👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८८
जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा । तुज वांचुनी केशवा अनु नावडे ॥१॥ जीवें अनुसरलिये अझुनी कां नये । वेगीं आणावा तो सये प्राणु माझा ॥२॥ सौभाग्यसुंदरू लावण्य सागरू । बापरखुमादेविवरू श्रीविठ्ठलु ॥३॥
अर्थ:-
श्रीकृष्णा तूं सर्व जीवांचा जीव, प्रेमाचे ही प्रेम असा आहेस. तुझ्यावांचून मला दुसरे काही आवडत नाही. सर्व भावाने मी तुला शरण आले आहे. पण तू अजून का येत नाहीस. त्यामुळे फार दुःख होत आहे. तो श्रीकृष्ण म्हणजे माझा प्राणच आहे. त्याला तुम्ही लवकर घेऊन येऊन माझी भेट करून द्या.त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे काय वर्णन करावे? सर्व सौभाग्य त्याचे ठिकाणी असून लावण्याचा तो साक्षात् सागरच आहे. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, यांना मी सर्व जीवाभावाने शरण आलो आहे.असे माऊली सांगतात.
