ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 880

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८०

पांचा दमांचा घोंगडा नेसेन । उरली मोट ते मी जेवीन गे बाईये ॥१॥ कामारी कामारी कामारी होईन । या गोपाळाचें घर रिघेन गे बाईये ॥२॥ त्याचा उंबरा उसिसा करीन । वरी येरझार मी सारीन गे बाईये ॥३॥ निवृत्ति ज्ञानदेवा पुसशील वर्म । त्यासी कामीन पुरेन गे बाईये ॥४॥

अर्थ:-

भगवद्प्राप्तीकरता तळमळ लागलेली विरहिणी म्हणते घोंगडा म्हणजे वस्त्र ज्या वस्त्राला पाच पैशाचीसुद्धा किंमत नाही असे जाडे भरडे नेसेन. आणि त्या परमात्म्याचे जे उच्छिष्ट राहील ते मी जेवण करीन. त्याचे एका दासीच्या दासीची दासी होईन. पण या गोपाळाच्या घरांत त्याच्या प्राप्तीकरता शिरेन. त्याच्या घरांत मला शरीरभोगाची इच्छा नाही. त्याचे दारांत मी पडून राहीन. त्याच्या दाराचा उंबरा मी उशास घेईन. इतके कष्ट मी करीन पण मी माझी जन्ममरणरूपी येरझार मात्र चुकवीन. याचे वर्म निवृत्तीरायांनी ज्ञानदेवास विचारले तर त्यांची दासी होऊन मी सुद्धा उत्तर देण्यास पुरेन. असे माऊली ज्ञानदेव

सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading