ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.1000

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग १०००

तुझी आण वाहिन गा देवराया । बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥ कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसी जीवापांसूनिया ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुराया । बहु आवडसी जीवापांसूनिया ॥३॥

अर्थ:-
हे देवराया मी तुझी शपथ घेऊन सांगतो तूं मला माझ्या जीवापेक्षाही अधिक आवडत आहेस. वास्तविक तूं भावभक्तिवांचून कळण्यास अत्यंत कठीण असा आहे. म्हणून मला मात्र श्रीविठ्ठला तूं अंतःकरणापासून म्हणजे भावभक्तिमूलक आवडत आहेस. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल मला अत्यंत जीवापासून आवडत आहेत असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा समाप्त

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading