संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ४६ ते ५०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न अभंग क्र.४६

ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्घन वैकुंठी रया ॥
ते रुप सखोल कृष्ण रुपें खेळे । नंदयशोदेमेळें गोपीसंगे ॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखे ॥
तेंची हें रुपडे कृष्णनामें पिकले । यमुने स्थिरावले वेणू वार्ता ॥
ज्योतीरुपे कीर्ण अनंत विस्तार । ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥
निवृत्ति सोज्वळ नित्य नूतन सोय । आपणची होय गोपरुपे ॥

अर्थ: दृष्य द्रष्टा द्रष्यत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टानाने युक्त असे ते परब्रम्ह असुन ते चिद्घन अशा वैकुंठात राहते.ते परब्रह्म सगुण साकार होऊ नंद यशोदे सह गोपिकांशी खेळ खेळते.ज्याच्या अंगाच्या प्रकाशाने हे जगत प्रकाशमान होते तो सर्व सुख ज्याच्याकडे आहे आसा हा श्रीधर परमात्मा आहे.आशा ह्या परमात्माचे पुर्ण पिकलेल्या फळा सारखे कृष्णरुप जेंव्हा बासरी वाजवते तेंव्हा यमुनाही पांगुळते. त्या परमात्न्याच्या अलौकिक प्रकाशातुन निघणारा एक किरणातुन अनंत ब्रम्हांडे प्रसवत असतात.निवृत्तिनाथ म्हणतात आशी ही नित्य सोज्वळ सोय कृष्णरुपामुळे झाली असुन तो गोपरुपाने भक्ताशी एकरुप होतो.

गगनवाड दृष्टी सर्व तत्व शेखी अभंग क्र.४७

गगनवाड दृष्टी सर्व तत्व शेखी । जीव शिव शेखी कारण सिध्द ॥
तेची हे सांवळे स्वरुप गोजिरे । कृष्णनाम खरे नंदाघरी ॥
पृथ्वीचे तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥
निवृत्ति तत्पर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥

अर्थ: गगनाहुन जास्त लांब जाणारी दृष्टी असलेले परब्रह्मा मुळे जीव व शिवाची वाढ होते. ते सिध्द तत्व आकाशाहुन मोठे व सर्वांच्या परे आहे. तेच तत्व सगुण सावळे कृष्णरुप घेऊन नंदाच्या घरी अवतरले आहे. मोठेपणाचे माप असलेली पृथ्वी हि त्याच्या पायाशी असुन ते पृथ्वीपेक्षा विराट आहे. ते तत्व श्रीकृष्ण बनुन गोपीसवे क्रीडा करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वानंदासाठी तत्पर असुन त्यावर लक्ष ठेऊन हा आनंद नित्य उपभोगत असतो.

नेणती महिमा ब्रह्मादिक भद्र अभंग क्र.४८

नेणती महिमा ब्रह्मादिक भद्र । आणि ते महेंद्र नाना स्थानी ॥
ते रुप खेळत गौळी याच्या संगे । पुंडलिका मार्गे भीमातीरी ॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग । दुजियाचा संगनाही ज्यासी ॥
निवृत्ति प्रगट गुरु मंत्र फळद । गोपाळ विग्दद ब्रह्म सेवी ॥

अर्थ: ब्रह्मदेव, इंद्रादिक देव हे हि ह्या परब्रम्हाचे स्वरुप जाणत नाहीत. आपल्या स्थानीचे मुख्य असलेले सुर्य चंद्र शेषादी ही ह्या स्वरुपाला पासुन अनभीज्ञ आहेत. तेच स्वरुप कृष्ण रुप घेऊन गोपिकांबरोबर खेळते व तेच पुंडलिका साठी भीमातीरी आले आहे. त्या स्वरुपाला सुरवात व अंत ही नाही व असंग असल्यामुळे कोणाशी ही संग नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीच्या नाममंत्राचा सतत जप केल्याने त्या स्वरुपाची सेवा करुन तो मंत्र मला फलदायी झाला.

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठी अभंग क्र.५०

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठी । दुजियाची गोष्टी नाही तेथे ॥
ते रुप सुंदर देवकी उदरी । वसुदेवा घरी कृष्ण माझा ॥
ब्रह्मांड कडवा मनाचा वोणवा । साधिता राणिवा हारपती ॥
निवृत्ति सुंदर कृष्णरुप सेवी । गयनी गोसावी उपदेशिले ॥

अर्थ: जो परमात्मा ब्रह्मांड व वैकुठात नाही तो परमात्मा सर्वत्र व्यापक स्वरुपात ओतप्रोत भरला आहे. तेच सुंदर रुप कृष्ण होऊन देवकीच्या पोटी व वसुदेवाच्या तुरुंगात म्हणजे तो आल्याने झालेल्या घरात अवतिर्ण झाले. तो परमात्मा ब्रह्मांड व मनाला परे असुन तो मनाच्या जाणिवा पासुन दुर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोसावी गहिनीनाथांनी उपदेशामुळे मला ते कृष्ण रुप भोगता आले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading