देवघरातील घंटी*
आगमार्थं तू देवांना गमनार्थं रक्षसां।
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणं।।
अज्ञाना ज्ञाणतो वापी कांस्य घंटान् आवादयेत्।
राक्षसांणां पिशाचाणां तद्देशे वसतिर्भवेत्।।
घंटाग्रे ब्रह्म दैवत्यं मुकूटे रुद्र दैवतं ।
नादे सरस्वती चैव नागे नालादी दैवतं।।
अर्थ:- घंटीचे वादन करण्याचे मूळ कारण आपण लक्षात घेतले तर देवांचे आगमन व्हावे आणि असुर शक्ती निघून जाव्या या करीता घंटा कार्य करते.
अज्ञाना ज्ञाणतो वापी कांस्य घंटान् आवादयेत्। राक्षसांणां पिशाचाणां तद्देशे वसतिर्भवेत्।।
या श्लोकाचा अर्थ पाहता असे लक्षात येईल कि असुरी शक्ती या सात्विक लहरींपासून दूर जातात , कास्याची घंटा हि अतिशय मंजुळ व सात्विक ध्वनी प्रसारित करते त्यामुळे असुरी शक्ती दूर जाऊन देव शक्ती त्या ध्वनिकडे आकृष्ट होतात. वरील श्लोकात असे म्हणजे आहे कि काही कारण असता व विनाकारण जरी आपण कास्य घंटा वादन केले तरी असुर शक्ती दूर जातात . यावरून कास्य घंटी उत्तम आहे असे सांगण्याचा उद्देश दिसतो.
घंटाग्रे ब्रह्म दैवत्यं मुकूटे रुद्र दैवतं ।नादे सरस्वती चैव नागे नालादी दैवतं।।
याचा अर्थ असा होतो कि घंटीमध्ये वरच्या बाजूस ब्रह्मदेव व रुद्रदेव वास करतात , आणि घंटीच्या ध्वनी मध्ये सरस्वती आदी देवता वास करतात. सारांश असा कि घंटा हि दिसते कशी या पेक्षा तिचा ध्वनी सत्वशील व मंजुळ असणे अपेक्षित आहे.
