ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 881

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८१

सांवळे परब्रह्म आवडे या जिवा । मनें मन राणिवा घर केलें ॥१॥ काय करूं सये सांवळें गोंवित । आपेंआप लपत मन तेथें ॥२॥ बापरखुमादेविवरू सांवळी प्रतीमा । मनें मनी क्षमा एक झालें ॥३॥

अर्थ:-

अति मोहक, शामसुंदर, परब्रह्म भगवान श्रीकृष्ण तो या जीवाला फार आवडतो. म्हणूनच मने मन म्हणजे आपल्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मसौख्य भोगण्यांस राजमंदिर केले. काय करावे ते सांवळे परब्रह्म माझ्या मनाला आपल्यांत अटकवून टांकते. म्हणजे मन सहजच तेथे लपून जाते म्हणजे एकरूप होते. माझे पिता व रखुमादेवीचा पती सांवळ्या प्रभेचा जो श्रीविठ्ठल त्याचेच ठिकाणी जाण्याचा मनाचा प्रवाह झाला आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading