त्यांनी विपरित परिणाम होऊ दिला नाही.पर्वतातील सपाट भागात शेती होत असल्यामुळे सैन्याची व प्रजेची सोय होत होती.महाराणांचा राजविस्तार हेतू नव्हताच!भूमी,धन,जन,आणि साधनांचे संरक्षण करुन स्वातंत्र्य आबाधित राहावे या उदात्त हेतूने ते मोगलांशी संघर्ष करीत होते.त्यांनी आजुबाजुच्या राजांना कधी ही त्रास दिला नाही की शत्रुत्व केले नाही. त्यांना आदिवासी भिल्लांचे मोलाचे सहकार्य मिळाले.वेळोवेळी महाराणांच्या राजपरिवाराचे रक्षण केले.त्यांना पहाडातील गुप्त वाटा माहित असल्या मुळे कित्येक मैलांचा प्रवास अल्प काळात करुन संदशवाहक म्हणून उत्तम कामगिरी बजावत.अरवली पर्वताच्या घनदाट जंगलातील गुप्त गुहेत महाराणा धन,संपत्ती त्यांच्या विश्वासावर लपवून ठेवीत.त्यातील जावार,मायरा,मचीन ह्या प्रमुख गुहा होत्या.महाराणांचे सैनिक साधारण वेष धारण करुन,वेगवान हाल चाली करुन घोड्यावरुन आक्रमण करण्यात पटाईत होते.ते आपले भोजन कमरेला बांधत त्यामुळे त्यांना अडचण येत नसे.सर्वजण संघटीत राहत असल्या मुळे त्यांनी केलेल्या हल्ल्यातून शत्रू सहसा सुटत नसे.तसेच मोगलांच्या ताब्यात असलेल्या माळला,गुजराथ, आमेर भागात जाऊन लुटमारही करीत.
आक्टोबर १५७९ मधे अकबर पुन्हा अजमेरला आला.तिसर्यांदा शहाबाजखानला भरपूर द्रव्य,सैनिक व सारे अधिकार व तंबी देऊन मेवाडला पाठवले.ही बातमी महाराणाना मिळाल्या बरोबर त्यांनी लगेच गड आणि राजधानी मोकळी केली.सैन्यतुकड्या पहाडी मुलखात सर्वत्र पसरवल्या.पांच विश्वासू भिल्लांसोबत राजपरिवारास ‘ढोलन’ गांवी रवाना केले आणि स्वतः कडव्या विश्वासू सैन्याची तुकडी घेऊन घनदाट जंगलात शिरले.
मोगल सैन्य जसजसे पुढे सरकू लागले,महाराणा तसे मागे सरकू लागले. गनिमी काव्याने युध्द करीत ते भोमरच्या जंगलात शिरले.त्या जंगलात शिरण्याची हिंमत मात्र मोगल सैन्याची झाली नाही. त्या जंगलात शिरणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युला मिठीत घेण्यासारखे होते.भोमर च्या जंगलातून महाराणा हळूहळू अबूपहाडाकडे निघून गेले.शहाबाजखान मात्र महाराणांना छप्पनच्या प्रदेशातच शोधत राहिला.तो एक एक भाग जिंकून आपला सुभेदार नेमत पुढे पुढे सरकत, ठाणी निर्माण करीत राहिला.ठाण्यांवर अत्यंत कडक पहारा बसवत होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५०.
शहाबाजखानने या मोहिमेत तेजोमल सिसोदिया महाल ताब्यात घेऊन तिथेही कडक पहारा बसवला. त्याने सारा पहाडी प्रदेश पिंजून काढला पण राणा न सांपडल्याने तो वैतागुन गेला
ह्याचवेळी भामाशहाचा भाऊ ताराचंद दंड वसूलीकरितां मावळ्यात आल्याचे कळताच,शहाबाज माळव्यात आला.दोघांमधे तुंबळ युध्द झाले.त्या युध्दात जखमी झालेला ताराचंद त्याची नजर चुकवुन मोठ्या शताफिने पळून गेला.महाराणांनी मेवाडचे जिंकलेले किल्ले त्याने परत ताब्यात घेतले.मागील दोन आक्रमणात मिळालेल्या सफलते च्या तुलनेत यावेळी मात्र त्याला सफलता मिळाली नाही.कारण यावेळी महाराणां नी सैन्याचे विकेंद्रकरण केले होते.त्या मुळे त्याचेवर गनिमी हल्ले होतच राहिले.
अतिशय कष्टप्रद आयुष्य कंठीत असून देखील व्रतस्थ जीवन,ध्येयापासून तसूभरही दूर न होता,पराक्रमाची धार कायम ठेवत,तंबू,झोपडी,कच्चे घर,कुठे ही राहत,वेळेवर जेवण पण मिळत नसे तरी कधी खंत केली नाही.त्यांच्या परिवारातील स्रीयांना सुध्दा त्यांचेबरोबर अतोनात कष्ट,त्रास,हालअपेष्टा सहन करावे लागत,तरी,त्यांनी देखील कधी तक्रार केली नाही.या सर्व गोष्टींची माहिती अकबरला मिळाल्यावर तो थक्क झाला.नकळत त्यांच्याबद्दल आदर त्याच्या मनात निर्माण होत असे.
नेमके याचवेळी एकीकडे बंगाल- बिहार मधील अफगान व पठाणांनी अकबर विरुध्द पुकारलेले बंड तर दुसरी कडे महाराणा प्रतापसिंह!तो अगदी कात्रीत सांपडल्याने शेवटी शहाबाजला मेवाडमधून बोलावून बंगालकडे रवाना केले.मेवाडचे आक्रमण अकबरला महागात पडले होते.अमाप पैसा,विपूल मनुष्यहानी होऊनही तो हट्ट मागे घ्यायला तयार नव्हता.शहाबाजखानने तिन्हीवेळा प्रामाणिकपणे मोहिमा गाजवूनही त्याला काय फळ मिळाले तर,त्याची सुभेदारी काढून रुस्तुखानला बहाल केली.दुःखी खिन्न मनाने तो बंगालकडे निघून गेला. पण जाण्याआधी जिंकलेल्या मुलखाचा कडक बंदोबस्त,व ठाणी मजबूत करुन जागोजागी सैनिक पेरुन ठेवले.
मेवाडमधून शहाबाजखान जातांच प्रतापसिंह अबूपहाडातून बाहेर पडून ढोलन गावी आले.नव्या उमेदीने पुन्हा मोगलालाने जिंकलेला प्रदेश परत प्राप्त करण्यासाठी विखुरलेले सैन्य पुन्हा एकत्रीत करायचा सपाटा लावला. महाराणा डोंगराच्या शिलाखंडावर विचार मग्न विराजमान होते.झोपडीत सुलक्ष्मा देवी चुलीवर स्वयंपाक करीत होत्या. लहानगी कन्या देवल आजारी असल्या मुळे कन्हत होती.तेवढ्यात एक आदिवासी भिल्ल धापा टाकत येऊन म्हणाला,महाराज घात झाला.चुलीतुन निघणार्या धूराने घोटाळा झाला.शत्रूची एक तुकडी अगदी जवळ आली आहे. महाराज मोगल सैन्याने चारही बाजूने घेरले असून क्षणाक्षणाला वेढा आवळल्या जात आहे इथून निसटणे अतिशय कठीण आहे.
महाराणांनी आवाज देत सुलक्ष्मी ला म्हणाले,चुल विझवून धूर बंद करा.जेवढ्या झाल्या असतील तेवढ्या भाकरी सोबत घ्या. तेवढ्यात आणखी २-३ भिल्ल तरुण येऊन मुलांना खांद्यावर घेतले.तोच आजारी देवल केविलवाणे म्हणाली,माॅंs आम्हाला खूप भूक लागली आहे,खायला रोटी दे ना!बेटी मोगल येत आहे,थोडा वेळ कळ काढ बेटा!ते गेले की,पोटभर भाकरी तुला खायला देईन.मोगलांचे नांव घेताच भयभित झालेली मुलं गप्प झाली.
दुःखी हताश स्वरांत महाराणा म्हणाले,आम्ही देशाचा संसार करायला निघालो,पण वैयक्तिक संसाराचे काय? वेळेवर मुलांना खायला सुध्दा देऊ शकत नाही.स्वामी!एकदा स्विकारलेले व्रत पुरे करण्यासाठी कितीही हालअपेष्टा भोगाव्या लागल्या,आहुत्या टाकाव्या लागल्या,जीवावर बेतले तरी व्रत पुर्णत्वा स न्यावे,अन्यथा व्रताची सांगता न होता, त्याचे पावित्र्य नष्ट होते.स्वामी!नैराश्य दूर करा,मोगल आपल्या दिशेने सरकत आहे कधी कधी आमच्या मनांत वैफल्य डोकावते,पळाss पळा ss ना रात्र ना दिवस बघायचे,स्वतःला व परिवाराला वाचवण्यासाठी धावत राहायचेय!शेवटी आम्ही देखील माणूसच आहोत ना?कधी तरी भावना उचंबळून येणारच ना?
तेवढ्यात एक आदिवासी भिल्ल म्हणाला,मुलांना मोठ्या टोपल्यात ठेवून, दाट पाणांच्या झाडावर त्यांना घेऊन लपून बसतो.आपण महाराणीबरोबर समोरच्या गुहेत लपून बसा.कांही जणं झोपडीबाहेर बसतो.आम्हाला इथे बघून मोगल सैनिक निघून जातील,पण त्यातील आमच्या तिक्ष्ण बाणाने एकही जिवंत राहणार नाही याची काळजी घेऊं.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


